खाजा - नायक | KHAJA NAIK - AADIVAASI KARANTIKARI information in marathi

KHAJA NAIK - AADIVAASI KARANTIKARI information in marathi महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या मधे सातपुडा पर्वताच्या सानिध्यात खान्देशातील सांगवी पळासनेर जवळच्या एका पाड्यावर - भिल्ल वस्तीत गुमान सींग नाईकांच्या घरी थोर क्रांतीकारक, गरिबांचे वाली असलेल्या व इतिहासात अमर झालेल्या खाजानाईकांचा जन्म झाला. 

गुमानसींग हे जन्मापासून जंगलात राहणारे होते. पुढे मोठे झाल्यावर ते इंग्रजांच्या राजवटीत संरक्षण खात्यात काम करायला लागले. त्यांनी मोठ्या निष्ठेन, प्रामाणीकपणान काम केल.
                                                    
KHAJA NAIK - AADIVAASI KARANTIKARI information in marathi
KHAJA NAIK - AADIVAASI KARANTIKARI 


 त्यांची ती निष्ठा व प्रामाणीक पणा आणी सचोटी पाहून इंग्रजांनी खाजालाही नोकरीत घेतल आणी संरक्षण खात्यात अधिकारी केला खाजा सींग यांच खर नाव काजेसींग अस होत. मात्र इंग्रजांच्या भाषेने उच्चारात त्याचा अपभ्रंष होऊन ते खाजा, खाजा सींग अस झाल


KHAJA NAIK - AADIVAASI KARANTIKARI information in marathi

खाजेसींग यांनी वडीलांसारखच निष्ठेन व इमान- दारीन काम केल. एकदा त्यांनी लुटारूंच्या एका टोळीला पकडल त्यातील एका लुटारूला इंग्रज शिपायांनी खुप मारल. मारता मारता तो लुटारु मेला. तो लुटारू मेला मात्र त्याचा आरोप इंग्रजांनी खाजेसींगांवर ठेवला आणी 'KHAJA NAIK - AADIVAASI KARANTIKARI information in marathi' त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावून तुरुंगात डांबल.

 कुठलाही गुन्हा नसताना त्यांना शिक्षा भोगावी लागत होती. तरी ते तुरूंगातही सदाचारान सदवर्तनान रहात होते. मात्र त्यांच्या साथीदारांना माहीत होत, आपला माणूस खाजा नाईक निरपराध आहे. त्यांच्यावर विना कारण आरोप घेऊन तुरुंगात डांबल आहे. त्यांना सोडण्यात याव. 

तुरुंगाबाहेर काढाव म्हणून इतर भिल्ललोकांनी इंग्रजांना विनवण्या केल्या. उठाव केला. मोर्चे काढले. मात्र इंग्रजांनी त्यांच काही एक ऐकल नाही, इंग्रजांनी भिल्लांचे मोर्चे उठाव सर्व हानुन पाडले तेव्हा भिल्लांनी इंग्रजांना छळायला सुरुवात केली. त्यांच्या चौक्या, ठाणी लुटायला लागले जाळपोळही करायला लागले. 

अनेक भागांत विद्रोह करून इंग्रजांना छळायला लागले त्यांच्या त्या विद्रोहाने इंग्रज सरकार जेरीस आले. त्यांचा तो विद्रोह थांबवण्यासाठी इंग्रजांना खाजा नायकांना सोडावच लागल . दहा वर्षांची सजा होती तरी पाच वर्षातच ते तुरुंगाबाहेर आले हा भिल्ल संघटनेचा विजय होता. तसच खाजा नायकांच्या सदवर्तनाचही फळ होत.


KHAJA NAIK - AADIVAASI KARANTIKARI 


खाजा नाईक तुरुंगातून सुटून आल्यावरही त्यांची निष्ठा आणी सचोटी पाहून इंग्रजांनी त्यांना पुन्हा सेवेत यायचा आग्रह केला. मात्र त्यांच्या स्वाभिमानी मनाला ते पटल नाही. १८३८ते १८५१ एवढे दिवस आपण इंग्रजांची निष्ठेन सेवा केली. त्याच फळ त्यांनी आपल्यावर असे खोटे आरोप करून तुरुंगात टाकून पाचवर्षे तुरुंगवास भोगायला लावला. याचा त्यांना खुप राग आला. 

त्यांनी इंग्रजांकडे नोकरी करायचा प्रस्ताव साफ नाकारला. आणी आपला स्वाभिमान जपला. नोकरी करताना आणी तुरुंगात असताना त्यांना अनेक अनुभव आले होते. त्यात त्यांना असही  KHAJA NAIK - AADIVAASI KARANTIKARI information in marathiसमजून आल होत की, इंग्रजांना आपल्यातीलच अनेक लोक मदत करतात. आणी त्यांना मदत करून आपल्यातल्या गरीब जनतेवर अन्याय, अत्याचार जुलूम, जबरदस्ती करतात याचा त्यांना रागच होता. 

मनात चिड होती. या अन्याय अत्याचाराचा, समाजबांध- वांवरील जुलूम जबरदस्तीचा बदला घ्यायच, हे अत्याचार बंद करायच त्यांनी ठरवल. समाज बांधवांच्या पाठीशी उभरहायच ठरवल आणी आपल्यातील काही लोकांना संघटीत केल. त्यांच्या मनात इंग्रज आणी सावकारांच्या अन्याय अत्याचारी वागण्याविषयी जागृती करून लढायला सिद्ध केल. 

सर्व लोकं आधीच कंटाळलेले असल्याने ते उस्फुर्तपणान अत्याचार करणारांच्या विरोधात संघटीत झाले. मिल्लांची निडर,उस्फुर्त, लढवय्यी सेना तयार झाली खाजा नाईक त्यांच नेतृत्व करत होते. कालू नाईक, भिमा नाईक, आनंद नाईक, महादेव नाईक, डोलक नाईक, रामलीला नाईक असे जाणते, अनुभवी, पराक्रमी, स्वाभिमानी निष्ठावान साथीदार त्यांना साथ देवू लागले. दिवसेंदीवस संख्या वाढायला लागली मोठी सेना तयार झाली. मुंबई आग्रा रोडवरील सेंधवा घाटाच्या परिसरात खाजा नाईक आधी बरेच फिरलेले असल्याने त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला. आणी जे लोक इंग्रजांना मदत करत होते' त्यांना दंड करायला लागले. त्यांच्याकडील संपत्ती लुटून गोरगरीबांना वाटायला लागले. काही ठिकाणी इंग्रजांच्या छावण्या, चौक्या होत्या त्यांवर छापे टाकून त्या लुटणे, नष्ट करणे, जाळपोळ



करणे अशा प्रकारांनी इंग्रजांवरही दहशत पसरवायला लागले. आणी परिसरात आपला अधिकार बसवायला लागले. आणी - इंग्रजांच्या ऐवजी स्वताच कर वसूल करायला लागले. इंग्रज अधिकारी, सावकारांना चांगल झोडपून आपला वचक-दरारा निर्माण केला. मात्र कोणत्याही गरिबांवर, समाजबांधवांवर, स्त्रीयांवर अत्याचार होणार नाही याची दक्षता घेतली. गरीबांत आपुलकी निर्माण करून विश्वा- स वाढवून त्यांची निष्ठा आणी सहकार्य मिळवल.

१८५७ च्या काळात संपूर्ण भारतभर इंग्रजी सत्तेच्या विरोधात स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती. अनेक लोक, संघटना लढा देत होते. खाजा नाईकही त्यात सहभागी होते. आपल्या ३०० शे साथीदारांना घेऊन ते उठाव करत होते' इंग्रजांच्या विरोधात कारवाया करत व सुगावा काढून इंग्रजांचा मोठा खजाना लुटला. या आधी त्यांनी लहाण मोठी बरीच लुट मिळवून गरिबांना वाटली 'होती' मात्र आताचा त्यांनी साथीदारांसह मिळवलेला खजाना खुप - मोठा होता ती लुट मोठी होती. त्यात चांदिचे शिक्के, रोकड, दागीने असा ऐवज होता. 

खाजा नाईकांनी मिळवलेली ती लुट त्या काळातली भारतातली मोठी लूट मानली जाते. त्या लुटीतून त्यांनी आपल्या साथीदारांसाठी हत्यारं, आधुनीक शस्त्रे घेऊन बाकीची लूट गोर गरीबांत वाटून दिली. या घटनेनंतर मात्र इंग्रज सरकार चवताळून उठल. त्यांनी खाजांना पकडण्यासाठी रानरान पछाडल. 

अनेक अधि- काऱ्यांना जबाबदारीन पाठवल. मात्र नाईक काही हाती लागत नव्हते. तेव्हा इंग्रजांनी त्यांच्यावर बक्षीस जाहीर केल जो कुणी खाजा नाईक यांचा तपास सांगेन त्यांना २००० २रूच बक्षीस ठेवल. त्यांचा शोध सुरूच ठेवला दि. ११ एप्रील १८५८ रोजी इंग्रज आणी खाजा नाईकांच्या सैन्याची जंगलात अचानक भेट झाली. दोन्ही सैन्यात चांगली चकमक झाली. 

त्यात खाजा नाईक निसटून जाण्यात यशस्वी झाले. इंग्रजांचा मोठा घेराव भेदून ते त्यातून निसटले. इंग्रजांनी त्यांचा पाठलाग केला तरी ते सापडले नाही. इंग्रज हतबल होऊन परतले इंग्रजांना चकवा देत रानावनांतून हिंडत खाजा नाईक आणी त्यांचे सहकारी इंग्रजांना सळो की पड़ो करून सोडत होते. अनेक इंग्रजांना चांगला चोप देत होते. चौक्या ठाणी उध्वस्त करत होते लुटालुट जाळपोळ करत होते. 

तर दुसरीकडून त्यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी जीवाच रान करत होते. अनेक प्रयत्न करत होते. सुगावा सांगणाराला त्यांनी आधीच बक्षीस जाहीर केलेल होतच. त्या बक्षीसाची लालसा धरून एकान घात केला. २००० रु मिळवण्यासाठी रोहीतून मखराणी नावाच्या माणसाने इंग्रजांना खाजा नाईकांचा अचूक सुगावा सांगीतला. त्यानुसार इंग्रजांनी तातडीन सापळा रचून खाज़ा नाईक आणी त्यांच्या साथीदारांना मोठा घेराव घातला. 

KHAJA NAIK - AADIVAASI 


सातपुडा च्या जंगलात शिरपूर जवळच्या अंबापाणी या ठिकाणी हा घेराव घातला. खाजा नाईक आणी त्यांचे सर्व सहकारी मिळून इंग्रजांच्या अफाट सैन्याचा निकरान प्रतिकार करायला लागले. सर्वजण निकरान झुंज देत होते. दोन्ही दळात घनघोर लढाई झाली.

 ही लढाई भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ४-२-१८६० १८६० ची अंबापाणीची लढाई नावाने प्रसिद्ध आहे बाढाईत भिल्लांच्या बायां व मुलांनीही प्रत्यक्ष सहभाग घेऊन झुंज दिली. तलवारी, तर गोफण, गुलेर, लाठ्या-काठ्यां, दगडांचा मारा करून इंग्रजांना जेरीस आणल. खाजांनीही अनेक इंग्रज आणी त्यांच्या सैन्यातून लढणाऱ्यांना घायाळ केल. ठार मारल. 

मात्र या धांदलीत त्यांना इंग्रजांची बंदूकीची गोळी लागली ते घायाळ झाले नी गतःपाण झाले. त्यांची प्राणजोत मालवली. या लढाईत त्यांचे ६५ साथीदारही मारल्या गेले.

एक स्वाभिमानी धमधमता, पराक्रमी योध्दा लढाई करता करता विरगतीला गेला. गोरगरीबांसाठी, समाज बांधवांसाठी ते हुतात्मा झाले. मात्र निर्दयी इंग्रजांनी त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मृत देहाची क्रूरतेन विटंबना केली. त्यांचा मृतदेह धरणगावच्या रेल्वे स्टेशनसमोर रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाला आठ दिवस लटकवत ठेवला. नी आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. 

मात्र त्यांच्या त्या प्रयत्नांच्या आधीच खाजा नाईक मरूनही अमर झाले. "KHAJA NAIK - AADIVAASI KARANTIKARI information in marathi" अनेक क्रांती- विरांना, समाजबांधवांना प्रेरणा देवून गेले. भिल्लांच्या गौरवशाली इतिहासात, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात, अंबापाणीची लढाईत आणी खाजेसिंग नाईक अमर झाले.

लेखक : ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या