Tilka Majhi- The Warrior of the Old World in Marathi तिलका मांजा यांचा जन्म ११ फेब्रुवारी १७५० मधे झारखंड मधल्या सुलतानगण जवळच्या तिलकपूर इथे झाला.
त्यांच मुळ नाब जबरा पहाडीया अस होत. मात्र त्यांचे मोठाले लाल डोळे पाहून इंग्रजांनी त्यांना तिलका मांजा हे नाव दिल होत. पुढे तेच नाव रूढ झाल.
तिलका मांजा हे लहाणपणा पासूनच हुशार, महत्वाकांक्षी व जिद्दी होते. तरुणपणात ते तडफदार, स्वातंत्र्यप्रीय, निडर, न्यायप्रीय आणी निष्णात तिरंदाज झाले.
Tilka Majhi- The Warrior of the Old World in Marathi
ते ग्राम प्रमुख होऊन गावकऱ्यांच्या आर्थीक, सामाजीक, संरक्षणाची जबाबदारी निभवायला लागले. आपल्या परिसरातील जनतेवर इंग्रजी हुकूमतीचे आणी सावकारांचे 'Tilka Majhi- The Warrior of the Old World in Marathi' होणारे अन्याय अत्याचार त्यांनी लहाणपणा पासून पहात आलेले होते. आणी म्हणून त्यांच्या मनात इंग्रजाविषयीची चिड होती.
त्यांच्या विरोधात आवाज उठवायच त्यांनी ठरवल आणी भागलपूरच्या कंचनी मोर या ठिकाणी स्वतंत्रता संग्रामाचा प्रथम उठाव सुरू केला.
इ. स. १७७० मधे बिहार बंगाल भागात मोठा दुष्काळ पडला होता. लोकांना अन्न मिळत नव्हत. अन्नावाचून लोक मरायला लागले. त्यावेळी तिलका माजी यांनी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन इंग्रजांचे गोदामं लुटले आणी त्यांतील अन्न आणी धनही गरिबांना वाटले.
भर दुष्काळात लोकांना आधार दिला त्यांचे प्राण वाचवले. लोकं त्यांना आपला दाता मानून परोपकारी समजायला लागले. त्यांच्या कार्यात त्यांना सहकार्य - मदत करायला लागले
. त्यानंतरही तिलका मांजा यांनी अनेक वेळा सरकारी खजीने, गोदामं लुटले आणी गरिबांना वाटले. १७७४ मधे चुआर विद्रोह करून लोक इंग्रजांच्या विरोधात कारवाया करत होते त्यावेळी इंग्रजांच सैन्य तिकडे गुंतलेल असल्याने ते तिलका मांजींचा सामना करु शकले नाही.
तिलकांचे सर्व साथीदार तिर, गुलेर, गोफण अशा पारंपारीक शस्त्रांनी लढायां करायचे आणी इंग्रजांना झोडून काढायचे. तिलका सालच्या झाडाच्या पानांना घरोघर पोहचवून आपला संदेश देवून लोकांना संघटीत करायचे.
Tilka Majhi- The Warrior
इंग्रजांचे अनेक शिपाई अधीकारी प्रयत्न करून थकले तिलकांचा शोध घेत फिरले तरी त्यांना ते सापडले नाही. आणी त्यांच्या वाढत्या कारवाया थांबवण्यासाठी इंग्रजांनी इक्यूलीलँड नावाच्या कलेक्टरला पाठवले. तो मोठा मुत्सद्दी, चलाख, धुर्त होता. त्याने पहाडी समुदायाच्या ४७ गावांना करमुक्त केल आणी त्या गावांतील सरदारांना आपल्या बाजूकडून करून घेतल. आणी पहाडी व संथाल यांच्यात फुट पाडली. त्यानंतर तिलकांचा शोध घ्यायला निघाला धुर्तपणान Tilka Majhi- The Warrior of the Old World in Marathiतिलकांना पहाडींची मदत मिळण बंद झाल. तरी तिलकांनी आपल्या साथीदारांसह इंग्रज विरोधी कारवाया सुरू ठेवल्या होत्या.
त्यांनी भागलपूरवर हल्ला केला आणी इंग्रजांचा खजीना लुटला त्यामुळे इंग्रज कलेक्टर जास्तच चवताळला तिलकांचा शोध कसून घ्यायला लागला. तिलकांनाही त्याला चांगला धडा शिकवायचा होता.
ते संधीची वाटच पहात होते. नि ती संधी त्यांनी अचूक साधली. कलेक्टरच्या जाण्याच्या मार्गावर ते एका ताडाच्या झाडावर लपून बसले. कलेक्टर घोड्यावर बसून येत होता.
पुंजांनी त्याच्यावर निशाणा धरून विखारी बाण सोडला. तो कले- कटरच्या छाताडात घुसला नी तो ठार झाला. दि 23 जानेवारी १७८४ रोजी त्याला ठार केल.
इक्यूलँडच्या नंतर इंग्रजांनी तिलकामांझीना पकडण्या- साठी वेरीन हॅस्टींग नावाच्या अधिकाऱ्याला पाठवला तो देखील चाणाक्षपणान धुर्ततेन तिलकांना पकडण्यासाठी झटत होता. ज्या लोकांचे कर माफ केलेले होते त्यातीलच जरा नावाच्या गद्दारान तिलकांना पकडवून दिल. ते पकडले गेले.
इक्यूलँडच्या नंतर इंग्रजांनी तिलकामांझीना पकडण्या- साठी वेरीन हॅस्टींग नावाच्या अधिकाऱ्याला पाठवला तो देखील चाणाक्षपणान धुर्ततेन तिलकांना पकडण्यासाठी झटत होता. ज्या लोकांचे कर माफ केलेले होते त्यातीलच जरा नावाच्या गद्दारान तिलकांना पकडवून दिल. ते पकडले गेले.
मात्र ते वेरीनच्या हातून निसटले आणी सुलतान गडाच्या जंगलात पसार झाले. आणी काही दिवसांनी पुन्हा सैन्याची जमवाजमव करून लढत राहीले. अनेक वेळा इंग्रज सैन्या सोबत त्यांच्या अनेक वेळा लढाया झाल्या. इंग्रजांजवळ आधुनीक बंदूका आणी तोफा होत्या तर तिलकांकडे पारंपारीक गुलेर आणी तीर-धनुष्य होते.
इंग्रज लोकं आपल्या स्त्रियांवर अत्याचार करतात याची खबर मिळताच तिलकमांजा आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी १८८५ मधे रामलाल कॅम्पवर जोरदार हल्ला करून इंग्रजांची दाणादाण उडवली आणी इंग्रजांच्या तावडीतून रामलाल कॅम्प मुक्त केल. आणी स्त्रीयांवरील अत्याचारही थांबवले. मात्र या प्रकरणाने चवताळलेल्या वेरीन हेस्टींग ने तिलकांचा बंदोबस्त करण्याचा चंगच बांधला. तो खुप मोठ सैन्य घेऊन आला. आणी आधुनीक शस्त्रांनी हल्ला केला.
Tilka Majhi- The Warrior in Marathi
यांच्याकडे तसे हत्यारं नसल्याने व त्यांच सैन्यबळही कमी पडल्याने तिलकांची हार झाली. ते कैद झाले. इंग्रजांनी त्यांना साखळदंडांनी जखडवून चार घोड्यांना बांधल आणी ओढत-खरचटत भागलपूर ला आणल. इतक्या लांब ओढत आणल तरी ते जिवंत होते असा त्यांचा आत्मविश्वास दृढ होता.
इंग्रजांनी त्यांना भागलपूरच्या भर चौकात वडाच्या झाडाला लटकवून फाशी दिली. दि. 9 जाने वारी १७८५ रोजी तिलका मांजी समाज बांधवांच्या, भील आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी झटताना हसत हसत फासावर गेले. इंग्रजांविरुद्ध बंड करणारे ते पहीले क्रांतीकारी आणी हुतात्मा ठरले.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातले अजरामर झाले. पहीले "Tilka Majhi- The Warrior of the Old World in Marathi" विद्रोही ठरले. त्यांच्या प्रेरणेने नंतर भिलांमधून अनेक क्रांतीकारी होऊन देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढून अमर झाले.
लेखक- डॉ. ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर

