History of Maharsahtra in Marathi महाराष्ट्राला ऐतिहासिकतेचाही मोठा ठेवा लाभला आहे व मोठ्या स्वाभिमानान ,आदरान आपण जतन करत आलो आहोत.
![]() |
| History of Maharashtra in Marathi |
अनेक भागात ठाण मांडून ताठ मानेने उभे असलेले अनेक किल्ले म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीची, तिच्या थोरपणाची साक्ष आहे. वाकाटक, चालुक्य, यादव आणी नंतर शिवाजी महाराजांच्या राजवटीतील अनेक गड किल्ले आपल्या संस्कृतीच समर्थपणान, स्वाभिमानान जतन करत आहेत तिथल्या प्रत्येक दगडावर कष्टकरी, लढवय्ये, बलीदान कर्त्याच अस्तीत्व सामावलेल आहे.
अनेक किल्यां वर अजूनही संस्कृती द्योतक पाऊलखुणा पहायला मिळतात.
History of Maharashtra in Marathi
गडांवरील जल साठवणूकच तंत्र व महत्व, कोठा- गरे, घोड्यांच्या पागांची जागा, सैन्याच्या जागा, लढायांच्या जागा, दैनंदीन वापराची साधनं, गड बांधकामांच तंत्र वाटा, नैसर्गिक 'History of Maharsahtra in Marathi' साधनांचा करून घेतलेला उपयोग अशा अनेक गोष्टी आपणास बरच काही शिकवून जातात. व आपल्या संस्कृतीच धोरण सांगतात. जिजाऊंच माहेरघर असलेल्या सिंदखेड राजा येथील लखुजी जाधवरावांच्या राजवाड्यात गेले असता तेथील घरोट-जात, पाटा, वऱ्हाटा अशा पारंपारीक वापराच्या वस्तू पहायला मिळतात तर त्या अनेक ठिकाणी ही पहायला मिळतात
History of Maharshtra information
स्थल स्मृती प्रमाणेच काही लिखीत आठवणीही एखादया भक्कम गडांसारख्या जतन करन्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला कल्याणच्या खजीना लुटीसोबत सुंदर स्त्री मिळाली. शिवाजी महाराजांनी तिचा सन्मान करून, साडीचोळीचा आहेर देऊन सन्मानान त्या कल्याणच्या सुभेदाराकडे नेवून पोहचवल होत. प्रत्यक्षकाळ बनून शिवाजीराजांना मारायला आलेल्या अफजल खानाला शिवाजी राजांनी शिताफीन मारल. मात्र त्यांच्या मृत देहाची हेळसांड होऊ दिली नाही. मोठा सरदार, वडीलांचा सहकारी म्हणून प्रतापगडावर त्यांची कबर समाधी बांधली.
ती समाधी म्हणजे शिवाजी राजांच्या थोर सांस्कृतीक वर्तनाची साक्ष देणारी प्रत्यक्ष शिल्पाकृती आहे. एखादा स्वतंत्र गड आहे.
शिवाजी राजांनी अनेक ठिकाणच्या मंदिरांना देणग्या दिल्या मंदिराचा जिर्णोध्दार केला. तसा अनेक ठिकाणच्या मशिदींनाही देणग्या दिल्या. संत तुकाराम महाराजांविषयी जेवढा त्यांच्या मनात आदर होता तेवढा च आदर थोर संत बाबा याकूता विषयी देखील होता. छत्रपती संभाजी महाराजांना समोरा समोर लढाईत अनेक प्रयत्न करूनही हरवता आले नाही म्हणून औरंगजेबान फितूरीच विष पेरून त्यांना पकडल. बादशहान त्यांच्याकडे स्वराज्याचा अधिकार मागून त्यांना जीवदान द्यायच वचन दिल मात्र संभाजी राजांनी तो प्रस्ताव ठोकरला.
आपल्या वडीलांनी अथक परिश्रम करून मिळवलेल स्वराज्य, ज्या स्वराज्यासाठी तानाजी मालूसरे, बाजीप्रभू देशपांडे अशा शेकडो विरांनी स्वताच बलीदान, दिल. हजारो मावळे रात्री अपरात्री डोंगर दऱ्या मधून धावले, अनेक लढाया केल्या, घरदार बायका पोर सोडून उपासी तापासी भटकले त्यांच्या श्रमाच मोल अनंत आहे आपल्या एकट्याच्या जीवापेक्षा कितीतरी पटींनी स्वराज्याच मोल श्रेष्ठ आहे. हे जाणून त्यांनी स्वताच बलीदान दिल आणी स्वराज्य वाचवल. ही त्यांच्या थोर सांस्कृतीक परंपरेची साक्ष आहे.
संभाजी राजांना फितूरी करवून कपटान अटक केल्यावर औरंगजेबान त्यांना हाल हाल करून ठार केल. या प्रकारान सर्व मराठ्यांचा संताप अनावर झाला होता. यवनांवीषयी चिड-घृणानिर्माण झाली. असाच राग निष्ठावान मराठा सरदार संताजीराव घोरपडे यांनाही आला.
संभाजी राजांना फितूरी करवून कपटान अटक केल्यावर औरंगजेबान त्यांना हाल हाल करून ठार केल. या प्रकारान सर्व मराठ्यांचा संताप अनावर झाला होता. यवनांवीषयी चिड-घृणानिर्माण झाली. असाच राग निष्ठावान मराठा सरदार संताजीराव घोरपडे यांनाही आला.
सुडाच्या भावनेन ते पेटून उठले आपले भाऊ मालोजीव बहीर्जी आणी आणखी काही विश्वासू सरदारांना घेऊन निघाले बादशहाच्या वढू- तुळापूर येथील सहा लाखांच्या फौजेत घुसून थेट History of Maharsahtra in Marathi बादशहा च्या डेऱ्याजवळ गेले त्याच्या तंबूचे दोर कापून तंबूवरचे सोन्याचे कळस कापले. आणी बादशहाला शोधत फिरले. नेमके त्यावेळी बादशहा नमाज अदा करत होता. संताजी न पाहील औरंगजेब बादशहा नमाजला बसला आहे
त्यांना थोरले महाराज शिवाजीराजे व संभाजी महाराजांचा आदर्श ज्ञात होता. प्रत्येक विधर्मीयांचा आदर करायचा, संताजीनी त्या दोन्ही राजांच व भगवान शंकरांच मनोमन चिंतन केल नी बादशहाला तसाच सोडून देऊन, ते सोन्याचे कळस घेऊन निघून आले.
हातात आलेली शिकार तसीच सोडून दिली. त्या वेळी एका क्षणात एका तलवारीच्या घावात बादशहा संपला असता. संपूर्ण स्वराज्यच नव्हे तर भारतही मुघल सत्तेच्या जाचातून मुक्त झाला असता व संपूर्ण भारतभर भराठी साम्राज्याचा झेंडा फडकला असता. मात्र संताजींनी स्वार्थ सोडून संस्कृतीच पालण केल. शिवाजीराजांच्या विधर्माचा आदर संस्कृतीची जोपासना केली.
Maharashtra in Marathi
पैठणचे थोर संत एकनाथ महाराजांनी काशीहून. आणलेल तिर्थ तहाणेने तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात दिल. तिर्यापेक्षा तडफडणारा जीव मोठा मानला त्याचे प्राण वाचवले व संस्कृतीच रक्षण केल. असे अनेक उदाहरणांनी आपल्या मराठी संस्कृतीचा महीमा सजलेला आहे.
पन्हाळागडासोबत अनेक पौराणीक कथा निगडीत असून त्याच्या अवशेषांवरून पाऊलखुणा दिसतात अशा अनेक किल्ले गडावर ही आढळतात. पन्हाळ्यासोबतच जीवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, कोंडाण्या सोबत तानाजीराव मालूसरे, पुरंदरा सोबत मुरारबाजी देशपांडे अशा नरवीरांच्या बलीदानान विभूषीत आहेत.
राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव मराठे अशा राजवटींनी महाराष्ट्राचा स्वाभिमान व संस्कृतीच रक्षण करून त्यांच्या साक्ष पुढील पिढ्यां साठी मार्गदर्शक ठरल्या आहेत.
इतिहास काही फक्त शौर्य धैर्याच्याच गोष्टींचा-कथाचा नसतो, त्यात चातूर्य समर्पण बलीदानाच्याही कथा असतात, इतिहास घडवणाऱ्या महान व्यक्ती अमर होऊन अढळ स्थान मिळवतात "History of Maharashtra in Marathi" व पुढील अनेक पिढ्यांना प्रेरक ठरतात. अशा अनेक कथांनी आपल्या इतिहासात मराठमोळ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पहायला मिळतात.
लेखक- डॉ.ज्ञानेश्वर जाधव - विटनेरकर

0 टिप्पण्या