I salute C - Jijai
वंदन मी करते ग् जिजाबाईला
शिंदखेड राजा गाव वऱ्हाड प्रांताला,
वंदन मी करते ग् जिजाबाईला ।।!धृं।।
लखुजीरांव म्हाळसाबाईंची लाडाची लेक
रुप गुण चातुर्याची हिरकणी एक
मानती ते पाचवा मुलगा लेकीला ।।
रुप गुण चातुर्याची हिरकणी एक
मानती ते पाचवा मुलगा लेकीला ।।
बाळपणाच काय त्यांच सांगू कौतूक
तलवारबाजी घोडेस्वारी खेळ कित्येक
सुखं वैभवाचा काळ त्यांनी पाहीला ।।
तलवारबाजी घोडेस्वारी खेळ कित्येक
सुखं वैभवाचा काळ त्यांनी पाहीला ।।
महापराक्रमी वीर शहाजी भोसले
जिजाबाईसाठी राजे पंती शोभले
जिजाबाईसाठी राजे पंती शोभले
लक्ष्मीवानी घरी आल्या सोडून आईला ।। .
शहाजी राजे पराक्रमी मोठे सरदार
मोहीमां लढाया करती सोडून घरदार
जहांगीरीत शिवनेरीवर मुक्काम घडीला ।।
मोहीमां लढाया करती सोडून घरदार
जहांगीरीत शिवनेरीवर मुक्काम घडीला ।।
भोसल्यांचा कुलदिपक शिवाजी जन्माला
जिजाबाईला महाराष्ट्रभर आनंद झाला
मऱ्हाठ्यांचा भावी राजा मातेन घडवीला ।।
जिजाबाईला महाराष्ट्रभर आनंद झाला
मऱ्हाठ्यांचा भावी राजा मातेन घडवीला ।।
शिवरायांचा स्वराज्यभिषेक सोहळा पाहून
जिजाऊ म्हणती शिवबा माझा श्रेष्ठ इंद्राहून
शिंदखेडी येवून. नानान पोवाडा गायीला ।।
जिजाऊ म्हणती शिवबा माझा श्रेष्ठ इंद्राहून
शिंदखेडी येवून. नानान पोवाडा गायीला ।।

0 टिप्पण्या