Revolt of Bhils in Khandesh खान्देशातील भिल्लांचे विद्रोह - व्यापार करायला आलेल्या इंग्रजांनी हळूहळू सत्ता वाढवत संपूर्ण भारताची सुत्रे हाती घेऊन शासनकर्ते झाले.
Revolt of Bhils in Khandesh
मात्र जेव्हा हा छळ जास्तच असहय झाला, तेव्हा त्यांच्या त्या सत्तेला व दडपशाहीलाही न जुमानता लोक आवाज उठवायला यागले. इंग्रजी सत्तेच्या विरोधात 'Revolt of Bhils in Khandesh' प्रथम आवाज आदिवासींनीच उठवले.
इंग्रजी सत्तेच्या व इंग्रजधार्जिण्या सावकारांच्या सतत होणाऱ्या छळाने त्रासलेल्या आदिवासींनी भारतातल्या अनेक भागांतून आवाज उठवला बंड पुकारले.
महाराष्ट्रातही असे गरीब आदिवासी संघर्ष करत आवाज उठवायला लागले. महाराष्ट्रातील खान्देश विभागातूनही प्रथम आदिवासींनीच उठवला.
इ.स. १८०३ मधे सातमाळा ते अजींठा भागातून इंग्रजांच्या अराजकतेच्या विरुद्ध संघटीतपणे आवाज उठवला, त्यांच्या त्या आवाजाला कलेक्टर बिग्जने दाबण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यामुळे आदिवासी भील जास्तच चिडले. त्यांनी इंग्रजांच्या आणी त्यांना छळणाऱ्या सावकारांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या. सरकारी खजीने, कचेऱ्या लुटणे, जाळपोळ करणे असे दहशतीचे कृत्य करायला लागले. त्यांच्या संघटीत कारवायांपुढे इंग्रजांना नमत घ्याव लागल.
त्यांनी आपली भुमीका बदलवली. ते नरम झाले. त्यांनी आदिवासींना गरिबांना प्रलोभन दाखवल. त्यांच्यासोबत सामंज्यस्यान बोलणी केली आणी त्यांना त्यांचे पुर्वीचे हक्क देण्याच, काहींना नोकरी देण्याच तर काहींना मान- धन देण्याच आश्वासन दिल. मात्र त्यांच्या कपटीपणाला बळी न पडता आदिवासींनी आपल्या कारवाया करणे सुरूच ठेवले आणी इंग्रजांना जर्जर करून सोडले. रानावनात राहून ते कारवाया करतच होते
आदिवासींच्या कारवाया थांबवण्याचे मेजर मोरीनने प्रयत्न केले. तरी आदिवासींनीही आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या. इंग्रजानीही त्यांच्या त्यांच्या कारवाया सुरूच ठेवल्या.
Revolt of Bhils in Khandesh in marathi
" इ.स १८१२ खान्देशात भिलांना सोबत घेऊन हिरा भील यांनी उठाव केला. इंग्रज आणी सावकारांच्या जुलूमा विरोधात हा उठाव होता. ० इ.स. १८२५ सेवाराम भिलांनी खान्देशातील भिलांना सोबत घेऊन
उठाव केला. इंग्रजांच्या अराजकतेच्या विरोधात हा उठाव होता.
इ.स. १८१९ ते १८४६ दुसरा बाजीराव पेशव्यांनी त्रिंबकजी इंगळे यांच्या चिथावणी वरून इंग्रजांविरूध्द उठाव केला
● साताऱ्याचे प्रतापसिंहराजे यांनी १८४१ मधे इंग्रजांच्या जुलुमांविरोधात उठाव केला होता.
• १८१९ मधे गुजरातच्या कच्छचा राजा भारमलला इंग्रजांनी पदच्यूत करून लहाण मुलाला गादीवर बसवून कारभार हाती घेतला होता. त्याने गैरव्यवहार केला. भारमलला सत्ता देण्याची जनतेने मागणी केली ती. इंग्रजांनी फेटाळून लावली त्या विरोधात भारमलनते Revolt of Bhils in Khandesh लोकांना सोबत घेऊन हा उठाव केला होता.
इ.स. १८१८-१९ बडोद्याचे गायकवाडांच्या मदतीने गुजरातच्या ओखा विभागातील वाघेरेंच्या कडून जास्त कर घेतला म्हणून वा वाघेरेंनी सशस्त्र उठाव केला होता.
इ.स. १८४४ ते १८४८ इंग्रज सरकारने मिठावरील कर दुप्पट केला होता. त्याच्या विरोधान जनतेने असंतोषाने सरकारच्या विरोधात उठाव केला. इ.स. १८०६ मधे इंग्रजांचे राज्य विस्ताराचे धोरण, जमीनदारांच्या हक्कावर गदा आनणे विरोधात असंतोष होऊन कोलारी व मुंडा यानी वेलोरा उठाव केला होता
इंग्रजांनी ब्रम्हदेश व भारत जोडण्याचा प्रयत्न केला होता. मेघालय, खोरा खानटी सिंहपो वर अवैध अधिकारही करून घेतला त्याविरोधात तिरत- सींग यांनी इ.स १८30 मधे खासीचा उठाव केला होता.
आसामात अहोनांनी गोमाधरला राजा घोषीत केल नंतर: इंग्रज व ब्रम्हदेशात युद्ध झाल. इंग्रजांनी त्यांच्या फौजा अहोनांच्या- आसामात ठेवल्या. ते काढून घेण्याच आश्वासनही दिल मात्र त्या काढल्या नाही. म्हणून गोमाधर यांनी इंग्रजांच्या विरोधात इ.स. १८१८ मधे आसामात उठाव केला होता
इंग्रज सरकार आणी जमीनदार सावकारांकडून जास्तीची आणी सक्तीची कर वसूली, अधिकाऱ्यांच्या क्रूरवर्तना विरोधात बंगाल मधील संथालांनी इ.स. १८५५ मधे इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला होता
रम्बा - आंध्र प्रदेशातल्या गोदावरी जिल्ह्यात मद्रास फोर्टस अॅक्ट च्या विरोधात अलुरी सिताराम यांनी १८८२ मधे उठाव केला पुढे तो उठाव राजू सिताराम यांनी चालवला होता.
ओरिसा प्रांतात संभलपूर राजकोंडा गावात मधुकर साई नावाचे जमीनदार रहात होते. त्यांच्या निधनानंतरमुलगा सुरेंद्र साई हे वारसदार होते मात्र इंग्रजांनी त्यांना डावलून चव्हाण वंशातील नारायणसिंग यांना वारसदार केले. तेव्हा इंग्रजांच्या विरोधात सुरेंद्र, साईने 30 जानेवारी १८०८ ला ओरिसात उठाव केला. त्यांना त्यांचे भाऊ काका व अनेक आदिवासीनी सहकार्य केले इंग्रजांनी सुरेंद्र साई यांना पकडून मध्यप्रदेशातल्या आसिरगड किल्यावर बंदीस्त ठेवले होते. तेथेच ते मरण पावले होते २ मे १९१४ रोजी ते मेले.
आंध्र प्रदेशात विशाखापट्टण जवळ पालकोंडात विजयरामराजे यांनी इ.स. १८२७ मधे उठाव सुरू केला. इंग्रजांनी संपत्ती हडप करणेच्या विरोधात हे आंदोलण होते. पुढे त्यांचच आंदोलण इंग्रजी सत्तेच्या जुलुमा विरोधात १८30/३१ मधे आंदोलण केले. तसेच पेंशन रोखणे आणी उत्तराधीकारीच्या विरोधात १८३२ मधे जगन्नाथ राजे यांनी हे आंदोलण सुरूच ठेवले होते.
Revolt of Bhils in maharshtra - Khandesh
आंदोलणाचा प्रतिकार केला. त्यात टोपासोरा मारल्या गेले. अनंत यार यांनी लढवैय्ये लोकांना जमवून राम सांडू सेना - रामाची सेना उभी केली. आणी कोया विद्रोह सुरूच ठेवला. त्याकरता त्यांनी जयपूरच्या राजाचीही मदत मागली होती. मात्र इंग्रजांसोबत लढता लढता ते मारल्या गेले.
चेंचू विद्रोह: - आंध्र प्रदेशात गुंटूर जिल्ह्यात १९२० मधे हा विद्रोह केला होता. आदिवासी परंपरागत जंगलात गुर चारत होते. इंग्रजांनी त्यावर बंदी घातली तसेच त्यांच्यावर अब कारी कर लावून सक्तीची वसूली करणेच्या विरोधात वेंकटप्पाने हा विद्रोह केला होता. त्याच महात्मा गांधींनी ही समर्थन केल होत
• गंजाम विद्रोह- जास्तीचे कर लावून सक्तीने वसूली करणे. मद्रास प्रेसीडेंसीच्या विरोधात श्रीकर मोजे यांनी १८०० ते १८०५ पर्यंत तामीळनाडूत गंजान मधे हा विद्रोह केला होता.
'पोलीगारांचा विद्रोह: - तामीळनाडूत इंग्रजांकडून भूमी कर व्यवस्थेच्या विरोधात मालाबार दिंडीगल भागात बी.पी कट्ट्वामन यांनी विद्रोह केला होता.
गुमसूर विद्रोह:- इंग्रजांनी जमीनदारांवर जास्तीचे कर लावणे च्या विरोधात, तामीळनाडूत धनंजय भंज यांनी १९३५ मध्ये गुमसूर विद्रोह केला होता.
वेलूभंपी विद्रोह- केरळ मधील त्रावर कोरचा राजा वेलूभेपी यांनी इंग्रजांना सहकार्य केल नाही. म्हणून इंग्रजांनी राजाला पदच्यूत केला म्हणून त्यांच्या दिवानान इंग्रजांविरुद्ध १८०८-१८०९ मधे हा विद्रोह केला. त्यांना नायर बटालीयन लोकांनी समर्थन केले. त्यावेळी फ्रान्स व अमेरीकेशी मदतीसाठी संपर्क केला होता. दिवानांनी यालाच १८५७ चा पुरोगामी विद्रोह असेही म्हटले जाते. या विद्रोहाने इंग्रजांना चांगलाच हादरा बसला होता.
किंटूर विद्रोह:- किंदुरचे अंतीम शासक- राजा शिवलींग रुद्रांच निधन झाल्यावर राणी चेनम्मान दत्तक घ्यायच ठरवल त्याला इंग्रजांनी विरोध केला म्हणून राणीने १८२४ ते १८२९ पर्यंत मोठा विद्रोह केला. त्यांच्या विद्रोहाला राय्प्पाने सहकार्य केल
राजस्थानात मेवाड प्रांतात इंग्रजांनी आदिवासींना लाकडे कापणे बंद केले. महूफुले घेणेही बंद केले. आणि तिसाला नावाचा नवा भूमी कर लावला होता. त्याच्या विरोधात १९३१ मधे दौलतसींग, गोविंदसिंग यांनी विद्रोह केला होता
गड़करी विद्रोह महाराष्ट्रातल्या कोल्हापूर भागात किल्यांवरील किल्लेदार परंपरेन रहात होते. त्यांना परंपरागत जमीनी मिळाल्या होत्या त्या करमुक्त होत्या. इंग्रजांनी त्या "Revolt of Bhils in Khandesh" जमीनी हडप करून घेतल्या. तसेच समन्नगड किल्ला आणी भूगड किल्हाही बळकावून घेतला. म्हणून त्यांच्या विरोधात गडकऱ्यांनी १८४४ सालात विद्रोह केला होता.

0 टिप्पण्या