विर - एकलव्य | Veer Eklavya Aaadivasi Story in Marathi

Veer Eklavya Aaadivasi  Story in Marathi विर एकलव्य- परमेश्वराच साक्षात साकार स्वरूप म्हणजे हा निसर्ग. सृष्टीच्या निर्मीती पासूनच निसर्गान सजीवांना आश्रय दिला आहे. संगोपन करत जीवदान दिल आहे.

 हे जंगलराज म्हणजे भुतलावरचा प्रत्यक्ष आश्रयदाता ईश्वरच. याच जंगलांच्या निसर्गाच्या सानिध्यात आदिमानवाच अस्तीत्व टिकून अबाधीत राहीला आहे. 
 
                                            

Veer Eklavya Aaadivasi  Story in Marathi
veer eklavya


आदिमानवालाच पूढे आदिवासी म्हणून ओळख झाली. आदि+ वासी आदिवासी. सर्व आदिवासी एकमेकांच्या अश्रियान गुण्या गोवीं दान रहात होते.



Veer Eklavya Aaadivasi  Story in Marathi 


अशा या आदिवासी मधील एखादा सुर धाडसी पराक्रमी आपल्या समाजबांधवांच संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन मोठ्या निष्ठेन आपल्या बांधवांच त्यांच्या कुटुंबांच रक्षण करायचा. त्याला आपला रक्षक नेता मानून, त्यालाच इतर लोके प्रामाणीकपणान साथ दयायचे. सर्वजण  'Veer Eklavya Aaadivasi  Story in Marathi' एकमेकांच्या सुखात दुःखात आनंदात सहभागी होऊन सणवार साजरे करायचे. 

पुढे त्यांच्यातील आपापसांतील वाद, किंवा शेजारच्या - दुरच्या नगरांतील एखाद्या बलाढ्यांचा दरोडेखोर, लुटारूंचा, राजांचा त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांनी जवळच्या राजांचा आश्रय घेऊन रहाणे सुरू केले.

हस्तीनापूर या समृद्ध नगरीच्या जवळ आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी भिल - निषाद लोक तेथील राजघराण्यांच्या सोबत परंपरेनुसार निष्ठेन स्नेह राखून प्रामाणीकपणान रहात होते. त्यांच्या आश्रयान निर्भय जगत होतो कधी आपल्या वर संकट आल तर त्या राजांच्या सहायान - मदतीन ते निवारून नेत होते. तर कधी त्या राज्यावर एखादया इतर राजाच संकट आल तर वेळ प्रसंगी लढायां- युद्ध करायला किंवा इतर कोणतीही मदत करायला हातात शस्त्र घेऊन त्या राजांच्या मदतीला धाऊन जात आपला क्षत्रीय धर्म निभावत होते. अशातीलच एक घराण होत निषादराज हिरण्यधनूचा ते भिलांचे राजे होते.

हस्तीनापूर पासून काही अंतरावर निषादांची वस्ती होती. शूर धाडसी निडर काटक अशी या निषादांची ख्याती होती. त्यांनी निष्ठा व प्रामाणीकपणान आपली महत्ता जोपासली होती परंपरे नुसार ते काबाडकष्ट करून, कधी शिकारीचा छंद जोपासत होतो आपापले सण उत्सव साजरे करून आनंदान रहात होते. 

वेळ पडेल तेव्हा हस्तीनापूरच्या राजांच्या मदतीला धाऊन जात होते. हिरण्य धन् हे आपल्या साथीदारांना आपल कुटूंब मानून त्यांचा सांभाळ करत होते. त्यांच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी दक्ष रहात होते. त्यांची पत्नी कनीरी ही देखील धार्मीक वृत्तीची होती. ती महान पतीव्रता होती. पतीच्या कार्यात मोलाच योगदान देत पतीव्रता धर्म निभावत होती.

हिरण्यधनू- कनेरीला एकलव्य हा पुत्र झाला तेव्हा त्यांना खुप आनंद झाला. त्यांनी मोठ्या श्रध्देन आपल्या आदर्शाचे धनी असलेल्या महर्षी व्यासांना आहेर देवून सन्मानीत केल. तेव्हा व्यासांनी संतुष्ट होऊन बाळाला आशिर्वाद दिले नी एकलव्य असे त्याचे नाव ठेवून शुभकामना व्यक्त केली.

Veer Eklavya Aaadivasi  Story


एकलव्य हे राजपुत्र होते. लाड कौतुकात त्यांच बालपण जात असल तरी ते सुसंस्कारांनी वाढत होते ते जिज्ञासू शिस्तप्रिय होते. धाडसी, निडर होते. राजपूत्र असुनही ते आज्ञा- धारक होते. माता कणेरींनी त्यांची सर्व काळजी घेत त्यांच्या आरोग्याची सुदृढता राखली होती. वडील हिरण्यधन हे देखील त्यांना सुसंस्कार करण्यासोबतच त्यांना शिक्षण देण्याचीही काळजी घेत होते.

 इतर सर्व प्रकारच शिक्षण घेता घेताच त्यांना आपल्या पारंपारीक धनुर्विदेयचीही खुप गोडी लागली. त्यांची ती जिज्ञासा आवड पाहून हिरण्यधन यांनी आपल्या राज्यातील निष्णात तिरंदाजांकडून त्यांना तस शिक्षण देण्याची व्यवस्था केली. एकलव्यांनी मोठ्या आत्मीयतेन ते शिक्षण आत्मसात करून घेतल.

हस्तीनापुरातील राजपुत्रांना द्रोणाचार्य धनुर्विद्या शिकवतात हे ऐकून एकलव्यांची उत्कंठा वाढली. आपण ही राजकुमार आहोत. आपणही त्यांच्या कडून ती विद्या शिकून घ्यावी अशी त्यांना तळमळ लागली. त्यांनी आपली इच्छा आई आणी वडीलांना बोलून दाखवली. मुलाची इच्छा जाणून घेऊन माता कणेरी यांनी पती देवांकडे तसा आग्रह धरला. की, आपण द्रोणाचार्यांना सांगून एकलव्यालाही  Veer Eklavya Aaadivasi  Story in Marathi धनुर्विद्या शिकवायला विनंती करावी. राजा हिरण्यधन यांनाही तो प्रस्ताव सोग्य वाटत होता. मात्र द्रोणाचार्यांना भेटायला, त्यांना विनंती करायला त्यांच मन धजत नव्हत.

हिरण्यधनू हे राजे होते. निषधांचे अधिपती होते. हस्ती- नापुरात त्यांना मान सन्मान होता आदर होता. मात्र त्यांना माहीत होत की, हस्तीना पूरात कृपाचार्य या ब्राम्हण आचार्याच्या विचारांच वर्चस्व आहे. द्रोणाचार्य हे देखील ब्राम्हणच आहेत. ते कृपाचार्य चे आप्तेष्ट-शालक आहेत. 

ते दोन्हीही आपणाला तृच्छ समज ताता द्रोणाचार्यांनी यापुर्वीच कर्णाला सुतपुत्र- सेवकाचा पुत्र म्हणून धनुर्विद्या शिकवायला नकार दिलेला होता. आपल्याला देखील ते शुद्र समजून एकलव्याला ज्ञान दयायला नकार देतील. याची हिरण्यधनूंना जाणीव होती. म्हणूनच ते द्रोणाचार्यांकडे एकलव्याच्या शिक्षणाचा विषय काढायच टाळत होते. त्यांची ती दिधा मनप्रस्थीती चाणाक्ष एकलव्यांनी ओळखली. आणी एके दिवशी त्यांनी आईला नमस्कार केला. आणी परवानगी घेऊन हस्तीनापूरात द्रोणाचार्यांना भेटायला निघाले.

एकलव्यांनी द्रोणाचार्यांना विनयपूर्वक नमस्कार केला. आपली ओळख करून दिली. आणी आपणाला धनुर्विद्या शिकवण्याची विनंती केली' मात्र द्रोणाचार्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. मी राजगुरू आहे. मी फक्त राजपुत्रांनाच विद्या शिकवतो! अस सांगून त्यांना अपमानीत करून परत पाठवल. एकलव्यांना त्यांचा राग आला. आणी ते त्वेषाने म्हणाले, कोण म्हणत आम्ही शुद्र आहोत, निच आहोत. जंगली असभ्य आहोत. शुद्र तर ते आहेत ज्यांचे विचार शुद्र आहेत. तुम्ही नाही शिकवल तरी ही धनुर्विद्या काही स्तीमत राहणार नाही. किंवा लोप पावणार नाही' ही विद्या हे ज्ञान सृष्टीच्या निर्मितीपासूनच आहे ते तिच्या अंता पर्यंत अबाधीत राहील. त्याला कोणताही गर्वीष्ठ माणूस थांबवू शकत नाही एवढ बोलून ते तिथून निघाले.

घरी आल्यावर एकलव्यांनी आईला सर्व वृत्तांत कथन केला. ते ऐकून तिलाही वाईट वाटले. तिने बाळाला धिर दिला. समजवून सांगून राग कमी केला. आणी कर्णाच उदाहरण दिल. कर्णदेखील द्रोणाचार्याकडे धनुर्विद्या मागायला गेला होता. तेव्हा कर्णालाही त्यान असच अपमानीत करून सुतपूत्र म्हणून, विद्यादान करायच नाकारून हिनवल होत नी परत पाठवल होत. तू त्याचा नाद सोडून दे आणी दुसर कोणा कडे जाऊन ज्ञान मिळव! असे विचार मांडले. त्या आणखी पुढे म्हणाल्या,

तुला कुठेही जायची गरज नाही. तुला आपल्या राज्यातल्या जाणकारांनी जे ज्ञान दिल आहे जी विद्या शिकवली आहे ती खुप मोलाची आहे त्याचा चांगला सराव करून ज्ञान वाढव. हा निसर्ग आपला दाता त्राता आहे त्यालाच गुरु मानून ज्ञान संचय करून मोठा हो! या सृष्टीत, निसर्गात जे ज्ञान, विद्या, शक्ती, औदार्य आहे ते कोणातही नाही. आपल्या प्रयत्नांनी - कष्टांनी जेवढ घेता येईल तेवढ घ्याव ते कधीच संपणार नाही. तुला माझा आशिर्वाद आहे. यशस्वी हो!

आपल्या आईचे प्रांजळ विचार एकलव्यांना पटले त्यांनी विचार केला आणी दुसऱ्या दिवशी आईला आणी वडीलांना आदरान वंदन करून रानात निघाले. निसर्ग देवतेला आदरान वंदन केल. आणी आपल्या घराण्यातील परंपरेन जतन केलेल धनुष्य पशुपत हाती घेऊन त्याला मस्तकाला लाऊन आदरान नमस्कार केला.

त्या काळात भगवान शंकरांचे पिनाक, परशूरामाचे विजय, रामाचे कोदंड, कृष्णाचे सारंग, अर्जुनाचे गांडीव, आणी हिरण्यधन - एकलव्यांचे पशुपत हे धनुष्य प्रसिद्ध होते. त्यांना धारण करणारे श्रेष्ठ धनुर्धर मानले जात होते. त्यांच श्रेष्ठत्व अबाधीत होत. ते अपराजीत मानले जात होते.

एकलव्यांनी पशुपताला वंदन करून प्रत्यंचा चढवला आणी त्याचा टणत्कार केला. त्याचा नाद त्या रानात दुमदुमला. आणी बाण लावून सराव करायचा प्रयत्न करायला लागले. मात्र त्यांच मन अस्थीर-बेचैन झाल. त्यांचा मनात विचार आला, आपण इतर माणसांसारखेच. इतर लोकांसारखच अन्न खातो. राजपुत्र आहोत. आपल आचरण शुद्ध, विचार प्रांजळ तरीही शुद्ध ? आणी हे ब्राम्हण अशा हलकट विचारांचे माणसात भेद करणारे मग ते तरी श्रेष्ठ कसे? या विचारांनी ते व्याकूळ झाले, अशा विचारांनी ते बेचैन झाले. काय कराव? हा प्रश्न त्यांच्या समोर आला. त्यांना आठवल आपल्या वडीलांकडे पूर्वी आपण लहाण असताना अनेक राजे. काही ऋषीही यायचे. त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या. त्यात त्यांनी एकदा परशूरामाच नाव ऐकलेल होत. ते महान धनुर्धर आहेत अस ते ऐकून होते. आता त्यांनी मनाशी ठरवले की आपण परशूरामाकडे जायच.

एकलव्यांनी सराव करायच थांबवल आणी ते घरी आले. त्यांनी आई वडीलांना आपले विचार सांगून परशूरामा कडे जायची परवानगी मागली. बाळाची बेचैनी, जिज्ञासा आणी हटट् जाणून त्यांनी काही स्वानुभवाचे मार्गदर्शन करून, काही सुचना देवून परवानगी देवून आशिर्वाद दिले. आई वडीलांची संमती घेऊन व त्यांना वंदन करून श्रेष्ठ धनुर्धर व्हायच्या जिद्दीन त्यांनी निरोप घेतला की निघाले.

रानात येवून मार्गक्रमण करत, विचार करत करत एकलव्यांनी मार्गात भेटेल त्याला परशूरामाचा ठाव ठिकाणा विचारल मार्ग शोधत रानावनांतून हिंडत चालत होते.

 Eklavya Aaadivasi  Story in Marathi 


द्रोणाचार्यांच्या घरची स्थिती अगदीच हलाखीची होती. खायला अन्न मिळत नव्हत. त्यांचा एकूलता एक पुत्र अश्वत्थामाला ते त्यान दुध मागीतल्यावर पिठाच पाणी करून पाजायचे अस करताना त्यांची पत्नी कृपी ही देखील दुःखी कष्टी होत असे. एकलव्याला वाटल आपणही माणूस आहोत. मला आई वडीलांकडून माझ्या समाजाकडून चांगले संस्कार मिळाले आहेत. मी हीन नाही, मी शुद्र नाही. त्यांच्या मनात असाही विचार आला की ,

आपण परशूरामांकडे धनुर्विद्या शिकायला जातोय ते देखील ब्राम्हणच आहेत. आणि त्यांनीही आपणास हीन शुद्र म्हणून असाचा नकार दिला तर ?-नाही, ते असा विचार करणार नाहीत. कारण त्यांनी कर्णाला सूतपुत्र म्हणून नाकारल नाही. ते आपल्यालाही नाकारणार नाही असा विचार करत ते कुरूक्षेत्राची सिमा पार करून यमुना तिरावर आले. तेथे एका नावाडी युवकाजवळ जाऊन महेंद्राचल पर्वताकडे जाण्याचा मार्ग विचारून चौकशी करायला लागले. तेव्हा तो युवक विस्मयचकीत झाला आणि आपण कोणडे कुठून आलात? महेंद्राचलावर कशासाठी जात आहात? अशी सर्व चौकशी केली तेव्हा एकलव्यांनी आपली सर्व सत्य माहीती सांगून तिकडे जाण्याच प्रयोजनही सांगीतल. ते सर्व ऐकून त्या युवकाला सहानुभूती वाटली. 

त्यान आग्रहान एकलव्यांना आपल्या घरी नेल. व आजच्या दिवस इथे मुक्काम करून सकाळी योग्य मार्गाने जाण्यास सांगीतल. कारण त्यांचा मार्ग चुकलेला होता. व आता सायंकाळ झालेली असल्याने अनोख्या मार्गान एकलव्यांना पुढे जाऊ देण हे त्या युवकांना योग्य वाटल नाही म्हणून त्यांनी आग्रहान आपल्या घरी नेल.

तो नावाडी युवक निषादच होता त्याच नाव होत, अवाची. हस्तीनापूर नरेश महाराज शंतनू राजांचे सासरे असलेल्या निषादराजांचा तो नातू होता. आपल्या जातीचा वाटसरू व एक राजपुत्र म्हणून त्यान मोठ्या आग्रहान एकलव्यांना आपल्या घरी नेल. बराच वेळ पर्यंत बोलण विचार विनिमय करून, रात्री मुक्काम करून सकाळी आदरान निरोप देऊन महेंद्राचलाचा मार्ग दाखवला. आणि अचानक आठवून त्यांनी जवळच रहात असलेल्या महर्षी व्यासाच दर्शन घ्यायचा एकलव्यांना आग्रह केला ' ते मान्य करून एकलव्य प्रथम व्यासांच्या दर्शना साठी निघाले. व्यासांनी एकलव्याच यथोचीत आदरातिथ्य केल. सर्व विचारपूस केली. 

राजा हिरण्यधनूची खुषाली विचारून आपली ओळख करून दिली व तुझ एकलव्य नाव मीच ठेवलेल आहे. अस सांगीतल. तो सर्व खुलासा ऐकून एकलव्याज आदरान नतमस्तक होऊन. आपल्या मनातील महेंद्राचाकडे आण्याच आपल प्रयोजन खर तेच सांगीतल. ते सर्व स्पष्टी करण ऐकून ते म्हणाले

हे विरा! तुझ्या मनातील क्रोध मी समजू शकलो, तरीही सांगतो की, गुरूंच्या ठायी अढळ श्रद्धा ठेवूनच ज्ञान प्राप्ती होते. कपटान मिळवलेल ज्ञान ऐनवेळी उपयोगी येत नाही. तेव्हा ज्ञान मिळवताना मनात थोडही कपट ठेवू नये... तुला द्रोणाचार्यानी शुद्र अस म्ह‌टल्याच तू सांगतोस. म्हणून का तू शुद्र झालास. अरे जो परमेश्वरान निर्माण केलेल्या कृतील भेदभाव करतो तोच खरा शुद्ध हीन दीन असतो. तू स्वताला कधीही नीच, कमी समजू नकोस. गुरूवर श्रध्दा ठेवून स्वता अभ्यास केल्याने तुला धनुर्विदयेच ज्ञान होईल. सर्व जगात सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून तुझी ख्याती होईल असा माझा तुला आशिर्वाद आहे! तू आता घरी जा. आणि स्वअध्ययन करून धनुर्विद्येत पारंगत हो!

महर्षी व्यासांचा उपदेश ऐकून, त्यांचा आशिर्वाद घेऊन एकलव्य महेंद्राचलाकडे न जाता आपल्या घराकडे परतला येताना तो हस्तीनापूरात अधिरथांच्या घरी गेला. तिथे कर्णाणा पाहून त्याला खुप खुप समाधान झाल. व व्यासांनी आपणास पुढे न जाऊ देता मागे परत पाठवल हे खुप बर झाल अस म्हणत मनाने व्यासांचे आभार मानले. कर्णासोबत चर्चा करून आपली व्यथा सांगीतली ती ऐकून कर्ण म्हणाले,

मित्रा! आपण समदुःखी आहोत. द्रोणाचार्यांनी आपणाला हीन लेखून ज्ञानार्जन करायचं नाकारल. तेव्हा तेच खरे दुबळे हीन झालेल - मी परशूरामांकडे ज्ञानाच्या लालसेने गेलो मात्र ते देखील ब्राम्हणच आहेत ते आपल्याला ज्ञान देण्यास नकार देतील, असा विचार करून मी तिथे ब्राम्हण पूत्र म्हणून ज्ञान घेतल. मात्र अगदी शेवटी माझ खर स्वरूप ओळखू आल नी त्यांनी मला दोष देऊन शाप दिला की ऐन वेळी तुझी विद्या तुला कामी येणार नाही। तुला महत्वाच्या वेळी त्या विद्येचा विसर पडेल, ब्रम्हविद्येच स्मरण होणार नाही।

त्यामुळे मी ज्ञान मिळवूनही दुःखीच आहे मित्रा तू, व्यासांनी सांगीतल्या प्रमाणे स्वअध्ययन करून, परिश्रमपूर्वक श्रम करून ज्ञान संपादन करून पारंगत हो! आणि द्रोणाचार्यांच्या गर्वाच हरण कर! माझ्या तुला शुभेच्छा आहेत!

कर्णाच्या उपदेशान, मार्गदर्शनान एकलव्य भारावून गेले. त्यांनी कर्णाचे आभार मानून निरोप घेतला. नी घरी जायला निघाले. घरी आल्यावर सर्वांनी त्यांच आनंदान स्वागत केल. एकलव्यांनी आई वडीलांना, व्यासांची आवाचीची व कर्णाची भेट झाल्याची व त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाची सर्व माहीती कथन केली. ती ऐकून हिरण्यधन व कनेरी दोघांनाही खुप आनंद झाला. त्या दोघांनी मनोमन त्या तिघांचे आभार व्यक्त केले.

दुसऱ्या दिवसापासून एकलव्य रानात गेले तेथे पुर्विच्याचा ठिकाणी जाऊन निसर्ग देवतेला विनम्र भावनेने वंदन केल- आणी - मनोमन महर्षी व्यासांच स्मरण करून धनुर्विद्येचा सराव सुरू केला आणि निष्ठेन, लक्षपूर्वक, स्वयंस्फुर्तीन लक्षवेध घेत घेत निशाणा साधायला लागले. तहाणभूक विसरून उन्हाची, थंडी पावसाची पर्वा न करता ज्ञानाची वृद्धी करायला लागले. व चांगले पारंगत झाले. निसर्गालाच आपला गुरू मानून स्वअध्य यनान त्यांनी खुप खुप ज्ञान मिळवल.

एके दिवशी द्रोणाचार्य आपल्या सर्व शिष्यांना घेऊन हस्तीनापूर सोडून निघाले व जंगलात सहलीला आले त्यांच्या सोबत एक आवडता कुत्राही होला' कुत्रा त्यांच्या पुढे पुढे चालल होता. जंगलात एकलव्य रोजच्या सारखच आपला धनुर्विद्येचा सराव करत होते. दुरवर तो कुत्रा भुंकायला लागला. तेव्हा एकलव्यांनी त्या भुंकण्याचा, आवाजाचा वेध घेऊन एकाच वेळी पाच बाण सोडले. ते सर्वच्या सर्व बाण त्या कुत्र्याच्या तोंडात अचुक जाऊन बसले. की ज्यामुळे कुत्र्याच्या लोंडातही इजा- जखम झाली नाही व ते खाली पडणेही शक्य झाले नाही' तोंडातील ते बाण तसेच घेऊन तो कुत्रा मागून येणाऱ्या द्रोणाचार्य व त्यांच्या सर्व शिष्यांकडे आला कुत्र्याच्या तोंडात बाण पाहून सर्वजणं विस्मितच झाले. अर्जुनान ते सर्व बाण आपल्या हातांनी काढले. पहातो तर कुत्र्याला थोडीशीही इजा झालेली नव्हती की खरचटलेल नहत. तेव्हा तो म्हणाला,

गुरुदेव! हा बाण चालवणारा कुणी सामान्य माणूस नाही. हा त्याचा शब्दवेध आणि विलक्षण चपलता अप्रतीमच आहे. तो कोण आहे? हे आम्हाला शोधून काढायलाच हव. त्या महान धनुर्धराला भेटायलाच हव

तेव्हा द्रोणाचार्यही म्हणाले,

अवश्य। मी देखील आश्चर्यचकीत झालो आहे की एवढा अचूक शब्दवेध साधणारा असामान्य धनुर्धर या जंगलात आहे तरी कोण? त्याला शोधून काढू चला!

सर्वजण त्या कुत्र्याच्या मागे मागे चालत आले. तर कुत्रा त्यांना बरोबर घेऊन आला. समोर पहातात तर एक जंगली युवक बाण मारून लक्ष साधत सराव करत होता त्या तरुणाची चपळाई अचुकता पाहून सर्वजण आश्चर्यातीरेकन थक्कच झाले. समोर एकलव्याची मुर्ती पाहून सर्वांना विस्मय वाटला. आता प्रत्यक्षात द्रोणांना यांना साक्षात आपल्या समोर पाहून एकलव्यांना अत्यानंद झाला. त्यांनी हातातील धनुष्यबाण खाली ठेवून जमीनीवर लोळत दोन्ही हातांनी द्रोणाचार्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्याना उठवत द्रोणाचार्यांनी त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी नम्रतेन आपली ओळख करून दिली.

गुरुदेव मी एकलव्य! निषादपती हिरण्यधन् चा मुलगा. सांगा मी आपली काय सेवा करू ? आपल्या कृपेनच मी हे ज्ञान मिळवत आहे. आपण मागाल ती दक्षीणा देण्याचा मी प्रयत्न करीन.

एकलव्यांचा विनम्र भाव, निष्ठा पाहून द्रोणाचार्य मनोमन सुखावले. आणि विचार करायला लागले, हा आपणाला श्रेष्ठ मानतो, आपला आदर करतो. मिळवलेल्या ज्ञानाच मोल - गुरुदक्षीणा द्यायच म्हणतो. हा खरतर त्याचा मोठेपणाच आहे. मात्र मी याला कधिही कोणताही ज्ञान दिलेल नाही. ज्ञानाचा एखादा शब्द देखील कधी सांगीतला नाही. मग याच्याकडून गुरु दक्षीणा घेण्याचा कोणताही अधिकार नाहीच. याउलट आपण याला धनुर्विद्या मागायला तो आपल्याकडे आला होता तेव्हा शुद्र म्हणून ज्ञान देण्यास स्पष्ट नकार देऊन परत पाठवल होत. तरिही त्यान लिनतेने आपल्याला गुरु मानून एवढी प्रगती केली याविषयी आपणच त्यांचे ऋणांकीत ठरलो. त्याच्या थोरपणाच आपण कौतूक करून त्याचा सन्मान करायला हवा. असा ते विचार करत होतेच इतक्यात अर्जुनान समोर येवून त्यांना स्पष्टीकरण विचारत म्हणाला,

गुरुवर! आजपर्यंत आपण आम्हाला धनुर्विद्येतल सर्व प्रकारचं ज्ञान दिलत. ज्याच्या त्याच्या आकलण क्षमतेच्या नुसार सर्वांनी ते ग्रहण करून पारंगतही झालेले आहेत. गर्वान नाही मात्र मी खर सांगतो की आपल्या सर्व शिष्य वर्गात सध्यातरी माझ्या इतक धनुर्विदयेच ज्ञान इतर 'कुणा जवळही नाही आणि आपण आपण पूर्वी म्हणाला होता की, अर्जुना! तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर दुसरा कुणीही रहाणार नाही. तूच सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे! असे असताना हा एकलव्य, आपलाच शिष्य माझ्यापेक्षाही श्रेष्ठ कसा? कारण त्याच्याकडे असलेल अद्भूत ज्ञान कौशल्य माझ्या कडे नाही!

अर्जुनान विचारलेला हा प्रश्न खरा होता. तरीही द्रोणांनी मात्र एकलव्याला कधीही कोणतही अस ज्ञान दिलेल नव्हत. त्याने स्वताच्या प्रयत्नांनी, स्वयंस्फूर्तीने अभ्यास-सराव करून ते ज्ञान मिळवलेल होत व तरिही तो द्रोणाचार्याना श्रेष्ठ मानून आपली निष्ठा जपत होता है त्याच थोरपण होते. मात्र अर्जुनाच्या प्रश्नान द्रोणाचार्य गोंधळले. त्यांच्या समोरचा अर्जुनाचा प्रश्न खरा होता. पूर्वी त्यांनी त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हटल होत तेही खर होत.

आणि आज एकलव्यान दाखवलेली कला पाहून तर एकलव्यच खरा सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे हे त्यांचे प्रांजळ मन सांगत होता मात्र त्यांच्या समोर अर्जुनाचा प्रश्न होताच. आणि आपली स्वताची प्रतिज्ञाही होती, अर्जूना तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कोणीही रहाणार नाही! समोर एकलव्य नम्र- तेन हात जोडून विनंती करत होता, गुरु दक्षीणा मागायला सांगत होता. चाणाक्ष द्रोणाचार्यांनी धुर्तपणाचा विचार केला व आलेल्या संधीचा लाभ घ्यायच ठरवून म्हणाले,

एकलव्या! तू महान आहेस. तुझी निष्ठा थोर आहे याक्षणी तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस हे मी या सर्वांसमोर मान्य करून तुला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून तुझ्या कलेचा, तुझा गौरवही करतो आणि तू सांगीतल्या नुसार गुरुदक्षिणा मागतो,

गुरु द्रोणाचार्यांनी आपणाला सर्वांच्या समक्ष सर्वश्रेष्ठ धनुर्धर! म्हटल याचा एकलव्याला खुपखुप आनंद झाला: महर्षी व्यासांनी सांगीतले होते की, तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून लौकीक मिळवशील! हे त्यांच वचन सत्य ठरल. ज्या द्रोणाचार्यांनी आपल्याला धनुर्विद्या शिकवायला स्पष्ट नकार देत शूद्र म्हणून हिनवल होत, त्याच द्रोणाचार्यांनी आज आपल्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर" म्हणून घोषीत केल याचा एकलव्यांना खुप खुप आनंद झाला. त्यांनी आपल्या आराध्य दैवताचे भगवान शंकरांचे मनोमन आभार मानले. आता द्रोणाचार्यांनी गुरूदक्षिणेत आपले प्राण जरी मागीतले तरीही ते दयायला तत्पर होते. व द्रोणांनी गुरूदक्षिणा मागायची प्रतिक्षा करत होते. त्यांच्या मनाची उत्कंठा पाहून द्रोणांनी गुरुदक्षीणा मागली,

हे सर्वश्रेष्ठ धनुर्धरा, विर एकलव्या! हा द्रोणाचार्य तुला गुरुदक्षीणेपोटी तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मागत आहे।

द्रोणाचार्यांचे हे शब्द ऐकताच एकलव्याने क्षणाचाही विलंब न करता कमरेचा खंजीर काढून चर्रर्रकन उजव्या हाताचा अंगठा कापला आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत घेऊन द्रोणाचार्यांना दक्षीणा दिली. व दक्षीणा दिल्याचा समाधानी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकला.

एकलव्यांच धाडस निष्ठा पाहून सर्वजण अवाकच झाले व विस्मयान पहातच राहीले. द्रोणाचार्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, शिष्य एकलव्या ! धन्य आहे तुझी निष्ठा आणि गुरुभक्ती. धन्य आहे तुझा वंश ! जोपर्यंत या जगात चंद्रसूर्य राहतील तो पर्यंत तुझी किर्ती अमर राहील. भारताच्या इतिहासात तुझ नाव धृवासारख अढळ राहील!

द्रोणाचार्यांनी मागीतलेली: दक्षीणा विर एकलव्यांनी एका क्षणात अंगठा कापून दिली. तेव्हा त्या जंगलातील पशुपक्षी झाडेवेली व द्रोणांचे सर्व शिष्य राजपुत्र प्रत्यक्षात साक्षी होते. दक्षीणा देण्यापूर्वी व दिल्यानंतही ते सर्वश्रेष्ठ धनुर्धरच ठरले. आणि त्यांना विद्या शिकवण्यास नकार देणारे शुद्र म्हनणारे व एका शब्दाचही ज्ञान न देणारे,. न देताही गुरुदक्षीणा मागणारे राज गुरु द्रोणाचार्य हेच खरे शुद्र ठरले. ठेंगू, लहाण झाले. द्रोणाचार्यांनी कर्णालाही विदया देण्यास नकार दिला होता. कर्णाची. एकलव्यान भेट घेतली तेव्हा कर्णान शुभेच्छा देताना म्हणल होत,

एकलव्या विरा! जिद्दीन सराव करून तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर हो । आणि त्या द्रोणांचा गर्व हरण कर। कर्णाचे शब्दही आज खारे ठरले होते द्रोणांनी स्वतः एकलव्याला सर्वश्रेष्ठ मान्य केलेल होत.

जंगलात घडलेल्या प्रकाराची माहीती हिरण्यधनुच्या वस्ती वर कळाली तेव्हा सर्व निषाद स्त्री पुरुष आपल्या झोपड्यांमधून निघून जंगलात आले पहातात तर, एकलव्याच्या हातातून अजूनही रक्त वहातच होत ते मात्र समाधानी आनंदात मग्न होऊन भगवान शिवशंकरांच ध्यान करत होते वडील हिरण्य धनूंनी त्यांना हृदयाला लावून कवटाळल व हातावर बांधायला झाडाच पान आणायला दुसऱ्या एकाला पाठवल. आई कनेरी तर एकलव्याला छातीशी लावून रडतच होती. घळघळा अश्रु ढाळत होती. एकलव्य तिला समजवत शांत करत होते। सर्वानी एकलव्याच्या निष्ठेच कौतुक करून त्यांच्या नावाचा जयघोष केला. व सन्मानान घरी नेवून आदर सत्कार केला. थोड्याच दिवसांत ही वार्ता सर्वत्र पसरली. परिसरातील लोकं एकलव्यांना भेटायला यायला लागले. त्यांच कौतूक, अभिनंदन करायला लागले. ही वार्ता व्यासांनाही समजली तेव्हा ते त्वरित एकलव्यांच्या भेटीसाठी निघाले. येताना ते आवाची व त्याची बहीण वारुणीलाही सोबत घेऊन आले

हिरण्यधनू कनेरी व एकलव्यान महर्षी व्यासांच विनम्र भावनेन स्वागत केल. त्यांच्या पवित्र दर्शनान सर्व निषादांचजीवन धन्य झाल. नंतर व्यासांच्या निर्देशानुसार एकलव्यव वारुणीच्या विवाहाच आयोजन करण्यात आल. सर्व निषादांच्या उपस्थीतीत तो विवाह सोहळा संपन्न झाला. स्वतः व्यासांनी वधू वरास शुभ आशिर्वाद दिला. सर्वजण आनंदून गेले. सर्वांना आशिर्वाद देवून व त्यांचा निरोप घेऊन महर्षी व्यास परत जायला निघाले त्यांच्या सोबत आवाचीही निघाला त्यांना एकलव्य व वारुणीन निरोप दिला.

सर्वश्रेष्ठ धनुर्धर ! तेही प्रत्यक्ष द्रोणाचार्यानी घोषीत केलेले एकलव्य द्रोणाचार्याना गुरू मानून, महर्षी व्यासांचे आभार मानत व कर्णान सांगीतलेल कधीही कपट न करण्याच व्रत पाळत होते. आपले आई वडील समाजाचऋण स्मरण करत, सहचरणी वारुणी सोबत राहून भगवान शंकरांच ध्यान चिंतन करत सुखान संसार करत होते.

आपल्या समाज बांधवान एकलव्यान गुरूदक्षीणा म्हणून आपल्या उजव्या हाताचा अंगठा दिलेला आहे ते आपल समाज भूषण आहे! अस समजून त्यानंतर कोणत्याही निषादांनी-भिल्लांनी धनुष्याला तीर लावताना उजव्या हाताचा अंगठा लावायचा नाही अस ठरवल आणि ते व्रत अखंड पाळल ते आजतगायत एकलव्याचा स्वाभिमान म्हणून मोठ्या श्रध्देन पाळल्या जात आहे.

भारताच्या दक्षीणे कडील भागात निषाध पर्वताच्या सानिध्यात वेत्रवती नदीच्या उगमाजवळ निषाधांची राज्य होती. तेथे राजा हिरण्यधनूचेही राज्य होत. इतर राज्याच्या राजांसोबत त्यांचा चांगला स्नेह होता' निषाद-भिल हे सामुहीक शेती करत शिवाय शिकार ही करायचे मृत-मेलेल्या प्राण्यांच मास ते कधीच खात नाहीत, भगवान महादेव हे त्यांच आराध्य दैवत असून गरुड हे त्यांच्या शौर्य, धैर्य, चाणाक्षपणाच प्रतीक आहे म्हणूनच ते गरुडाच पीस आपल्या शिरपेचात स्वाभिमानान खोवतात.

राजा हिरण्यधनू यांच्या पत्नीचे नाव रत्नगर्भा ( कणेरी) होते. त्यांचा त्या परिसरात आणी राज्यात चांगला लौकीक आदर होता. मगध देशाचा राजा जरासंधा सोबत त्यांची घनीष्ट मैत्री होती एकलव्य या आपल्या शुरवीर, निष्ठावान सद्गुणी मुलाचा त्यांना स्वाभिमान होता. वडीलांच्या मृत्यूनंतर आईच्या मदतीन राजा एकलव्यांनी राज्यकारभार केला त्यांना राजगुरू मेघवर्णाच मोलाच मार्गदर्शन लाभल. तसच भिलसेन आणी गिरीबीन या सरदार मित्रांचही निष्ठेच सहकार्य लाभल. सर्व प्रजेचही सहकार्य आणी आत्मीयता लाभली. सर्व भील सैनीक रानावनांत लढाई करण्यात पारंगत होते. तरी एकलव्यांनी त्यांना आधुनीक पद्धतीने लढाई करण्याचेही शिक्षणाची सोय केली.

एकलव्यांनी आपल्या पारंपारीक धनुर्विद्येच्या प्रचार प्रसार व संगोपना साठी अनेक ठिकाणी विद्यालये काढले. आधुनीक शिक्षणाचीही सोय केली. मल्लयुद्ध गदा युध्दाचाही आपल्या भिल्लांना लाभ मिळवून देवून पारंगत बनवल. एकलव्यांनी उदेवमातृक-नदिच्या पाण्याला बांध घालून ते पाणी शेती साठी वापरण्याची पध्दत अस्तीत्वात आणली. तिचा विकास केला अन्न धान्य वाढीसाठी गोधन वाढी साठी राज्यातील जनतेला प्रोत्साहीत केले. धनुधारी, गदाधारी, मल्ल अशा आधुनीक सैन्याची उभारणी केली. मगधनरेश जरासंघ राजा आणि त्यांच्या इतर सर्व मित्र राजांच्या मिळून सर्व धनुर्धारी सैन्याच नेतृत्व करायच काम त्यांनी निष्ठेन व समर्थपणान निभावली

राजा एकलव्यांना आवाजाच्या दिशेन बाण मारण्याची आणी हवेत बाणाची दिशा बदलवण्याची श्रेष्ठ कला अवगत होती ती त्यांनी स्वअध्ययनान सरावान संपादन केलेली होती. आणी ती त्यांनी आईच्या वचनांवर दृढ श्रद्धा राखूनच मिळवली होती.

राजा हिरण्यधनूंचे मित्र राजा नंदन यांची सर्वगुण संपन्न - सुकन्या सुनीतांसोबतही एकलव्यांचा विवाह झाला होता. त्यांना केतुमान, भल्लका व सिंहरन असे गुणवान मुलं होते.

द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा सोबतही एकलव्यांचा स्नेह होता. तसेच दुर्योधन आणी कौरवां विषयी त्यांच्या मनात आदर होता.

पांडवांनी खांडव वनातून गुप्त मार्गान पळून गेले ., व नंतर जाळून टाकले होते. त्यात प्राणी , पक्षी होरपळून मेले,. त्यात नागलोकांचे स्त्रीया माणसे, बालकं सर्व पांडवांनी तेथे "Veer Eklavya Aaadivasi  Story in Marathi"  इंद्रप्रस्य उभारल दुष्कृत्याचा एकलव्याला राग होता. तसेच कृष्णा च्या कुटील कपटी कृत्याचीही त्यांना घृणा वाटल होती.

शुर धाडसी, एकवचनी, न्यायप्रीय अशा सर्व सद्‌गुणी एकलव्यांना द्रोणाचार्यांनी कपटीपणान फसवून त्यांचा उडाव्या हाताचा अंगठा कापून घेतला तरीही त्यांनी कधीच द्रोणांचा उपहास केला नाही. तसेच त्यानंतरही त्यांनी धनुष्य चालवण थांबवल नाही. अनेक लढायांत भाग घेऊन नैपुण्य राखल.

अशा या थोर सुसंस्कारी, स्वाभिमानी प्रजाहीतकारी महान राजाला विनम्र विनम्र अभिवादन! हरहर महादेव!


लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या