उमाजी - नाईक | veer Umaji Naik Balidan In Marathi

 veer Umaji Naik Balidan In Marathi उमाजी नाईक -- छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीपातींच्या लोकांना मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य घडवल. मावळ्यांनीही त्यांना खुप मोठ मोलाच योगदान दिल होत. 

राजांचे गुप्तहेर असलेले बहीर्जी नाईक हे देखील निष्ठावान, पराक्रमी, चतूर, प्रसंगावधानी अशा अनेक सद्गुणांनी युक्त होते. निष्ठावान होते त्यांनी अनेक वेळा आपला जीव धोक्यात घालून योगदान दिलेल आहे. 

                                                              
veer Umaji Naik Balidan In Marathi
 veer Umaji Naik Balidan In Marathi

अशा या थोर मावळे बहीर्जी नायकांच्या परंपरेतच उमाजी नाईक हे थोर स्वराज्य प्रेमी, समाजनीष्ठ, क्रांतीवीर होऊन गेले.


 veer Umaji Naik Balidan In Marathi


इतिहासात प्रसिद्धि, मुरारबाजींच्या शौर्याची साक्ष छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थानाच भाग्य लाभलेल्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भिवडी या गावात दादाजी खोवडे व लक्ष्मीबाई या दाम्पत्याच्या पोटी दि. ७ सप्टेंबर १७९१ रोजी उमाजींचा जन्म झाला. ते लहाणपणा पासुनच तल्लख बुद्धीचे, धाडसी काटक होते. पुरंदरावर, रानावनात ते निडरतेन फिरायचे.

 ते लहाणपणापासून जेजुरीच्या मल्हारी रायांचे भक्त होते. आपल्या वडीलांकडून त्यांनी दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे असे युद्धकलेचे शिक्षण घेऊन  'veer Umaji Naik Balidan In Marathi'  तरबेज झाले होते. घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे हे तर त्यांचे अत्यंत आवडीचे होते. तरुणपणात ते रांगडे, धिप्पाड पराक्रमी सुरवीर झाले तसे ते मनानही प्रांजळ, परोपकारी, सत्यनीष्ठ होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर त्यांचे सुपुत्र शाहूराजे (त्यांचे खरे नाव शिवाजी) यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली जी पुरंदराच्या संरक्षणाची जबाबदारी तेथील रामोशी-नायकांकडे दिलेली होती त्यांनी निष्ठेन जोपासली. परंपरेन सांभाळली. 

त्यानंतर स्वराज्याची सुत्रे पेशव्यांच्या ताब्यात गेली. त्यांनी देखील पुरंदराच्या संरक्षणाचा हक्क कायम राखला मात्र पेशवाईच्या उत्तरार्धात इंग्रजी सत्तेचा अंमल सुरू झाला तेव्हा पेशव्यांनी गडाच्या संरक्षणाची जबाबदारी रामोशी-नायकांकडून काढून त्यांच्या मर्जीतल्या लोकांना दिली. या प्रकारान उमाजींना राग आला त्यांनी काही साथीदारांना सोबत घेतल आणी पुरंदरावरील आपला हक्क परंपरेनुसार मागायला गेले मात्र इंग्रजांनी त्यांना अपमानीत करून धुडकावून लावल. आणी इथूनच उमाजींच्या मनात इंग्रजी सत्ते विरोधात व्देष वाढला.

इंग्रजांच प्रस्थ आता बरच वाढायला लागल होत ते सावकार, वतनदार जमीनदारांना हाताशी धरून वागायचे गोरगीरब शेतकरयावर अन्याय अत्याचार करायचे. जास्तीची आणी सक्तीने कर वसुली करणे सक्तीने धान्य नेणे, मारठोक करणे स्त्रीयांवर अत्याचार करणे असे त्यांचे प्रकार सुरू होते तसेच सावकारही जास्त व्याज घेणे, व्याज्यापोटी जमिनी हडप करणे, गुंडांकरवी लोकांना त्रास देत होते त्या लोकांचा बंदोबस्त करावा, गरिबांवरील अन्याय अत्याचार थांबवावे अस उमाजींना वाटायच छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श होते. आपणही त्यांच्यासारखाच जनतेचा कैवार घ्यावा. त्यांच्या साठी झटाव अशी त्यांची प्रामाणीक इच्छा होती. त्यांनी आपल्या भावकीतल्या व इतर काही तरुणांनाही आपले विचार सांगीतले ते त्यांनाही पटले. ते देखील आनंदान तयार झाले नी सर्व प्रकारच्या मदतीच आश्वासन दिल.

आपल्या कार्याला आरंभ करण्याआधी आपल्या देवाच खंडोबा रायाच दर्शन घ्याव या प्रामाणीक सद्‌भावनेने ते सोमवती अमावसेच्या निमीत्ताने जेजुरी गडावर आले. श्रध्देन दर्शन घेतल यळकोट. यळकोट जय मल्हार! म्हणून भंडारा उधळला आणी हात जोडून देवाला मागण मागीतल,

देवा खंडोबा राया ! गोर गरीबांच दुःख, त्यांच्यावरील अन्याय अत्याचार निवारण्याच बळ मला दे! तुझ्या कृपेन मी हे काम करू इच्छीतो त्यात यश दे! तस तर यापुर्वीच प्रत्यक्ष मल्हारी रायांनी दर्शन दिलेल होत. आणी भंडारा दिला होता. तो भंडारा त्यांनी ताईतात भरून आपल्या पिळ- दार दंडावर बांधून श्रध्देन जोपासत होते.

दर्शन घेऊन या गर्दीतून वाट काढत परतताना त्यांचा एक जोडीदार घाबरत येवून त्यांना सांगायला लागला,

दादा, आपल्या अमृताला पकडून पोलीस चौकीजवळ नेल आहे. त्या अण्णा रामोशाला सांगून त्यांना सोडवाव लागेल!

ते दोघेही घाईघाईन पोलीस चौकीजवळ आले. उमाजीनी परिस्थीतीची जाणीव करून घेतली. गर्दीत धक्का बुक्की करतो अस म्हणून अण्णान अमृताला पकडवून दिल होत. अण्णाही रामोशीच होता मात्र तो पोलीसांचा दलाल होता. त्यानच अमृताला पकडवल होत. उमाजीन अण्णाला हात जोडले, त्याची विनवणी करत म्हणाले,

माझ्या भावा कडून कळत न कळत चुक झाली असेल. मी माफी मागतो, त्याला माफ करा!

आणान उमाजीकड ढुंकूनही पाहील नाही. तरीही उमाजी मोठ्या आशेन नम्रतेन पुन्हा म्हणाले,

अण्णा माझ्या भावाला माफ करा, त्याला सोडा! मी तुमच्या पाया पडतो! उमाजींच्या या बोलण्याकड अण्णान पुन्हा दुर्लक्ष केल आणी तोंड वाकड केल.

 veer Umaji Naik Balidan In Marathi


उमाजीन अण्णाच्या पाया पडूनही माफी मागली तरी तो ऐकूनही न घेता मग्रूरीन वागला याचा उमाजींना राग आला. त्यांनी कमरेची तलवार उफसली आणी अण्णाला एकाच घावात खाली पाडला. समोर अण्णा मरून पडलेला पाहून ते अमृताला म्हणाले, माझ्या हातून अमृताचा खून झाला आहे इंग्रजांच्या राज्यात या गुन्हयाला फाशीच होते आता मी फरार होतो. तू घरी जा सर्वांना सांग माझी काळजी करू नका म्हणाव. तू सर्वांना सांभाळ. यळकोट, यळकोट जय मल्हार ! अस म्हणून ते तातडीन निघाले. नी नजरेआड झाले. रानांत निघून गेले.

पुरंदरच्या जंगलात उमाजींनी सत्तू नायकाची भेट घेतली. त्या दोघांनी इंग्रजी राजवट आणी सावकार शाहीचा बंदोबस्त करायची पुर्ण तयारी केली आणी त्यांच्या सारखेच फरारी झालेले, शिपाईगीरी सोडून बेकार झालेले, धाडसी पराक्रमी लोकांना संघटीत केल. आणी आपल्याला शस्त्र हवे. इतर सामानही पाहीजे म्हणून खानापूरच्या एका व्यापाऱ्याला लुटले. मात्र त्यात ते सापडले. पकडले गेले.

 त्यांना एका वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली. या वर्षभराच्या तुरूंगवासात त्यांनी लिहीण वाचण आत्मीयतेन शिकून घेतल त्या तुरूंगवासाचा सदुपयोग करून घेतला.

तुरूंगवास भोगून आल्यावर त्यांनी पुन्हा साथीदारांना संघटीत केल. आणी सावकार, व्यापारी, व इंग्रजांविरुद्ध कारवाया सुरू केल्या' आणी एके दिवशी जेजूरीच्या गडावर सर्व साथीदार जमले त्या सर्वांनी संमतीने उमाजींना आपला राजा घोषीत केल.

 उमाजी आता राजे झाले रानावनात एखादया  veer Umaji Naik Balidan In Marathi गडावर दरबार भरवून ते मसलत करत असत आणी योजना मोहिमा आखायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून आणी त्याच मार्गान वाटचाल करून त्यांनी माणसे साथीदार जोडले. तसेच जनतेचाही विश्वास संपादन केला. त्यांनी कोल्हापूर आणी सातारा येथील दोन्ही राजांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेतले. 

त्या दोन्ही भोसले राजांनी त्यांचा सन्मान केला आणी त्यांच्या कार्याला शुभेच्छाही दिल्या. कोल्हापूरच्या राजांनी त्यांना तलवार व फेटा भेट दिली होती. आणी आणखी मदतीच आश्वासन दिल होत.

उमाजीराजे आता आपला स्वतंत्र कारभार करायला लागले. लोकांकडून रितसर कर घेऊन त्यांच्या सुखासाठी झटायला लागले. इंग्रजांचे खजीने, गोदाम लुटून, सावकारांना लुटून गरिबांना ते धन धान्य वाटून देत होते. आई बहीणींवर कोणी अत्याचार केला तर ते त्यांना सहन होत नसे . 

एकदा तर त्यांच्याच टोळीतील एका काळोजी रामोशी नावाच्या माणसान एका बाईवर हात टाकला. याची माहीती मिळाल्यावर उमाजींनी खात्री करून घेतली आणी काळोजीचा हात तोडून त्याला आपल्या टोळीतून हाकलून दिल होता. त्याची तरफदारी त्याच्या नात्यातल्या नाना रामोशान केली म्हणून त्यालाही बाहेर काढून दिल होत.

उमाजीराजांच्या इंग्रजां विरुध्दच्या कारवाया सतत वाढतच होत्या. त्यामुळे इंग्रज त्रस्त झाले हैराण झाले त्यांनी उमाजींना पकडण्यासाठी अनेक अधिकारी शिपाई प्रयत्न करत होते. मात्र उमाजी काही सापडत नव्हते १८२४ सालात त्यांनी काळोख्या रात्रीत भामोड्याचा खजीना लुटला. त्यात हजार चांदीचे रुपये आणी दागीने वगैरे सामान मिळाल. त्यातील चार आणे धन खंडोबाला- देवस्थानाला देवून काही पैशात शस्त्र घेतले उरलेले सर्व धन गोर गरीबांना आणी साथीदारांना वाटून दिले. स्वता करता एक दमडीही घेतली नाही. 

लुटीच्या या घटनेने इंग्रज सरकार हादरल. त्यांच धाबच दणानल त्यांनी काही शिपाई पाठवले. बहादूर उमाजींनी त्यातल्या पाच शिपायांना ठार करून पोलीस ठाण्यात त्यांची मुंडकी पाठवली होती. या घटनेने तर इंग्रजांना लांछनास्पद करून सोडले इंग्रज अधिकारी साहेबाच्या पायांची आग मस्तकाला भिडली. त्याने आणखी कर्तबगार अधिकारी आणी शिपायांना उमाजींच्या पारिपत्याकरता पाठवल. त्यांना पकडून देणाराला २००० रुच बक्षीस जाहीर केल. बक्षीसाच्या लाल सेन शिवनाथ नावाचा तरुण पोलीसांना भेटून व संगनमत करून उमाजींना शोधायला निघाला. ही वार्ता ऊमाजीना समजताच त्यांनी शिवनाथ याचा शोध घेऊन ठार केल.

उमाजींनी इंग्रजांना मदत करणाऱ्या मिरजेच्या राजांना व १८२७मध्ये फलटणच्या निंबाळकरांनाही लुटले. इंग्रजांनी पुन्हा १५ डिसेंबर १८२७ म‌धे ५ कलमी जाहिरनामा काढला. त्यात उमाजींना पकडण्यासाठी १२०० रुपया चे बक्षीस जाहीर केले. त्यांच्या विरोधात उमाजींनी पुन्हा नवा जाहीरनामा काढला. आणी तेरा गावांच्या महसूली घेतल्या. आणी सर्व लोकांना जाहीर आवाहन केल, इंग्रजांना कोणीही मदत करु नये. जो ऐकणार नाही त्याला नव सरकार दंड करीन!

उमाजींच्या कारवायांची खबर थेट इंग्लंडमधे राणी व्हिक्टोरीया पर्यंत जाऊन भिडली. तीने कसही करून उमाजीना पकडायच्या इंग्रजी अधिकाऱ्यांना कडक सुचना दिल्या. कठोर कारवाई करायला सांगीतल. त्यानुसार मुंबईच्या गर्वनरन त्यांना पकडण्यासाठी सतराव्या रेजीमेंटचा अधिकारी कॅप्टन मैकोटॉस या हुशार कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची निवड केली. त्याने जाहीर नामा काढून उमाजीला पकडून देणारास १० हजार रुपये आणी चारशे एकर जमीन देण्याच जाहीर केल तसच उमाजींचे साथी दार भजाजी, येसाजी, व कृष्णाजी यांना पकडून देणारास ५ हजार रुपये आणी २०० बिधे जमीन जाहीर केली. इतक्या दिवस धाक दाखवून, बक्षीसी जाहीर करूनही कोणी उमाजींना पकडायला समोर येत नहत. मात्र आता एवढी मोठी रक्कम आणी ही चारशे बिधे जमीनीच्या लालसेन काळूजी समोर आला. त्यान नाना रामोशाला आपले विचार सांगून दोघांनी संगनमत केल आणी उमाजीला पकडून द्यायच ठरवल. हा काळोजी रामोशी तोच होता ज्यान एका बाईवर हात टाकला म्हणून उमाजीन त्याचा हात तोडला होता.

काळोजी व नाना दोघे इंग्रज अधिकाऱ्याला भेटले. त्यांना आपली हकीगत सांगून उमाजीला पकडून दयायची हमी दिली. इंग्रज अधिकाऱ्यानही त्याला मदतीच आश्वासन दिल नी काही योजना सांगितल्या त्यानुसार काळोजी व नाना उमाजीकडे आले त्यांची माफी मागण्याच नाटक केल , आम्ही चुकलो, आम्हाला माफी दया! आमची लेकरबाळ उपाशी मरताहेत आम्हाला आपल्यासोबत घ्या! पुन्हा आम्ही असा गुन्हा करणार नाही! अस सांगून त्यांचे पाय धरले. प्रांजळ मनाच्या उमाजींना ते खर वाटल त्यांनी त्या दोघांना पुन्हा आपल्या सैन्यात घेतल. त्यांनीही थोडे दिवस त्यांच्या सोबत काम करून विश्वास दाखवला. 

मात्र हे करताना त्यांनी त्यातील काही माणसांच्या चहाडी करून, काहींना जास्त पगार मागायला सांगून किंवा इतर कारणांनी असंतोष निर्माण करून सैन्य सोडून- उमाजींना सोडून जायला भाग पाडल सैन्याची संख्या कमी केली. नकळत आपला कावा करत गेले. आणी थोड्याच दिवसात डाव साधला.

 veer Umaji Naik Balidan In Marathi


इंग्रजांसोबत संगनमत करून त्यांच्या सैन्याला एके ठिकाणी जंगलात लपून रहायला सांगीतल. इकडे उमाजीला खात्रीन एका सावकाराचा खजीना लुटायचा सल्ला सांगून रात्रीच्या अंधारात उमाजीला घेऊन निघाले. व उटरोळी गावाजवळ आल्यावर सांकेतीक इशारा करून इंग्रजांना इशारा केला. त्यासरसा इंग्रज सैन्यान चौफेर बंदूकधारी शिपायांचा घेराव घालून त्यांना पकडलः 

उमाजी राजे पूर्व साथीदारांच्या विश्वासघातकी फितूरीन पकडले गेले. काळू रामोशी आणी नाना रामोशी यांनी त्यांना पकडवून दिल. वाघ पिंजऱ्यात अडकला. १५ डीसेंबर १८३१ रोजी ते पकडले गेले इंग्रजांनी उमाजीला जायबंदी करून साखळ दंडानी जखडवून तुरुंगात ठेवल. त्यांच्यावर खटला भरला. न्यालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. आणी पुण्याजवळच्या खडकमाळच्या कोठडीत ठेवल. त्यांच्या दोन साथीदारांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांना फाशी देण्यात आली. उमाजीराजेंना दि. 3 फेब्रुवारी १८३२ रोजी फाशी देण्याचे ठरले सर्व तयारी झाली, गळ्याला फास लावल्यावर त्यांना त्यांची अंतीम इच्छा विचारली तेव्हा ते म्हणाले होते,

तुम्ही इंग्रज हा भारत सोडून निघून जा!

थोर स्वातंत्र्यप्रेमी इंग्रजांचे कर्दनकाळ, आदय क्रांतीकारक पराक्रमी वादळ स्वातंत्र्यासाठी बलीदान करून अमर झाले.

उमाजी नायकांच वेगळेपण- श्रेष्टत्व:

  •   वयाच्या तेराव्या वर्षीच पुरंदर गडाचे किल्लेदार होण्याची जबाबदारी. प्रत्यक्ष मल्हारी रायांच त्यांना दर्शन घडल होत.
  •  छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन स्वातंत्र्यप्रेम जागवल सर्वात आद्य क्रांती, इंग्रजांविरोधात बंड पुकारल. आद्य क्रांतीकारक. 
  • आपले सद्गुण व चातुर्यान लोकांना संघटीत केल.

  •  गनीमी काव्यान लढाई इंग्रजांच्या विरोधात जाहीरनामा काढण्याच धाडस.

  •  सर्व भारतीयांनी एकाच वेळी उठाव करण्याची प्रथम हाक
  • १८२७ मधे इंग्रजांना ठणकावून सांगीतल, आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर रामोशांच्या संघर्षाला सामोरा जाव लागेल. आज हे बंड असल तरी उद्या मोठी क्रांती होईल. आणी हजारो क्रांतीवीर सातपुड्या पासून ते सहयाद्री पर्यंत दौडत येतील. पुढे तेच वाक्य खरेही झाले. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांना सहा वेळा जाहीरनामा काढून प्रत्येक वेळी बक्षीसाची रक्कम वाढवावी लागली.

  • दहा हजार रुपये (त्या काळातील) आणी चारशे बिधे जमीनीच बक्षीस पकडायला आलेल्या इंग्रजांची मुंडकी छाटून त्यांनाच पाठवली. कोल्हापूरच्या भोसले राजांकडून कोल्हापूरी पेहराव तलवार देवून सन्मान, आधुनीक शस्त्र घेऊन पाठलाग करणाऱ्या इंग्रजांना त्यांनी मांढरगडा वरून गुलेर, गोफणी, व तीरांचा मारा करून पळवून लावले.

  • १६ फेब्रुवारी १८३१ ला स्वातंत्र्याची घोषणा करून स्वतंत्र कारभार केला. फासावर जाताना शेवटची इच्छा विचारली तेव्हा ते म्हणाले होते, "इंग्रजांनी भारत सोडून जावे ! "

  •  निजामानेही त्यांना सहकार्य मागले होते.

  •  त्यांच्या शौर्याची व्हिक्टोरीया राणीलाही दखल घ्यावी लागली.

  •  एका वर्षाच्या तुरूंगवासात त्यांनी लिहीण वाचण शिकून घेतल होता उमाजींच्या विषयी कॅप्टन रॉबर्टसन आपल्या वरीष्ठांना लिहून कळवताना सांगतो, येथील रामोशी हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्का. रान पेटून उठला आहे. तो कोणत्यातरी बदलाची वाट पहात आहे. जनता त्याला सहकार्य करत आहे' कोणी सांगावे? उमाजी हा राजा होऊन छत्रपती शिवाजी राजांसारख दूसर स्वराज्यही निर्माण करीन! हे पत्र त्याने ईस्ट इंडिया कंपनीला लिहील होत.


  •  मॅकॅनटॉस हा इंग्रज कॅप्टन अधिकारी आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना लिहून कळवतो, उमाजींपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर  "veer Umaji Naik Balidan In Marathi" तो दुसरा शिवाजी राजाच झाला असता.


  •  कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वताच पाचशे लोकांच सैन्य जमवून, व स्वातंत्र्याचा जाहीरनामा करून स्वताचा कारभारही केला.

  • अशा अनेक अनेक सद्गुणांनी, आपल्या पराक्रमांनी श्रेष्ठ असलेले उमाजीराजे दुसरे छत्रपती शिवाजी महाराज शोभावेत असे असे ते थोर होते.

इंग्रजांनी उमाजी नायकांना फाशी दिल्यावरही इंग्रजांनी त्यांना, त्यांच्या प्रेताला विहीरीच्या काठावरच्या तीन दिवस लटकवून ठेवल. लोकांमधे दहशत पसरावी. कोणीही इंग्रज सरकारच्या विरोधात आवाज उठवून... नये कारवाया करू नये. हा त्यांचा हेतू होता. मात्र तस न घडता उमाजींच्या "veer Umaji Naik Balidan In Marathi" प्रेरणेन महाराष्ट्रात आणी संपूर्ण भारतभरात हजारो स्वातंत्र्य सैनीक तयार झाले नी १८५७ चा राष्ट्रीय उठाव झाला. 

अशा महान योध्याला, दुरदृष्टीच्या आदय क्रांतीविराला विनम्र अभिवादन!

लेखक- डॉ.ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या