वढू तुळापूरी काळ थरकला,
घात करवला फितूरीन ।। धृ ।।
यश ना मिळाले कधी मुघलांना
फितुरीने कैद केले संभाजींना,
घात करवला फितूरीन ।। धृ ।।
यश ना मिळाले कधी मुघलांना
फितुरीने कैद केले संभाजींना,
दिल्ली पती बादशहा डरला मऱ्हाठ्यांना
विजयी ठरला मऱ्हाठ्यांचा बाणा
विजयी ठरला मऱ्हाठ्यांचा बाणा
सम्राट होणारा मनी चरकंला
हाल हाल केले आमीष दावीले
हाल हाल केले आमीष दावीले
कंवि कुलेशांचे मरण दावीले,
स्वाभिमानी राजे रागान बोलीले
स्वाभिमानी राजे रागान बोलीले
सिंहाचा छावां क्रोधे गरजला ।।
लांडग्यांनी वाघाला छळीले फार
हाल हाल करुन केले ठार
हाल हाल करुन केले ठार
स्वराज्यावर राजांचे प्रेम होते फार
मरुनही औरंग्याला दिला त्यांन मार
महाराष्ट्र सारा उपकारला ।।
मरुनही औरंग्याला दिला त्यांन मार
महाराष्ट्र सारा उपकारला ।।
लेखक: डॉ. ज्ञानेश्वर जाधव, विटनेरकर


0 टिप्पण्या