छत्रपती - राजाराम महाराज | Chatrapati Rajaram Maharaj Role in Marathi

Chatrapati Rajaram Maharaj Role in Marathi    14 फेब्रुवारी 1670 या दिवशी राणी सोयराबाईंनी सुंदर बाळाला जन्म दिला. दायी सुवासीनी धावल्या. 

बाळाला न्हाऊ घालून पाळण्यात टाकल आणि त्याच नाव ठेवल. राजाराम. राजाराम राजकुमार होते. 

प्रभू रामांसारख सौंदर्य त्यांना लाभल होत. त्या सुकुमार बाळाच सर्वांनी कौतुक केल. त्यांच्या आईन, आजीन बाळाला लाडाकोडात माया ममतेन वाढवल खेळवल. त्यांची सर्व काळजी घेतली. 

                                    
Chatrapati Rajaram Mharaj Role in Marathi
छत्रपती राजाराम महाराज भोसले


महाराजांना, शंभूराजांनाही बाळ राजारामांचा खुप लळा लागला. सर्वजण त्यांची काळजी घेत होते. त्याला खेळवत होते. बाळ वाढत होते. राजाराम मोठे होत होते. दुडूदुडू धावत होते. पळत होते. राजाराम आता चार वर्षांचे झाले होते.



Chatrapati Rajaram Maharaj Role in Marathi

                               राजगडावर आज आनंद सोहळा साजरा होता होता. शिवाजी महाराजांनी रात्रदिवस झटून, दऱ्या खोऱ्यातून ऊन्हा तान्हात रात्री अंधारात धावपळ करून उभारलेल्या स्वराज्याला अथक परिश्रमान संघटीत केलेल्या स्वतंत्र महाराष्ट्राला स्वतंत्र अधिष्ठान हव, स्वतंत्र राजाची राजधानी हवी म्हणून महाराज आज राज सिंहासनावर बसत होते. 

महाराष्ट्रातल्या ब्राम्हणांचा आपण क्षत्रिय नसल्याचा, आपणास राज्यभिषेक करून घ्यायचा अधिकार नसल्याचा विरोध खंडीत करून त्यांनी काशीच्या विद्वान पंडीत गागा 'Chatrapati Rajaram Mharaj Role in Marathi' भट्टांच्या हातून राज्याभिषेक करून व स्वतंत्र निर्माण केलेल्या हिरे, मोती माणकें पाचू लाऊन सजविलेल्या बत्तीस माण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. त्यावर वरुन सोन्याच छत्र धरण्यात आल.

 शिवाजी महाराज आज राजाधीराज सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले. मोठा आनंद सोहळा संपन्न झाला. सकळ महाराष्ट्र आनंदून गेला.

राजांचा राज्यभिषेक झाला तेव्हा बाळ शंभूराजे इकडून तिकडे मिरवत होते. त्यांच ते तेजस्वी बाणेदार स्वरूप सर्वांच्या डोळ्यांत चांगल सजत होत. तसचसिंहासनावर बसल्यानंतर महाराजांच्या मांडीवरील लहाणसे नजरा त्यांवर खिळून रहात होत्या. 

दोन्हीही राजकुमार भावी राजे म्हणून आपल ऐश्वर्य, साहस, बाणेदारपणा सहज प्रगट करत होते. संभाजी राजांना आईच प्रेम मिळाल नव्हत. तरी आजीन - जिजाऊ मासाहेबांनी त्यांना कधीही आईची आठवण येवू दिली नव्हती. उणीव भास्त दिली नव्हती. राजारामांना मात्र आई सोयराबाई व आजी जिजाऊ मासाहेब या दोघांचही भरपूर प्रेम मिळाल अपार माया, जिव्हाळा, आपुलकी मिळाली त्यांची थोर शिकवण मिळाली. सर्वांच्या कौतुकात लाडा प्रेमात बाळराजे राजाराम वाढत होते. लहाणाचे मोठे होत होते.

छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रभर सत्ता करून आता त्यांनी कर्नाटकात जायला निघाले. आता मात्र रायगडावर कारस्थान शिजायला लागलेल होत. कट रुजत होता. शिवाजी महाराजांच्या छत्रपती होणे, राजा सिंहासनावर बसणेला विरोध दर्शविणाऱ्या ब्राम्हण मंडळीनीच आता गुप्तपणान कारस्थानांना सुरुवात करून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणान कुभांड उभ करत होते. आणि स्वराज्याच्या कार्यात बाधा आणत होते. प्रथम त्यांनी संभाजी राजांनाच बदनाम करण्याच षड़यंत्र केल होत. 

संभाजीराजे आता चांगले जाणकार झालेले होते ते राजकारभारात लक्ष देत होते. संभाजी राजांसाठी शिवाजी महाराजांनी शिरकाणातल्या लक्ष देत होते. संभाजी राजांसाठी शिवाजी महाराजांनी शिरकाणातल्या गणोजी शिर्त्यांची बहीण येसूबाईंची निवड करून त्यांचा विवाह लाऊन दिलेला होता. येसूबाई सूनबाई लक्ष्मीच्या पावलांनी घरी आल्या.

                                              Chatrapati Rajaram Mharaj Role in Marath


शिवाजी राजांचा राज्यभिषेक झालेला होता. जिजाऊ मासाहेबांचे शिवबा आता राजे झाले होते. त्यांच्या सर्व आशा आई तुळजाभवानीन पूर्ण केल्या होत्या.
त्यांच पूर्ण समाधान झाल होत. आता त्यांच वयही झाल होत. त्या थकल्या होत्या. अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यातच त्यांच निधन 17 त ल 1674 रोजी झाल. त्यांच्या जाण्यान राजांनी व शंभूराजांनी खुप शोक केला. दुःख व्यक्त केल. स्वराज्याच्या राजमाता, छत्रपतींच्या आऊसाहेब, शंभूराजांना आई व आजीच प्रेम देणाऱ्या प्रेमळ आजींच निधन झाल. याआधीच झालेल होत. 

एकट्या मासाहेबांचाच आधार तोही काळाआड झाला होता. सहकाऱ्यांनी, थोर जेष्ठांनी राजांना दुःख विसरायला लावल. स्वराज्याच्या राज्यकारभारात लक्ष द्यायला लावल.

Chatrapati Rajaram Maharaj Role 


राज्याचा कारभार सुरळीत होत होता. सर्व मावळे सरदार शिपाई मंत्री अधिकारी निष्ठेने कामं करत होते. मात्र मोगऱ्याच्या बनात एखादा निवडूंग उपजावा तसे एकदोन अधिकारी आपला मतलब साधुन घेण्यासाठी अप्रत्यक्षपणान शिवराजांच्या अभिषेकाच्या वेळेच्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी कारस्थान करत होते. अण्णाजीपंत प्रभूणीकर हे यात सर्वांच्या पुढे होते. त्यांच्यासोबत त्र्यंबकपंत, राजुजी सोमनाथ व इतर मंडळींनाही त्यांनी आपल्या गोटात सामाऊन घेतल. या सर्वांना संभाजी राजांचा राज्यकारभारातला हस्तक्षेप घेतल. या सर्वांना संभाजी राजांचा राज्यकारभारातला हस्तक्षेप सहन होत नव्हता.

 ते संभाजींच्या विरुध्द कांगावा करून थोरल्या महाराजांकडे तक्रारी करत होते. संभाजी राजांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते.
अशा या सर्व उपाधी टाळण्यासाठीच छत्रपती महाराजांनी कर्नाटकची मोहिम आखली होती. संभाजी राजेही या मोहिमेवर राजांच्या सोबतच जाणार होते. मात्र ते तिकडे चांगला पराक्रम गाजवतील. 

शत्रूवर विजय मिळवतील. महाराजांची मर्जी संपादन करतील आणि मग मोहिमेहून परत आल्यावर महाराज शंभूराजांना आपला उत्तराधिकारी वारस घोषीत करतील. संभाजींचा सन्मान वाढेल आणि आपणाला त्यांना मुजरा करावा लागेल. त्यांच्या अधिकाराखाली जगाव लागेल. आपला कोणताही हेतू साध्य होणार नाही. याची त्या विरोधकांना खात्री होती. 

म्हणूनच त्या सर्व विरोधकांनी मिळून राणीसाहेब सोयराबाईंना फितवणी दिली. सोयराबाई राणीसाहेब तशा सरळ स्वभावाच्या होत्या. विरोधकांनी त्यांना सर्व परिस्थिती सांगून संभाव्य राजकारणाचा सविस्तर पतशील सांगितला. संभाजींच्या धाडसी तापट स्वभावाची जाणीव करून दिली. आणि अशा या राजांसमोर आपल्या बाळराजे राजारामांना लाचारीन जगाव लागणार. 

त्यांच्याकडून नेहमी अपमानीत जीवन जगाव लागणार. खरतर संभाजीराजे राजसिंहासनावर बसण्यास योग्यही नाहीत. त्यासाठी आपले राजारामच सर्वार्थान योग्य आहेत. त्यांनाच राजगादीवर बसायला हव. थोरल्या महाराजांनी काबाड कष्टान, अथक परिश्रमांनी निर्माण केलेल हे स्वराज्य त्या संभाजींच्या हाती देऊन स्वराज्याच नुकसान करून घेण्यापेक्षा आपल्या राजारामालच गादीवर बसवायला हव आणि बाईसाहेब, तुम्हीच राजमाता होऊन ते सांभाळायला हव ! अशा अनेक प्रकारांनी सांगून त्यांनी सोयराबाईंच मन वळवल. त्या या असल्या राजकारणापासून पुर्णतः अनभिज्ञ होत्या. अजाण  होत्या त्यांनी त्या सर्व अधिकाऱ्यांच्या म्हनण्याला रुकान होकार दिला व त्यांच्याच सांगण्याप्रमाणे राजांच्या जवळ हद्द धरला की, उद्या आपण मोहिमेवर जाताना शंभू राजांना सोबत नेवू नये.

मोहिमेवर जायची सर्व तयारी झालेली होती. शंभूराजेही तयारी करून उत्साहान सज्ज झालेले होते अशा वेळी सोयराबाईंनी असा आग्रह का धरावा ? अयोध्येतराम राजा होणार Chatrapati Rajaram Maharaj Role in Marathiहोते तेव्हा कैकयीने देखील असाच हट्ट धरून दशरथांना अडचणीत आणल होत व प्रभूरामांना वनवास भोगावा लागला होता. शिवाजी राजांनी ओळखल। सोयराबाईंचा बोलविता धनी वेगळाच आहे. कारस्थान्यांनी डाव साधला आहे आता सावधानतेन वागायला हव. त्यांनी संभाजी राजांना समजवल व आपणाला आमच्यासोबत येता येणार नाही हे सांगितल. संभाजी राजे थोर आज्ञाधारक होते. त्यांनी राजांची आज्ञा मान्य केली. राजांनी त्यांना रायगडावर न थांबता संगमेश्वराला जाऊन रहायला सांगितल. 

राजांची मोहीमेवर जायची तयारी झालेलीच होती. राजे सैन्यांसह सर्व लवाजमा घेऊन मोहीमेवर निघाले. शंभूराजेही त्यांच्यासोबत संगमेश्वरापर्यंत आले. मार्गात बालेकांत चर्चा, मसलत झाली. राजांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संगमेश्वराहून महाराज निघून गेले.

संगमेश्वरात संभाजी राजे त्या प्रांताचे सुभेदार म्हणून रहात होते. त्यांनी थोड्याच दिवसांत तेथील प्रजेत थोर जिव्हाळा, आपुलकी निर्माण केली. आदर्श राज्यकारभार करून चांगला लौकीक मिळवला. प्रजेच्या हिताची अनेक कामे केली. दुःष्काळात शेतकऱ्यांचा सारा माफ केला. या सर्व वार्ता रायगडावर जाऊन पोहचत होत्या. तिथले अधिकारी मंडळी कारस्थान करून संभाजींच्या कामाळ्या केलेले पत्र खलीता शिवाजी राजांकडे पाठवून दुषीतपणाची रोपणी करत होते. तसेच ते संभाजीराजांनाही पत्रे पाठवून अपमानीत करत होते. 

संभाजी राजांनी दुःष्काळात जो सारा माफ केला होता तो मोडीत काढून रायगडावरून माणसं येवून शेतकऱ्यांच्या जमिनीवर जप्ती आणायला लागले. यामुळे संभाजी राजांचा अपमान झाला. असाच अपमान त्यांना सतत सहन करावा लागत होता. विरोधकांच्या कारस्थानाला बळी पडाव लागत होत. राणी येसूबाई त्यांना धिरदेत होत्या. महाराज येईपर्यंत थांबायला सांगत होत्या. महाराजांच्या पश्चात, त्यांच्या मागे कोणतेही बंड करणे उचीत होणार नाही हे पटून, जाणून संभाजीराजे शांत रहात होते. नी महाराजांच्या येण्याची वाट पहात होते.
शिवाजी महाराजांनी कर्नाटकात मोठा पराक्रम करून दिग्वीजय मिळवला. अनेक राजांना पराभूत केल तर अनेकांना मांडलीक बनवल. अनेकांचा सन्मान मिळवला. आणि दिग्वीजय मिळवून ते सुमारे दोन वर्षांनंतर स्वराज्यात परतले. स्वराज्यात आल्यानंतर ते पन्हाळ गडावर थांबले होते. 

संभाजी राजांना वाटले आता महाराज आपल्याला भेटीसाठी बोलवण करतील. म्हणून ते पन्हाळ्यावरून महाराजांच्या पत्र येण्याची वाट पहात होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना भेटीसाठी न बोलावता लिहिले होते. आमच्या पश्चात आपण स्वराज्याच्या अहिताची कामें केली. सारा माफ करून राज्यकारभारात बाधा आणली तुर्त आपण तेथेच थांबावे इकडे यायची घाई करू नये ।
खलीता वाचून संभाजी राजांच्या तळपायांची आग मस्तकाला जाऊन भिडली. आबासाहेबांनी एवढा कठोर निर्णय घेण्याआधी थोडतरी ऐकून घेणे गरजेच होत. अस त्यांना वाटत होत. मन बेचैन होत होत. डोळे भरून येत होते. मन मोकळ करायला आऊसाहेबही राहील्या नव्हत्या. महाराजांना उलटून जाब विचारण्याच त्यांना धाडस झाला नाही. येसूबाईंनी त्यांना धिर दिला.

 गडावरच्या अधिकारी लोकांचच हे कारस्थान आहे हे ओळखायला त्यांना वेळ लागला नाही. जगदंब, जगदंब ! म्हणत भवानीचे चिंतन करत ते शांत राहीले. मध्यंतरी मुघल सरदार ते दिलेरखान सतत मैत्रीचा हात पुढे करून सहानुभूती दाखवत होताच म्हणून काही दिवस दिलेरखानाकडेही गेले. मात्र तिथेही त्यांच्या मनाची घुटमळ होतहोती म्हणून ते परत आले व पन्हाळगडावर येवून रहायला लागले. आणि महाराजांच्या हुकुमाची प्रतिक्षा करायला लागले.

कर्नाटकचा विजय मिळवून महाराज पन्हाळ गडाहून राजगडावर आले, राजधानीत आले. आता तेथील चित्र पार बदलून गेलेल होत. विरोधक सोयराबाईंना पुढे करून आपली बाजू बळकट करून बसले होते. महाराजांनी हे सर्व ओळखल. आपण संभाजी राजांना समजून न घेता त्यांच्याशी गैर वागलो याची खंत त्यांना वाटायला लागली. ते संभाजी राजांना भेटायला पन्हाळगडावर आले. 

 Chatrapati Rajaram Maharaj 

दोन्ही बापलेक एकमेकांना भेटून खुप खुप समाधान पावले. संभाजी राजांनी महाराजांपूढे आपल मन मोकळ केल. सारी व्यथा सांगितली महाराजांनी तयांना धिर दिला. शांत रहायला सांगितल. राजकारणातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. स्वराज्याचा विस्तार त्यांच्या सीमा, धनदौलत ऐश्वर्याचा सर्व तपशील सांगितला. कसे आहेत त्यांच्याशी कस वागायच. आपल्यातल्या कारस्थानी लोकांशी शत्रू कस वागायच. स्वराज्याची पुढील जबाबदारी वगैरे सर्व सांगून प्रजेच्या हिताच्या गोष्टी सांगून पूर्णतः समाधान पावून व संभाजी राजांचा निरोप घेऊन ते रायगडावर परत आले.

महाराजांना आता गुडघे दुखीन ग्रासल ते सतत आजारी रहायला लागले. राणी पुतळाबाई व राणी सोयराबाई त्यांची सेवा करत होत्या काळजी घेत होत्या व लहाणसे राजाराम त्यांच्या अवती भवती राहून आबासाहेबांना अनेक प्रश्न विचारून अनेक माहीती जाणून घेत होते. महाराजही त्यांच्याशी गप्पा करत गोष्टी सांगत उपदेश करत वेळ घालवत होते. तरी महाराजांच दुखण दिवसेंदिवस वाढतच होत. वैदयं औषधं देत होते मात्र उतार पडत नव्हता. आजार वाढतचहोता. प्रकृती क्षिण होत होती.

त्यांच फिरण कमी झाल आता आणखी त्यांच्या जास्त जगण्याच्या आशा कमी झाल्या म्हणून सर्वानुमते महाराजांसमोर राजारामांच लग्न उरकुन घ्यायच ठरल आणि ताराबाई या सदगुणी मुलीसोबत राजारामांचा विवाह संपन्न झाला. 

राजारामांचा विवाह झाला तेव्हा त्यांना दादासाहेब सोयरा बाईकडे विचारणा केली. म्हणाले दादासाहेब आमच्या लग्नाला का आले नाहीत ? असा सवाल अनेक वेळा विचारला तेव्हा त्यांनी, ते तिकडे लढाईत गुंतलेले आहेत अस सांगून वेळ निभाऊन नेली. मात्र त्यान राजारामांच समाधान झाल नाही. 

त्यांना ती खंत मनात बोचत होती. खरतर विरोधकांनी संभाजी राजांपासून ही वार्ता जाणून बुजुनच दूर ठेवलेली होती. त्यांना पन्हाळ्यावर लग्नाच निमंत्रणच पाठवलेल नव्हत. मुद्दामच टाळलेल होत.
                                            Chatrapati Rajaram Maharaj Role in Marathi

राजारामांच लग्न झाल. आनंद झाला व समाधानही झाल. मात्र महाराजांची तब्येत काही सुधारत नव्हती. दिवसेंदिवस ते क्षिण होत होते. दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी महाराजांच निधन झाल. स्वराज्याचे उदगाते निर्माते सह्याद्रीच्या कुशीत चिरनीद्रा घ्यायला जाऊन सर्व जगत अमर झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच निधन झाल. गडावरील साबाजी भोसले शिंगणापूरकर व बाळराजे राजारामांकडून त्यांचे सर्व अंतविधी करवून घेतल्या. महाराजांच्या निधनाची वार्ता बाहेर पसरू नये याची रायगडावरील सर्व विरोधकांनी काळजी घेतलेली होती.

लेखक : डॉ. ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर
तोरणाळे , ता. जामनेर , जी. जळगाव

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या