"छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक – एक ऐतिहासिक पर्व"


🏰 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक – एक ऐतिहासिक पर्व

🔸 परिचय

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील एक सुवर्णक्षण होता. ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर झालेल्या या दिवशी मराठा साम्राज्याने अधिकृतपणे एक नवीन अध्याय सुरू केला. या राज्याभिषेकाने महाराजांना केवळ राजा नव्हे, तर एक सार्वभौम सम्राट म्हणून ओळख दिली.


🔸 राज्याभिषेकाची पार्श्वभूमी

शिवाजी महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने, शौर्याने आणि जनहितकारी धोरणांमुळे स्वराज्य उभं केलं. पण दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्याला त्यांच्या सामर्थ्याची भीती वाटत होती. शत्रू त्यांना केवळ एक बंडखोर म्हणून पाहत होते. म्हणूनच महाराजांनी औपचारिक राज्याभिषेक करून जगाला दाखवायचं ठरवलं की, मराठा स्वराज्य ही एक स्वायत्त आणि सत्ताधारी रचना आहे.

                     पिताश्री शहाजी राजांच अनुभवी कुशल मार्गदर्शन, आई साहेब जिजाऊंची प्रेरणा, सर्व जाती धर्मांतल्या निष्ठावान पराक्रमी मावळ्यांच अनमोल सहकार्य घेऊन व स्वचातूर्य, अविश्रांत पराक्रमांनी शिवाजीराजांनी पारतंत्र्याच्या अंधार खाईतून स्वातंत्र्य स्वराज्याचा सुर्योदय केला. व मराठी मुलुखाला सुखं दिल. स्वाभिमान दिला. 

एवढ मोठ स्वराज्य उभारल, तरीही ते थांबले नाहीत. स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी झटतच होते. त्यांनी स्वताला कधीही श्रेष्ठ-राजा समजल नाही. 
जे स्वराज्य निर्माण झाल ते सर्वांच्या प्रयत्नांनी व सर्वांच-सर्वांसाठीच आहे अशी त्यांची प्रांजळ सद्भावना होती. आणी म्हणूनच शत्रू त्यांना अजूनही राजा मानायला राजी नव्हते. शत्रू त्यांना बंडखोरच समजत होते.

ही बाब मासाहेबांच्या मनाला खटकत होती. आपल्या शिवबाला सर्वत्र राजा म्हणून मान्यता मिळाल्या शिवाय शत्रूवरही त्यांचा वचक राहणार नाही व प्रजेवरही जरब राहणार नाही स्वराज्यातल्या इतर शुभचिंतक, प्रामाणीक लोकांनाही असच वाटत होता तसे विचार ते मासाहेबांकडे मांडत होते ते त्यांनी हा विषय मासाहेबांकडे काढून आग्रह केला नी राजांना राजा होण्यासाठी राजी कराव असा आग्रह केला. 

एके दिवशी मासाहेब शिवाजी राजांना म्हणाल्या, शिवबा ! जगदंबेच्या कृपेन, महाराजांच्या प्रेरणेन, सर्व मावळ्यांच्या साथीन अपार कष्ट करून तुम्ही हे स्वराज्य उभारलत, आमच स्वप्न साकार केल, आम्ही धन्य झालोत! आता , या स्वराज्याला, मराठी मुलुखाच, आपल हक्काच राज सिहासन असायलाच हव. तुम्ही या राज्याचे राजे हावेल अशी आमची व सर्वांचीच इच्छा आहे. ती तुम्ही मान्य कराच!




🔸 राज्याभिषेकाची तयारी

आऊसाहेबांची ही सुचना ऐकून राजे प्रांजळ नम्रतेन म्हणाले, आऊसाहेब! आम्ही हा सर्व खटाटोप प्रजेच्या कल्याणासाठीच केला. आम्ही राजे हावेत म्हणून नाही. 

हे राज्य सर्वांचच आहे. त्यावर सर्वांचाच समान अधिकार आहे. सर्वानीच समान कष्ट करून अनमोल योगदान दिलेल आहे. हे स्वराज्य मावळ्यांच राज्य नावानेच ओळखल जाव अशी आम्हाला आशा वाटते.
Shivaji Maharaj Rajyabhishek in Marathi
Shivaji Maharaj 

                                        
त्यावर मासाहेब पुन्हा त्यांना समजावत म्हणाल्या, हे आपल थोरपण आहे राजे! हे राज्य मावळ्यांचंच आहे. आणि त्यांनी तुम्हाला राजा मानलेल आहे.

 त्यांना तुम्ही राजे म्हणून हवे आहात: प्रजेलाही तेच हव आहे! अस अनेक विचारांनी,त्याची आवश्यकता असल्याच सांगून त्यांना प्रवृत्त केलच. व राज्याभिषेक करून घ्यायला परवानगी मिळवलीच.

काशीचे विद्वान पंडीत गागा भट्ट हे या सुमारास शिवाजी महाराजांची पराक्रम व स्वराज्याची सद्कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आले होते काशीत असताना योगा राजा बनवण्याचा व त्यांच्या राज्याचा लौकीक वाढवण्याचा मनात निश्चय केलेला होता .कारण त्यांनी काशी, दिल्ली व इतर अनेक भागांत यवनी राजशाहीचे होणारे अन्याय अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहीलेले होते. 

शिवबांच स्वराज्य वाढून सर्वत्र सुख शांती लाभावी, त्यासाठी शिवरायांनी राजा व्हाव , राजगादी निर्माण करावी अशी त्यांना तळमळ होती. तशी सदीच्छा घेऊन से महाराष्ट्रात आले होते व सुयोग जुळून आले. मासाहेबांनाही तेच हव होत. त्यांनी त्वरित संमती दिली व तयारी सुरू झालीही.

मोरोपंतांकडे राजांच्या राज्याभिषेकाची सुत्रे सोपवण्यात आले. ते स्वतः लक्ष देऊन तयारी करून घेत होते. पोलादपूरच्या रामजी दत्तो चित्रे प्रभू या कुशल कारागीरांकडून स्वराज्यासाठी बत्तीस मण वजनाचे शुद्ध सोन्याचे व हिरे, माणके मोती पाचू अशा मौल्यवान रत्नांनी सजवलेले अप्रतीम कला कुसरीचे रत्नजडीत सिंहासन बनवून घेतले. 

मासाहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी शिवरायांनी प्रतापगडावर स्थापन केलेल्या भवानी मातेसाठीही तीन मण उतनाचे सोन्याचे रत्नजडीत सिंहासनावरील छत्र बनवून घेतले-तसेच कसब्याच्या गणपतीसाठीही दागीने अलंकार घडवून घेतले. सिंहासना सोबतच महाराजांसाठी पांढरे शुभ छत्र करवून घेतले त्यालाही रत्ने, माणकें, जडवून कशीदा करून मोत्यांच्या झालरींनी सुशोभीत केले होते. अशाच रत्नं माणकांनी सुशोभीत चामरही बनवून घेतले.

Shivaji Maharaj Rajyabhishek in Marathi
Shivaji Maharaj Rajyabhishek in Marathi

                                         

सप्त सागर ,सप्त नद्यांचे पवित्र जलाने भरलेले उदककुंभ मागवण्यात आले. जवळच्या तसेच दुरदुरच्या राजे, महाराजे, पंडीत, साधू, फकीर, आप्त स्वकीय, पाटील, देशमुख सरदार कलाकार व स्नेहीजनांना आमंत्रणं पाठवले. रायगडावर सुशोभीकरण करून सर्व तयारी जय्यत झाली. सर्वत्र आनंद ओसं- डायलागल्या. सुगंधी वारे आनंदाच उधाण घेऊन वहायला लागले.

राज्याभिषेकासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून आणि बाहेरूनही मान्यवर, ब्राह्मण, कवी, सेनानी, आणि शास्त्रज्ञांना आमंत्रित करण्यात आले. काशीहून गागा भट्ट या प्रख्यात ब्राह्मणाला आणण्यात आलं, ज्यांनी संपूर्ण विधी पार पाडला.

राज्याभिषेकाच्या आधी शिवाजी महाराजांनी सप्तशुद्धी व्रत पाळलं, आणि विधीपूर्वक होम, जप, यज्ञ यांचे आयोजन केले गेले.


🔸 राज्याभिषेक सोहळा

६ जून १६७४ रोजी रायगडावर भव्य दिव्य सोहळा पार पडला. सोनेरी वस्त्रं, रत्नजडीत सिंहासन, दुंदी वाजवणारे नागारे, आणि “छत्रपतींच्या जयघोषांनी” रायगड निनादून गेला. या दिवशी शिवाजी महाराजांनी 'छत्रपती' ही पदवी धारण केली.

सहा जून १६७४ , जेष्ट शुद्ध १२ शके १५९६ शुक्रवारचा शुभ दिवस उजाडला. रायगडाभोवती भव्य शामीयाने उभारलेले होते. गडावर ही भव्य मंडप उभारला होता. एक लाखापेक्षाही जास्त लोकं जमा झाले होते. सर्वांच्या मनात भावी राजा विषयीचा आदर ओतप्रोत भरला होता.

मुख्य समारंभाला आरंभ झाला. सप्तधातू व सात धान्यांची राजांची तुला करून ते सर्व गोरगरिबांना वाटायला दिल. शुचिर्भूत होऊन, पांढराशुभ्र पोषाख करून महाराज सोन्याच्या चौरंगावर येवून बसले, त्यांच्या शेजारी डाव्या बाजूला राणी सोयराबाईसाहेब व मागे युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. इतर राणीवसा व आप्तगण समोरच मासाहेबांच्या चौफेर बसले होते . 

मंगल वाद्ये वाजत होती. सर्वांच्या मनांतला पवित्र आनंद त्यांच्या स्वाभिमा चेहऱ्यांवरून ओसंडत होता. सर्वांची, पाहूण्यांची सरबराई, व्यवस्था केली जात होती

प्रथम महाराजांना सप्त सागर, सप्त नद्यांच्या आठ स्वर्ण कलशांतील शुद्ध जलाचा मंत्रोच्चारांच्या घोषात अभिषेक करण्यात आला. महाराजांनी राजवस्त्रे परिधान करून आई भवानीचे दर्शन घेतले. उच्चासनावर बसलेल्या मासाहेबांच्या चरणांवर नतमस्तक होऊन त्यांचा आशिर्वाद घेतला. गागाभट व इतर पंडीतांचा मंत्रघोष यावेळी सुरूच होता सिहासनाला वंदन करून एक एक पाऊल स्वाभिमानी ऐटीने टाकत महाराज सिंहासनावर चढले त्यावर आरुढ झाले. ते रत्नजडीत सिंहासन चांगलच लखलखत होता त्यावरील बारीक नक्षी- काम वाघ, सिंह, हत्ती, बैलं, हरणे, अश्व, मोर, पानं फुलं, फळं सर्व ठळक दिसत होत. त्यावर सर्वांच्या नजरा खिळत होत्या. त्या अष्टकोनी सिंहासनाच्या आठही खांबांना रत्ने जडवून सुशोभीत करण्यात आलेल होत. त्यांच्या शेजारीच अष्ठ नररत्नें-अष्टप्रधान मावळे अदब राखून उभे होते. 

 

महाराज सिंहासनावर आरूढ झाले नी गागाभटांनी पवित्र वेदोक्त मंत्रोच्चारात स्वर्ण- सोन्याची, चांदीची, रुप्याची फुले ओंजळी भरभरून त्यांच्या अंगावरून उधळली. गंध अक्षता लावून, मोतीलगाचा तुरा लावलेला रत्नजडीत राज मुकुट महाराजांच्या मस्तकावर ठेवला. आणि वरती छत्र धरून गंध अक्षता फुले उधळत राजांच्या नावाचा जयघोष करत “क्षत्रिय कुलावंतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज, की जय!" असा मोठ्याने जयजयकार केला. त्यांच्या मागोमाग तसाच जयघोष सर्वांनी बराच वेळपर्यंत केला. त्या जयजयकारात सारा आसमंत दुमदुमुन गेला. महाराणीसाहेब व युवराजांवरही तसाच फुलांचा वर्षाव झाला. त्यावेळी गडावरच्या तोफाड़ी कडाडल्या व त्या आवाजाने बुरूज थरारले सहयाद्रीच्या द-याखो-यातून थेट नभांगणभर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष निनादला व त्याचे प्रतिध्वनी थेट सागराला जाऊन भिडले. रायगडावरील बुरुजांवरच्या तोफांतून निघालेला तो प्रचंड ध्वनी जय शिवाजी। जय शिवाजी म्हणत घुमत होता व "शिवाजी महाराज छत्रपती झाले “! असा संदेश त्यातून मराठी मुलुखात-महाराष्ट्रात आणि भारतवर्षासह सर्व भूलोकांत निनादत होता.

शिवाजी राजे, महाराज, छत्रपती झाले. सिंहासनाधीश्वर झाले तो दिमाखदार सोहळा संपन्न झाला. गेल्या कित्येक वर्षांत असा सोहळा कुणी पाहीला किंवा ऐकलाही नव्हता. मात्र आता प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी पाहून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ते दिपून गेले जमलेल्या मान्यवरांनी भेटी नजराणे देऊन महाराजांचा सन्मान केला. इंग्रजांचा वकील हेनरीने, हिरेजडीत अंगठी, शिरपेच, सलकडी देऊन सन्मान केला इंग्रज फ्रेंच, डच असे परकीय व महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील इतर अनेक प्रांतांतील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थीत होते. अनेकांनी आणलेल्या नजराण्यांचा राजांनी स्विकार केला व त्यांना भेटी देऊन संतुष्ट केले. नंतर राजांची हत्तीवर बसवून मिरवणूक निघाली. 

या मिरवणूकीत अनेक कलाकारांनी आपल्या कला सादर करून पाहूण्यांच मनोरंजन केल. त्या सर्व कलाकारांना मोठी बक्षीसी देऊन राजांनी गौरवल. महाराजांनी आपल्या सोबत सतत धावपळ, पराक्रम करून स्वराज्यासाठी योगदान देणारया मावळ्यांचाही सन्मान केला जे लढ़ताना कामी आले होते. त्यांची आठवण करून त्यांची पत्नी मुलांना साडीचोळीचा, कपडयांचा आहेर देऊन गौरवल राजांनी मासाहेबांची स्वर्णतुला करून ते धन गोर गरीबांना वाटायला दिल.
  

Shivaji Maharaj Rajyabhishek  in Marathi
Shivaji Maharaj Rajyabhishek  in Marathi

                                                  

                                          

शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा स्वाभिमानी आनंदान संपन्न झाला. राजे सिंहासनाधीश्वर झाले ते छत्रपती झाले. त्यांनी स्वतंत्र मराठी स्वराज्य-साम्राज्याची घोषणा केली. सहा जून १६७४ पासून मराठी साम्राज्य भारत वर्षात संपूर्ण विश्वात मान्यता पावल. त्या दिवसा पासून राजांनी स्वतःच शक, शिवशक निर्माण केल ते शककर्ते राजे झाले. तसेच त्यांनी त्या दिवसापासून पारंपारीक होनांच्या जागी स्वताची नाणी प्रचलीत केली ती शिवमुद्रा त्यांना शहाजी राजांनी ते विजापूरला भेटीसाठी गेलेले असताना दिली होती. तीच मुद्रा चलनात आणून त्यांनी आपल्या वडीलांचा सन्मान राखला व त्यांनीच दिलेला ध्वज रायगडावर फडकवला. स्वतःचा राज्य व्यवहारकोष तयार करून घेतला. त्यांच्या या सर्व राज्याभिषेक सोहळ्याला सुमारे ४२ लक्ष होन खर्च झाल्याची इतिहासात नोंद आहे.

शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहून सर्वच भारावले, सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. तसच मासाहेबांनाही खुप खुप समाधान झाल. त्यांना आपला शिवबा जगात श्रेष्ठ व इंद्रापेक्षाही मोठा राजा झाल्याचा आनंद झाला, त्या तृप्त झाल्या . अशा या महाथोर छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र चरणी विनम्र अभिवादन!

जय शिवाजी!

लेखक- ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर
तोरनाळे जी. जळगाव ९४०३११९०८२
तर मित्रानो तुम्हाला  हा लेख  आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका






🔸 राज्याभिषेकाचे महत्त्व

  • मराठा साम्राज्याला एक अधिकृत ओळख मिळाली

  • हिंदवी स्वराज्याचा विचार जनतेपर्यंत पोहचला

  • मुघल आणि इतर सत्ताधीशांना एक सशक्त इशारा मिळाला

  • महाराजांचे नेतृत्व अधिक मान्यताप्राप्त झाले


📚 संदर्भ

  • गो. स. सरदेसाई – "शिवछत्रपती"

  • रा. ग. भांडारकर – "मराठ्यांचा इतिहास"

  • लोकमान्य टिळक – "शिवाजी महाराजांचा महिमा"


🖼️ 

Shivaji Maharaj Rajyabhishek  in Marathi
Shivaji Maharaj Rajyabhishek  in Marathi


📝 निष्कर्ष

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे केवळ एक धार्मिक किंवा औपचारिक विधी नव्हता, तर तो भारतीय स्वाभिमानाचा आणि स्वराज्य संकल्पनेचा एक जागर होता. आजही हा दिवस आपल्या इतिहासात अभिमानाने स्मरण केला जातो.












 






 





टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या