भुवैकुंठ पंढरपूर – संत तुकाराम महाराजांच पवित्र वैकुंठगमन

भुवैकुंठ पंढरपूर – संत तुकाराम महाराजांच पवित्र वैकुंठगमन

पंढरपूर हे महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तीचा प्रमुख केंद्र आहे. 


pandharpur temple information in marathi
 pandharpur temple information in marathi

इथेच संत तुकाराम महाराजांनी अनेक भक्तीगीते गायली आणि विठोबाची भक्ती सर्वत्र पसरवली. त्यांचा वैकुंठगमन, म्हणजेच 'भुवैकुंठ' प्रवास, ही भक्तीच्या परंपरेत एक अत्यंत पवित्र आणि अद्भुत घटना मानली जाते.

संत तुकारामांनी संपूर्ण जीवन भक्ती आणि समाजसेवेत घालवले. त्यांच्या भक्तांच्या मनात त्यांचा दिव्य गोंधळ कायम राहिला आहे. भुवैकुंठ पंढरपूरमध्ये तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाची कथा भक्तांच्या श्रद्धेला नवा अर्थ देते.

वारी आणि विठ्ठल भक्तीच्या या समृद्ध परंपरेत, भुवैकुंठगमनाचा प्रसंग एक अद्वितीय अध्यात्मिक अनुभव मानला जातो. तुकाराम महाराजांच्या जीवनातील हा भाग त्यांच्या भक्तांसाठी एक प्रेरणादायी संदेश देतो, की आत्मा मुक्त होऊन देवाच्या जवळ जातो.

पंढरपूर हे केवळ एक मंदिर नाही, तर महाराष्ट्रातील लोकांच्या भक्तीचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. येथे दरवर्षी होणारी वारी हजारो भक्तांना एकत्र आणते आणि त्यांचा जीव ओतून भक्तीचा अनुभव देते.

पूर्वीच्या दिंडीरवनात वसलेले भूवैकुंठ दक्षिण काशी, संताचे माहेर असे श्री क्षेत्र पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर आहे. 

श्रीकृष्ण अवतारातील मुचुकंद पुंडलीक होऊन लोहदंडा जवळ राहात होता. तो आई-वडिलांची सेवा न करता पत्नीची सेवा करायचा. 

एकदा तो वाराणसी यात्रेला निघाला. मार्गात त्याचा मुक्काम कुक्कुट मुनीच्या आश्रमात झाला. त्याने त्यांना काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला. कुक्कुट ऋषी म्हणाले, की काशीचा मार्ग माहित नाही कारण ते तिथे कधी गेले नव्हते.

भक्त पुंडलिक ऋषींची थट्टा करीत म्हणाले, की त्याच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला जायलाच पाहिजे. कुकुट ऋषी शांत राहिले.
                                                               
संत तुकाराम महाराजांचे भुवैकुंठगमन
bhuvaikunth-pandharpur-tukaram-maharaj




रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाने स्त्रियांचा आवाज ऐकला. काय घडले आहे ते पाहण्याकरिता तो बाहेर आला आणि त्याने पाहिले की आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून ते स्वच्छ करत आहे. 

चौकशी केल्यावर कळले की ह्या तीन महिला म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती आहेत आणि ते कुकुट ऋषींच्या आश्रमास स्वच्छ करण्यासाठी आल्या आहेत.

 पुंडलिकाला आश्चर्य वाटले की कुक्कुटसारख्या संताने काशीला भेट दिली नव्हती आणि तीन पवित्र नद्या त्यांचे आश्रम शुद्ध करण्यासाठी  'pandharpur temple information in marathi' आल्या होत्या. तीन महिलांनी पुंडलिकाला सांगितले की धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसून केवळ कर्म करण्यावर अवलंबून आहे. 

त्या तीन स्त्रियांनी त्यांना सांगितले की ऋषी कुकुट यांनी आपल्या आईवडिलांची मनोभावे सेवा केली, त्यांनी आई-वडिलांचरणी आयुष्य समर्पित केले आहे. 

अशाप्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी पुण्य जमा केले आणि आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणले. पुंडलिकाने त्यांच्या आई वडिलांना सोडले होते आणि मोक्ष व आशीर्वाद मिळवण्यासाठी काशीला जात होते.

आपल्या आई-वडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती त्याने पूर्ण केली नाही. हे ऐकून पुंडलीकाला खूप पश्चत्ताप झाला. तेव्हापासून तो रोज नियमाने मातापित्यांची सेवा करायला लागला. 

pandharpur temple information 

मागे मुचुकुंदाला दिलेल्या वचनाला स्मरून श्रीकृष्ण विठ्ठल होऊन पुंडलीकाच्या भेटीसाठी आले. तेव्हा तो मायबापांची सेवा करण्यात व्यस्त होता. त्याने जवळच पडलेली वीट पुढे लोटून दिली व विठ्ठलाला थांबायला सांगितले. पुंडलिकाची माय - पित्याची सेवा पाहून विठ्ठल प्रसन्न झाले व त्या विटेवरच कमरेवर हात ठेवून उभे राहिले. ती वीट म्हणजे शापदग्ध इंद्र असल्याचे सांगितल्या जाते.

दिंडीरवन :    श्रीकृष्ण-राधेला एकमेकांच्या मिठीत पाहून रुख्मिणी रागाने दूर निघून गेली व तप करत बसली. ते स्थान दिंडीर नावाच्या राक्षसाच्या अधिकारात होते. 

कृष्णांनी शोध घेऊन दिंडीराला ठार केले. (मल्लिकार्जुन रूपाने) व पुंडलिकासाठी  pandharpur temple information in marathiतेथेच थांबले. रुद्राच्या वराने उत्पन्न झालेला गयासूर घोर तप करत असता सर्व सृष्टी डळमळायला लागली.

 तेव्हा सर्व देवगण श्रीहरीकडे आले. त्यांनी सर्वांना अभय दिले व ते गयासूराकडे गेले. तो धार्मिक होता. विष्णू - श्रीहरीला आपल्याकडे आलेले पाहून त्याला आनंद झाला.
 त्याने तपश्चर्या सोडून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या विनंतीवरून श्रीहरी विठ्ठल होऊन तेथेच थांबले.

लोहदंड तीर्थ :-    पार्वतीला तहान लागली असता शंकरांनी त्रिशुलाने खड्डा खोदून पाताळातील भोगावतीचे जल आणले. ते पिऊन पार्वती तृप्त झाली व त्या क्षेत्राला पुण्य क्षेत्राचा दर्जा दिला. वर दिला. तेच हे लोहतीर्थ. 

दुसरी कथा अशी अहिल्येचे पतिव्रत्य नष्ट करून गौतमांच्या शापाने अंगावर पडलेली भगे घेऊन इंद्र खूप फिरला व शेवटी तो विष्णूला शरण गेला. त्यांनी इंद्राच्या हातात एक लोहदंड दिला व म्हणाले ज्या ठिकाणी हा दंड पाण्यावर तरंगेल त्याच पाण्याने तुझी भगे नष्ट होतील!

 इतर सर्वत्र फिरून इंद्र चंद्रभागेतल्या या डोहात आला. तिथे त्या पाण्यावर तो लोहदंड तरंगला. त्याच पाण्याने इंद्र भगमुक्त झाला.

पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर पूर्व पश्चिम ३५० फूट, दक्षिणोत्तर ७० फूट आहे. याला आठ दरवाजे, पाच मंडप व कमान आहे. गाभाऱ्यात रूप या धातूंनी मढवलेल्या पऱ्या असलेल्या तीन फूट उंचीच्या चौथऱ्यावर तीनफूट नऊ इंचाची विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती आहे. त्यामागे प्रभावळ पाच फण्याचा रूपेरी नाग आहे. 

येथे सतत तेलवात तेवत राहते. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट, कानात कुंडले, गळ्यात कौस्तुभ हार, हृदयावर श्रीवत्सलांच्छन, कमरेला मेखला आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत.

देवाला रोज पहाटे काकडा आरती शेजारती होते. देवाला रोज शेला पागोटे जरीची शाल घालतात तसेच गुढीपाडवा, नवरात्र, दसरा, दिवाळी, संक्रांतीच्या वेळी मौल्यवान दागिने घालतात.

विठ्ठल मंदिराच्या थोड्या अंतरावर रुख्मिणीचे मंदिर आहे. विठ्ठलाच्या नंतर इथली पूजा व नित्योपचार केले जातात.

 मंगळवार शुक्रवार व नवरात्रीला तसेच भोगी संक्रांत, नागपंचमी, दिवाळी, गौरी गणपतीला इथे उत्सव होते. अनेक गावांहून स्त्रिया इथे भक्तिभावाने येतात व देवीला वाण देऊन ओटी भरतात. 

आषाढी कार्तिकी व प्रत्येक महिन्यातल्या एकादशीला येथे यात्रा भरते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र व भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही लाखो भाविक श्रध्देने येतात.

 सर्व जाती धर्मातल्या अनेक संतांनी पंढरीचे व विठ्ठल रुखमाईचे गुणगान करणारे अभंग काव्य लिहिले आहे. गोपाळपुरीत साजरा होणारा आषाढ पौर्णिमेचा काला हा अवर्णनीय असतो. टाळ- मृदंग वीणा घेऊन रामकृष्ण हरी म्हणत भाविक येथे दिंड्या घेऊन येतात.
pandharpur temple information in marathi
pandharpur temple information in marathi


इथे महाराष्ट्र विकास मंडळाचे निवासस्थान आहे. अनेक धर्मशाळा, मठ आहेत. तेथे भक्तांच्या निवासाची सोय होते. भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी सुविधा आहे. मंगळवेढे करमाळा "pandharpur temple information in marathi " अरणबार्शी तुळजापूर शिखर शिंगणापूर, गोंदवले ही जवळची स्थाने आहेत.
लेखक : ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर    -- मो.नं. ९४०३११९०८२
 
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या