Mata shabri aur Ram ka Milan in marathi राजकन्या भक्तीमाता शबरी- आपल्या भारतीय संस्कृतीक परंपरेत स्त्री सन्मानाची परंपरा निष्ठेन जोपासली जात आहे त्याचा आदर व सन्मानही यथोचीत करण्यात येतो आहे.
रामायणात भिल्लांना सर्व समजाला आणि सर्व भारतीयांना भूषणावह असलेल्या राजकन्या शबरीची कथा आहे.
![]() |
| shabari mata |
मतंग हे महान थोर दयाळू ऋषी अरण्यात राहून तपाचारण करत. त्यांनी आपला आश्रम पवित्र राखला होता. ऋषीपत्नी आश्रमाची विशेष काळजी घ्यायच्या.
Mata shabri aur Ram ka Milan in marathi
आश्रमाच्या जवळपास राहणाऱ्या भील्ल वगैरे रानटी लोकांची भाषा शिकून ऋषी त्यांना त्यांच्याच भाषेत वेगवेगळ्या कथा सांगायचे. त्यांना सदुपचाराचा उपदेश करायचे. त्यांच्या त्या उपदेशानं ते सर्व रानटी लोक प्रभावित होत. नि चांगलं वागण्याचा प्रयत्न करत. तेथील सर्व लोकांत 'ऋषी आदराला प्राप्त झाले. सर्व लोकं त्यांचा आदर करायला लागले. त्यांची शिकवण आज्ञा मानायला लागले. त्याच्याने त्यांचे संसार सुखाचे होऊ लागले.
मतंग ऋषीच्या आश्रमापासून थोड्या अंतरावर भिल्लांच्या वस्त्या होत्या. त्यांचा राजा ऋषींच्या सदविचारांनी प्रभावित झाला. त्यानं आपली एकुलती एक पाच 'Mata shabri aur Ram ka Milan in marathi' वर्षाची मुलगी ऋषींना आपल्या आश्रमात ठेवून घेण्याची व चांगले संस्कार करण्याची विनंती केली. दयाळू-मायाळू ऋषींनी तिला आश्रमात ठेवून घेतले. शबरी हे तिचं नाव होतं. शबरीला ऋषी व त्यांच्या पत्नीनं पोटच्या पोरीसारखीच वागवलं. माया लावली तिला चांगल्या सुसंस्कारात वाढवलं.

शबरी ऋषींची व त्यांच्या पत्नीची सेवा करायची. सर्व आश्रमाची झाडलोट करून स्वच्छ ठेवायची. गायी-वासरे, हरणं इतर पशू-पक्ष्यांची काळजी घ्यायची. ऋषींना पुजेसाठी लागणारी फुले आणून द्यायची. नवीन फुलांची झाडे, वेली लावणे फळझाडे लावणे त्यांना पाणी टाकणे अशी कामे करायची व ती कामे करतांना स्वत:ला धन्य समजायची.
फुलझाडे, वेली बहरून आल्या तरी शबरीच्या गव्हाळ कायेनही बहर घेतला. ती आता वयात आली. सत्य, प्रेम, करुणा परोपकारांच्या शिकवणुकीनं तिचं मन फुलासारखंच अलवार झालं. तिचं ते रानफुल सात्विक सौंदर्यानं गुणगंधानं नटलं. ऋषींनी तिच्या वडिलांना निरोप पाठवून बोलवून घेतलं व तिला आता ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमात टाकायला सांगितलं.
आश्रम सोडून वडिलांबरोबर जातांना तिचा पाय निघत नव्हता. ती सारखी रडत होती. आश्रमातील फुले वेलीही तिचं रडणं पाहून निस्तेज दिसत होत्या. गायी चारा खात नव्हत्या, वासरे हंबरत होती व हरणेही तिनं हा आश्रम सोडून जावू नये असाच सांकेतिक इशारा करून तिला अडवण्याचा प्रयत्न करत होते. ऋषिंची पत्नी तर तिला सोडायलाच तयार होईना. डोळे पुसत मोठ्या कष्टानं ती निघाली एकदाची.
भिल्लराजानं शबरीचा विवाह आपल्याच जातीच्या एका युवकासोबत ठरवला, सर्व तयारी झाली होती.. उद्या लग्नाचा तो मंगल पवित्र दिवस. सर्वत्र लगबग धावपळ होत होती.
Mata shabri aur Ram
भिल्लराजानं शबरीचा विवाह आपल्याच जातीच्या एका युवकासोबत ठरवला, सर्व तयारी झाली होती.. उद्या लग्नाचा तो मंगल पवित्र दिवस. सर्वत्र लगबग धावपळ होत होती.
एकाएकी शबरीचं लक्ष 'बाहेर बांधलेल्या मेंढ्याकडे गेले. तिचं कनवाळू मन द्रवलं. तिनं आईला सांगितलं, आई अगं हे सर्व मेंढरं पहाटेची तशीच उन्हात अन्नपाण्यावाचून तळमळत आहेत.
त्यांना चारा पाणी करायला हवा. त्यांना सावलीत न्यायला हवं ! मात्र आईकडून जेव्हा तिला कळलं की उद्या तिच्या लग्नात हेच मेंढरं कापून मेजवानी दिली जाणार आहे. तेव्हा तिचं हृदय धडधडायला लागलं. आपल्या लग्नासाठी एवढ्या निरपराध जीवांची हत्या होणार या Mata shabri aur Ram ka Milan in marathi विचारांनीच ती बेचैन झाली. पूर्ण दिवसभर विचार करत राहिली. नि रात्री कुणालाही न सांगता तशीच घराबाहेर पडली. ती थेट मतंग ऋषींच्या आश्रमातच.
उन्हाळ्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर तापलेल्या भुईवर मृगाच्या शिडकाव्यानं त्या जमिनीसह झाडेवेली गुरंढोरं माणसं या सर्वांनाच आनंद व्हावा तसं त्या आश्रमात सर्वांनाच शबरीच्या आगमनानं आनंद झाला.
ऋषिपत्नी जागी होऊन बाहेर आली तशी शबरीनं त्यांच्या खांद्यावर मान टाकून ती ओक्साबोक्सी रडायला लागली. ऋषीपत्नीनं तिची सारी व्यथा जाणून तिला धीर दिला. त्यांनी व ऋषींनी शबरीची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. तिनं लग्नाला स्पष्ट नकार दर्शविला.
ऋषिंनी मग राजाला सारं समजावून सांगितलं नि तिचं लग्न करायचा विचार सोडून द्यायला भाग पाडलं.
शबरी आता मतंग ऋषीच्या आश्रमाच्या जवळच एक झोपडी करून राहायला लागली. पंपासरोवराची गंभीरता, सभोवतालच्या निसर्गाची पवित्रता सौम्यता असे कितीतरी गुण तिच्या ठायी वसत ऋषींची सेवा करणं, त्यांच्या आश्रमाचं पावित्र्य राखणं, ऋषिंच्या मुखाने सदुपदेशाचं श्रवण करणं यात तिचा वेळ जात असे. ती आता पूर्ण तपस्विनीचं जीवन जगत होती. तपस्विनी झाली होती.
मतंग ऋषी आता थकले होते. त्यांनी शबरीला जवळ बोलावलं नि डोक्यावरून प्रेमळ हात फिरवून तिला त्यांनी आत्मियतेनं सदुपचाराचा शेवटचा उपदेश केला. शबरी आता मतंग ऋषींचे वचन आठवून त्यावर विश्वास ठेवून श्रीराम, राम म्हणत व राम येण्याची वाट पाहू लागली. शीतळ - शुभ्र चंद्राला शबरी विचारायची, आज माझा राम येणार ना, म्हणूनच तू असा सजलाय ! त्याच चंद्राला काळवंडलेला पाहून ती म्हणायची, राम दिसत नाही. म्हणून का तू असा काळवंडला आहेस? उमललेली फुले पाहून ती म्हणायची, अरे लबाडा ! राम आज येणार हे तू मला नाही सांगितलंस.

कोमेजल्या अवस्थेत त्याच फुलांना पाहून ते म्हणायची, राम आले नाहीत म्हणूनच तुम्ही असे ग्लान झालात ना? बहरलेल्या वृक्षांना पाहून शबरी रामाला गाणं म्हणायची. लतासोबत झुलणाऱ्या फुलांबरोबर रामाला आळवायची. रोज उगवणाऱ्या सूर्यासोबत नव्या उमेदीनं, नव्या आशा घेऊन रामाच्या येण्याची वाट पाहायची.
शबरी शरीरानं वयानं वृद्ध होत होती. नि रामाच्या दर्शनाच्या आशेनं, उत्कटतेनं तरुण होत होती. एखाद्या झाडावरून पिकलेलं पान खाली पडलं तर त्यात ती रामाच्या पावलांचा अनुभव करायची. श्रीराम आगमनाच्या कांक्षेत शबरी जणू वेडी झाली होती. तिला सर्व चराचरात राम दिसायला लागला. त्यात तिला स्वत:चीही शुद्ध भान राहत नसे,
शबरीला आज मतंग ऋषींचे ध्यान झाले. त्यांनी सांगितलेल्या शब्दांची आठवण झाली. सुंदर सुलोचनी डोक्यावर जटांचा मुकूट बांधलेले, गळ्यात वनमाला गौरवर्णाचे असे श्रीराम पाहून शबरी त्यांच्या चरणावर शरीराचं भान विसरून पडली. नि नयनाश्रूंनी प्रभूरामांचे चरणांना अभिषेक करू लागली.

Mata shabri rajkanya
शबरीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. शरीराचे भान विसरून ती रामाच्या आनंद सागरात बुडाली. प्रभूरामांच्या पायांना तिनं शुद्ध जलानें सिंचन करून पाय धुतले. नि तिनं स्वतः चाखुन गोड असल्याची खात्री करून जमा ठेवलेले बोरं-फळ तिनं रामाला मोठ्या श्रद्धेनं दिले.
प्रभू रामांनी ते आवडीने खाल्ले. शबरीनं स्वतःला धन्यता मानली. शबरीची तपश्चर्या फळाला आली होती. तिनं मतंग ऋषिंची निःस्वार्थ केलेली सेवा फलद्रूप झाली. तिच्या दृढ भक्तीने राम तिची उष्टी बोरं आवडीनं खाऊ लागले. ते पाहून शबरीचं मन शांत झालं.
तिनं प्रभूरामांच्या पायावर डोकं ठेवलं नि राम ! राम ! राम! म्हणत प्राण सोडला. आतापर्यंत तिथल्या परिसरातील अनेक ऋषी मुनी जमा झाले होते. सर्वांना शबरीच्या दृढ भक्तीची जाणीव झाली. रामांनी शबरीचे अंत्यसंस्कार करून वनवासाच्या पुढील प्रवासाला निघून गेले. आजपर्यंत जे इतर ऋषी स्वत:ला श्रेष्ठ समजून मतंग ऋषींना हीन लेखत होते. शबरीला हीन समजत होते त्या सर्वांची भ्रांती फिटली. सर्वांनी शबरीच्या चितेला वंदन केले व शबरीच्या नावाचा जयजयकार केला.
राजकन्या श्रेष्ठ गुरुभक्ती परायण: सुवीचारी, प्रामाणीक, निष्ठावान शबरीच्या शुद्ध सद्भाव वर्तनान रामायणाच्या श्रेष्ठत्वाला तर उजाला दिला आहेच.
राजकन्या श्रेष्ठ गुरुभक्ती परायण: सुवीचारी, प्रामाणीक, निष्ठावान शबरीच्या शुद्ध सद्भाव वर्तनान रामायणाच्या श्रेष्ठत्वाला तर उजाला दिला आहेच.
शिवाय प्रत्यक्ष देवांच्या नंतर आदर असलेल्या थोर ऋषींना त्यांच्या ज्ञानाच्या गर्वाचा दंभही कमी करण्याची प्रेरणा देवून श्रेष्ठ कनीष्ठचा भेदभाव सोडून समानता राखण्यास प्रवृत्त केल आणी स्री सन्मान, थोर संस्कार निष्ठा भक्ती सोज्वळ चारीत्र्य संपन्नता, दया, भूतमात्र-पशूंविषयीची करूणा सद्भावना अशा थोर गुणांची शिकवणही दिलेली आहे.
आणी भिल्ल भूषण या थोर परंपरेत, भिल्लांच्या श्रेष्ठ इतिहासात "Mata shabri aur Ram ka Milan in marathi" आपल नाव अजरामर केलेल आहे अशा या थोर, तिर्थस्वरूपी, वरात्सल्यमुर्ती शबरी मातेल्या विनम्र अभिवादन!
(पूर्व प्रसिद्धी- देशोन्नती १५-१२-११)
लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर
व्हिडीओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

0 टिप्पण्या