🔥 माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे | 🚩 इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घ्या | मराठ्यांचा गौरवशाली इतिहास | वीरांच्या कथा | नवीन लेख रोज उपलब्ध! 🚩 🔥

बाबूराव - शेडमाके | Adivasi Krantiveer Baburao Shedmake Biography

Marathisamarajya
0

 Adivasi Krantiveer Baburao Shedmake Biography बाबूराव शेडमाके
महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात १२ मार्च १८33 रोजी चपराना बु बुमपालीत बाबूराव शेडमाके यांचा जन्म झाला 

राजगोंड घराण्यातील रामराय हे त्यांचे वडील त्यांच्या आईच नाव झुरजाबाई होता बाबूराव हे बालपणापासून श्रीमंतीत वाढलेले असले तरी सुसंस्कारी आज्ञाधारी होते. 
                                                     
                                                                       
Adivasi Krantiveer Baburao Shedmake Biography
 Adivasi Krantiveer Baburao Shedmake 

                                                          

वडीलांनी त्यांना लहाणपणापासूनच कुस्ती, तलवार, तीर, गुलर अशा प्रकारच शिक्षण दिण्याची व्यवस्था केलेली होती. तसेच गोटूल येथील शाळेत शिकायला टाकल व नंतर पुढे ब्रिटीश सरकारच्या एज्यू केशन शाळेत रायपूरला मध्यप्रदेशात घातल


 Adivasi Krantiveer Baburao Shedmake Biography

बाबूरावजींचं जेव्हा शिक्षण पूर्ण शिक्षण झाल तोपर्यंत सभोवतालची सामाजीक परिस्थीती खुपच बदललेली होती. इंग्रजी सत्तेचा अंमल  'Adivasi Krantiveer Baburao Shedmake Biography' वाढला होता. ते जमीनदार व्यापारी, सावकारांना हाताशी धरून आपली सत्ता वाढवून, हुकूमत दंडपशाही करून गोरगरीबांना छळत होते.

 त्यांच्याकडून जास्तीची कर वसुली करत होते. आदि वासींचे जंगलातील साधनसंपत्ती वरील पारंपारीक हक्क काढून ते जमीनदार सावकारांना देत होते. आणी इंग्रजांच्या अभयान जमीनदार व्यापारी, सावकार मुजोर होऊन वागत होते. 

गरिबांच्या, आदिवासीच्या जमीनी व्याजाच्या अतिरेकान बळकावत होते. व गरीबांवर आदिवासींवर अन्याय, अत्याचार करत होते. त्यांचे ते हाल पाहून प्रामाणीक, सद्वर्तनी बाबूरावांच्या मनात तळमळ होत होती. आपण जमीनदार आपले कर्तव्य आहे त्यांना सावरायच, त्यांच दुःख निवारण करायचा असे प्रांजळ विचार त्यांच्या मनात यायचे.

बाबूरावांनी आपल्या सारखेच समविचारी मित्र जोडले. त्यांना आपल्या मनातले विचार सांगीतले त्यांनाही ते पसंत पडले. आणी त्यांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत! अस म्हणून सहकार्याच आश्वासन दिल. त्या साथीदारांत सर्व जाती धर्मातले लोकं होते. 

जे इंग्रज आणी सावकार जमीनदारांच्या अत्याचारांची शिकार होऊन भरडून निघत होते. त्यांनाही आपला कैवार घेणारा, मुक्ती मिळ- वून देणारा बाबूरावांचा अभिमान वाटला ते निष्ठेन तयार झाले.


 Adivasi Krantiveer Baburao Shedmake


बाबूराव सुशिक्षीत होते संयमी होते. तसे तेधाडसीही होते. पराक्रमी होते ते रानांत शिकारीला गेले असताना त्यांच्यावर दोन वेळा वाघाने झडप घालण्याचे प्रसंग आले मात्र त्यांनी मोठ्या चपळाई धैर्यान त्यांचा सामना केला होता.

 आपल्या सुशिक्षीत पणाचा फायदा त्यांनी नेहमी नियोजन करण्यात केला नी तो सार्थ केला. कोणतेही काम करण्यापुर्वी ते नियोजन करायचे असच त्यांनी नियोजन करून इंग्रजां विरोधात बंड पुकारल

गावोगावी आपले विश्वासु हेर पाठवून ते गरीबांना छळणाऱ्या व इंग्रजांना साथ देणाऱ्या सावकारांचा शोध घेऊन व त्यांना लुटून त्यांच्याकडच धन आदिवासी गरिबांना वाटल. व यामुळे त्यांचा   Adivasi Krantiveer Baburao Shedmake Biographyदरारा वाढला. जनतेचा त्रास कमी झाला. आणी महत्वाच म्हणजे इंग्रजांचे बळही कमी झाल.

 तसेच विकासाच्या नावाखाली इंग्रज लोक आदिवासींच्या काही लोकांना कुटुंबांना बाटवत होते त्यावरही बाबूरावांनी अंकुश लावला. चांदागड येथील मिशनरींवर हल्ला करून त्यांना झोडपून काढल. 

दि. २४ सप्टें बर १८५६ रोजी त्यांनी आपल्या साथीदारांच्या सेनेची घोषणा केली. त्या सेनेला जंगोन हे नाव दिल. त्यात सुमारे पाचशे लोक होते ते सर्व धाडसी, निष्ठावान, पराक्रमी होते. 

आता त्यांना व्यंकटराव नावाचे अन्याया विरुद्ध लढणारे समवीचारी पराक्रमी जोडीदार येवून मिळाले. त्यांच्याकडेही त्यांच स्वतःच सैन्य होत.

रामगडचा रामशहा गेडाम हा मोठा जमीनदार इंग्रजांना सहाय्य करून गरीब आदिवासींवर अत्याचार करतो अशी माहीती मिळाली तेव्हा बाबूरावांनी चौकशी व नियोजन करून ७ मार्च १८५७ रोजी हल्ला करून तो ताब्यात घेतला. याची खबर मिळताच कैप्टन क्लिस्टन रागान भडकला. 


 Krantiveer Baburao Shedmake

त्यान १३ मार्च १८५८ रोजी राजगडावर हल्ला केला मात्र बाबूरावांनी आपल्या साथीदारांसह त्याचा कडवी झुंज देवून प्रतिकार केला नी पळवून लावल. त्याआधी पहिला हल्ला बाबूरावांनी नांदगाव घुसरी येथे इंग्रजी सेना येताना पाहून गनीमी काव्यान झडप घालून घायाळ केलेल होत. 

या दोन्ही पराभवांचा बदला कॅप्टन क्रिस्टल घेईलच अशी खात्री बाबूरावांना होतीच. ते सुज्ञपणान सतर्क होते. म्हणून ते कडीचूर्ला पहाडावर जाऊन लपले. दि. 30 मार्च १८५८ रोजी अर्ध्या रात्री नंतर पहाटे चार वाजता किस्टनने इंग्रजी सैन्य घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. मात्र आधीच सावध असलेल्या बाबूरावाच्या सैन्यान पहाडावरून दगडांचा मारा करून त्यांना घायाळ केल' वरून दगडांचा मारा होत होता. 

मात्र खालून इंग्रजांच्या बंदूकांच्या गोळ्या वर पोहचत नव्हत्या त्या दगडांचा मार लागून अनेक इंग्रज शिपाई मेले काही घायाळ झाले तर काही जीव घेऊन पळत सुटले. त्यांना पळवून लावल्यावर बाबूराव आणी त्यांच्या साथीदारांनी पहाडाखाली येवून इंग्रजांच्या बंदुका, तोफा जमा करून घेतल्या व धान्याचा मोठा साठाही मिळवला ते धान्य त्यांनी गरिबांना वाटून दिल

दि. १९ एप्रील रोजी १८५८ रोजी इंग्रजांनी सगमापूर आणी एरीज चिचपूडी या दोन्ही ठिकाणी बाबूरावांच्या सैन्यावर निक राचा हल्ला केला आणी यावेळी देखील दोन्ही ठिकाणी इंग्रजांची हार झाली बाबूरावांचाच विजय झाला. यावेळीही अनेक इंग्रज शिपाई मारले गेले. आता मात्र इंग्रजांच्या आधुनीक हत्यारधारी सैन्याची चांगलीच नाचक्की झाली. याची खबर थेट इंग्लंड मधे व्हिक्टोरीया राणीपर्यंत जाऊन भिडली. राणीने सक्त ताकीत देवून बाबूरावाचा बंदोबस्त करायला सांगितल. काहीही करुन जिंदा या मुर्दा पकडायचे आदेश दिले.

कॅप्टन क्लिस्टनने आता वरिस्टांच्या मार्गदर्शनाने नागपूरच्या कॅप्टन सेक्सपीयरची आणी झाशीच्या राणी लक्ष्मी बाईची मदत घेतली. तसेच राजेश्वर जमीनदार यांचीही मदत घेतली. त्यांना ९१ गावांची जहागीरी देण्याच जाहीर केल.

 त्या तिघांनी इंग्रजांच्या सैन्याला मदत करून घोट येथे बाबूरावांच्या सैन्यासोबत लढाई केली. ही लढाई त्यांच्या आतापर्यंतच्या लढायां तील सर्वात मोठी लढाई होती यात दोन्ही कडचे अनेक लोक मारल्या गेले. बाबूरावही कैद झाले. मात्र ते शिताफीन निसटले शत्रूच्या हातात सापडूनही बाबूराव निसटण्यात यशस्वी झाले मात्र आता त्यांचे बरेच साथीदार मारल्या गेलेले होते तर काही पांगलेले होते. व्यंकोजी हे देखील पांगलेले होते. इंग्रजांनी आता त्यांच्या सर्व जमीनी बळकावून घेतल्या. बाबूरावांचीही जमीन बळकवली. आणी त्यांच्या मागावर रोहिल्यांना सोडल. ते बाबूरावांचा शोध घेत फिरत होते मात्र बाबूराव काही सापडत नव्हते. 

इंग्रजांनी आणखीबाबूरावाला पकडून देणाराला बक्षीसी जाहीर केली. बाबूरावांच्या गावाला आग लावली. व त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. आणी विश्वासघातकी भाऊ बंदकीने फितूरी करून त्यांना पकडवून दिल. त्यांच्याच भावकितल्या एकान विश्वासघातान इंग्रजांसोबत संगनमत करून फितूरीन बाबूरावांना पकडवून दिल.

बाबूरावांना पकडल्यावर कॅप्टन क्लिस्टनने त्यांना मोठ्या बंदोबस्तात ठेवल व चांदागडच्या जेलमधे ठेवल आणी देशद्रोही ठरवून दि. २१ आक्टोबर १८५८ रोजी  "Adivasi Krantiveer Baburao Shedmake Biography"दुपारी चार वाजता फाशी दिली. वयाच्या २५ व्या वर्षी ते हसत हसत फासावर गेले. फाशी देताना त्यांच्या फासाचा दोर तीन वेळा तुटला होता. असे सांगीतले जाते. चांदागडच्या जेलमधे पिंपळाच्या झाडाला लटकवून त्यांना फाशी देण्यात आली. तसेच त्यांच्या सोबत पकडलेल्या साथीदारांना १४ वर्षे कारावासाची शिक्षा झाली.
लेखक : ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
3/related/default