आपल्या भारत देशाची महान ख्याती व परंपरा खुप खुप पुरातन -जुनी आहे.
![]() |
| maharashtra killa marathi |
येथल्या राजांनी स्वतःचे शौर्य औदार्य धैर्य व श्रेष्टत्वान स्वतःचे इतिहास निर्माण करून
इतिहासाला अमरत्व बहाल केल आहे.
Maharashtra killa marathi
राजा गौतमांनी राजवैभवाचा त्याग करून समाज हितासाठी- लोककल्याणासाठी बौद्ध धम्म स्थापून, त्याचा प्रचार व प्रसार करून संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देऊन सन्मानवसुखं बहाल केल. महान राजा भरत यांनी जंबूदीपाला -आपल्या शौर्यान भारत हे नाव देऊन, 'maharashtra killa marathi' चक्रवर्ती सम्राट अशोकांनी शौर्यनीती व बुद्ध धम्माच्या ज्ञानाने अलंकारीत केल्याचा इतिहास आपण अजुनही स्वाभिमानाने जपतो आहोत.
तसेच त्यानंतरच्याही अनेक थोर राजे महाराजे महात्म्यांचाही इतिहास आपणाला ज्ञात आहेत.
पवित्र भारत देशात महाराष्ट्र हा वैभवसंपन्न प्रदेश सहयाद्री च्या उंच रांगा महाराष्ट्राची थोरवी कृष्णा, कोयना, गोदावरी भीभेच्या संथ लयीच्या तालावर स्वाभिमानान सांगतो.
भिमाशंकर त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळीवैजनाथ, शिखर शिंगणापूरातील भग- वान शिवशंकर, तुळजापूर, कोल्हापूर, वणी, माहूर येथील आदिशक्ती, पंढरपूरचा विठूराया, जेजुरीचा खंडेराया, जोतीबा, अशा अनेक ठिकाणचे देव देवता महाराष्ट्राला पावित्र्याच वरदान देत आहेत. अनेक ठिकाणच्या लेण्यांतून भगवान बुद्धांच्या शांतीचा संदेश सतत निनादत आहे. लाटांच्या तुताऱ्या वाजवून समुद्र जयजय कार करत आहे.
घनदाट अरण्यांतून जंगलांतून अखंडतेची व सुदृढतेची प्रेरणा मिळत आहे. वेरूळच्या लेण्यांतून स्वर्गाची कल्पना येते.
Maharashtra killa information in marathi
अशा या समृद्ध वैभव संपन्न महाराष्ट्रात शालिवाहनो सारखे शककर्ते राजे, शिलाहार चालुक्यां सारखे धुरंधर-शौर्य-कीर्तीवान राजे महाराजांनी या महाराष्ट्राला सुखाच्या सागरात न्हाऊ घातल होते. कदंब राजघराणेही योर वैभवसंपन्न होऊन गेले. त्यांनी सुखी समृद्ध केलेल्या महाराष्ट्राला देवगीरीच्या यादव राजांनी प्रत्यक्ष स्वर्गीय सुखांची अनुभूती दिली.अशा वैभव संपन्न महाराष्ट्रातच छत्रपती शिवाजी महाराज हे देखील थोर राजे होऊन गेले, त्यांनी स्वरा- ज्याची स्थापना करून स्वाभिमानान जगण्याचा हक्क बहाल करून अखील महाराष्ट्र आणि भारतासमोर आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. अशा थोर विभूतींना महाराष्ट्र आणि भारत कधी विसरणार नाही अशाया थोर राजांनी आपला राज्य कारभार करण्यासाठी राज्याच्या संरक्षणासाठी, वैभवासाठी सर्वात जास्त महत्व दिले ते गड किल्यांना बाजूच्या प्रदेशावर नियंत्रण राखण्यासाठी व सुरक्षितता देण्यासाठी रात्रूपासून बचाव करण्यासाठी, आपला परिवार सुरक्षीत राखण्यासाठी या किल्यांचा उपयोग करण्यात येत असे. सर्व शत्रूवर नियंत्रण राखता येत असे. वचक रहात असे
संपूर्ण दगडांच्या घडीव चिऱ्यानी या गडांची निर्माती केली जात असे. किल्यांवर अनेक सोयी सुविधा बनवलेल्या असत उंच डोंगरावरच्या गडांना किल्ला, जमीनीवरच्या गडांना दुर्ग व पाण्यात बांधलेल्या गडांना जलदुर्ग म्हणतात गड बांधताना त्या राजघराण्याच्या कुल दैवताचे, शंकर, देवींचे मंदिर बांधलेले दिसतात. गडावर पाण्याच्या विहीरी, पाणी साठवण्याचे टाके, महल सदर, सैन्याला रहाण्याच्या खोल्या, घोड्यांच्या पागा, धान्याचे कोठारं, गुरांच्या छावण्या, चाराभरण्यासाठी, शस्त्रांच्या maharashtra killa marathi सुरक्षीतते साठी, राज महाल, राणी महाल, दरबार भरण्याची जागा अशा अनेक सोयी सुविधा केलेल्या असत.
गडाच्या सुरक्षेसाठी बाहेरूनही अनेक ठिकाणी खोल खंदक दरीचा सहारा घेऊन तासीव कडे अशा नैसर्गीक सुविधांचा उपयोग करून घेतला असतो तर चौफेर कोट सुरक्षीत भीत व त्यात जागोजागी बुरुज बनवलेले व त्या बुरुजांवरही सैनीकांना दडून बसण्याची व तेथून दुरवरच्या परिसराची टेहळणी-निरीक्षण करता येत असे व कोटावरही लहाण लहाण ओक्या बनवलेल्या असत तेथून शत्रूवर दगड-गोटे, भाले, तीर अस्र शस्त्रांचा मारा करता येत असे. बुरुजावरूनही असा मारा करण्याची, तोफांव्दारा तोफगोळे दारुगोळे फेकून शत्रू सैन्य मारण्याची, त्यांना थांबवण्याची सुविधा होती. व त्याचा योग्य उपयोगही करून घेतला जात होता. महाराष्ट्रात असे अनेक किल्ले होते ते अनेक राजांनी बांधून घेतलेले होते. अशा गडांना पहीला दुसरा तिसरा तर काही ठिकाणी चार, पाच, सातही दरवाजे रहायचे.
म्हणजे एका दरवाजातून जाणेही रात्रूला कठीण करून ठेवलेले असे तर मग अशा अनेक दरवाजांतील सैनीकांचा सामना करणे अतीषय अवघड काम असे. मुख्य दरवाजांच्या व्यतीरीक्त त्याच्या दुसऱ्या बाजूनेही मात्र अत्यंत अवघड जागी एखादा दरवाजा असे. सर्व दरवाजांवरून राजांना त्यांच्या महालात खबर देण्याची व्यवस्था रहात असे.
महाराष्ट्रात पूर्वीपासूनच असे अनेक किल्ले अस्तीत्वात होते, व त्यातील अजूनही आहेत. पराशर गड, (पन्हाळा) पराशर ऋषींनी तप:श्यर्या केलेले स्थान माहूरगडावर अत्री ऋषींचे वास्तव्य होते. शिवदुर्ग -पावनगड-मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य, वणी गड, त्र्यंबकगड, वसंत गड तसेच रायगडही खुप जुना होता. लोहगड हा इ.स दुसऱ्या शतकातला, कर्नाळा भादुली, राजमाची हे देखील खुप जुने गड किल्ले होते. शिलाहार राजाने १२व्या शतकात काही गड बांधून घेतले तर अजिंक्यतारा, विशाळगड, कल्याणगड, पांडवगड, व्याघ्रगड असा काहीं किल्यांचा जिर्णोधार केला. यादव राजांच्या काळात देवगीरी, पुरंदर या गडांची पुर्नबांधणी झाली अशा अनेक गडांच्या अनेक कथा आहेत.
अशा या वैभवसंपन्न महाराष्ट्रात मराठी जनता सुखा समाधानान नांदत असताना या महाराष्ट्राची मराठी मुलुखा ची सुसंपन्नता परकीय राजांच्या डोळ्यांत खुपली. त्यांच्या राज्याच्या वाढीच्या विस्तारांची हाव ने महाराष्ट्राची संपन्नता लुटली. आक्रमण करून आपली सत्ता स्थापीत करताना त्यांनी लढाया करून अनेक गड किल्ल्यांची नासधूस झाली. नैसर्गीक पडझड झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज हे दुरदृष्टीचे राजे होते. त्यांनी स्वराज्य स्थापने पासूनच गड किल्यांना महत्वाच मानल- आणि तोरणा किल्ला जिंकून त्याची प्रचीती दाखवून दिली. आणि एका मागून एक किल्ले जिंकून स्वराज्यात मिळवले. अनेक जुन्या किल्यांची डागडूजी - जिर्णोध्दार केले व भक्कम केले. अनेक नवी किल्ले बांधून घेतले. त्यांच्या स्वराज्यात ३६५ किल्यांची नोंद आहे.
महाराष्ट्रात पूर्वीपासूनच असे अनेक किल्ले अस्तीत्वात होते, व त्यातील अजूनही आहेत. पराशर गड, (पन्हाळा) पराशर ऋषींनी तप:श्यर्या केलेले स्थान माहूरगडावर अत्री ऋषींचे वास्तव्य होते. शिवदुर्ग -पावनगड-मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य, वणी गड, त्र्यंबकगड, वसंत गड तसेच रायगडही खुप जुना होता. लोहगड हा इ.स दुसऱ्या शतकातला, कर्नाळा भादुली, राजमाची हे देखील खुप जुने गड किल्ले होते. शिलाहार राजाने १२व्या शतकात काही गड बांधून घेतले तर अजिंक्यतारा, विशाळगड, कल्याणगड, पांडवगड, व्याघ्रगड असा काहीं किल्यांचा जिर्णोधार केला. यादव राजांच्या काळात देवगीरी, पुरंदर या गडांची पुर्नबांधणी झाली अशा अनेक गडांच्या अनेक कथा आहेत.
Maharashtra killa darshan marathi
अशा या वैभवसंपन्न महाराष्ट्रात मराठी जनता सुखा समाधानान नांदत असताना या महाराष्ट्राची मराठी मुलुखा ची सुसंपन्नता परकीय राजांच्या डोळ्यांत खुपली. त्यांच्या राज्याच्या वाढीच्या विस्तारांची हाव ने महाराष्ट्राची संपन्नता लुटली. आक्रमण करून आपली सत्ता स्थापीत करताना त्यांनी लढाया करून अनेक गड किल्ल्यांची नासधूस झाली. नैसर्गीक पडझड झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे दुरदृष्टीचे राजे होते. त्यांनी स्वराज्य स्थापने पासूनच गड किल्यांना महत्वाच मानल- आणि तोरणा किल्ला जिंकून त्याची प्रचीती दाखवून दिली. आणि एका मागून एक किल्ले जिंकून स्वराज्यात मिळवले. अनेक जुन्या किल्यांची डागडूजी - जिर्णोध्दार केले व भक्कम केले. अनेक नवी किल्ले बांधून घेतले. त्यांच्या स्वराज्यात ३६५ किल्यांची नोंद आहे.
जंजीरा हा एकमेव जलदुर्ग राजांना पोर्तुगीजांकडून जिंकता आला नाही. म्हणून त्यांनी त्याचा खेद न करता, सिंधूदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा सुवर्णदुर्ग असे अनेक जलदुर्ग बनवून घेतले व समुद्रावर आरमार ही उभारले. व संरक्षीत करून स्वराज्याच्या सीमा रक्षण केल्या. राजानी राजगड, रायगड हे भक्कम किल्ले बनवून त्यावर राजधानी केली.
या गडांवर त्यांनी सर्व सोयी सुविधा बनवून घेतल्या. ज्या त्यापूर्वी कोणत्याही गडावर नव्हत्या. खजीना, रत्नशाळा, धान्यकोठार, जलस्थान, नगारखाना व्यायाम शाळा, वस्त्रागार, पाकशाळा, वैद्य- शाळा, शिकार खाना, दारूखाना, हत्तीशाला, आरोग्यशाला, उंटशाळा नाणी पाडण्याचा कारखाना, अश्वशाळा, गोशाळा, याव्यतिरिक्त लेखशाला, सोबत रायगडावर विस्तीर्ण पठार, आवश्यक इमारती, वर्षानुवर्षे पुरेल एवढी शिबंदी साठवणीची सोय, चतुरंग सेनेच्या वास्तव्याची सोय, अष्टप्रधानांचे राजवाडे, राजवाडा, राजदरबार, राज्यांचे महाल, बाज़ार- पेठ, मंच शाळा, खुबलढा बुरुज, चित दरवाजा, नाना दरवाजा, महादर- वाजा, राजसभा, मनोरे, गंगा सागर तलाव, बाले किल्ला, नगारखाना जगदीश्वराचे मंदीर, भवानी टोक, टकमक टोक, हिरकणी बुरूज, होळीचा माळ, वाद्य दरवाजा, दारू कोठार अशा अनेक अनेक सुविधांनी, सोयीनी युक्त आहे
आजही महाराष्ट्रातील कोणताही गड किल्ला दुर्ग आपल्या दृष्टीपथात आला तरी आपल्या नजरेसमोर जिजाऊ मासाहेबांसोबत त्यांच्या मार्गदर्शनात शिकणारे, स्वराज्याची शपथ घेणारे, घोडदौड करणारे, लढा या करणारे, न्यायदान करणारे, राज सिंहासनावर बस- लेले असे अनेक अनेक रूपं सहज तरळतात. महाराष्ट्राला हर एक गड किल्ला शिवाजी राजांच थोरपण सांगत स्वाभिमानान उभा आहे.
गड किल्ले, दुर्ग हे सर्व महाराष्ट्राच्या ज्वलंत वैभव शाली इतिहासाची साक्ष सांगणार, प्रत्यक्षातल उदाहरण आहे. इथल्या थोर संस्कृतीची ज्वलंत साक्ष सांगत आहे. असेच काही पुरातन मंदिरांची अलौकिक शिल्पकला, वाडे, प्रसीद्ध आहेत.
आजही महाराष्ट्रातील कोणताही गड किल्ला दुर्ग आपल्या दृष्टीपथात आला तरी आपल्या नजरेसमोर जिजाऊ मासाहेबांसोबत त्यांच्या मार्गदर्शनात शिकणारे, स्वराज्याची शपथ घेणारे, घोडदौड करणारे, लढा या करणारे, न्यायदान करणारे, राज सिंहासनावर बस- लेले असे अनेक अनेक रूपं सहज तरळतात. महाराष्ट्राला हर एक गड किल्ला शिवाजी राजांच थोरपण सांगत स्वाभिमानान उभा आहे.
गड किल्ले, दुर्ग हे सर्व महाराष्ट्राच्या ज्वलंत वैभव शाली इतिहासाची साक्ष सांगणार, प्रत्यक्षातल उदाहरण आहे. इथल्या थोर संस्कृतीची ज्वलंत साक्ष सांगत आहे. असेच काही पुरातन मंदिरांची अलौकिक शिल्पकला, वाडे, प्रसीद्ध आहेत.
आपल्या या महान संस्कृतीच, गौरवशाली इतिहासाच्या साक्षीच जतन करण आपणा सर्वांच कर्तव्य आहे या किल्यांसोबत अनेक मह त्वाच्या घटनांचे संदर्भ जुळलेले आहेत. जे शिवचरीत्राची महती "Maharashtra killa marathi " सांगत ताठ मानेच्या सह्याद्रीच्या साक्षीन उभे आहेत. आपल्या महान संस्कृतीची नाळ जोडली आहे.
चला तर करूया संकल्प आपल्या वैभवशाली परंपरा जपण्याचा संस्कृती रक्षणाचा !
लेखक- डॉ.ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर
लेखक- डॉ.ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर

0 टिप्पण्या