अद्भूत कलालावण्य ठेवा - लेणी famous ancient caves in maharashtra

famous ancient caves in maharashtra नमस्कार मित्रानो आज आपण महाराष्ट्रातील प्राचीन लेण्यांविषयी माहिती पाहू


महाराष्ट्रातील अद्भूत कलालावण्य ठेवा म्हणजेच  लेणी त्यावरील शिल्पकला हि अत्यंत उल्लेखनीय आणि मनाला सुखद अनुभ देणारी आहे

सहयाद्री व सातपुडा यांच्या मधील डोंगर रांगेत , इ., स. पूर्व २०० ते ६५० या काळात ,संपूर्ण काळ्या पाषाणात ,अजिंठा लेणी कोरलेल्या आहेत. येथे बौद्ध गुंफा मंदिर विहारांत ,भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारीत, अनेक प्रसंग कोरलेले आहेत. 

famous ancient caves in maharashtra

                                                        famous ancient caves in maharashtra



 येथील छतांवरील, विविध रंगांतील चित्रांकीत जातक कथां हे एक आश्चर्यच आहे. शेकडो वर्षे उलटून गेले तरिही हे रंग जसेच्या तसेच आहेत. असे अनेक लावण्य चमत्कार येथे पहायला मिळतात.


Famous Ancient Caves in Maharashtra


पहिल्या लेण्यात गर्भगृहात असलेली भगवान बुद्ध मुर्ती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. यात वेगवेगळे तीन हावभाव प्रगट होतात हे विशेष. सभामंडपाच्या तीसऱ्या स्तंभावर चार हरीणं कोरलेले  'famous ancient caves in maharashtra' असुन त्या चौघांचे तोंड - मुख मात्र एकच आहे हे देखील विशेषच.

 येथे एका स्त्रीचे सुंदर शिल्प अत्यंत मोहक आहे. तीचे वक्षस्थल- छातीचा भाग अप्रतिम सुंदर कोरीव असुन ती स्त्री आपल्याकडे पहात तर नाही मात्र सलज्ज होऊन आपल्याशीच बोलत असल्याचा भास होतो हे देखील विशेषच .

                                 
famous ancient caves in maharashtra
famous ancient caves in maharashtra


बौद्ध भगवानांच्या एकाच शरिराचे विभिन्न दर्शन घडवून श्रावस्ती चमत्कार येथे दर्शवण्यात आला आहे. येथील पद्मपाणी बोधीसत्वांचे चित्रही जगात प्रसिद्ध गणले गेलेले आहे. तसेच येथील कोरीव आणि चित्रांकण केलेल्या नृत्यांगणा - लावण्यखाणी सर्व. श्रेष्ठ चित्रशिल्प आहे.
                                       
famous ancient caves in maharashtra
famous ancient caves in maharashtra

 येथील अप्सरा गर्भ नृत्य करतानाची कला अप्रतिम अद्वितीय आहे.

Ancient caves in Maharashtra


अजिंठा लेण्यांतील एकूण तीस लेण्यांपैकी पाच चैत्यगृह व पंचवीस विहार आहेत. येथील या लेण्यांत राजकुमार सिद्धार्थांची बाल्यावस्था बोधी सत्वांचे चित्र व अनेक जातककथा आहेत. त्या कथांतून बोध दर्शव- लेला आहे. शिवाय पुर्नजन्माविषयी मार्गदर्शन केलेले आढळते. 

सहाव्या क्रमांकाची लेणी दुमजली आहे. तेराव्या क्रमांकाच्या लेणीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण भांडार आहे. सोळाव्या क्रमांकाच्या लेण्यात राज महालाचे चित्र असून तेथेच आठ बौद्धांची ओळख होते. सव्हीस क्रमांकाच्या लेणीत बुध्दांच्या महानिर्वाणाचे शिल्प कोरलेले आहे.

अखंड पाषणात कोरलेल्या या लेण्यांत जशी मुर्तीकला सजीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसच या लेण्यांतील छतांवर साकारलेली अप्रतीम चित्रकलाही प्रसंशनीय आहे. निसर्गातल्या विविध घटकांपासून बनवलेल्या रंगांनी ही चित्रकला सजीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
                                  
famous ancient caves in maharashtra
AJINTHA  LENI

या छत चित्रांत बोध देणाऱ्या जातक कथा, कोंबड्यांची लढाई पहिलवानांच्या कुस्त्या, बैलांच्या लढाया, किन्नरं असे एकापेक्षा एक सरस चित्राकृती मंत्रमुग्ध करतात.

डोंगरात ज्या ठिकाणी या लेण्या कोरलेल्या आहेत तेथे हा डोंगर घोड्याच्या नालच्या इंग्रजी U (यु) सारखा आहे. व तेथूनच वाघुर नदिचा उगम झालेला आहे. पावसाळ्यात famous ancient caves in maharashtra  येथील विहंगम दृष्य अतिषय विलोभनीय दिसत. डोंगराच्या वरील हयू पॉईंट वरून हा अनोखा देखावा पाहताना निसर्ग-मानव निर्मितेचे अनोखे लावण्य सर्वांना सुखद भासते. शेकडो वर्षे उलटूनही हे सौंदर्य शिल्प चित्र लावण्य अबाधीतच आहे.

औरंगाबाद जिल्हयात सोयगाव तालुक्यात औरंगाबाद जळगाव या मुख्य मार्गावर अजिंठा गावाजवळ असून ते प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. विश्रामगृह, हॉटेल्स व रेस्टारंटची सोय आहे कार्तीको पौर्णिमेला इथे अजिंठा महोत्सव साजरा होतो. त्यात वैचारिक साहीत्याची बिक्री होते

Famous caves in Maharashtra

जगप्रसीद्ध वेरूळची लेणी हा देखील एक क लावण्याचा खजीनाच आहे. बौद्ध शिव (हिंदू) व जैन अशा तीन्ही धर्मातील चौतीस कोरीव लेण्यांचा समुह येथे आहे. आधी कळस मग पाया अशी रचना असलेले येथील कैलास य लेणे हे जगातल अप्रतिम लावण्याचा चमत्कारच आहे.
                                               
famous ancient caves in maharashtra
VERUL LENI


वेरूळच्या लेण्यांतील पहिल्या एक ते बारा क्रमांकाच्या लेण्यांत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावरील व त्यासंबंधी अनेक प्रसंग कोरलेले आहेत. यात ध्यान व अभ्यास करणारे भिख्खू (भिक्षु), धनपती, जोभाल, प्रलभासन अवस्थेतील बुद्ध, धमचक्र प्रवर्तन मुद्रा, स्तंभ, जलाषय, बोधीसत्व वज्रपाणी, अवलोकितेश्वर व त्यांच्या दोन्ही बाजुला तारा लक्ष्मी आणि महामयूरी आहेत. 

धनपती नम्भाळ व त्याची पत्नी हारीती तसेच भगवान गौतम बुद्धांच्या विविध भावांतील अनेक मुर्त्या आहेत. तर काही लेण्या दुमजली आहेत.

लेणी क्रमांक तेरा पासून तीस पर्यंतच्या लेण्यां शिव शंकरांच्या दयोतक आहेत त्यात कारागीरांचे निवासस्थान, राव- णाची खाई, दशावतार, कैलास, रामेश्वर, निलकंठ, जोगेश्वरी लेणे, न्हाणी अशा नावांच्या आहेत. त्या लेण्यांत दुर्गा, गजलक्ष्मी विष्णु लक्ष्मी, महिषासूर मर्दिनी, विरभद्र, शिव, सप्त मातृका, श्री गणेश, त्रिपुरांतक शिव, नृत्य कर्ता. नटेश्वर, ब्रम्हा विष्णु शिव, व्दारपाल नंदी, सूर्य, रथ, शेषषांयी नारायण अशी सुंदर हुबेहुब शिल्पे साकारलेली आहेत.

 अगदी ती सजीव भासावी अशी कोरलेली आहेत. याशिवाय अंधकासूराचा वध, रावणाने कैलास हलवणे, दशावतार, शिवपार्वती विवाह, गजेंद्र मोक्ष, शिव पार्वतीचा पट खेळणे, असे प्रसंगही विलोभनीय कोरलेले आहेत. नंदी सिंह असे प्राणीही आहेत.

सोळाव्या क्रमांकाची लेणी म्हणजे मानवान केलेला. अप्रतीम चमत्कारच आहे. आधी कळस मग पाया अशी ही लेणी कोरलेली आहे. त्यात भगवान शिवशंकरांच कैलास (स्वर्ग) आनंद सुखाची 'अनुभुती येते. भगवान शिवांच्या अनेक भावमुद्रा यात प्रत्यक्ष पहायला मिळतात. यातील शिल्पाचे आखीव रेखीव कोरीव सोळा शिल्प स्तंभ व विशाल शिवलींग अतिषय देखण आहे. या लेण्याला पाहून प्रत्यक्ष कैलासाचा आभास होत असल्यानेच या लेण्यांना कैलास हे नाव लाभले आहे कैलास हा शब्द काल्पनीक तरी विश्वातील प्रत्यक्ष संदिर्यापेक्षाही श्रेष्ठ सौंदर्याची ती एक उपमा आहे

लेणी क्रमांक तीस ते अडतीस या जैन धर्मिय लेण्या आहेत. यात भगवान महावीरांच्या विविध भावदर्शक मुर्त्या, शासन देवतां, महावीर, पार्श्वनाथ, भगवान बाहूबली पार्श्वनाथ गोमटेश्वर हत्तीवर बसलेला इंद वाघावर बसलेली इंद्राणी, आम्रवृक्षांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. तसेच इतर जैन तिर्थंकरांच्याही मुर्त्या कोरलेल्या आहेत. शिवाय काही सेवकांच्याही मुर्त्या आहेत..

वेरूळच्या लेण्यांतीलही काही लेण्या दुमजली सुंदर कलाकृतींचा आविष्कार आहे. काही लेण्यांच्या छतांवरही सुंदर नक्षीकला कोरलेली आहे. लेण्यांतील स्तंब म्हणजे देखील स्वतंत्र कलेचा नमुना आहे. त्यांवरील अद्भूत सौंदर्याची नक्षीकला जगातील श्रेष्ट कला आहे.

वेरूळच्या सर्व लेण्यांत तीन महान संस्कृतींचे अद्वितीय संगम आहेत. या लेण्यांतील सर्व मुर्त्या विलोभ- नीय अद्वितीय सौंदर्य खाणी आहेत. त्यांच्या चेह-यांवरून शांत सद्‌भाव ओतप्रोत ओसंडतो. अनेक मुर्त्यामधे शृंगारीक कलांचा भाव असला तरी त्यात उन्मादकता नाही. त्या निर्मळ प्रसन्न दिसतात. व रसीकांचे डोळे स्थिरावून मन गुंतवून ठेवतात. मनाला प्रसन्नता देतात.

वेरुळ नगरी तच भगवान शिवशंकरांच्या बारा जोतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर हे जोतिर्लिंग असून धार्मीक व कला सौंदर्यांचा ठेवाच आहे ते मंदिरही भव्य सुंदर व संपूर्ण चिरेबंदी पाषाणांत विलोभनीय कलाकृतींनी बनवलेले आहे. वेरूळच्या जवळच दौलताबादचा प्राचीन देवगीरी नावाचा भक्कम किला मराठी वैभवाची व सांस्कृ तीची साक्ष देत उभा आहे. निसर्ग सौंदर्य व मानव कलेचा बुद्धीमत्तेचा व श्रम सामर्थ्याचा संगम आहे

वेरूळचे जनार्दन स्वामींचे भक्ती-शांती पीठ, खुलताबादचे मारुतीचे पुरातन मंदिर, औरंगजेब बादशहाची समाधी - कबर, म्हैसमाळ हे पर्यटन स्थळ, ऐतिहासीक सांस्कृतीक शहर औरंगाबाद, नाथ सागर व पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले संत एकनाथांचे पैठण हे पुरातन वेद विद्येचे माहेर समजले जात होते "famous ancient caves in maharashtra" अशा अनेक साहित्यीक सांस्कृतीक ऐतीहासीक कला सौंदर्याचा वारसा लाभलेले व अबाधीत कलेचा ठेवा असलेले वेरूळ नैसर्गिक सौंदर्य व कलेचा ठेवा आहे.

लेखक - डॉ.  ज्ञानेश्वर  जाधव विटनेरकर - ९४०३११९०८२
मित्रानो व्हिडीओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका . धन्यवाद.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या