मंदिरं - देवी देवता | Hindu Mandir devi- mahatyma

Hindu Mandir devi- mahatyma  महाराष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेत धार्मिकलेला अत्यंत मोलाचे स्थान आहे. या परंपरेन ते श्रेष्ठ आहे. ही धार्मिकता पोथी पुराणांतून ओतप्रोत भरली आहे.

 ग्रंथांतूनही अबाधीत आहे. शिवाय मंदिरांतूनही तिच अस्तीत्व अबाधीत असल्याच पहावयास मिळत. मंदिरांतून प्रार्थनास्थळांतून संस्कृती जपण्याच कार्य गेल्या शेकडो


Hindu Mandir devi- mahatyma
Hindu Mandir devi- mahatyma

वर्षांपासून अविरत सुरूच आहे. आजच्या आधुनीक, वैज्ञानीक, संगणकीय युगातही मानवांनी या मंदिराच्या निर्मितीच कार्य सुरूच राखल आहे हे विशेष. 


Hindu Mandir devi- mahatyma

अशिक्षीतपासून उच्च शिक्षितांपर्यंत स्त्री पुरुष, गरीब-श्रीमंत, जाती पातींचा भेद विसरून या मंदिरांच्या- प्रार्थनास्थळांच्या निर्मिती उभारणी, जिर्णोध्दार, संरक्षण, विकासासाठी झटतात. श्रध्देन योगदान देतात.

महाराष्ट्रात मंदिरांची परंपरा प्राचीन आहे. विवीध देव देवतांची Hindu 'Mandir devi- mahatyma' मंदीर शहर-नगरांपासून ग्रामीण- खेड्यांतही आहेत. काळ्या पाषाणांतील मोठमोठ्या दगडांना चिऱ्याना सुबक आकार देऊन त्यांवर पान, फुले, विविध देव देवता, यक्ष किन्नरांच्या आकृत्या कोरलेल्या असतात तोरण, दोरखंड, तोरण , नक्षी कोरून सुबक घडावण केलेली असते. 

मंदिरांचे ओटा, . चबूतरा, मंडप, गर्भगृह, घुमट, कळस असे भाग असतात आणी त्याला आतून व बाहेरूनही नक्षी करून सुशोभीत केलेल असत गर्भगृहाची मांडणी गोल, चौकोनी षटकोनी, अष्टकोनी अशी केलेली असते.

 बाहेरून त्याला गोलाकार बनवून वर निमुळता नेलेल्या असतो व त्यावर आणखी लहाण घुमट करून कळस बसवलेला असतो. कळसाला दगडा ऐवजी पितळ, कासे भंटूर, ताबे, शिसे अशा पंच धातूंचा किंवा काही सोन्याचाही बनवलेला असतो या कळसांचे आकारही भिन्न भिन्न असतात.



यादव राजघराण्यात त्यांच्या भरभराटीत अनेक मंदिरांची निर्मीती झाली. त्यांच्याच काळात हेमाद्री या कुराल कारागीरान त्याची स्वताची बुद्धीमत्ता वापरून आगळी वेगळी शैली, शिल्पकला विकसीत केली केवळ काळ्या पाषाणातील, दगडी चि-यांना जोडून, त्यावर कोरीव नक्षीकाम केलेली ती कला

पुढे प्रसिद्धी पावून हेमादी घाटणीची- हेमाद्री पंथाची हेमाडपंथी म्हणून विकसीत होऊन चांगलीच प्रसीद्ध झाली. पुढे अनेक वर्ष ती अस्तित्वात राहीली त्याची साक्ष देत अनेक भागात अनेक पुरातन मंदीरे स्वाभिमान जपत आहेत.

शिलाहार, वाकाटक, यादव, शालिवाहन अशा राजवटींनी जोपासलेली मंदिरांची संस्कृती यवनशाहींच्या राजवटीत मंदावली मात्र स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले व जिजाऊ मासाहेब यांनी ती पुनरुज्जीवीत केल्याच आढळत. जिजाऊ जेव्हा शिवबांना घेऊन पुण्यात रहायला आल्या तेव्हा त्यांनी कसबा गणपतीची स्थापना व शिवापूर बसवल. ५. छत्रपती शिवाजी महाराजांनीही अनेक ठिकाणचे मंदीरे, मशीदींना देणग्या वतनं दिले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी तर महाराष्ट्रभर आणी इतरत्र अनेक भागांत मंदिरांचे जिर्णोध्दाराचे कार्य केले. त्यानंतर व अजूनही अनेक दानशूर लोक, सामाजीक संस्थां मंदिरांच्या उभारणी जिर्णोध्दारा साठी झटत आहेत. श्रध्देन कार्य करत आहेत.

मंदिरांमधे रोज काकडा आरती, पूजा, प्रार्थना, नैवेद्य प्रसाद, माध्यान्ह आरती सायं किंवा शेजारती केली जाते. मंदिरांची स्थापना अथवा मंदिरांतील देव, देवतांच्या जयंती अथवा पुण्य- तिथी किंवा इतर कोणत्याही औचित्याने यात्रा भरतात. उत्सव साजरे होतात. त्यानिमीत्तान हजारो लाखो भावीक दर्शन घेऊन
धन्यता मानतात.


Mandir devi- mahatyma

देव देवी देवतांच्या मंदिरांसारखीच संत महात्मे साधुंचीही मंदीरे आहेत. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई निवृत्तीनाथ नामदेव एकनाथ, तुकाराम, रामदास, चोखोबा निळोबा गोरोबा, अशा महान संतांप्रमाणेच शेगावचे गजानन महाराज, साईबाबा, स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, सिध्देश्वर महाराज अशा साधू महात्मेची मंदीरे आहेत 

तर जनार्दन स्वामी, गुलाबबाबा, चैतन चैतन्य स्वामी अशा संतांच्या वास्तव्यान पवित्र स्थानी मठ उभारलेले आहेत. अशा अनेक मंदीर-मठातून भक्तांच्या  Hindu Mandir devi- mahatyma सोयीसाठी महाप्रसाद भोजन- किंवा अन्नदान, निवासाची व्यवस्था करण्याची प्रथा पूर्वीपासूनची आहे.

देवाधी देव महादेव भगवान शंकरांची भारतात बारा जोर्तिलग असून त्यापैकी महाराष्ट्रात पाच आहेत ती अशी, पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळ भिमाशंकर, उंच डोंगरावर हे स्थान आहे. 

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ, बीड जिल्हयात परळी वैजनाथ, नाशिक मधे त्र्यंबकेश्वर,. औरंगाबादमधे वेरूळ येथे घृष्णेश्वर हे जोतिर्लिंग आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात शिखर शिंगणापूर हे घृष्णेश्वर शंकराचे प्रसिद्ध स्थान 'उंच डोंगरावर आहे. इथे शिव आणी पार्वती दोघांचेही लिंग आहेत. चैत्र शुद्ध पंचमीला इथे शिव पार्वतीच्या विवाह सोहळा संपन्न " होतो. 

कावडीने पाणी आणून वाहण्याची प्रथा, दवणा ही वनस्पती शिवाला प्रिय आहे ती अर्पण करायची प्रथा. हे महादेव छत्रपती शिवरायांचे कुलदैवत असल्याने त्यांची अपार श्रद्धा होती.

याव्यतिरिक्तही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्राचीन शिवालये आहेत. ठाणे जिल्हयातील वसई तालुक्यात निर्मळ येथे निर्मलेश्वर व विमलेश्वर शंकरांचे मंदीर शंकराचार्यांनी इथेच समाधी घेतली गडचिरोली जिल्हयात चार्मोशी येथे नाजुक सुंदर कोरीवकला कुसर असलेले मार्कंडदेव शंकराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर. आहे 

वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यात कोटेश्वर येथे वर्धा नदी काठावर महर्षी व्यासांनी स्थापन केलेले कोटेश्वर महादेव स्थान प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिल्यात पुसद येथे धनकनकेश्वर व इतर अनेक पुरातन शिवालये आहेत. लातूर जिल्हारात मिलगा येथील बाराव्या शतकातील निळकंठेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदीरे आहे ते शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. 

नादेड जिल्यात धर्माबाद तालुक्यात गोदावरी व मांजरा नदयांच्या संगमा वरील प्राचीन संगमेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे हिंगोली या जिल्याला पुरावन एकंचक्री नगरी असे म्हणत येथे महाभारत कालीन डालेश्वर महा "देवाचे मंदीर असून भिमाने बकासूराला इथे मारल्याची आख्याईका आहे. 

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात अन्वा येथील मंदीर पुरातन असून कोरीव शिल्पकलेचा नमुना आहे' हे तुळजा भवानीचे पिठ आहे. जालनातच अंबड येथेही मत्सोदरी देवी मंदीरा समोरील टेकडीवर शिवमंदीर आहे. औरंगाबाद जिल्हयात कन्नड तालुक्यात अजिंठाडोंगररांगेत मुर्डेश्वर हे पुरातन शिवालय आहे.

 सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात चौथ्या शतकातील अर्धनारीनटेश्वराचे शिवपार्वतीची पुर्णाकृतीचे मंदीर असून ते हेमाडपंथी आहे. कोल्हा पूर जिल्हयातल्या शिरोळ तालुक्यात खिद्रापूर येथे कोपेश्वर महादेवाचे मंदीर स्थापत्य शिल्पकले साठी प्रसिद्ध आहे. कैलास लेणी व कोणार्क येथील सूर्य मंदीरा सारखे असून या स्थानाला युद्धभूमीही मानतात. 

Hindu Mandir devi

सातारा जिल्हयात महाबळेश्वर हे प्रेक्षणीय ठिकाण असून श्री शंकरांचे पुरातन शिवमंदीर आहे अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांनी या मंदीराला. सोन्याचे कळस लावले होते. इथून अनेक नद्यांचा उगम झाला आहे. तसेच खटाव तालुक्यात येरळा नदीकाठावर सिध्देश्वर महादेवाचे प्राचीन मंदीर आहे.

 रायगड जिल्ह्यात कनकेश्वर येथे कनक डोंगरी येथे परशूरामाने स्थापलेले कोरीव नक्षीचे शिवमंदीर प्रसिद्ध आहे रायगड जिल्हयात श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर प्राचीन शिवमंदीर असून ते दक्षीण काशी समजले जाते. अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने हे स्थान पावन झालेले आहे. 

रत्नागीरी जिल्ह्यातील मार्लेश्वर येथे स्वयंभू जागृत शिवमंदीर आहे येथील धारेश्वर धबधबाही प्रसिद्ध आहे. राजापूर येथील धूतपा- देवराचे पुरातन मंदीर प्रसिद्ध आहे. दरवर्षी इथे गंगा प्रगट होते. ती पहायला लोकांची गर्दी होते. संगमेश्वर येथील संगमेश्वर व मार्लेश्वर मंदीर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. हे मंदीर पुरातन जागृत आहे. छत्रपती संभाजी राजांना मोगलांनी इथेच कैद केले होते. 

जळगाव जिल्हयात कवीलेखर ता. अमळनेर इथेही तापी व पांझरा नद्यांच्या संगमावर भगवान शिवांचे प्राचीन मंदीर आहे. तसेच पिंपळगाव हरेश्वर बहुळा नदीच्या काठावर संगमावर हरेश्वर शंकराचे प्राचीन शिवालय आहे हे स्थान भस्मा सुराच्या वधानंतर शंकर व विष्णुच्या भेटीच स्थान मानल्या जात. 

जामनेर तालुक्यात शेंदूर्णी येथे स्वयंभू शिवलींगाचे काशिविश्वेश्वराचे पुरातन मंदीर आहे येथे त्रिविक्रमाची एकमेव मुर्ती आहे. हे मंदीर हेमाद्रीपंतांनी बनवले असल्याचे सांगीतले जाते प्रकाशे जील्हा ओळख असलेले आहे.

नंदूरबार हे क्षेत्र दक्षिण काशी अशी त्याची ओळख आहे तापी व गोलाई नद्यांच्या संगमावर केदारेश्वर व संगमेश्वर आणी तापीतिरावर सिध्देश्वराचे ही मंदीर आहे. हे प्रसीध्द स्थान आहे.

 नाशिक जिल्हयातल्या सटाणा तालुक्यात दोघेश्वर येथे प्राचीन शिवमंदीर प्रसीद्ध आहे. येथे गोमुखातून वाहणारी धार पवित्र तिर्थजल मानले जाते. तर सिन्नर  "Hindu Mandir devi- mahatyma" मधील गोंदेश्वर शंकरांचे प्राचीन मंदीर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध येथील बारा जोतिर्लिंगांच मंदिरही प्रसिद्ध आहे.

 पुणे जिल्हयात पुरंदर तालुक्यात भुलेश्वर प्राचीन शिव मंदीर आहे. रामदा ता. हवेली येथील पुरातन शिवमंदीर पाण्याने वेढलेले आहे. असेच अनेक ठिकाणी लहाण गावांत शिवालये आहेत.

लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या