गुरु - गोवींद गीरी | Guru Govind Giri Krantikari in Marathi

 Guru Govind Giri Krantikari in Marathi  गुरु गोवींद गीरी--राजस्थानात डुंगरपूर जिल्ह्यात १० डिसेंबर १८५८ रोजी मेडी मगरी जवळ बासीया बासीया गावात गुरु गोवींदगीरी यांचा जन्म झाला. 

बालपणा पासून ते धार्मीक प्रवृत्तीचे होते ते भजन गायन करून लोकांना उपदेश करायचे. मासाहार करू नका, दारू पिऊ नका, आपापसात भांडणे करू नका.

                                                            
Guru Govind Giri Krantikari in Marathi
Guru Govind Giri Krantikari in Marathi



 स्वच्छ रहा, पशूंची हत्या करू नका अस सांगून लोकांना सन्मार्गाला लावायचे



 Guru Govind Giri Krantikari in Marathi


गुरु गोवींद गीरी हे बंजारा समाजाचे असले तरी आजू- बाजूच्या सर्व आदिवासींसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी ते झटायचे. त्या परिसरात दुष्काळ पडला होता तेव्हा आदिवासींची 'Guru Govind Giri Krantikari in Marathi' उपासमार होत होती.
 अन्नावाचून लोक मरत होते. तरीही इंग्रज शिपाई त्यांना त्रास दयायचे. नवे कर लावून सक्तीन वसुली करायचे. 
त्यांना छळायचे. गरीब आदिवासींचा छळ पाहून प्रांजळ मनाचे गोवीं दगीरी तळमळत होते. त्यांना या लोकांची कीव येत होती. ते लोकांना धिर देत होते आणी अन्याय अत्याचारांचा प्रतिकार करायची प्रेरणाही देत होते.
 त्यांनी सर्व आदिवासींना विश्वासात घेतल नी त्यांच नेतृत्व करत इंग्रज सरकारला खरखरीत पत्र लिहील;


सर्वत्र दुष्काळ पसरला आहे. अन्नावाचून लोक मरायला लागलेत. सरकारकडून जे नवे कर लावून सक्तीची वसूली केली जात आहे ती त्वरीत थांबवा! आदिवासी गरिबांचा छळ करु नका अस पत्र लिहून सरकारला पाठवल. इंग्रजांना ते पत्र म्हणजे जणू आपला अपमान वाटला. 


 Guru Govind Giri Banjara in Marathi


त्यांनी गोवींद गुरूंना देशद्रोही ठरवल. हा माणूस लोकांना संघटीत करून आपल्या विरुध्द भडकवत आहे. अस त्यांना वाटल.

 त्या आधीही गुरु गोविंदाच्या विरोधात स्थानीक सावकारांनी सरकारात तक्रार करून चहाडी केलेली होती. आता तर इंग्रज भडकलेच त्यांनी नोटीस काढून गुरू गोविंदांना  Guru Govind Giri Krantikari in Marathi

तो परिसर सोडून कायमच दूर जाण्याच फर्मान काढल. या फर्मानाची खबर आदिवासी बांधवात पसरताच लोक संघटीत झाले. 

गुरूंनी हे स्थान सोडून कुठेही जाऊ नये' अशा विनवण्या करून त्यांना संरक्षण देण्यासाठी तिथेच थांबले. आदिवासींच्या जमा होण्याची ही खबर इंग्रज शिपायांना लागताच ते सर्व तयारी करून धावत आले. त्या सर्व टेकडीलाच त्यांनी घेराव घातला. आणी बॉम, तोफा, बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करून बेफाम माऱ्यान सुमारे १५०० शेच्या वर आदिवासींना ठार केल.

 दि.१७ नोहेंबर १९१३ रोजी इंग्रजांनी केलेल्या हत्यात शेकडो आदिवासी स्त्री पुरुष शहीद झाले. व गुरु गोवींद गीरी यांनाही कैद झाली. त्यांना फाशीची शिक्षा सुनवली. 

मात्र त्यांची लोक प्रियता आणी त्यांच्यासाठी उठाव करणाऱ्या आदिवासी बांधवांचा उदेक पाहून फाशीची शिक्षा रद्द करून आजिवन कारावासाची शिक्षा दिली. 
 

Guru Govind Giri Krantikari 


आणी त्यांना अहमदाबादच्या कैदेत ठेवलः गुरु कैदेत पडल्यापासून आदिवासींनी त्यांच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले. इंग्रजांचा छळ करून त्यांना जेरीस आणल.

 शेवटी आदिवासींचा उद्रेक पाहून १९२३ मधे गोविंद गीरीना कैदेतून मुक्त करावच लागल. हा त्या आदिवासीच्या एकात्मीक संघर्षाचा विजय होता.

गुरु गोविंद गीरींनी कैदेतून मुक्त झाल्यावरही उरलेल आयुष्य आदिवासीच्या कल्याणासाठी व इंग्रज सरकारच्या धोरणांच्या विरोधात प्रबोधन जनजागृतीत घालवल. 

अखेर ऑक्टोबर १९३१ मधे त्यांच निधन झाल. ज्या ठिकाणी शेकडो भील शहीद झाले त्या जागी मानगड मधे भव्य स्मारक असून त्याला शहीद स्मारक अस नाव आहे. 

तसेच १७ नोहेंबर हा दिवस तेथे शहीद स्मारक म्हणून पाळला  "Guru Govind Giri Krantikari in Marathi"

जातो. ते स्मारक शासकीय स्मारक व्हावे अशी स्थानीक आदिवासींची मागणी आहे.


लेखक : ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या