तंट्या मामा - भिल | Tantya Mama Bhil Aaadiwasi in marathi

Tantya Mama Bhil Aaadiwasi in marathi  तंट्या मामा - भारतात इंग्रजांनी आता चांगलच बस्तान बसवल होत. संपूर्ण देश त्यांच्या राजवटीखाली घेतला होता

 भारतातल्या काही भागांतील राजे, राजसंस्थान इंग्रजांच्याच अधिपत्याखाली आपल अस्तीत्व टिकवून होते. ते राजे असले तरी त्यांच्यावरही इंग्रजांच राज्य होत. 

                                                         
Tantya Mama Bhil Aaadiwasi in marathi
Tantya Mama Bhil Aaadiwasi in marathi



ते राजे फक्त नामधारीच होते. गावांतील पाटील, देशमुख, देशपाडे, शेठ सावकार जमादार अशा लोकांकडे भरपूर जमीनी असायच्या त्या त्यांनी गरीब मजबूर शेतकऱ्यांकडून त्यांच्या अडीअडचणीत थोडीफार मदत करून, सुखादुःखात थोडा फार पैसा अडका देऊन, दुःष्काळात थोडफार अन्न धान्य देऊनच बळकावलेल्या होत्या नी ते गरीब शेतकरी भूमीहीन होऊन, मजूर बनून अशा बड्या लोकांच्या मालकीच्या -पूर्वी त्यांच्याच असलेल्या जमीनींवर शेतांवर कामे करत होते. 



Tantya Mama Bhil Aaadiwasi in marathi


तर जंगलांच्या आसऱ्यान रानावनांत रहाणारे आदिवासी भटके लोक जंगलातील डीक, फळे, सरपण, लाकूडफाटा, औषधी वनस्पती गावांतील लोकांना विकून व काही कष्टाची कामं करून, शिकार करून आपला आपल्या पोराबाळांचा उदर निर्वाह करायचे. व समाधा नान जगायचे.

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या मध्यात विंध्य पर्वत व सातपुडा पर्वताच्या भागात रहाणारे भटके लोकही असच समाधानान जगायचे. कष्ट करून, रहायचे. जंगलाचा आश्रय व  'Tantya Mama Bhil Aaadiwasi in marathi' निसर्गाच्या वरदानाचा त्यांच्या जगण्याशी धनीष्ट संबंध होता. गेल्या अनेक वर्षापासून अनेक पिढ्यां त्यांच्या या जंगलाच्याच आश्रयान जगल्या होत्या. मात्र आता इंग्रजांनी कठोर कायदा करून, जंगलांचा सुरक्षीततेचा कायदा करून या सर्व लोकांना उघड्‌यावर आणल. जंगलातील लागवडी योग्य काही भागांपैकी थोडे थोडे ज़मी मीची तुकडे देऊन त्यांना जंगलांच्या बाहेर काढल. या जमीनी कसायला दिल्या तरी त्या मोबदल्यात सरकार त्यांच्याकडून सक्तीन सारा वसूल करायचे. व वर्षभर राबराब राबणारे भील लोकं उपासमारीच जीवन जगायचे.

भारताला इंग्रजांच्या अधीकारान ग्रासलेल होतच त्यातच स्थानीय राजवटीच्या संस्थानांचीही मुजोरी होतीच. असच एक संस्थान मध्य प्रदेशातील खंडवा जील्हयात होत. घाटाखेडी नावाच्या या संस्थानचा त्या परिसरात कारभार व सत्ता होती. ठाकूर घराण्याच्या राजपूत राजाच तिथ राज्य होत. या संस्थानातच अनेक लहाण लहान गावं आणि अनेक वाड्या, वस्त्या होत्या. अनेक जाती धर्मातील (लोकोनी- ठरवलेल्या जातीपाती) समाजातील लोक रहात होते असच एक गाव होत पोखर पोखर गावात राजपूत व भिल्ल आणि इतरही लोक रहात होते. अनेक पिढ्यांपासून गुण्या गोविंदान राहून कष्ट करून जगत होते.

भाऊसिंग भिल नावाचा या गावातील रहाणारा गरिब शेतकरी होता. तो लहाणपणा पासून कष्ट करत होता मात्र सतत कष्ट करूनही त्याच्या कुटुंबाच भरणपोषण करण त्याला शक्य होत नव्हत. त्याच्या एकट्याच्या मजुरीवर कुटुंबाचा भार सोषण शक्य नव्हत. त्याच्या वडीलांकडे वडीलोपार्जीत शेती होती मात्र एकदा नैसर्गीक आपत्ती आली आणि शेतात उत्पन्न आल नाही. म्हणून कुटुंब जगवण्यासाठी त्यान आपली शेती गावातल्या पाटलांकडे गहाण ठेवली आणि कर्ज काढून कुटुंब जगवल. त्या कर्जाच्या व्याजाच्या मोबदल्यात तो त्या पाटला कडे सालदारीन काम करून राबराब राबत होता. गेले अनेक वर्षेत्यान सालदारी करून काम केल नी त्यातच आयुष्य संपवल. त्याच आयुष्य संपल' तो मेला तरी त्यान घेतलेल कर्ज त्या पाटलान काही पूर्ण केल नाही. आणि त्याची जमीनही परत दिली नाही. तो मेल्यावर भाऊसींगनही काही दिवस तसीच सालदारी करून जमीनीच व्याज फेडत राहीला. मात्र त्याच्याही अशा वागण्यान त्याच्या पत्नीच मुलाच पोषण होण शक्य नव्हत. त्यांची उपासमार होत होती म्हणून त्यान ते गाव सोडल.

भाऊसींगन पोरख हे गाव सोडल, त्याला ते सोडावच लागल. कारण जमीन गहाणात पडून हडप झाली होती. ती परत मिळण्याची आता आशाच नव्हती. निदान कष्ट करून आपला संसार तरी सुरळीत करावा म्हणून तो पोरख पासून चार पाच मैलांवर असलेल्या व तेथे काही नाते- वाईक रहात असलेल्या बिरडा या गावात रहायला आला. व तेथे मोल मजूरी करून, कष्टाची कामे करून रहायला लागला. त्याच्या प्रामाणीक कष्टाला त्याची पत्नी जिवणी ही देखील निष्ठेन साथ देवू लागली. ते दोघेही बिरडा गावातील शेतक-यांच्या शेतावर कामे करून कष्ट करून मजूरी कमवायचे व सुखान समाधानान जगायचे. पोरख गावापेक्षा त्यांना इथ चांगल काम व मजूरी मिळाल्यान समाधान लाभल



बीरडा गावात आल्यावर जिवणी सोबत भाऊसिंगचा संसार समाधानान सुरू होता. त्यांच्या संसार वेलीवर गोंडस फुल फुलल- आणि त्यांच्या आनंदात भर पडली. त्यांना मुलगा झाला. त्याच नाव त्यांनी तात्या अस ठेवल. तात्याचच पुढे तंट्या हे नाव झाल.

इ. स -१८४२ मधे तंट्याचा जन्म झाला. तंट्या बालपणापासूनच चंचल होता. त्याचे डोळे पाणीदार होते. आपल्या नाजूक परिस्थीतीतही, दिवसभर कामे करून लोकांची मजूरी करून भाऊसींग व जीवणी तंट्याची सर्व काळजी घेत होते. भरपूर प्रेम, माया लावून लाडकौतूक करत होते. त्याच्या आईन जिवणी बाईन तंट्याला मोठ्या माया ममतेन वाढवल मात्र देवाला जणू ते मान्यच नव्हत. त्याला भाऊसीगचा सुखी संसार पाहवला नाही. त्यान तंट्याच्या बालपणातच त्याच मायेच छत्र हिरावून घेतल. तो लहाण असतानाच त्याच्या आईच निधन झाल तंट्या लहाणपणातच आईच्या मायेला पारखा झाला. त्याच्या वडिलांनी भाऊसीगांनी मात्र त्याला भरपूर प्रेम दिल. आईची माया व बापाच प्रेम देऊन त्याला वाढवल. आईची आठवणही येवू दिली नाही.

Tantya Mama Bhil Aaadiwasi 

 
तंट्या लहाणाचा मोठा होत होता. धष्टपुष्ट काटक शरिर, कणखर बाणा, निडरपणा, त्याच्या अंगातच होता. सोबतच मन मिळाऊ चंचल स्वभाव, समंजसपणा अशा अनेक सद्गुणांनी इतर पोरापेक्षा तो वेगळाच भासायचा. पोरांसोबत खेळताना झाडावर चढणे, पाण्यात पोहणे, टेकड्यां- रानावनात भटकणे, मासे पकडणे यात तो सर्व पोरांच्या पुढेच असायचा. पोरांच्या सैन्याचा जणू तो सरदारच होता. भिल्लांच पारंपारिक आयुध, हत्यार-शस्त्र तिरकामढा (धनुष्यबाण) चालवण्यात तर तो लहाणपणापासूनच पटाईत होता. चांगलाच तरबेज झाला होता. थोडा मोठा झाल्यावर लाठी काठी चालवणे फिरवणेतही त्यांन चांगला हातखंडा करून घेतला. व तो जेव्हा तरुण झाला, तेव्हा त्यान तलवार चालवणे, भाला फेकणे हे क्षत्रियत्वाचे गुणही आत्मसात करून घेतले. रानावनात राहून काट्या कुट्यांतून फिरत त्याच शरिर चांगल काटक झाल होत. त्याच  Tantya Mama Bhil Aaadiwasi in marathiचालण ऐटबाज-रूबाबदार होत. त्याचा आवाज पहाडी. भरदार होता. यासोबतच तो कमालीचा विनयशील नम्र स्वभावाचा होता. त्यामुळे तो सर्वांनाच आवडायचा. रानात जाऊन शिकार करणे, शेतात नागर धरणे इतर कोणत्याही कामात तो मागे हटत नव्हता. शेती कामाची त्याला आवड होती. सर्व कामे करून तो आता वडीलांना मदत करायला लागला.

जवळच्याच पोखर गावातील ओळखीच्या माणसाची मुलगी भिकी, भीकू- बाई सोबत संबंध जोडून भाऊसिंगान तंट्याच लग्न उरकून घेतल. घरात आता आनंद होता. भाऊसींग तंट्या रोज वावरात जाऊन काम करायचे काम करून आपल गहाण पडलेल शेत सोडवायच अशी त्यांना आशा होती. म्हणून ते सुखा दुःखांचा विचारही न करता राबराब राबायचे कष्ट करायचे.

असच एकदा तंट्या मालकाच्या शेतात काम करत असताना कामात तल्लीन होता. तेव्हा एक मस्तवाल रेडा लोकांच्या मागे लागून मारायला धावत होता. म्हणून लोकं हातात लाठ्या काठ्या घेऊन त्याला मारायला धावत होते. तो पुढे पळत जाऊन पुन्हा मागे मागे वळायचा नी एखादयाच्या मागे पळत सुटायचा. पुन्हा लोकं त्याच्या मागून पळायचे. बरेच लोक जमा होऊन त्याच्या मागे पळायचे, आरडा ओरडा करायचे. लोकांच्या आरोळ्या - गोंधळ ऐकून तंट्या काम थांबवून तीकडे पळत गेला. त्यान त्या रेड्याच्या दोन्ही शिंगांना धरून त्याच्याशी झुंज देत त्याची मान वाकवून तीरपी करत जमीनीवर रगडली. रेडा त्याला उचलून फेकायचा प्रयत्न करायचा पण कसलेल्या चाणाक्ष तंट्या त्याला तशी संधी मिळू दिली नाही. मानच आवळल्या गेल्यान तो रेडा जखडला. त्याची शक्ती शिण होऊन तो जमीनीवर पडला. तेव्हा इतर सर्व लोकांनी त्याला जेरबंद केल. साखळदंडांनी जखडवल तंट्याच हे धाडस व कौशल्य पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केल. सर्वानी त्याची प्रसंशा केली. कौतुक केल. बिरडा गावात खुप कामे करून, कष्ट करून भागत नष्टतः कर्ज फेडण्या पुरतेही पैसे शिल्लक रहात नव्हते. जेम तेम पोट भरून जगण सुरू होत. त्यातच भाऊसींग आजारी पडले त्या आजारातच त्यांच निधन झाल. वडीलांच छत्रही हरवल्यान तंट्या बेचैन झाला. त्याच आता त्या गावात मन रमेनास झाल म्हणून तो ते गाव सोडून पोखरला आला. तेथे त्याच्या मालकीच शेत होत मात्र ते त्याच्या आजोबापासून शिवा पाटील नावाच्या इसमाकडे गहाण होत. तंट्या त्याच्याकडे शेत मागायला गेला तेव्हा शिवा पाटलान तंट्याला हाकलून आवल. त्या शेतावर आपला कब्जा करून घेतला होता. तो ती जमीन दयायला राजी नव्हता. तंट्याला मात्र ते सहन झाल नाही. तो शेतात गेला शेतात शिवा पाटलाचे मजूर काम करत होते. त्यांना मार ठोक करून हाकलून शेताच्या बाहेर घालवल पुन्हा या शेतात पाय ठेवायचा नाही! अशी तंबी दिली. शिवा पाटलान खोट नाट करून खटला भरला. खोटे साक्षीदार उभे करून साक्षी दिल्या. कोर्टान तंट्याला गुन्हेगार ठरवल. एका वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.


तंटयाला नागपूरच्या कारागृहात ठेवल तीथ त्यान हाल अपेष्टा सहन करून तुरुंगवास भोगला. तेथे त्याला पत्नी-मिनीची व पोराची खुप आठवण यायची. तो सारखा त्यांचाच विचार करायचा

तुरुंगातून सुटुन आल्यावर तंट्या पुन्हा शिवा पाटलाकडे गेला व आपली जमीन परत मागायला लागला. यावेळी कावेबाज पाटलान त्याला खोटी सहानूभूती दाखवली व त्याच शेत परत करायच खोटच आश्वासन दिल. त्याला मागच्या गोष्टी विसरायला सांगून थोडेफार पैसे फिटे पर्यंत त्या शेतातच काम करायला सांगीतल. मोठ्या आशेन त्याच्या कामाला लागला भरपूर काम करून चांगल उत्पन्न काढल. शिवा पाटलाचा कावा त्याची मुलगी यशोदाला तर चांगलाच माहीती होता. तो तंट्याला त्याची जमीन परत तर देणार नव्हताच उलट गुडांकडून त्याचा कायमचा काटा काढणार होता. त्याला ठार करणार होता. बापाचा हा कावा यशोदान प्रांजळ पणान त्याच्या कानावर टाकला. यशोदा विधवा होऊन माहेरी पडलेली होती. तीन तंट्याला अस चोरून भेटल्याचा लोकांनी तंट्याचा व यशोदाचा अनैतीक संबंधाचा डांगोरा पीटला. यात शिवा पाटलान ही साथ दिली. त्याला निमीत्ताला कारण हव होत. तो तंट्याच्या वाईटावर उठला. तंट्याच्या शेतातल उभ पीक त्यानच काढल. या प्रकारान तंट्यान वैतागून ते गाव सोडल

बायको भिकी व पोरगा किसनाला घेऊन तंट्या हिरापूर गावात आला. तेथे मोल मजुरीची कामं करून राहू लागला. त्या गावात त्याला अनेक मित्र भेटले मात्र बिजनीया नावाच्या समविचारी मित्रासोबत त्याची मैत्री घट्ट झाली. तो रहात असलेल्या हिरापूर गावाजवळच्या बारी या गावात चोरी झाली होती. चोरीची ही वार्ता सर्वत्र पसरली. शिवा पाटलाच्याही कानावर आली. त्यान त्याचा नातेवाईक हिंमत पाटला मार्फत संधान साधल- हिमत पाटलान पोलीसांसोबत संधान केल. आणि संषयावरून पोलीसानी तंट्याला व बिजनीयाला पकडायला आले. आपला काही अपराध नसताना पोलीस आपल्याला पकडून नेत आहेत याचा राग येवून त्या दोघांनी विरोध केला. पोलीसांना प्रतिकार केला. त्यांच्यावर हल्ला ही केला. पुढे कोर्टात खटला गेल्यावर चोरीच्या आरोपावरून नव्हे तर पोलीसांवर हल्ला केला म्हणून त्यांना तीन महीने कारावासाची सजा झाली. तंट्याला जबलपूरच्या तुरुगात तीन महीने शिक्षा भोगावी लागली.

तीन महीन्यांची सजा भोगून तंट्या परत आला. आता इथ या ब्रिटीशांच्या हद्दीत रहायच नाही अस त्यान ठरवल. आणि आपल बिऱ्हाड घेऊन तो होळकर संस्थानचा अधिकार असलेल्या भागात सिओरा गावी आला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल स्वराज्य त्यांच्या पश्चात छत्रपती संभाजी राजांनी सांभाळल. यवन, इंग्रज, पोर्तुगीज व स्वकीय यांच्याशी संघर्ष करून अबाधीत राखल-बलीदान देऊन स्वराज्य स्वतंत्र ठेवलः वाढवल. त्याच संगोपन केल. त्यांच्यानंतर संभाजी महाराजांचे सुपुत्र व पेशवे यांनी ते जपल वाढवल. त्यांच्या नंतर उत्तर पेशवाईत इंग्रजांनी हस्तक्षेप करून भारताचा बराचसा भाग आपल्या अधिकारात घेतला होता. व अजुनही घेतच होते अस्तीत्व टिकवून होते. मात्र अजुनही अनेक पुर्विचे सरदार आपले संस्थान सांभाळून होते. मध्य प्रांतातल्या इंदूरला मल्हारराव होळकरांची राजधानी होती. व अनेक प्रांतात त्यांचा अधिकार होता."

सिओरा गावात पत्नी मुलासोबत राहून तंट्या मोलमजुरीची कामं करून गुजराण करू लागला. मात्र तेथेही लोकांनी त्याचा पिछा सोडला नाही. त्या गावातही सुदान भीलाच्या घरी चोरी झाली तो चोरीचा माल जेलीम पाटलाच्या घरी सापडला. शिवा पाटील व हिंमत पाटलान जेलीम पाटलाशी संपर्क साधला. त्याला त्यातून वाचवल. त्या वस्तू आपण तंट्या कडून घेतल्या अस जेलीम पाटलान पोलीसात जबाब दिला. व खोटे साक्षीदार उभे करून तशी साक्षही दिली. त्यानुसार तंट्याला पकडायला पोलीसांची एक तुकडी निघाली. याची खबर तट्याला लागताच त्याला त्यान मागे दोन वेळा तुरुंगवास भोगलेल्याच्या हाल अपेष्ठा त्याच्या समोर आल्या. त्यान ताबडतोब घर सोडल. आणि पोलीसांना चुकवण्यासाठी रानावनात पळत निघाला.

रानात लपत, आज इथे तर उदया दुसरीकडे दूर निघत तो पळत होता. काही दिवस कंद मुळे खाऊन खाऊन राहीला तरी नंतर मात्र पोटासाठी त्याला लहाण सहान चोऱ्या कराव्या लागल्या. दरोडे घालावे लागले. असच रानावनात फिरताना त्याला त्याचा मागचा जोडीदार बिजनीया येवून मिळाला. नंतर त्या दोघांनी दरोडे घालणे गुरू केले काही दिवसांनी त्यांना आणखी जोडीदार मिळाले. आणि दरोडेखोरी हा जणू त्यांचा व्यवसायच झाला. त्यांची दरोडेखोरांची टोळीच झाली. ते सर्वजणं तंट्याला आपला म्होरक्या सरदार मानायचे. त्याच्या विचारांनीच वागायचे त्याच्या आज्ञेतच कोणतही काम करायचे

तंट्या दरोडेखोरांच्या टोळीचा सरदार होता. तरी त्याचे विचार मात्र प्रांजळ होते. तो दरोडेखोर होता तरी क्रूर नव्हता. दरोडे घालताना त्याची आपल्या साथीदारांना सक्त ताकीत होती. कडक शिस्त होती. गरिबांवर कोणीही कधीही अन्याय करायचा नाही. स्त्रीयांना कोणीही हात लावायचा नाही स्त्रीयाच्या अंगावरचे दागिने काढायचे नाहीत, लहान पोरांनाही हात लावायचा नाही! असा त्याचा हुकूमच होता व सर्वजण तो कटाक्षान पाळत होते.

दरोडे घालतानाही तंट्यान गरिबांना कधी त्रास दिला नाही. सावकार लोकांच्याच घरी तो डाका टाकायचा आणि मिळवलेल्या जीनसा से सर्व साथीदारांत वाटुन घ्यायचा. त्याच्या हिश्यावर आलेल सामान- पैसे वगैरे तो गोरगरीबांत वाटुन दयायचा. त्यान कधीही लोभ केला नाही. धनाचा संचय केला नाही. सतत, गरीबांना सहकार्य, मदत करण्यातच समाधान मानल साथीदारांसह तंट्या दरोडे टाकून गरिबांना मदत करायचा. 

लोकही त्याचा आदर करायचे. त्याला सहकार्य करायचे त्याच्या विषयी कुठेही वाच्चता करत नव्हते. पोलीसांना कोणी त्याचा तपासही सांगत नव्हते. आणि मस्तवाल मुजोर सावकार धनीकोना लुटून गरिबांना मदत करत होता. रानावनात फिरत होता पोलीसांना सापडत नव्हता. अस असल तरी तंट्याचा उद्देश अजुन सफल झालेला नव्हता. पोखरचा शिवा पाटील आणि त्याच्या गावाशेजारचा हिंमत पाटील यांनी अशाच अनेक लोकांनी तंट्याला त्रास दिलेला होता. त्याची जमीन हडप करून घेतलेली होती. खोटनाट करून त्याला जेल मधे पाठवल होत. आणि त्यांच्या मुळेच आज दरोडेखोर बनून रानावनात वणवण भटकाव लागत होत बायको पोराला, घरादाराला सोडून उपासीतापासी हिंडाव लागत होत. तंट्याच्या मनात राग होता. त्यांचा सुड घेण्या साठी, त्यांना चांगला धडा शिकवण्यासाठी तो टपून बसला होता. त्याला त्रास देणाऱ्या काही पाटील राजपूताना त्यान आपला इंगा दाखवला. त्यांच्यात तंट्याची दहशत होती. तंट्याच्या विरोधात वागणारा, त्याचा सुगावा पोलीसांना सांगणारा, गरिबांना त्रास देणारा अशा लोकांना तंट्या शासन करायचा. तो आणखी काहीतरी करून आपल बर वाईट करीन अशी भीती वाटून लोकं तंट्याचा बंदोबस्त करायचा प्रयत्न करायचे मात्र तंट्या कोणाच्या हाती लागत नव्हता. उलट त्याच्या विरोधात कारवाया करणारांना तो धडा शिकवल्या शिवाय रहात नसे.

पोखरचाच राहणारा तंट्या च्या वयाचा व त्याच्या चांगल्या ओळखीचा मोहन पाटील याने तंट्या ला पकडून दयायच्या इराद्यान घर सोडल नि त्यान गावोगाव, रानावनात फिरून त्याचा माग काढला. आणि भेट घेतली. व म्हणाला, घरी मला आई वडील खुप त्रास देतात.गावातल्या शिवा पाटलान माझ्यावरही तुझ्यासारखाच अन्याय केला. मला भूमीहीन केल. गावातले लोकही खुप त्रास देतात. म्हणून मी वैतागून तुझ्या सोबत रहायला आलो आहे आता कृपा करून तू नाही म्हणू नको मला इथेच राहू दे!



मोहनच्या या सांगण्यावर निष्कपटी तंट्यान खरसमजून विश्वास केला त्याला आपल्या जवळ ठेवून घेतल आणि त्याला चांगल वागवल. थोड्या दिवसात मोहनन घरी जायची इच्छा प्रगट केली घरच्यांची खूप आठवण येते, दोन दिवस राहून परत येवू! अस म्हणून त्यान तंट्याला गावात आणल. गावात आल्यावर दोनचार दिवसांचे दोन चार महिने निघून गेले तो मागचं सर्व विसरून कामाला लागला बायको पोरात रमला. संसारात लक्ष घातल. कामधदा करून संसार सुधारण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र गावातल्या लोकांनी त्याला पुन्हा संकटात टाकलच.

मोहनसिंगचा बाप सरदार पाटलान तंट्याला खोटी सहानुभूती दाखवली. व आपुलकीन त्याची विचारपूस केली. आणि म्हणाला,

तंट्या, पोरा तुला खूप त्रास झाला. उपासीतापासी रानावनात भटकाव लागला मात्र आता तू घाबरू नको. तू आमच्या मोहनला घरी घेऊन आलास ते फार बर झाल' नाहीतर रागाच्या भरात पोरग भलतच काही करून बसल असत: तुझे खुप उपकार झालेत रे बाबा! आता तू काळजी करू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. मी पोलीसांच्या, कोर्टाच्या रहाटातून सोडवीन! तुझी जमीन तुला परत मिळवून द्यायला मी मदत करीन. मागच सगळ विसरून जा. उद्या तू आमच्या घरी थे। यापुढे आपण असच प्रेमान राहू

तुला पाटील बुवांनी आग्रहान बोलवल! असा विचार करून तंट्या दुसऱ्या दिवशी तंट्याच्या घरी गेला. तेथे आधीच पोलीस दबा धरून बसलेले होते त्यांनी घेराव घालून तंट्याला पकडल: हातपाय बांधून खंडव्याच्या तुरूंगात नेवून टाकल. त्या दिवशीच पोलीसांनी मोहनसींगन ठाव ठीकाणा सांगीतल्या नुसार तंट्याचे साथीदार दौल्या भीलाला अटक करून आणल व दुसया दिवशी बिज़नीया यालाही अटक केली. नंतर त्या तीघांना न्यायालयासमोर हजर केल. खोटे पुरावे उभे केले. न्यायाधीशान ते सर्व ऐकून लिहून घेतल आणि निकाल उदयाच्यासाठी राखून ठेवला होता. त्यांना होणारी सजा ते उद्या सांगणार होते. म्हणून त्या साठी तीघांना आणखी तुरुंगात नेण्यात आल. तुरुंगात रात्री तंट्यान विचार केला, या तुरुंगात आपण या आधीही शिक्षा भोगली आहे. उद्याही कोर्टान सांगल्यावर उन्हा इथे तुरुंगात यावच लागणार, शिक्षा भोगावीच लागणार! आपला काही अपराध नसताना, कोणताही गुन्हा नसताना खोट नाट करून हे लोक आपल्याला तुरुंगात पाठवतात! का? कशाकरता आपण शिक्षा भोगावी? बस झाल आता हे । त्यान त्याच्या दोन्ही साथीदारांनाही सांगीतल. ते विचार त्यांनाही पटले. तिघांनी तुरुंगाच निरीक्षण केल. एक ठिकाणी कमजोर जागा दिसली .एक एक दगड काढून खिडकी मोकळी केली. आणि त्याखालून पळत पळत थेट रानात निघून गेले. त्यांना शोधायला पोलीस निघाले, जवळपासच्या सर्व पोलीस ठाण्यांवर व अनेक गावांत खबर करण्यात आली शोध मोहीम राबवण्यात आली. पण त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.


 Mama Bhil Aaadiwasi in marathi


तुरुंगातून पळालेला तंट्या व त्याचे दोन्ही जोडीदार रात्रीच्या गडद अंधारात पसार झाले .दूर निघून गेले पुढे त्यांना त्यांचे पुर्विचे साथीदार येवून मिळाले तर काही नविनही आले. आता त्यांची बिस लोकांची टोळी जमली. ते सर्वजण आता पुर्विसारखच तंट्याच्या आज्ञेत राहून वागायला लागले. विश्वासान संघटीत राहू लागले. गरिबांना लुटणाऱ्या लुबाडणाऱ्या सावकार धनिकांच्या घरावर दरोडे टाकून येणारी रक्कम सामान आपसात वाटून घेऊ लागले. तंट्या मात्र त्याच्या वाट्याला येणारा माल गोर गरिबांना वाटून देत असे. एखाद्या गरिबाला काही नड-अडचण असली तर त्यातील सर्वच रक्कम तो देऊन टाकायचा. आपल्या समाज बांधवांना भिलानाही तो मदत करायचा. त्यामुळे त्या सर्वांना तंट्याचा स्वाभिमान वाटल असे. ते सर्वजण त्याचा आदर करायचे. त्याच्या विरोधात ते कोणालाही काही खबर कळू देत नसत. पोलीसांना तर त्यांनी कधीच सुगावा लागू दिला नाही. खबर बातमी मिळू दिली नाही. उलट त्याच्या सुरक्षेची काळजी घ्यायचे. पोलीस किंवा पाटील सावकारांच्या हालचाली त्याला गुप्तपणान कळवायचे.

अनेक गावांत जाळे टाकून तंट्यान दहशत निर्माण केली. आणि पोलीसांसमोर आव्हान उभ केल. हे सगळ करतानाच तंट्यान त्याच्या विरोधात कारवाया करणारे पोलीसांना खबर करणारे, गरिबांचा छळ करणारे यांनाही तो शिक्षा करत होता. त्याने सरदार पाटील, शिवा पाटील, मोहनसिंग पाटील यांच्या घरांना आग लावून पेटवून दिल. हिंमत पाटलाच्या घरी जाऊन त्याच्या डोळ्यां देखत सर्व घर लुटल आणि भर चौकात आणून त्याला ठार केल. आणि बदला घेतला. ज्या ज्या पाटील मालगुजार सावकारांनी त्याच्या विरोधात पोलीसात खबर दिली होती, खोटे पुरावे दिले होते, त्याच्या विरोधात वागले होते. त्या सर्वाना तो शिक्षा करत होता. कोणाचे घर जाळून तर कोणाचे नाक कापत होता. एकदा एका मालगुजारान पोलिसांना त्याच्या टोळीचा सुगावा सांगीतला पोलीसांनी चौफेर घेराव घालून, सापळा रचून हल्ला केला व बारा लोकांना पकडून नेल- पैकी काहींनी झटापट करून स्वताला सोडवून घेतल. तर उरलेल्यांना पोलीसांनी तुरुंगात टाकले. तंट्याला व त्याच्या साथीदारांना पकडला. अशी सर्वत्र बातमी पसरली. मात्र त्यात तंट्या निसटला होता तंट्याचा साथीदार दौल्या भील सापडलेला होता व त्याचे जोडीदार होते. तंट्यान आपले उरलेले साथिदारांना सोबत नेऊन रात्रीच त्या तुरुंगावर हल्ला केला आणि सर्व साथीदारांना सोडवून नेल. आणि दोन दिवसांनी त्या माल गुजाराच्या घरी दरोडा घालून त्याला ठार केल तसच त्या पोलीसांच्या घरांवरही दरोडे घातले.

शत्रूना शासन करणे, त्यांचा बदला घेणे. दरोडे घालणे गरिबांचा न्याय करणे तंट्याचा हा उद्योग सुरूच होता. तसच त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागावर पोलीस यंत्रणा राबवत, नवनविन पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्त करून ब्रिटीश सरकार झटतच होत. या कामात ब्रिटीश शासन होळकर संस्थान ची देखील मदत घेत होत. मात्र तंट्याचा थांग पत्ता लागत नव्हत्ता. शिवाय त्याला पकडण्यासाठी सरकारन जाहीर केलेल बक्षीस मिळवण्यासाठी अनेक गावांतील बरेचसे लोकंही तंट्याच्या मागावर होतेच आणि त्या सर्वाच्या डोळ्यांवर धुळ फेकून तो आपल काम करत होता. त्यात यशस्वी होत होता. त्या त्याच्या या कामात त्याचे सर्व साथीदार त्याला जीवावर उदार होऊन साथ देत होते. त्यातला एखादा पकडला तरी, त्याला कितीही त्रास झाला तरी कधी तंट्याचा ठिकाना, सुगावा सांगत नसे. गावागावांतील गरिब लोकही त्यांना मदत करत होते. आणि म्हणूनच ब्रिटीश सरकारची शिस्तीची, बलाढ्य पोलीस यंत्रणा तंट्यासमोर हतबल- निष्प्रभ ठरत होती. सर ग्रिफिनफन हा ब्रिटीश अधिकारी त्याचा शोध घेऊन थकला मेजर इस्त्रीप्रसादनही स्वतंत्र फौज घेऊन जंग जंग पछाडल पण उपयोग झाला नाही. उलट एवढा अवा- -ढव्य खर्च फौज फाटा निकामी ठरला. तंट्यान चार कॉन्स्टेबलाच नाक कापल यामुळे तर त्या मेजरची जास्तच नाचक्की होऊन त्याला शरमेन मान झुकवावी लागली भर वेगात धावणाऱ्या मालवाहू रेलवे गाडीत चढून जोर लाऊन डबा उघडून तंट्या त्यातल सामान फेकायचा. त्याचे साथीदार ते सामान जमा करायचे. त्यांची एक मानलेली बहीण बाळतपणात अडली तेव्हा तंट्यान जेलचे डॉक्टर सदाशीव राऊत यांना आपल्या खांद्यावर बसवून गडद अंधारात रानातली वाट तुडवत मैलांच अंतर चालून घेऊन आला व त्या बाईच बाळंतपण झाल्यावर त्या डॉक्टरला सुखरूप नेऊन पोहचवल होत. एकाचवेळी सात सात-आठ आठ माणसासोबत



मुकाबला करण्याच तंट्याच धाडस आणि कौशल्य अप्रतीम होत. रोज रानावनात भटकत साठ मैलांपर्यंत चालण्याची त्याला सवय होती. प्रांजळ मनाच्या तंट्याच्या येश्वदासोबत अनैतीक संबंध जोडून तीला लोकांनी त्रास दिला, छळ केला म्हणून तंट्यान लोकांच्या घरी जाऊन त्यांच्यावर कारवाई केली होती. ऊन वारा पावसात थंडीत उघड्‌यावर तो सतत दहा वर्षे जंगलात राहीला.

पुर्वेला कालीभीतच्या विस्तीर्ण जंगलापासून पश्चिमेला सनगढ़ सुमारे दोनशे मैल तर उत्तरेला नर्मदा ते दक्षिणेला तापी सुमारे शंभर मैल म्हणजे सुमारे दोन हजार चौरस किलोमीटर परिसरात सातपुडा, विध्य, पंचमढी, गोडवन चारखा या जंगल डोंगर दरया खोरे काटेकुटे तुडवत तंट्या भटकत होता. बैतूल, खंडवा, जबलपूर, इंदूर, नागपूर, होशंगाबाद, खरगोन, घाटाखेडी बऱ्हाणपूर चा परिसर त्याच्या संचाराला मुक्त होता मंडाळा, सहेयला, बेरीया, अंबा, घरतलाई सिओरा, खागरा, भिल्लखडी, आऊजन, इजिराल, गाऊनेसी, तिनसीया, हेमगीरी, हिरापूर, इलीचपूर, रोहीणी, गंगराधन, बेरीसराम, गोटी, ओरखेली, इंगर, मुलगाव, बेलूर बरूरी, धनकोटरा, भोगाव, गांगली, बिला- सर, रोषनी, गंग्राधन, पावर, बोनेर, गंगळी, भूरी ओसोट, पोदार, उसली कपास्टी, कपारसी, बेनर, बन्ही गोना, भूईफळ, बावरीया, बारूर, सुरगण वंजारी, बिलासर हवसरा, शिवना, कुंदवाड, संगवारा, मालगाव, सुलगाव बेजारा,, महू, पाताळपाणी, घाटा खेडी, मकवारा जिजगाव, चिंचपोकळी चुना हजारी, बुधी, देवराबंदी, उसकली, भिकनगाव अशा अनेक गावांमधे तंटयान सावकार मालगुजार मग्रूर धनीकांच्या घरी चारशेपेक्षा जास्त दरोडे घातले. माऊलीया ओलीया, दौल्या, लक्षमन, बिजनीया हे त्याचे मुख्य साथीदार होते. तर आणखीही बरेच साथीदार होते. कधी त्यांची संख्या अठरा, वीस असायची तर कधी पंचवीस तीसही रहायची. सर्व साथीदार त्याच्या आज्ञेत वागायचे. कुणी बाहेर निघाला, पकडल्या गेला तरी कधीही त्यांच्या टोळी विषयी वाच्यता करत नसे किंवा सुगावा लागू देत नसे.

इंदूर, अचलपूर, मकडई, घाटोखेडी ही संस्थान आणि बलास्य ब्रिटीश फौजा सतत तंट्या च्या मागावर होते. त्यांचे शिपाई शोध घेत होते. सर लेपेन ग्रीणीन, मेजर हरीप्रसाद, हेमील्टन, कर्नल वार्ड मेजर इस्त्री, कॅप्टन मोहमद खान सरदार रतनसीह, लेप्टनन सरदार मुन्नासिंग, कर्नल हॅमेड, बक्षीसिंग, बजरंगसिंग उसे नावाजलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी देऊन व त्यांच्या सोबत प्रचंड फौज- फाटा मनुष्यबळ, साधन संपत्ती शस्त्रास्त्रे, बंदूका देऊन ब्रिटीश सरकार तंटयाला पकडायला सतत दहा वर्षे झटला डेप्यूटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, स्पेशल कमीशनर तंट्या ऑपरेशन असे स्वतंत्र पोलीस अधिकारांचे पद निर्माण करून नागपूर, मुंबई, दिल्ली अशा बाहेरच्या ठिकाणांहून पोलीस यंत्रणा, अधिकारी मागवून तंट्याचा शोध घेतला मात्र काहीही उपयोग झाला नाही. त्यांनी अनेक उपाय करून पाहीले पण व्यर्थ झाले



इन्सपेक्टर बेगन तंट्याचे सर्व नातेवाईक पकडून आणले. त्यांना धाक दडपशाही केली, मारठोक केली, धमक्या दाखवल्या. आणि त्यांतून वीस तरुणाची एक तुकडी बनवली. त्यांना तंट्याचा तपास करायला रानावनात फिरवल. तसच त्यान गावागावांतून खाजगी खबरे तयार केले. त्यांना पैसे दिले, मानधन दिल व तंट्याची माहीती काढून आणायची जबाबदारी सोपवली पण उपयोग झाला नाही. है मील्टनने सर्वांच मानधन वाढवून दिल त्यांना मोफत बंदूका दिल्या व त्या चालवायला शिकवल. तलवारी, लाढ्या काड्या दिल्या. प्रत्येक गावात वीस पंचवीस तरुणांची तुकडी बनवली पाटील ब मालगुजार यांच्यावर त्यांच्या देख रेखेची जबाबदारी सोपवली. तंट्याला पकडून देणाराला ब्रिटीश सरकारन मोठ बक्षीस जाहीर केलेल होतच त्यात आणखी वाढ करण्यात आली. तसेच नंदगाव वचारखेडा गावातील पंचवीसशे एकराची मालगुजारी जाहीर केली. त्या लालसेन लोकं तंट्याच्या मागावर असायचे. मात्र त्याबरोबरच तंट्यानही गावागावात आपले विश्वासू माणसं, खबरे तयार करून ठेवलेले होते. पोलीसांच्या सर्व वार्ता खबरी त्याला त्वरीत कळत होत्या पोलीसांतही काही चांगल्या विचारांचे लोकं तंट्याला मदत करायचे.

गेल्या नऊ दहा वर्षांपासून जंगलात रानावनात राहून वणवण भटकून तंट्या रानटी पशूंपेक्षाही भयानक कठीण जीवन जगत होता. हाल अपेष्ठा सहन करत होता. कधी तो पोटभर अन्न खायचा तर कधी चार पाच दिवसात त्याला घासभर ही अन्न मिळत नव्हत. कंदमुळे फळं खाऊन निळ्या आकाशाखाली जमीनीवर तो रहात होता. शत्रूशी त्याच उभ पैर होता शत्रू चौफेर टपला होता. आपल्यातलेच काही लोक त्याला मारायला टपले होते बलाढ्य इंग्रज सरकारच्या फौजा, होळकर संस्थानचे शिपाई पाठी लागलेले होते. त्याला या जगण्याचा कंटाळा यायला लागला. त्याच मन आता थकल , शरिरही पिकल. आपल्या माणसात व बायको पोरासोबत संसार करावा, जमीन कसावी, वावरातल कामे कराव अस त्याला वाटत होत त्याच्या मनाची उलघाल होत होती. हुरहुर वाटत होती.

तंट्याचे विचार आता बदलले होते. सरकारकडून आपल्याला माफी मिळावी. सन्मानाच जीवन जगता याव अस त्याला वाटत होत. त्यासाठी तो सर्व गुन्हे कबूल करायला व माफी मागायलाही तयार होता त्याच्या सर्व जोडीदारानाही  त्यान तस बोलून दाखवल. व त्यांना त्यांची सोय करून घरी जाऊन उद्योग करून संसार करायच सांगीतल. आपल प्रांजळ मनोगत त्याने अनेक गावांच्या चांगल्या विचारांच्या लोकांना बोलून दाखवल. त्यांनीही त्याला योग्य सल्ला दिला. त्यां लोकांचेही विचार तंट्यान ऐकून घेतले व सरकारकडे आपली शिक्षा- विनंत्या केल्या. सरकार कडून आपल्याला माफी मिळवून द्यावी. अस अनेक लोकांना सांगीतल. मात्र त्यात बहुतांशी गरिब लोकं होते सरकार दरबारापर्यंत जे पोहचू शकत नव्हते. या निमित्तान अनेक लोकांसोबत भेटी घेऊन बोलण केल. मैत्री केली मात्र त्याच्या त्या प्रयत्नांना अजून यश येत नव्हत. कोणी त्याची शिफारस करत नव्हत.

तंट्याच्या प्रांजळ विचारांची वार्ता बोनेर गावच्या गणपत राजपूतच्या कानी गेली. तो धूर्त होता. त्यान आपल्या माणसांकरवी तंट्याची भेट घेतली. विश्वास दाखवला. तंट्याकडून पैसेही घेतले. त्यामुळे तंट्याला त्याचा विश्वास वाटला . त्याला सर्व माहिती सांगून चर्चा केली .दोघांमधे विश्वास वाढला. गणपत राजपूतन पोलीस अधिकारी इस्त्रीप्रसाद सोबत संधान साधल त्याला सर्व माहिती सांगितली व चर्चा केली दोघांमध्ये गुप्त बोलणी झाली. इकडे आणखी त्याने तंट्याची भेट घेतली. आणि त्याला सुरक्षेची हमी दिली व गुप्तता राखायला सांगून त्याला आपल्या घरी बोलावण केल

तंट्या ठरल्यानुसार ठरलेल्या वेळी बोनेर गावात गेला. गणपत राजपूतन त्याच चांगल स्वागत केल. गोड बोलून त्याच्या बरोबरीच्या सहा साथीदारांना परत पाठवून दिल. तंट्याच्या हातातली बंदूकही हुषारीन बाजूला केली. आणि घरात आधीच लपून बसलेल्या पोलीसांना इशारा केला. त्यांनी त्वरीत समोर येवून तंट्याला अटक केली. तंट्याला काही कळायच्या आतच पोलीस धरायला लागले. त्यान प्रतिकार करण्याचा खुप प्रयत्न केला. दोन तीन पोलीसाना घायाळ केल. मात्र त्या वीस पंचवीस पोलीसांपुढे निःशस्त्र तंट्याला हार खावी लागली कारण त्या हत्यारबंद वीस पंचवीस पोलीसांसमोर तंट्याचा एकट्याचा निभाव लागणे शक्यच नव्हतः विश्वास घातकी गणपत राजपूतान आपला डाव साधून घेतला. तंट्याला कैद झाली.

तंट्याला पकडल्याची वार्ता थोड्याच वेळात वाऱ्यासारखी पसरली. माघारी जाणाऱ्या तंट्याच्या साथीदारांना कळताच त्यांनी धावत येवून पोलीसांवर गोळी बार केला. मात्र त्यात त्यांना यश आल नाही. त्यांना हार खाऊन जीव वाचवण्यासाठी पळून जाव लागल पोलिसांनी मात्र तंट्याला धरून, जायबंदी करून नेल आणि वरच्या अधिकाऱ्यासमोर हजर केल. त्याने अनेक लोकांकडून तो खरोखर तंट्याच असल्याची खात्री करून घेतली. कारण यापूर्वी पोलीसांनी त्याच्या जोडीदारांना, दौल्या भिलाला दोन वेळा तंट्या समजून पकडल होता आणि त्यांची स्वतचीच फजीती झाली होती. असच एकदा त्याचा दुसरा जोडीदार पकडून आणला होता. एकदा तर त्यांनी तंट्या समजून दुसऱ्याच टोळीतल्या एका गुंडाला पकडून नेल होत नी तो तंट्या नाही अस समजल तेव्हा त्यांची चांगलीच नाचक्की झाली होती. तंट्याची सर्व खातरजमा झाल्यावर त्यान मोठ्या बंदोबस्ताची व्यवस्था करवून घेतली आणि मग जबलपूरला आणून डेप्यूटी कमीश्नर समोर उभ केल. त्यान रात्रभर कडेकोट बंदोबस्त करून पहारा वाढवून व स्वतः जागून काळजी पूर्वक रात्रभर तुरूंगात ठेवून दुसऱ्या दिवशी कोर्टात नेल. आणि न्यायाधिशांसमोर उभ केल' तंटयाला कैद केल्याची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. या कानाची त्या कानाला व या गावातून त्या गावाला वेगात पसरली. तंट्याला पकडल्याच समजताच लोक पळत निघाले. हातात लाठ्या भाले, तिरकामठे, गोफणी घेऊन निघाले. तंट्याला न्यायाधिशापुढे हजर करण्यात आल. आणि न्यायालयाच्या बाहेर मात्र त्याच्या चाहत्यांनी न्यायालया भोवती गर्दी केली होती. अनेक गावांचे भिल्ल, आदिवासी गोरगरीब, इतर समाजांतील लोक दाटीन जमा झाले होते. आणखीनही येत होते. गरिबांना त्यान मदत केली होती. ते लोक सहानुभूतीन आले होते येत होते. काहींच्या मते तंट्यान आतापर्यंत ज्या कारवाया केल्या होत्या त्या योग्यच होत्या. कारण त्यान कोणत्याही गरिबाला, सामान्य माणसांना कधीही त्रास दिलेला नव्हता. गरिबांना, सामान्यांन छळणाऱ्या धनीक श्रीमंत, शेठ सावकारांनाच त्यांन त्रास दिला होता. व त्यातही ज्यांनी त्याला, त्याच्या समाजबांधवांना, गोरगरिबांना त्रास दिलेला होता त्यांच्यावरच त्याने कारवाया केल्या होत्या. तर तंट्या कसा आहे? अस म्हणून तंट्याला पहायलाही आले होते. अजुनही लोकांच्या झुंडीच्या झुंडी येतच होत्या. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात होती. सशस्त्र फौजां तैनात होत्या. बाहेर गावांवरूनही पोलीस कुमक मागवलेली होती. पोलीस फौजा बंदुका लाठ्या काठ्या घेऊन सज्ज होत्या तंटयावर अनेक गुन्हे होते; आरोप होते. पुरावेही सादर करण्यात आले. सरकारी वकीलांनी सरकारची पोलीसांची बाजू न्यायालयासमोर व्यवस्थीत माडली. तंट्याच्या बाजून बोलणार, त्याची वकीली करणार कुणीही नव्हतः न्यायाधीशान त्याला विचारल, काही सांगण्याची, आपल म्हणन मांडण्याची संधी दिली. मात्र त्यान कोणतीहीसफाई न देता सर्व गुन्हे कबूल केले. इतकच नाही तर त्यान ते सर्व का केले होते ते सर्व कारणही सविस्तर आणि प्रामाणीकपणान सांगीतल. ते सर्व ऐकून घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्या. व मोठा बंदोबस्त ठेवून तंट्याला सेशन कोर्टात नेण्यात आल. तेथे त्याच्यावरील सर्व गुन्हे काटेकोरपणान तपासण्यात आले. त्याच्याविरुद्धच्या सर्व परिस्थीतीचा बारकाईन विचार करून तंट्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

न्यायालयान तंट्याच्या गुन्हयांचा व त्यान ते गुन्हे का केले होते या स्पष्टीकरणाचा विचार करूनच त्याला जन्मठेपेची शिक्षा जाहीर केली होती. तंट्यान असे गुन्हे करायला सामाजीक परिस्थीतीही काही अंशी जबाबदार असल्याची जाणीव गृहीत धरण्यात आली होती मात्र तंट्यान इंग्रजांना, इंग्रज पोलीसांना त्यांच्या अधिकाऱ्यांना सतत दहा वर्षे खेळवलेल होत. तंट्याला झालेल्या जन्मठेपेवर त्यांच समाधान झाल नाही. त्यांनी आणखी पुरावे जमा केले. त्यात हिंमत पाटलाच्या खुनाचे भक्कम पुरावे सापडले. साक्षीदार जमा केले आणि पुन्हा नव्या स्वरूपात तंट्याची केस दाखल केली.

वास्तवीक हिंमत पाटलाचा खून तंट्याचा साथीदार बिनिया यान केल्याच सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा जाहीर करून त्याला फासीही देण्यात आलेली होती. ती सर्व कारवाई यापूर्वीच होऊन गेलेली होती. तरिही तंट्याला त्यात दोषी ठरवण्यात आल. दरोडा घालणाऱ्या टोळीने जरी दरोडा घातलेला असला व त्यात कोणाचा खून झाला तर त्याची जबाबदारी दरोडा घालणाऱ्या टोळीच्या नायकावर असते. असा आरोप ठेवण्यात आला व त्याच न्यायालयाने तंट्याला आता फाशीची शिक्षा सुनावली. दि. ९ आक्टोबर १८८९ ला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या वर ११ अक्टोबर १८८९ ला तंट्यावर पुन्हा आरोप करून दि. १९ आक्टोबर रोजी तंट्याला फाशीची शिक्षा जाहीर झाली. ही कामगीरी करून न्यायाधीशान इंग्रज सरकारला मदत केली. त्या न्यायाधीशाच नाव होत- सेशन जज लिंडसे निल. आणि फाशीची तारीख दिली ४ डिसेंबर १८८e.

तंटयाला फाशीची शिक्षा जाहीर झाल्याचे कळले. वर्त- मान पत्रांतून ही वार्ता सगळी कडे पसरली. ती ऐकून लोकांना खुप दु:ख झाल. त्यांनी हळहळ व्यक्त केली. शोक केला. दुःख व्यक्त केल- अनेक जाणकारांच्या, अनेक विधीज्ञ वकीलांच्या मते हा निर्णय योग्य नव्हता तो साफ चुकीचा होता. न्यायाला धरून नव्हता. काही नामांकीत वकील एकत्र जमले. त्यांनी आपसात विचार विनिमय करून तंट्याच्या पाठीमागे भक्कम उभे ठाकले. त्याची बाजू घेऊन त्याला न्याय मिळवून देण्यासाठी, त्याच्या बाजून दयेचा अर्ज सादर केला. त्यात त्यांनी सरकारची, न्यायाधीशांची बाजू अयोग्य असल्याचा त्याच्या कारणांसह स्पष्ट उल्लेखही केला. व तंट्याची फाशी माफ करण्याची विनंती केली. याचना केली. मात्र ब्रिटीश सरकारन तो त्यांचा तो प्रस्ताव धुडकवून लावला.

चार डिसेंबरला तंट्याला फाशी देण्यात येणार होती. तंट्याला आठ दिवसांच्या आधीच त्याची अंतीम इच्छा, विचारली असता त्यान त्याची पत्नी भिकी व पोरगा किसनला भेटायची इच्छा व्यक्त केली. कारण त्याला जेल मधे आल्यापासून त्यांची खूप आठवण येत होती. गेल्या कित्येक दिवसांत धावपळीत त्यांची भेटच झालेली नव्हती. आता मात्र जबलपूरच्या सेन्ट्रल जेलमधे त्याला त्यांची खुप खुप आठवण येत होती. सरकारन आपला दयेचा अर्ज फेटाळला आहे हे देखील त्याला समजेलेल होत. व आपणाला आता फाशी होणार हे देखील त्याला समजल होत म्हणूनच त्याला त्याची अंतीम इच्छा विचारली तेव्हा त्यान पत्नी व मुलाच्या भेटीची इच्छा व्यक्त केली मात्र इतक्या कमी वेळात त्यांना शोधून घेऊन येण शक्य नसल्याच कारण दाखवून त्याची ती अंतीम इच्छा पूर्ण करायच टाळल. आणि पुन्हा एकदा सरकारन तट्यावर अन्याय केला. त्याला त्याची अंतीम इच्छा नपूरवून बायको पोराच्या भेटीपासून वंचीत ठेवल.

चार डिसेंबर हा तंट्याच्या फाशीचा दिवस ठरला होता. तीन डिसेंबरला सकाळपासूनच लोक जबलपूरला यायला लागले. गर्दी होऊ लागली. शहराच्या चारही दिशांनी लोकांचे लोंढे येत होते. आपला गोर गरिबांचा त्राता, मसीहा, आपल्या जननायकाला शेवटच पाहुन घेऊन हृदयात साठवून ठेवायला लोकं मोठ्या श्रध्देन येत होते. भिल्ल लोक आपले पारंपारीक शस्त्र तीरकामटे बाण सोबत घेऊन आले होते. शेतकरी कोकरू, गोड बंजारा व इतर अनेक समाजांतील गरीब लोकं येवून दाखल होत होते. दूरदूरुन लोकांच्या झुंडी येत होत्या. चार डिसेंबर १८८९ रोजी पहाटेपर्यंत जबलपुरात लोकां ची खुप दाटी झाली होती. पाय ठेवा लाही जागा नव्हती. जेलच्या



सभोवती कडक पहारा बसवण्यात आला होता. बंदुका घेऊन, शस्त्रं घेऊन ब्रिटीश पोलीस शिपाई जय्यत तयारीत होते. त्यांची संख्याही खूपच होती. त्यांच्यावर पोलीस अधिकारी चाणाक्षपणान लक्ष ठेवून होते. लोकांच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवून - होते. आणि सर्व लोक तंट्याच्या नावाचा जयघोष करत होते. घोषणा देत होते. संपूर्ण परिस्थीती स्फोटक दिसत होती. बाहेरच्या परिस्थीतीचा अंदाज घेऊन जेलच्या अधिकाऱ्यांनी तंट्याला वेळ न दवडता फाशी दिली नी बाहेर जेलच्या पहाऱ्यावरील शिपायांनी त्याला फाशी झाल्याच जाहीर केल. ओरडून ओरडून सांगत राहीले. ते ऐकून जमलेले सर्व लोक खीन्न झाले, निःशब्द-अवाक झाले, आणि माना खाली घालून सुतकी चेह-यांनी माघारी वळले.

सगळं जबलपूर शांत झाल सुनाट पडल. जबलपूरची ती सेंन्ट्रल जेल धगधगत्या ज्वाळेला - ज्यालामुखीला गिळून शांत झाली. गेल्या दहा वर्षांपासून दमछाक करायला लावणाऱ्या इंग्रज शिपाई अधिकाऱ्यानी सुटकेचा निःश्वास सोडला. निमाड़, खेडवा, जबलपूर, खंडवा जील्ह्यातील धनीकानी धगधगत्या शौर्याचा मर्दानी तारा इंग्रजी राजवटीच्या अमानूष खाईत ढकलून दिला, त्यांचा बळी दिला.

गोर गरिबांचा त्राता जननायक, दुष्काळात सावकार व्यापारी चढ्या भावान धान्य विकणाऱ्यांना लुटून गोरगरीबांना वाटणारा, तंट्या, गावागावांतून लोकं आपल्या पोराच्या पोरीच्या लग्नात आपुलकीन आपल्या घरी आग्रहान बोलवायचे. त्यांच्या घरी मदत व आहेर पाठवणारा तंट्या, शेतकन्यांना मदत करणारा त्यांना बैल, गाडी, बिबीयाण घ्यायला मदत करणारा तंट्या अडल्या नडल्यांना मदत करणारा, स्त्रीयांच्या अब्रूच रक्षण करणारा, साव कार व्यापारी, मालगुजारांना लुटून गरिबांना मदत करणारा, सरकार ला. सरकारच्या अत्याचाराला मदत करणाऱ्या श्रीमंतांना- धनीकाना लुटून दुःखी कष्टी पीडीतांना अन्न पुरवणारा तंट्या, रानावनात
राहून अन्याय झालेल्यांच्या, आदिवासींच्या पाठीशी उभा राहणारा तंट्या स्वतावर अन्याय झाला होता म्हणून त्याचा बदला घेण्याच्या इराद्यान घरदार सोडलेला, लोकांनी खोटनाट करून त्याला पुन्हा पुन्हा तुरुंगवास भोगायला लावल्यान गुन्हेगार-गुंड-दरोडेखोर झालेला तंट्या, तंट्या, तंट्या! तंट्या नावाचा झंझावात, वादळ शमल. कायमच शांत, शांत झाल.

तंट्यान स्वाभिमानी वृत्तीने जगून जातीवाद व सरंजाम शाहीच्या विरुद्ध झगडून आपल बलीदान दिल. त्याच हे बलीदान म्हणजे इंग्रजी महासत्तेच्या विरोधात क्रांतीच रणशिंग फुंकल होत. अन्याय अत्या चारींच्या विरुद्ध पुकारलेला बंडाचा आवाज होता. क्रांतीची ठिणगी होती. त्याच्या त्या ठिणगीन रौद्ररूप धारण करून पुढे क्रांतीच रणशांग फुंकून आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीन नव "Tantya Mama Bhil Aaadiwasi in marathi" रूप घेतल. लोकांनी इंग्रजी सत्तेच्या विरोधात आवाज उठवला व हजारो क्रांतीकारक भारताच्या कानाकोपऱ्यांतून उदयाला आले. अशा या महान क्रांतीकारी तंटयाला- तात्याला. भारतीय जनता कधीही विसरू शकणार नाही

स्वाभिमानीदयाळू निःस्वार्थी, सत्यप्रिय, सहनशील, धैर्यशील, प्रामाणिक, कष्टाळू, मैत्रीचा आदर करणारा तंट्या थोर सद्गुणी होता. म्हणूनच लोकांमधे त्याचा आदर होता तो मरू नये त्याला फाशी होऊ नये असत्य सामान्य जनतेला वाटत होत. जाणकार विधीतज्ञांनी वकीलांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र इंग्रजी राजवटीन त्याला धुळकावून लावल नी एका महान क्रांतीकारी भारतीयाचा बळी घेतला.
तंट्याच्या या स्वाभिमानी बलीदानाला विनम्र विनम्र अभिवादन!

लेखक :  ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या