महाराष्ट्र - संस्कृतीच लेण | Maharasahtra sanskrutik Varsa information in Marathi

Maharasahtra sanskrutik Varsa information in Marathi  सिंधू परिसरातील, व महान राजा भरतांच्या नावाने प्रसिद्ध असलेली आपली भारतीय संस्कृती पुरातन, श्रेष्ठ, व आदर्श आहे. ब्रम्हा विष्णु, शंकर, गणेश दुर्गा, लक्ष्मी, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध, विठ्ठल, बालाजी, अनेक ऋषी-मुनी, थोर संत-महंत,

Maharasahtra sanskrutik Varsa information in Marathi
maharashtracha sankrutik paulkhuna


                                            
सिद्ध-सत्पुरुष, अनेक महासती पतिव्रता, विर, विरांगना, अशा चारित्र्य कथांचा समृद्ध ठेवा लाभलेल्या आपल्या भारतीय परंपरेला महान संस्कृतीचेही वरदान आहे. 


Maharasahtra sanskrutik Varsa information in Marathi

नदयां नाले, वृक्ष पर्वत, लेणी गुफां, वास्तूं, शिल्पकला, चित्रकला, हस्तकला, आभूषण, अशां सोबतच मान सन्मान, परोपकार, दया क्षमा चालीरीती जपत, सण उत्सवांतून गेल्या कित्येक पिढ्यांपासून ती जोपासली जात आहे.

कुठेही ग्रंथीत-लिखीत नसली तरी निष्ठेन परंपरांतून आपण संस्कृतीची 'Maharasahtra sanskrutik Varsa information in Marathi' जपणूक करतो. समाधान आणि विश्वास परोपकारी भावना, दया, स्नेह, कष्ठ हे आपले सद्गुण आहेत. विश्वास हे श्रेष्ठ नाते, अपराध्याला क्षमा करणे, संकटात मदत, सर्वांभूती समदृष्टी, नम्रता राखणे ही आपली संस्कृती आहे.

पौरव कुळातल्या दुष्यंत या पराक्रमी राजाला शिकार करताना हरणाचा पाठलाग करताना पाहून कण्व ऋषीच्या आश्रमातील एका शिष्यान नम्रतेन हात जोडून हरणाला मारण्या पासून थांबवले.
त्या
चे विनम्र बोल ऐकून सर्वसत्ताधीश, महाबलाढ्य राजान हरणाला जीवदान देणे, आजारान क्षिण झालेल्या उपवासी बाघीणीच्या मुखात आपल्या अंगावरचे मांडीचे मास देणारे, भगवान बुद्धांनी, झाड तोडणाऱ्या पुढे स्वतःची मान देणाऱ्या तुलसीदासांनी, कोवळ्या गवताला वायू लहरींवर डोलताना पाहून गवत कापायला आलेल्या व विळा फेकून देणाऱ्या संत कबीरपुत्र कमलांनी, तहाणेने तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात तिर्थजल टाकणाऱ्या संत एकनाथांनी, लुटीत मिळालेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा साडीचोळी देऊन सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, कथंकरी बुवांचा खट्याळ घोडा व सुकलालांची खोड कर गाय शांत करून गजानन महाराजांनी आपल्या थोर संस्कृतीचे रक्षण केलेले आहे. असे अनेक उदाहरणं आहेत.

सत्यभाषणा विषयी राजा हरिश्चंद्र, दृढ निष्ठेविषयी ध्रुव बाळ, निष्ठेविषयी भक्त प्रल्हाद, शिल रक्षणाविषयी राजपूत राण्या, स्वराज्य- स्वातंत्र्याविषयी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, नम्रतेसाठी संत, परोपकारांसाठी महात्माफुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान विभूतींनी आपल्या संस्कृतीत अक्षय लेणी कोरलेली आहेत.

Maharasahtra sanskrutik Varsa

एखादा धर्म समाज नात्यांत स्तिमीत नसलेली मात्र माणुसकी सोबत घट्ट नाळ जुडलेली, समाजात पाळे मुळे रुजलेली, कोणीही संस्थापक नसलेली राम, कृष्ण, भगवान गौतम बुद्ध महावीर मुहंमद पैगंबर, अशा अनेक श्रेष्ठांच विचारधन जोपासणारी विविधतेतून एकात्मता साधणारी भारतिय संस्कृती श्रेष्ठ आहे. साहित्य, शास्त्र, शस्त्र कलां, लोककलांतून तीच्या अस्तीत्वाच्या खुणा सर्वत्र पहावयास मिळतात.

अशा या वैभवसंपन्न संस्कृतीच्या भारत देशातील आपली महाराष्ट्रीयन संस्कृतीही थोर आहे. महाराष्ट्रात अनेक राजवटींनी संस्कृती जोपासली संवर्धीत केली. दक्षीण काशी धर्मपीठ अशी ख्याती असलेल्या पैठण येथील सातवाहन - शाली वाहन राजांनी सुमारे ४६० वर्षे राज्य केले त्यात 30 राजे होऊन गेले

 शालीवाहन राजाने शालीवाहन हे मराठी शक सुरू करून संस्कृतीत  Maharasahtra sanskrutik Varsa information in Marathi  मोलाच योगदान दिलेल आहे. त्यांनी दक्षिण भारताबर विजय मिळवल्यावर बैठणला राजधानी स्थापन करून उभारलेला ५० फुट उंचीचा दगडी विजयस्तंब, तिर्थखांब महाराष्ट्रांच्या हजारो वर्षापुर्वीच्या वैभवसंपन्ना तेची प्रत्यक्षात साक्ष आहे.

 यादव घराण्यांच्या राजवैभव्यच प्रतिक म्हणून देवगीरीचा किल्ला आजही आपल अस्तीत्व सांगत आहे अजिंठा वेरूळची व इतर ठिकाणची कोरीव लेणीं शिल्पकलेच्या वैभवाची साक्ष देत उभ्या आहेत. स्वराज्य- धर्मरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल बलिदान हे कोणत्याही लेण्यांपेक्षा कमी नाही. ज्ञानदेव तुकाराम, एकनाथ, नामदेव, निळोबा, गोरोबा, चोखोबा, बहिणाबाईंचा थोर उपदेश म्हणजे ज्ञानामृतच भांडारच आहे. अशा या महाराष्ट्राचा महान इतिहास, मऱ्हाटमोळी संस्कृती भारतासह संपूर्ण जगाला भूषणावह आहे. व त्याचा प्रत्येक मराठी माणसाला स्वाभिमान आहे.

 क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. पूर्व पश्चीम ८०० किमी, व दक्षिण उत्तर ७०० किमी लांबी असून त्याचे ३०७७१३ चौरस किमी एवढे क्षेत्रफळ आहे. ७२० कि.मी.चा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. महाराष्ट्राच्या पुर्वेला छत्तीसगढ़ पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला गोवा, कर्नाटक, व आंध्र प्रदेश आहे. व उत्तरेला दादरा, नगर हवेली, गुजरात मध्यप्रदेश राज्य आहे. महाराष्ट्रात सहयाद्री हा मुख्य पर्वत असून सातमाळा, अजिंठा बालाघाट व महादेवाचे डोंगर या सहयाद्रीच्या उपरांगा आहेत. कळसूबाई हे उंच पर्वतशिखर अहमदनगर जिल्ह्यात असून १६४६ मिटर त्याची उंची आहे. माळशेज, थक, बोर, वरेया, कुमार्ती, फोंडा, आंबा, आंबोली, (कोकणात जाणारे घाट आहेत. पुणे सातारा मार्गावर कात्रज, खंबाटकी, पूणे सासवड मार्गावर दिवाधार, औरंगाबाद चाळीसगाव मार्गावर औट्रम हे मुख्य घाट आहेत.

महाराष्ट्रात डोंगरांवरून वहात येवून समुद्राला जाऊन मिळणाऱ्या व इथल्या जमीनीला संपन्नता बहाल करणाऱ्या काही मुख्य व काही त्यांच्या उपनदयांनीही वैभवात भर घातली आहे. त्यात गोदावरी . मुख्य नदी असून, कादवा, प्रवरा, शिवना, सिंदफळा, मांजरा पूर्णा, मन्याद, दुधना, प्राणहीता, व इंद्रावती या तिच्या उपनय्या आहेत. भिमा या मोठ्या नदिला कुकडी, घोड, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना, कऱ्हा, निरा, माण, सोना या उपनद्या आहेत. तापी नदिला पांझरा मोर्णा गिरणा, पुर्णा, वाघूर काटेपूर्णा, या उपनदया आहेत. वैनगंगा नदीला, पंच, पैनगंगा, कन्हान, वर्धा या उपनद्या आहेत. कृष्णा नदीला, कोयना, वेण्णा, गायत्री, पंचगंगा वारणा परळा, मलप्रथा, घटप्रभा या उपनदया येवून मिळतात. तर कोकणात वैतरणा, तानसा, काळू, उल्हास, आखा, सावीत्री , वाशिष्ठी, शुक, गड, तेरेखोल व शास्त्री या मुख्य नद्या आपल्या अनेक उपनदयांना सोबत घेऊन समुद्राला जाऊन मिळतात. व सुपिकता संपन्नता बहाल करतात. या नद्यापैकी काहींना तिर्थक्षेत्राचाही दर्जा लाभलेला आहे भिमाशंकर जोतिर्लिंगाजवळ उगम पावणारी भिमा नदी पंढरपूर या श्री विठ्ठल क्षेत्राजवळ अर्धचंद्राकृती आकाराने वेढा देऊन वहाते म्हणून तिला चंद्रभागा है नाव आहे पंढरपूर हे महान तीर्थ तिच्या काठावर आहे. इंद्रायणीच्या काठावर ज्ञानेश्वरांची समाधी आहे. कृष्णा नदीच्या काठावर औदुंबर हे श्री दत्तांच तिर्यक्षेत्र आहे. तापी नदीच्या काठी चांगदेवांनी तप:श्चर्या केलेल व संत मुक्ताईची समाधी तिर्थ क्षेत्र आहे. गोदावरीच्या काठावर पैठण इथे संत एकनाथांची समाधी आहे. त्र्यंब केश्वर इथून उगम पावलेली गोदावरीच्या काठावर त्र्यंबकेश्वर व नाशीक येथे श्री राम प्रभूच्या पदस्पर्षाने पावन झालेले नाशीक, पंचवटी हे तिर्यक्षेत्र आहे. सासवड येथे कन्हा नदीकाठी संत सोपानांची समाधी आहे. इंद्रायणी काठावर संत तुकारामांची समाधी आहे. पंचगंगा नदिच्या काठावर कोल्हापूर हे अंबा भवानीचे तिर्यक्षेत्र आहे

काही नदयांच्या संगमावरही तिर्थक्षेत्रे आहेत. त्यांतील भिमा मामा व इंद्रायणी या तिन नयांच्या संगमावर तुळापूर येथे भगवान शंकरांचे संगमेश्वर हे तिथे असून येथेच स्वराज्यरक्षणा साठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराजांची समाधीही आहे. म्हणून याला बलिदान तिर्थ असेही म्हणतात. प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे भगवान शिवाचे व इतर देवालयांचे तिथे तापी व गोमती नद्याच्या संगमावर आहे. कृष्णा व पंचगंगा नदिच्या संगमावर नृसिंहवाडी हे तिर्यक्षेत्र आहे. तापी-पूर्णा या नयांच्या संगमावर चांगदेवाचेव मुक्ताबाई या संतांचे तिर्थ चांगदेव, मेहूण आहे.

महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यात कोपरा, दादरा, जळगाव जिल्यास मनुदेवी, नांदेड मधे सहस्त्रकुंड, रायगड मधे सैतवडे , अहमदनगर मधे रंधा, साताऱ्यात ठोसेघर, सिंधुदुर्गात - नागा, रत्नागीरीत धारेश्वर व तीवरे, बीडमधे सौताडा, व खंडाळा - लोणावळा इथे व इतर अनेक ठिकाणी निसर्ग निर्मित धबधबे आहेत तसेच ठाणे जिल्हयात अकलोली, गणेशपुरी येथे नांदेडमधे उनकेश्वर, जळगावमध्छे उनपदेव, रायगडमध्ये ऊन्हावरे धुळ्यात दारावीपूर ठाण्यातच वज्रेश्वरी या ठिकाणी निसर्ग निर्मित गरम पाण्याचे झरे आहेत.

वेरूळ, अजिंठा, पितळखोरा, घारापुरी येथील कोरीव लेण्या प्रसिद्ध असून इतर अनेक ठिकाणीही अशा लेण्या आहेत. हेमाद्री या वास्तुकला विशारदाने विकसीत केलेली हेमाद्री घडवणीची मंदीरांची शिल्पकला आजही हेमाडपंथी शिल्पकला म्हणून प्रसिद्ध आहे व महाराष्ट्रातल्या अनेक भागात ती मंदिरांच्या रूपान साथ देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकून, अस्तीत्व जपत आहे.

जळगाव जिल्यातल्या चाळीसगाव जवळील पाटणादेवी येथील पाटणादेवीचे पुरातन स्थान असून प्रसिद्ध गणिती व जोतिषी भाष्कराचार्य हे महाराष्ट्रासह भारत देशाच सांस्कृतीक वैभव आहे. ज्ञानदेव, आणि त्यांचे भावंड, नामदेव, तुकाराम, चोखा मेळा, गोरोबा, सावतोबा, निळोबा आणि अनेक संत महात्मे, राजे चरित्रकार लेखक, करी, कलाकार, विचारवंत, ज्ञानवंत देशभक्त अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रात आपल्या थोरपणाचा इतिहास अजरामर करणारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवांचे, नररत्नांचे राष्ट्राला सलल भूषण आहे. अशा या वैभवसंपन्न महारा- ष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेत आपण स्वाभिमानान जगतो याचा सर्वांना स्वाभिमान आहे. 

आपल्या या थोर परंपरेच आपण जतन करावे पारंपरिक वास्तू वस्तू कला, खेळ, साहित्याचा परंपरांचा, संस्कारांचा आदरान सन्मान करून संगोपन करत सुखी समाधानी समृद्ध जीवन जगावे व राष्ट्राचे नाव उज्वल करावे

महाराष्ट्रातल्या अनेक गावागावांत आजही आपल्या थोर संस्कृतीच्या खुणा पहावयास मिळतात. अनेक गावांतील वाडें, बुरूनं, जुन्यां दगडांच्या मंदिरांवरील नक्षीकाम अनेक घराण्यांत परंपरेनुसार जोपासलेली भांडी काही विशिष्ठ औजारं हत्यारं दररोजच्या वापरातील वस्तू. उदाहरणार्थ राज. माता जिजाऊंच माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधवरावांच्या राजवाड्यात असलेले घरोट - जाते वऱ्हाटा पाटा असे दगडी वस्तू - असच भलमोठ जात श्रीक्षेत्र पद्‌मालय जि.जळगाव येथे मंदिराजवळ आहे. ते पांडवकालीन असल्याच सांगीतले जाते. 

इथेच भिमान बकासूराचा वध केला होता. जळगावच्या थोर कवयत्री बहिणाबाईंच सर्व काव्य म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीच भूषणच आहे त्यांच्या घरी त्यांच्या वापरातील अनेक वस्तू संग्रहीत करून ठेवलेल्या आहेत. अनेक अशाच वस्तू साहीत्य काही संग्रहालयांतूनही पहायला मिळतात.

महाराष्ट्राच्या गावागावांतील अनेक ठिकाणचे अपरीचीत सौंदर्यस्थळ, अपरीचीत गायक, वादक, कलाकार, लेखक कवी चित्रकारांनीही आपल्या परिसरात संस्कृती जोपासण्याच कार्य केलेल आहे. पूर्वी गावगाड्याचा कारभार करणारे सर्व घटक आपापल योगदान देऊन सहकार्य करत गुण्यागोवींदान जगत संस्कृतीच संगोपन करायचे.

Maharasahtra sanskrutik Varsa information

पूर्वी बहुसंख्य समाज खेडयात ग्रामीण भागात रहाणारा होता व शेती करणारा होता. पाटील हा गावचा अधिकारी असायचा. लिखापढीची कामे कुलकर्णी करायचा आणी न्हावी, चांभार कुंभार, लोहा, महार, चौगुला, सुतार, सोनार, जोशी, परीट-धोबी, गुरव कोळी या लोकांना बारा बलुतेदार किंवा कारण म्हणत. तसेच शिपी, सनगर, लेबी, तांबोळी, साळी माळी, गोंधळी, भाट, डौ-या, गोसावी ठाकर, जंगम, वाजेत्री, घडसी, मुलाना, कलावंत, तराय-कोरबू, थोई हे अठरा लोकांना नारू किंवा 'अलुतेदार असे म्हणत. म्हणजे कारून नारू किंवा अलुतेदार

बलुतेदार म्हटल की सर्व गावकरी त्यात समाविष्ट होत. जो तो आपापली कामे निष्ठेन करून गावगाड्याच्या कारभारात योग-दान देत होत. शेतकरी राजा हा मुख्य घटक होता. त्याच्या कष्टा वर सर्वांची मदार होती. सरदार शिपाई राजा हे आपल्या प्रजेच संरक्षण करायचे. कौटुंबीक किंवा जमीनीं विषयीचे प्रश्न वाद तंटे व इतर समास्यांचा न्याय निवाडा करण्यासाठी या सर्व जाती-घटकांच्या जाती- घटकांच्या जात पंचायती असत. त्यांचा न्याय दोन्ही पक्षांना मान्य करावा लागे. आजही काही ठिकाणी ती प्रथा टिकून आहे.

मऱ्हाठी ही आपली मुख्य भाषा असून ती अनेक भागात अनेक पद्धतीन बोलली जाते. कोकणात तो मालवणी दंगाची, विदर्भात वऱ्हाडी, खान्देशात अहिराणी, मराठवाड्यात मराठवाडी पुण्याची पुणेरी तसेच पावरी, भिलाऊ गोड अशा अनेक उपभाषाही आहेत. बोली भाषा आहेत.

आदिवासींची वारली चित्रशैली, विरांच्या स्वागता साठीची तुतारी, धनगरी ओव्या, गोंधळातला संबळ, बैलांच्या अंगावरील नक्षीची झुल, अनेक भागातल वही गायन गौरी- च्या सणानिमीत्त होणार जागरण त्यातील पारंपारीक गाणी झिम्मा फुगडी, स्त्रीयांचे अनेक भागातले विविध प्रकारांचे दागीने, वेषभूषा, पारंपारीक सण उत्सव अशा अनेक ठिकाणी महाठमोळ्या सांस्कृतीक पाऊलखुणांच अस्तीत्व पहायला मिळत.

मातीच्या चुली, रांधण-खापरावरील मांड़े, लग्नाची गाणी, कुंभारांनी घडवलेले माठ, विवीध कला कुसर केलेल्या शोभेच्या वस्तू, लग्न समारंभात म्हटली जाणारी पारंपारीक गाणी, शेतीची औजार, मुला मुलींची माणसांची बायांची नावं, यात्रा, खेळणी अशा अनेक घटकांत आपली संस्कृती जतन आहे. तीच आपण संगोपन संवर्धन करा यला हव. आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्नशील असायला हव  "Maharasahtra sanskrutik Varsa information in Marathi" आपली संस्कृती महान आहे श्रेष्ठ आहे देश विदेशात तिला आदराच स्थान शिवरायांची संताची संस्कृती अशी ओळख आहे.

लेखक- डॉ.  ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या