बिरसा - मुंडा | Birsa Munda Andolan in Marathi



Birsa Munda Andolan in Marathi बिरसा मुंडा- आपला भारत देश हा विविधतेन व विविधतेतून एकात्मतेन नटलेला महान देश आहे. तो समृद्ध संप्पन्न आहे.

 उत्तुंग हिमालय, विध्य, सहयादी, अरवली व इतर अनेक डोंगररांगा अफाट सागर किनारा, गंगा यमुना, नर्मदा, गोदावरी, भीमा अशा महा व इतर असंख्य नद्यां 

विविध जातींच्या वृक्षराजीन, घनदाट हिरवळीन नटलेले रान, काळ्या. तांबड्या कसदार मातीचा सुपीक भूभाग, अनेक प्रकारचे पशू-जनावरं, निसर्गाच्या औदार्याच स्वैर स्वच्छंद गुणगान करणारे विविध रंगांचे, विविध आकारांचे सुंदर पक्षी, निसर्गाच हसू आपल्या रूप गुण गंधांतून व्यक्त करणारे विविध फुले अशा अनेक अलंकृतांनी विभूषीत औदार्यवंत निसर्गाच थोर वैभव आपण आपल्या पूर्वजांपासून शेकडो-हजारों वर्षांपासुन जपून ठेवल आहे.

                                             
Birsa Munda Andolan in Marathi
Birsa Munda Andolan in Marathi


 अबाधीत राखल आहे. निसर्गाच्या या उदारत्वालाच आपण आपल्या पुर्वजांनी देवता मानलेल आहे 
अजुनही तसी श्रध्दा आहे. बालपणापासून ज्या निसर्गाच्या सानिध्यात आपण जगलो, वाढलो, मोठे झालो त्याच निसर्गदात्याच्या सहवास सानिध्यात आपल्या शेकडो पिढ्यां खेळल्या बागळल्या वाढल्या आदिमानवापासून याच निसर्गदात्याने आपल्याला आश्रय दिला आहे. बळ दिल आहे. 

हे त्रिकला बाधीत सत्य आहे. या सल्याला कोणीही नाकारू शकत नाही. या निसर्गाच उदारत्व हेच खर देवाच स्वरूप मानायला हवः


Birsa Munda Andolan in Marathi


अशा या निसर्गाच्या ओतप्रोत दातृत्वाच्या सानिध्यात घनदाट जंगलांचा. अरण्याचा आश्रय घेऊन आपले पूर्वज सुखान समाधानान आनंदान रहात होते. जगत होते. या निसर्गातीलच झाडांची, कंद-मुळे, पाने खाऊन ते जगत होते.

 ते सुदृढ निरोगी व सशक्त आनंदी जीवन जगत होते. दोन-दोन, चारचार लोकांच एकत्र कुटुंब वाड्यां वस्त्यां, करून लोकं एकमेकांच्या सहकार्यान, माणुसकीन सुखा- दुःखात सहभागी होऊन जगत होते. फळांचे बहर ओसरल्यावर शिकार करून खात होते. 

ते देखील कमी पडायला लागल तेव्हा झाडे झुडपे तोडून, जमीनी 'Birsa Munda Andolan in Marathi'  तयार करून त्यावर पीक घेऊन उदरनिर्वाह करून सुखान जगत होते. त्यांच्या त्या प्रामाणीकपणाला, प्रांजळ कष्टाला निसर्ग दाता उदारतेन सहकार्य करत होता. असे हे लोकं स्वच्छंदी होते. स्वतंत्र होते.

 ते स्वतःच स्वतःचे राजे होते. त्यांचा कोणी शासनकर्ता नव्हता. त्यांचा कोणी देव नव्हता. रोज पूर्व दिशेला उगवून सर्वांना प्रकाश देणारा सूर्य हाच त्यांचा देव होता. तर रात्रीच्या काळोख्या अंधारात शितलता व प्रकाश देणारा चंद्र ही त्यांची देवता होती. आणि त्यांना आश्रय देणारा निसर्ग हा त्यांचा त्राता होता थोर दाता होता.

 यांचेच परोपकार ते मानत होते. गेल्या कित्येक पिढ्यांपासून हे लोकं असे समुह करून रहात होते. घरातल्याच एखादया वडीलधा-यांचा सल्ला त्यांच्यासाठी मोलाचा होता. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शना खाली इतर लोकं गुण्यागोवींदान सुखासमाधानान जगत होते. त्यांचे संसार सुखाचे होते.

पारंपरिकतेन सुखान आनंदान जगणाऱ्या या लोकांच्या पर्यंत नवे वारे - आधुनिकता अजुनही पोहचलेली नव्हती. फिरकली नव्हती. त्यांच कुटुंब, त्यांची वाडा, पाडा सुखी होते. कष्ट करून हे लोक समाधानान जगत होते.

 तीच त्यांची संस्कृती होती. दुःख त्यांनी कधी पाहीलच नव्हतः सर्वत्र आनंद आनंदच होता. त्यांच्या या सुखाला दृष्ट लागली ती विदेशी आर्यांची.

भारताची सुपीकता संपन्नता पाहून ईशान्य अरियाना प्रदेशातून-विदेशातून काही लोकांच्या टोळ्या भारतात आल्या. अरियाना प्रांतातील म्हणून त्यांना आर्य संबोधले गेले. ते आले तेव्हा त्यांनी आपल्या सोबत पारंपारीक व्यवसायाच साधन पशू गुरं-ढोरं जनावर आणले. होते.

या परप्रांतीय लोकांचे आर्यांचे इथल्या मुळनिवासी सद्‌गुणी लोकांनी सद‌विचाराने प्रामाणीकपणाने स्वागत केले. माणुसकीने त्यांना आश्रय दिला परोपकाराची स‌द्भावना राखली. त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य दिले. त्यांना आपल्यात सामाऊन घेतले.

आर्य या परप्रांतीय लोकांनी मात्र मुळनिवासी लोकां च्या आयत्या सहकार्याचा दुरूपयोग करून घेतला. इथल्या साध्या भोळ्या प्रामाणीक जनतेला त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणल. त्यांनी काल्पनीक देवांची निर्मीती करून मुळनिवारी भाबड्या जनतेवर धार्मिक दहशत लादली. त्यांच्या निष्कपटी प्रांजळ मनावर खोलवर बिंबवली. 


तसेच त्यांनी स्वनिर्मित मंत्रांचा, तंत्रांचा व शस्त्रांचीही जरब- धाक निर्माण करून "आपल वर्चस्व प्रस्थापीत केल. आपला अंमल चढवला. गरिब बिचारे मुळनिवासी लोक त्यांच्या या धार्मीक दहशत वादाला बळी पडले. ते घाबरून राहू लागले. 

इथल्या अज्ञानी भोळ्या गरिब जनतेच्या भोळेपणाचा गैरफायदा घेवून परप्रांतीय आर्यांनी आपल वर्चस्व वाढवल. रानावनात विखुरलेल्या असंघटीत पणावर मात करून त्यांच्या रहाण्याच्या जागा, त्यांनी कमवलेली- तयार, सुपीक केलेली शेती जमीनी त्यांनी बळकावून घेतल्या. आणि हळू हळू त्यांना आपल्या जमीनी सोडून, घरदार वाडेवस्त्यां सोडून दाट जंगलात जाऊन रहाव लागल. 

उदार आश्रयदात्या निसर्गाच्या कुशितील दन्यां खोरे पहाडे, कपारींचा आश्रय घेऊन रहाव लागल. जे मुळनिवासी घरदार- झोपड्या करून रहात होते. शेती करून जगत होते तेच आता बेघर होऊन वणवण भटकत आपापल कुटुंब घेऊन राहण्यापुरती सोय करून घ्यायला लागले. राहू लागले. मात्र आता त्यांच्या स्वतंत्रतेवर बाधा येवू लागली. आपल्यावर नैसर्गीक आपत्ती येते, संकटं येतात, दुःख येतात ले सर्वच आपल्या दैवाचे नशिबाचे भोग आहेत अस समजून, तसच त्यांच्या मनात ठसवल्या गेल्यावरून ते आर्यांच्या मार्गदर्शना खाली राहू लागले. 


Birsa Munda Andolan information in  Marathi


आर्याच्याच मार्गदर्शनात त्यांनी आपले देव निर्माण केले. त्या देवांची पूजा अर्चा करायला लागले. रानावनात राहणाऱ्या, असंघटीत, अशिक्षीत या लोकांना आता" "आदिवासी " ही संज्ञा लाभली. आदिवासी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. भारतातल्या अनेक प्रांतात राहणारे सरळस्वभावी, निष्कपटी, निर्व्यसनी, कष्टाळू साधे भोळे मुळनिवासी लोकं आता आदिवासी झाले. धूर्त आर्यानी त्यांच्यावर वर्चस्व चढवून, श्रेष्टत्व बिंबवून त्यांना आपल्या अधिकारात घेतल. या आदिवासी लोकांकडून ते सेवा करवून घेवू लागले. 

संकट निवारण्याच्या नावांवर देवांच्या पूजा आराधनांच्या नावांवर त्यांच्याकडून अन्नधान्याची किंवा आपणास हव्या त्या, आवश्यक त्या वस्तूंची, साधनांची वसुली करूआदिवासी रानावनांत राहून भटकत राहीले नीत्यांनी निर्माण केलेल्या- कमवलेल्या- तयार केलेल्या जमीनी ताब्यात घेऊन त्यांची घरदार घेऊन आर्यांनी वस्ती वाढवून त्यांचे गावं-नगरे झाले असावेत. 

पुढे अशाच वर्तणुकीतून चार वर्णांची निर्मिती झाली असावी यात संषय नाही. मुळनिवासींचे आदिवासी झाले. आदिवासीचे सेवक, दास, शुद्र झाले असते व या आर्यांना हव्या त्या वस्तू आणुन देणारे लोक व्यवसाय व्यापार उदिम करणारे लोक वैष्य झाले असते. तर आर्यांना आपली सुरक्षीतता रहावी, रानटी श्वापदं, ऊन वारां नैसर्गीक आपत्तीपासून आपल रक्षण हाव, आपले कुटुंब सुरक्षीत रहावेत म्हणून  Birsa Munda Andolan in Marathi काही लोकांच्या हाती शस्त्रं देऊन त्यांना आपल्या अवती भवती वागवले असावेत तेच क्षत्रिय झाले असावेत. याच बरोबर ज्याने जे काम केल, जो उद्योग केला त्यांना पुढे त्या नावांच्या जाती लाभल्या असाव्यात. यात शंकाच नाही.

कष्टाळू प्रामाणीक मुळनिवासी भारतीय समाज अशा तीन प्रकारांत विभागला जाऊन आर्यच श्रेष्टत्व मान्य करून, अन्नान्न दशा होऊन पोट भरण्यासाठी, रानावनांचा आश्रय करून, उन्हातान्हात पाऊस वाऱ्यात भटकत राहीला. आर्यांनी निर्माण केलेल्या धार्मिक दहशतीचे भूत आपल्या मानगुटीवर घेऊन वावरत राहीला. त्यांना तस भरकटत ठेवण्यात धुर्त आर्य मात्र यशस्वी झाले. व आपल वर्चस्व, आणि धार्मिक दहशत कायम राखली.

आर्य वगळता इतर लोकांनी आपापले काम उद्योग व्यापार करून उपजीविका करत, कुटुंबाच पालण पोषण करत भारत भूमीला सूखी संपन्न करण्यात राखण्यात धन्यताच मानली आहे. मानत आहे मात्र हे करत असतानाच आपण माणूस म्हणून जन्मलो आहोत. माणुसकी हाच आपला खरा धर्म आहे. हे समजत उमजत असुनही आपण आपल्याच माणसांपासून अलिप्त राहायला लागलो ,आपल्यात पोटजाती कधी कशा निर्माण झाल्यात हे त्यांना अद्यापही समजलेल नाही उमजलेल नाही

भारतातला मुळनिवासी, जंगलात रहाणारे, भटके लोक आदिवासी म्हणून वावरत राहिले. ते अद्यापही आदिवासी म्हणुनच ओळखले जातात. आपली संस्कृती. परंपरा त्यांनी अजुनही अबाधीत राखली आहे. त्यातच ते धन्यता मानतात व आनंदाने जगतात.

भारतातल्या अनेक प्रांतांत रानावनांत दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज गुण्यागोविंदान रहात असला, सुखान जगत असला तरी कालांतराने त्यांच्यातही पोटजाती निर्माण होऊन विघटन झाल आपल्यांत जाती, पोटजाती कधी, कशा निर्माण झाल्या या गहन प्रश्नाच उत्तर कोणालाही सापडलेल नाही सापडत नाही. पोट जाती निर्माण झाल्या असल्या, जमाती निर्माण झाल्या असल्या तरिही त्यांची खरी ओळख आदिवासी असीच आहे.

रानावनांत ठरावीक ठिकाणी कुटुंब कबिला घेऊन रहाण, शिकार करणे, शेती करणे, जळाऊ लाकडे, मद्य, डीक असे पदार्थ गोळा करणे अशा प्रकारची कष्टाची कामे करून ते आपला उदरनिर्वाह करतात. समान बोलीभाषा, सामाजीक बंधन, देवदेवतांवर निःस्सीम श्रद्धा. परंपरागत अंधश्रध्दा, शिक्षणाचा अभाव आधुनिकतेच्या खूप खूप मागे राहून वाटचाल करणे ही या आदिवासी समाज बांधवांची गेल्या अनेक पिढ्यांपासूनची ओळख आहे. संस्कृती आहे

अशाच आदिवासी समाजातील एक जमात - जनजाती आहे मुंडा," खर तर आदिवासी समाजातच त्यांची ओळख रहायला हवी' मात्र त्यांना आदिवासी जमाती - जनजातीत गणना करून अखंड आदिवासींच विघटन होणे ही खंत आहे. आदिवासी का हाईना ते माणसंच आहेत नी सर्व जाती धर्मांची खरी ओळख फक्त माणुस म्हणुन व्हायला हवी. सर्व जाती पातींच दृष्ट संकट नष्ट होऊन माणूसकी हीच जात व माणुसकी हाच धर्म हावा ही अपेक्षा !



भारतातल्या पूर्व वउत्तर डोंगराच्या आश्रयाने राहणाऱ्या मुंडा म्हणजे दुर्गम भागात- खेड्यात राहणारे. जमीनीचे धनी आदिवासी समाजात मुंडा ही एक जमात प्रमुख जमात आहे. खेड्यात राहणारे जमिनीचे धनी खेड्यातील जमीनदार अशी यांची ओळख आहे शक्यतो उंच डोंगर पठारावर यांची वस्ती असते. बिहार राज्यातील छोटा नागपूर, हजारीबाग रांची, धनबाद, सिंगभूम (छैबास) या भागांत मुंडांची वस्ती आहे. 

हे लोक शेती करून आपली गुजराण करतात. सोबतच पशूपालनही करतात. तर कधी कधी शिकारीलाही जातात. सूर्याला ते आपला देव मानतात. गेल्या हजारो वर्षांपासून त्यांनी सूर्यालाच देव मानले आहे व ही परंपरा अजुनही आहे. सूर्याच्या साक्षीनेच ते आपले सर्व कामे करतात. सणांच्या उत्सवांच्या वेळी मोठ्या श्रद्धा भावाने सूर्यालाच आद्य पुजेचा मान देतात. नंतर आलेल्या देवतांवरही त्यांची श्रध्दा आहे. मुंडारी ही त्यांची मुख्य भाषा आहे. मुंडारीच्या काही पोट भाषाही असल्या तरी. मुंडा लोकांची मुंडारी हीच मुख्य भाषा समजली जाते.

असे हे मुंडारी लोकं मुळनिवासी, कष्टकरी, प्रामाणीक, निस्वार्थी, निगर्वी, उद्योगी संघटीत अशा अनेक सद्‌गुणांनी परिपूर्ण असुनही. पारंपारीक अज्ञान, अंधश्रध्दा, मागासलेपण, शिक्षणाचा अभाव अशा परिस्थीती मुळे उन्नत समाजप्रवाहा पासून लांब राहीला. आदिवासींत गणल्या गेला. तरीही या समाज कोणा विरुद्ध कोणतीही तक्रार नाही. रूसवा फुगवा नाही. कुणाचा हेवा नाही. कुणाशी वैर नाही. प्रामाणीकपणान कष्ट करून, आपल्या समाज बांधवांसोबत संघटीत, एकनिष्ट राहून, गुण्या गोविंदान कष्ट करून जगतो. शेकडो, हजारो वर्षे उलटली, अनेक, कित्येक पिढ्यां खपल्या तरी त्यांचा प्रामाणीकपणा, कष्टाळू वृत्ती शाबुतच आहे. स्वाभिमान अबाधीत आहे. अशा थोर परंपरेत, महान संस्कृतील मुंडा समाज मुंडा जनजाती-जमाती वावरत आहे. जगत आहे.

भारतातल्या मुळ निवासी सामान्य गरिब जनतेला विदेशी प्रगत समाजाने आपल्या अमलाखाली आणल. त्यासाठी त्यांनी काल्पनीक देव देवतांचा धार्मिक दहशतवादाचा चांगलाच उपयोग करून घेतला.


इथला सुपीक संपन्नतेचा सर्व भाग त्यांनी आपल्या अंमलात आणला. थोडाथोडा प्रदेश भूभाग व त्यावरील वस्तींचे ते स्वामी-धनी झाले. राजे झाले. आणि अनेकांनी आपला विस्तार करत वैभव वाढवल. तर लहाण राजे मोठ्या राजांच्या अधियाला राहून आपल वैभव जपता जपता राज्याच्या सिमाही वाढवू लागले. या राजवटीत प्रगतांतीलच राजे, प्रधान, सरदार, दरकदार, शिपाई, वतनदार, जमीनदार, जहागीरदार देशमुख नोकर चाकर असे अनेक घटक निर्माण झाले. आणि इथेले डों मुळनिवासी सामान्य लोकं होते ते मुख्य प्रवाहापासून वंचीतच राहीले. 

त्यांच्या पदरी मागासलेपणच राहील. ते कष्टकरी राहीले. तरिही त्यांनी आपल्या त्या जीवनप्रवाहाला स्विकारल. त्यांनी आपल्या कष्टान भारतभूमीला सुखी संपन्न केल. कष्ट करून उत्पन्न घेऊन त्यातला काही भाग- हिस्सा राजाला देऊन उरेल ते स्वतःसाठी ठेवून उद‌रनिर्वाह केला. मात्र तरिही लहरी राजवटींनी आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्या च्या हव्यासाने या लोकांना सुखान जगू दिल नाही. 

कधी या राजाचे तर कधी त्या राजांचे सैनीक अचानक येवून त्यांच सर्वस्व लुटुन नेत होते. त्यांचे संसार उध्वस्त करून जात होते. व उपास‌मारी लाचारी पदारात टाकत होते. अशा तर कधी निसर्गाचा प्रकोप त्यांना पीडा देत होता. अशा दृष्टचक्रातच सामान्य लोकं मुळनिवासी लोक आदिवासी लोकं आहे त्या परिस्थीतीशी झगडत त्यावर मात करत जगत राहीले.

इथल्या राजांच्या आपापसांतील लढायां-भांडणांचा लाभ बाहेरील शत्रूंनीही घेण्याचे सुरूच ठेवले होते. शक, हुण, कुशाळा, ग्रीक यवन मुघल अशा बड्या राजांनी आपल साम्राज्य वाढवण्या साठी, आपल अस्तीत्व वाढवण्यासाठी इथल्या सामान्य जनतेलाच लुटले व इथला राजांना मांडलीक केले. सामान्य जनतेचा सतत छळच होत होता. भटकळ, उपेक्षा, हाल अपेष्टांच जीवन जगत होते. त्यांचा कोणी कैवार घेत नव्हत. कोणी वाली नहता. त्यावेळी भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध अशा थोर सत्पुरुषांनी या जनतेच लोकांच दुःख जाणल त्यांच्या हाल-अपेष्टा, भटकळ पाहून त्यांना जवळ केल. सहानुभूती दाखवली. त्यांच पारंपारीक अज्ञान अंध श्रध्दा नष्ट करायला सांगीतल. आपापसातील वैर विसरायला लावल.

आणि त्यांना संघटीत करून त्यांच्यावर परोपकार केले नवा सुखाचा  मार्ग दाखवला. समानतेची, माणुसकीची शिकवण दिली. त्यांच्या त्या  स‌द्विचारांचा प्रांजळ प्रामाणीक शिकवणुकीचा भरपूर फायदा झाला.

पुढे काही राजांनी आदिवासी सामान्य जनतेला आपल्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कैवार घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना हव तस यश येवू शकल नाही. महाराणा प्रताप, व छत्रपती शिवाजी महाराज यांनी मात्र इथल्या मुळनिवासी लोकांत जाऊन, त्यांना विश्वासात घेऊन आपल अस्तीत्व निर्माण केल. व बलाढ्य यवनशाही सोबत संघर्ष करून, लढाया करून राजवैभव वाढवल. आणि सामान्य जनतेला गोरगरिबांना सुख दिल. हे करण्यासाठी त्यांना रानावनात, दऱ्याखोऱ्यांत जाऊन भटकाव लागल. 

आदिवासी जनतेचा आत्मविश्वास जागृत करावा लागला वाढवावा लागला. त्यांच अज्ञान नष्ट कराव लागल. तेव्हाच हे शक्य झाल. आदिवासी, भटकणाऱ्या लोकांचा प्रामाणीकपणा, निष्ठा, त्यांच्या अंगातला काटकपणा, हुषारीचा योग्य उपयोग झाला. आणि रानावनातल्या आदिवासींची त्यांच्या प्रामाणीक पणाची, निष्ठेची, कष्टाची शुरविरतेची जगाला ओळख झाली. खात्री पटली. व हे समाज, आदिवासी, सामान्य, दुर्लक्षीत लोकं मुख्य समाज प्रवाहाच्या जवळ येवू लागले. त्यांना प्रगत जगाची ओळख व्हायला लागली.

भारतात आता वैभव संपन्नता येवू लागली. सर्व लोक आपापल कामं करून दोन घास सुखान खाऊ लागले. स्वाभिमान जपायला लागले. पारंपारीक दैन्य-दारिद्र्य हळूहळू नष्ट व्हायला लागल होत. अशा वेळी आणखी एका नव्या- बलाढ्य शत्रून इथ शिरकाव केला. हा शत्रू आतापर्यंतच्या शत्रूंपेक्षा वेगळा व धूर्त -कपटी होता. हा शत्रू होता इंग्रजी इंग्रज भारतात व्यापार करायच्या निमित्तान आले. 

त्यांनी हळूहळू व्यापाराच्या निमित्तान चांगलच बस्तान बसवल. थोड्या थोड्या जमीनी हस्तगत करता करताच आपला अधिकार वाढवला. आणि इथले राज्यकर्ते झाले इथला कारभार सांभाळण्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून त्या व्दारा कारभार केल्ला. व भारतावर राजकीय हुकुमत बिंबवली.

धुर्त इंग्रजांनी इथला प्रगत समाज हाताशी धरूनच राजकीय वर्चस्व वाढवल. त्यांना प्रलोभनं दिली तर गरिब सामान्य जनतेला कायद्याच्या अधिपत्याखाली वागवल. त्यानिमी- त्याने त्यांनी अन्याय अत्याचार करून, जुलुम जबरदस्ती करून आपली दहशत अबाधीत राखली. भारतातील लोक आता आपल्या अधिकारालाच पारखे झाले. मुळनिवासी नागरीक दुहेरी गुलाम झाले. स्थानीक हुकुमशाही सोबतच त्यांना परकीय इंग्रजांचाही विळखा बसला. आणि ते अन्याय, अत्याचारांची शिकार झाले. हाल अपेष्ठा, उपासमारी दारिद्र्याची शिकार झाले. आणि धार्मिक दहशतवादाखालील मानसीक कमजोरीने आपल्याच नशिबाला, दैवाला दोष देत दुःख भोगत जगू लागले.

इंग्रजी राजवटीतल गुलामीच, अन्याय-अत्याचारांच लाचारी- बेकारीच जीवन जगण जेव्हा असहाय्य झाल तेव्हा भारता तील जनतेत घुसमट होऊ लागली. त्यांना ते जीवन नकोस वाटायला लागल. इंग्रजांची जुलमी राजवट हकलून घालवून द्याविसी वाटायला

लागली. पूर्वि यवनशाहीच्या राजवटीसारखीच, त्यापेक्षाही जास्त त्रासदायक वाटू लागली त्याने इंग्रजी सत्ता उलथवून टाकावीसी वाटली म्हणून काही लोकांनी उठाव सुरू केला. इंग्रजी राजवटी विरुद्ध आवाज उठवला. आपले अधिकार, आपला हक्क मागण्यासाठी संघर्ष सुरू केला.भारताच्या कान्या कोपऱ्यांतून हजारो लोकं समोर येवू लागले. स्वयंप्रेरणेने प्रवृत्त होवू लागले. गुलामगीरी झुगारून आपल स्वातंत्र्य मागायला लागले. अशा लोकांना इंग्रजांनी दड- पण्याचा प्रयत्न केला. 

त्यांच्यावर कठोर कारवाया केल्या तरीही त्यांच्या त्या कारवायांना न जुमानता जनता जास्त पेटुन उठायला लागली. आपला संघर्ष जारी ठेवू लागली. तीव्र करू लागली. राष्ट्र भक्ती राष्ट्रप्रेमान तरुण भारावून गेले. पराक्रमांची- संघर्षाची-आंदोलनाची शर्श होऊ लागली. स्वातंत्र्याचे होमकुंड धगधगायला लागले. त्यात देशभक्तांच्या आहुती पडायला लागल्या. बलीदान होऊ लागल- त्यांची प्रेरणा घेऊन आणखी त्वेषान, जास्तीच्या संखेन तरूण पुढ यायला लागले. जनजागृती करून लोकांत स्वातंत्र्याची भावना चेतवत होते. इंग्रजांविरुद्ध आवाज उठत होता. तो आवाज दिवसें- दिवस वाढत होता. मोठा होत होता "चले जाव!, छोडो भारत! "म्हणत लोक आवाज उठवत होते. तो आवाज दडपवण्यासाठी इंग्रज शिपाई व अधिकारी प्रयत्न करत होते लाठीमार करून बंदुकांच्या गोळ्यांचा वर्षाव करून जनतेला पांगवण्याचा प्रयत्न करत होते. लोकांना तुरुंगात डांबत होते, क्रांतीकारकांच्या संखेन तुरुंग भरून अपूरे पडत होते.

स्वातंत्र्य संग्रामाचा, क्रांतीकारकांचा हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत होता सर्व जाती धर्मांतील अनेक भागांतून विविध प्रांतातून नगर शहर, गाव खेडे पाडे वाड्या वस्त्यांतून लोक पेटुन उठले. गोरगरिब आदिवासी सुध्दा या संग्रामात सामील होऊ लागले. असाच एक आदिवासी तरुण या स्वातंत्र्याच्या संग्रामात सहभागी झाला स्वयंप्रेरणेने इंग्रजी सत्तेच्या विरोधात उभा ठाकला. तो तरुण आदिवासी होता त्याच नाव होते "बिरसा मुंडा"

छोटा नागपूर भागातील उलीहातू " या लहानशा आदिवासी गावात मुंडा जमातीत - (जनतातीत) गरिब कुटुंबात १८७५ सायात बिरसा मुंडांचा जन्म झाला. त्यांच्या वडीलांचे नाव सुगना व आईचे नाव करनीबाई असे होते. बिरसांच्या जन्माने सर्वान्ना आनंद झाला. मात्र घरच्या अत्यंत गिरिबीच्या- दारिद्रयाच्या परिस्थीतीने आई वडील आपल्या बाळाचे कोणतेही कोड- कौतुक करू शकले नाही. याची त्यांच्या आई वडीलांनाही खंत वाटत होती. ते अत्यंत गरिबीत जगत होते. समाजातल्या परंपरागत सांस्कृतीक प्रथा, नियमांच पालण करत, कष्ट करून प्रामाणीकपणान राहून समाजबांधवां सोबत गुण्या गोविंदान रहात होते. रोज कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते. व सिंग बोंगा (सूर्यदेवा) चे आभार मानत जगत होते. रोज भरपूर कष्टाच काम कराव लागत होता. तर कधी कधी त्यांना उपासी रहाव लागत होत. खाण्या पेण्याची आबाळ होत होती. तरिही त्यांची जगण्याची उमीद-इच्छाशक्ती प्रबळ होती. कष्ट करायची अंगात धमक होती. घरच्या गरिबी-दारिद्र्यामुळे उपासमारीमुळे पोराचे बिरसाचे हाल    होतात म्हणून त्याच्या आई वडीलांनी सुगना व करनीपाई यांनी बिरसाला त्याच्या मामाच्या घरी पाठवण्याचा विचार केला. आणि त्याची सर्व तयारी करू त्याला मामाच्या आयुब हातू ” या गावी पाठवून पोहचवून दिल. तिथे ते रमायला लागले: बालमीत्रां सोबत नव्या सवंगड्या समवेत बिरसा खेळात रमायला लागले

इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या विरोधात भारतिय नागरीक संघर्ष करत होते. स्वातंत्र्याची मागणी करत होते. आंदोलण, उठाव करत होते. त्यांच्या या आंदोलणाला इंग्रज सरकार दडपण्याचा प्रयत्न करत होत. मात्र तो संघर्ष दडपण्या ऐवजी अधीक भडकत होता. त्याचा सामान्य जनतेलाही त्रास होत होता. सततच्या मोर्चे, आंदोलणं, संघर्ष दंगे यांनी जनतेच सुख नष्ट होत होत. अशांतता पसरत होती. समाधान हरपल होत. सर्व भारतियांसोबतच रानावनात राहणाऱ्या आदिवासी जनतेलाही याची झळ पोहचत होती.  Birsa Munda Andolan in Marathi आदिवासी मुंडा समाजा ला देखील या स्वातंत्र्य चळवळीचे चटके बसत होतेच.

आपल्यातीलच काही लोक व्यापारी, जमादार जहागीरदार, अधिकारी सैनीक पुरोहीत बनून, इंग्रजांचे प्रतिनिधी बनून आपल्या अधिकाराचा टेंभा मिरवून इंग्रजांची मर्जी राखत होते. व आपल्याच लोकांची सर्रास लुट करत होते. नी त्यावर आपले संसार दिमाखात थाटत होते. अशा लोकांनी आता आदिवासींच्या वस्त्यांवर जुलुम जबरदस्ती करून या ना त्या कोणत्याही कारणांनी त्यांच्या जमीन बळकावल्या व त्यांना भूमीहीन करून देशोधडीला लावले. भूमीहीन झालेले आदिवासी मुंडा आता घरदारे सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकत होते. रानावनांचा आसरा करून रहात होते, हाल अपेष्ठांच जीवन जगत होते.

इंग्रज सरकारने आता जंगलांवरही आपला कब्जा करून घेतला. आदिवासी मुंडा समाजावर आता उपासमारीची वेळ आली. त्यांचा रानावनाचाही आश्रय सुटला. पोट भरण्याच साधन नष्ट झाल. शेवटी ते दुसऱ्याच्या शेतावर मिळेल त्या मजुरीवर मीळेल ते काम करून जगण्याची धडपड करू लागले. येणारा दिवस ढकलू लागले. इंग्रजांचे प्रस्थ वाढले. इंग्रजी राजवट सर्वत्र बोकाळली होती. अन्याय अत्याचार वाढत होते.इंग्रजी हुकुमतीची दहषत वाढत होती.

आदिवासी मुंडारी लोकांना फक्त मुंडारी भाषाच समजत होती. मुंडारी व्यतिरीक्त कोणत्याही भाषेसी त्यांचा संपर्क आलेला नहता. तर इंग्रजांना मुंडारी भाषा समजत नव्हती. त्यांचे सर्व व्यवहार कायदे कानून इंग्रजी भाषेतूनच होते. अशा त्या दोघांच्या टोकाच्या मध्यस्थीतीची भूमीका भाषांतरकार- दुभाषी निभावत होते. ते मुंडारी लोकांच्या अज्ञानाचा इंग्रजांच्या वतीने स्वतःच्या भल्यासाठी उपयोग करून घेत होते. त्यांच्या नकळतच लुबाडणूक करत होते. मुंडा लोकांसमोर हे दुभाषीच आणखी एक संकटच होत. मुंडाच्या या अज्ञानीपणामुळेच त्यांची सर्वत्र पिळवणूक होत होती. आपले अधिकार आपल सर्वस्व गमावून अधिकारांना मुकाव लागल. व उपासमारीची वेळ आली. जगणच कष्टमय झाल.

भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधात १८५७ सालात मोठा संघर्ष केला होता. या लढ्यामुळे भारतात स्वातंत्र्य तर आले नाहीच उलट बेकारी वाढली. इंग्रजांचे अन्याय अत्याचार वाढले. लोकांना अन्न मिळेनासे झाले. गोरगरिब आदि वासी देशो घडीला लागले. वणवण भटकायला लागले. अशावेळी भारतियांच्या या बेकारीचा फायदा घेऊन त्यांना मदतीचा हात पुढे करून, सहानुभूती दाखवून युरोपातल्या ख्रिचन मिशनरींनी लाभ घेण्याच ठरवल. आणि त्या उद्दीष्ट पुर्तीसाठी ते भार- तात आले. 

गोरगरिब जनतेत आदिवासी वाडे वस्त्यांवर जाऊन, तिथल्या गरजू लोकांना सहानुभूती दाखवून मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या खाण्याची-जेवणाची सोय केली. दोन वेळच पोटभर अन्न खायला देवू लागले. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दवाखाने उघडले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता शाळा उघडल्या. त्यांच्या अडीअडचणी सोडवू लागले. सुखा दुःखात सहभागी होऊन त्यांना आपलस करून घेऊ लागले. मात्र हे सगळ करतानाच त्यांनी धर्म प्रसाराचे-प्रचाराचे कार्यही सुरूच ठेवले. त्यांच्या भावना, धर्मांतरासाठी त्यांच्या भावना मतपरिवर्तनासाठी खूप कष्ट करावे लागले खूप दिवस घालवावे लागले.

 त्यांना अपेक्षेप्रमाणे यश आले नाही... मात्र हळूहळू ते साध्य होऊ लागल. आपल्याला पोटभर अन्न मिळावे म्हणून आणि आपल्याच लोकांचा, इंग्रजांच्या अन्याय अत्याचारांचा सतत आदिवासी संघर्ष करून विट आलेला असल्याने मिशनरींची प्रेमळ सहानुभूती आदिवासी व इतर लोकांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करू लागली . त्यांच्यात धर्मांतराची भावना प्रज्वलीत होऊ लागली. ते धर्मांतर करून घेण्यास राजी होऊन धर्मांतर करू लागले. ईसाई धर्माचा स्विकार करू लागले. धर्मांतर केल्यावर त्यांची नवी ओळख होऊ लागली. नव नाव मिळू लागल. त्या नव्या नावानेच पुकारा होऊ लागला. त्या नव्या नावानेच पोरांना शाळेत प्रवेश मिळत असे.

अशा प्रकारे आदिवासी मुंडा समाजातील -जमातीतील अनेक लोक ख्रिस्ती धर्म स्विकारू लागले. व पोटभर अन्न खाऊ लागले. त्यांच्या पोरांनाही शाळेत प्रवेश मिळाला. रविवार चा दिवस आला म्हणजे हे मिशनरी लोक धर्मांतरीत झालेल्या व होणाऱ्या सर्व लोकांना चर्च मधे जमवायला लागले. त्या सर्वांना एकत्र जमवून ते ख्रिस्ती धर्माचे तत्वज्ञान सांगायचे. येशूची शिकवण सांगायचे संदेश दयायचे. येशूची प्रार्थना करायला सांगायचे. जे धर्मांतरीत झालेले आहेत त्यांनी दृढ रहावे. इतरांनीही अधिकाधीक संखेने धर्मांतरीत व्हावे, ख्रिस्त धर्माचा स्विकार करावा म्हणुन हे मिशनरी सतत प्रयत्न करत होते ते लोकांना विविध प्रकारचे प्रबोधन करून प्रलोभन दाखवत होते. मदत करत होते. आश्वासन देत होते. त्यांनी असेही आश्वासने दिले की, ज्यांच्या जमीनी सरकारन जप्त केल्या आहेत, इंग्रजांनी ताब्यात घेतल्या आहेत त्यांच्या जमीनी आम्ही ज्याच्या त्याला परत मिळवून देवू! अस सांगून ते लोकांना धर्मातर करायला प्रवृत्त करत होते. आणि त्यांच्या मुंडा लोकं विश्वास ठेवून धर्मांतर करत होते. आणि त्यांच्या या आश्वासनावर साधे-भोळे प्रामाणीक, आदिवासी, मुंडा लोकं विश्वास ठेवून ईसाई धर्माचा स्विकार करत होते. दिवसेंदिवस ही संख्या वाढत होती. मिशनरींनी मात्र प्रत्यक्षात काहीच केल नाही धर्मातराचा उद्योग फक्त करत राहीले. असेच काही दिवस त्यांनी गोर गरिब जनतेची, आदिवासींची, मूंडारी लोकांची फसवणुक केली. त्यांना धर्मांतरीत केल. मिशनरींची ही फसवणूक फार काळ टिकू शकली
"नाही त्यांच हे वागण, मतलबीपणा, कपट लोकांच्या लक्षात आल तसे लोके जागृत झाले. 

त्यांनी धर्मांतर थांबवल. व मिशनरींना याचा जाब विचारला. त्यांचा धिक्कार केला. तर काहींनी पुन्हा आपल्या धर्मात येवून मिशनरींच्या विरोधात बंड पुकारल. सर्व लोक संघटीत होवू लागले. संघर्ष करायला लागले. तेव्हा मिशनरींच खर स्वरूप लोकांच्या लक्षात आल. नजरे समोर आल. मिशनरींचा सेवाभाव, आपुलकी आता पूर्णतः नष्ट झाली होती. ते आक्रमक झाले होते. शिरजोर झालेले होते. आदिवासी गोरगरिबांना, मुंडांना ते ठग, चोर, गुंड, बेईमान म्हणायला लागले. मुंडांच्या विरोधात कारवाया करायला लागले. हुकुमत दाखवून, जबरदस्ती करून, कायद्याचा धाक दाखवून मुंडांना ते त्यांचे प्रार्थना स्थळं सरना आपल्या अधिकारत मागायला लागले. मुंडांनी त्यांच्या या मागणीला प्रखर विरोध करून हाणून पाडले. त्यांच्या दहशतीला, जुलूम जबरदस्तीला झुगारून आपला सरना, आपल प्रार्थनास्थळ कायम राखण्यासाठी, अबाधीत ठेवण्यासाठी प्राण दयायला तयार झाले. त्यांच्या या प्रखर प्रतिकारा समोर मिशनऱ्यांना हार खावी लागली. माधार घ्यावी लागली.

आता सर्व आदिवासी मुंडा जमात एकत्र येवून आपले परंपरागत अधिकार, गेलेली जमीन परत मिळावी म्हणून संघर्ष करायला समोर आले. त्यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात आवाज उठवला. संघर्षासाठी आंदोलण पुकारले. मात्रसरकारने त्यांच्या मागण्या ऐकून घेण्या ऐवजी त्यांनाच दोषी ठरवले. त्यांच्यावर खोटे नाटे आरोप लावून खटले भरले. गुन्हे दाखल केले. लहाण लहाण आरोपांसाठी देखील मोठी शिक्षा करू लागले. त्यांना बेकायदेशीर ठरवून, गुलाम ठरवल आणि त्यांच जगण कठीण करून सोडल.

गरिब आदिवासी मुंडा समाज बांधव आता चहू बाजुनी अन्याय अत्याचार, दहशतीची शिकार झाले. इंग्रजी सत्तेचा अत्याचार, जुलुम, स्थानीक व्यापारी अधिकारी, फौजदार शिपाई, जमीनदार, भांडवलदार, जहागीरदारांची मिजासखोरी- जुलुमशाही मिशनरींची दहशत यासोबतच उपासमारीचा संघर्ष करून जगत ते स्वातंत्र्यासाठी झटत होते. या सर्वांच्या विरोधात आवाज उठवत होते व त्यांचा हा आवाज दडपवून टाकण्यासाठी, मिटवून टाक‌ण्यासाठी सरकार कडक कायद्याचा बडगा घेवून लाठीमार, गोळीबार करत होते. माणसांनी तुरुंग भरत होते.

अशा बिकट परिस्थीतीत बिरसा लहाणाचे मोठे होत होते. ते तल्लख बुद्धीचे होते. हुषार होते. त्यांचा स्वभाव मात्र शांत होता. संयमी होता. त्यांचा चेहरा सतेज होता त्यांचे आईवडील आपल्या दारिद्र्याला त्रासून धर्मांतर करून इसाई झालेले होते व आपली जमीन परत मिळेल या आशेवर जगत होते. मात्र प्रत्य- क्षात तस काही घडत नव्हत. बिरसा लहाणपणा पासुनच कष्टाळू स्वभावाचे होते. अगदी बालवयापासुनच त्यांना गुरं-बकऱ्यां चारायच काम कराव लागल ते रानात गेले की पावा- बासरी वाजवायचे. त्यांच बासरी वादन अत्यंत सुमधुर होत. ते ऐकून लोक मुग्ध हायचे. व आवडीन त्याना पुन्हा पुन्हा बासरी वाजवायला सांगायचे. त्यांच्या शिक्षणाची आवड पाहून त्यांच्या आई वडीलांनी त्यांना मामाच्या घरी अयुबहातू” या गावी पाठवले.



Birsa Munda krantikari Andolan in Marathi


बिरसा आता मामाच्या घरी राहू लागले. नव्या मित्रांसोबत त्यांची ओळख झाली. त्या मित्रांसोबतच ते शेजारच्या गावात सालमा येथील शाळेत जायला आगले. अभ्यासात त्यांच चांगल लक्ष होता. ते मनलावून अभ्यास
करायचे. त्यांना छान चित्रही काढता येत होते- ते सुंदर सुंदर चित्र काढायचे. सत्यमाच्या शाळेत प्राथमीक शिक्षण पूर्ण करून ते मावशीच्या गावी, खटंगा येथे गेले. तेथील शाळेत शिक्षण घेत ते मोठे होऊ लागले. त्यांना आता बाहेरच्या जगाचे वेगवेगळे अनुभव येवू लागले. युरोपियन मिशनऱ्यांनी धर्मांतराच कार्य अविरतपणे सुरूच ठेवलेल होत. काही जर्मन मिशनरीही आता या उद्योगाला लागले होते. धर्मातराच्या चळवळीने चांगलाच जोर धरलेला होता. त्या चळवळीतच बिरसाच्या आई वडीलांनीही धर्मातर करून घेतले होतेच. असे बरेच लोकं धमांतर करून सवलतींची आशा करत होते. बिरसाला देखील धर्मातर करून खिच्चन व्हाव लागल. आता बिरसाला डेव्हीड हे नव नाव मिळाल. त्याच नावाने त्यांची ओळख झाली. व त्याच नावाने चाईबासा या गावातील बुधन मिशन स्कुल मधे प्रवेश मिळाला. व तेथे ते शिक्षण घेऊ लागले. १८८६ ते १८९० पर्यंत त्यांनी या शाळेतच शिक्षण घेतल· ज्ञान मिळवल व जगाचे अनुभवही मिळवले.

बिरसा मुंडांनी उच्च शाळेत शिक्षण घेतलेल होत. त्यांना इंग्रजी भाषेच बरचस ज्ञान झाल होत त्यांना इंग्रजी बऱ्या- पैकी लिहीता बोलता-वाचता येत होत. त्यासोबतच हिंदी भाषा • देखील त्यांना बरीचशी येत होती. शाळेत शिकत असताना त्यांना मिशनरी, इंग्रज अधीकारी, शिक्षक अशा लोकांकडून काही बरेवाईट अनुभव येत होते. ते आपल्याला हलकट समजतात, आपली अवहेलना करतात, जातिभेद करतात हे बिरसांच्या ध्यानात आलेल होत. ते मनातल्या मनात तडफडत होते. हळहळत होते. या लोकांचा प्रतिकार करावा, त्यांना चांगला धडा शिकवावा, त्योना आपल्या देशातून हकलून दयावे. असे त्यांना मनापासून वाटत होते. मात्र ते काहीही करू शकत नव्हते. त्यांच्या मनातला हा विद्रोह मनातच साहून रहात होता. मनाची घुटमळ होत होती. आणि असाच एक प्रसंग घडला नी बिरसांच्या विद्रोही मनाचा स्फोट झाला. मनात साठलेल सार शल्य ' स्फोट करून उठल.


चाईबासा येथील त्या शाळेत प्रार्थनेच्या वेळी कोणत्या तरी कारणावरून एका पादरीने मूंडांना त्यांच्या जमातीला चोर गुंड धोकेबाज असे शब्द वापरून अवहेलना केली त्या जमातीचा अपमान केला. त्यांचे ते कठोर शब्द बिरसा मुंडांच्या जिव्हारी शस्त्रांसारखे जाऊन भिडले. प्रार्थनेच्या शांततेच्या वेळी बिरसा मुंडांनी मोठ्याने सिंहगर्जना करून मोठ्याने अवाज उठवला ते म्हणाले,

नाही, नाही! मुंडा लोक चोर नाहीत, ते लबाड नाहीत, धोकेबाज नाहीत. गुंड नाहीत. त्यांनी कोणालाही फसवलेल नाही. कोणावरही अन्याय-अत्याचार केलेला नाही. कसलीही गुंडगीरी केलेली नाही. मुंडा जमातीत -समाजात अस कोणीच वागत नाही. उलट तुम्ही मिशनरी लोकांनीच आम्हाला फसवल. आमच्या लोकांना आमीष दाखवून धर्मांतर करून घेतल. त्यांच्या जमीनी देण्याच आश्वासन देवून त्यांची फसवणूक केली. तुम्हीच खोटारडे आहात, धुर्त आहात! सगळे टोपीवाले इंग्रज सारखेच आहेत!

अस म्हणून त्यांनी भर प्रार्थनासभेत इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवला. निडरपणान आपली सत्य बाजू मांडली. इंग्रजांना उघड प्रणान प्रत्यक्ष बोल लावला.

बिरसांच्या या अशा बोलण्याने व शांततेचा भंग करण्याने, नियमांचे उल्लघण केल्याने मिशनरी पाद्रीना खुप राग आला. ते क्रोधीत झाले. बिरसा सारखेच इतर सर्व विद्यार्थी देखील असेच- बिरसा सारखेच विद्रोही अस- तील!, बिरसा त्यांना चिथावणी देत असेल! असा त्यांचा ग्रह-समज झाला.. त्याची ही गर्जना म्हणजे भविष्यातील मोठ्या क्रांतीची चाहुलच असावी असे सरकारलाही वाटले. म्हणून बिरसाला त्या शाळेतून काढून टाकले व हकलून दिले. पुढे तर इंग्रज सरकारने मुंडा जातीतील सर्वच लोकांना दोशी ठरवल. त्यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. बिरसाचे फक्त निमीत्त झाले पण सरकारलाच तसे करायचे होते. व केले. विश्वासघातकी मिशनरींनी सरकारची बाजू घेऊन कारवाया केल्या. 

मुंडांच्या विरोधात सरकारचे कान भरले. सरकारने मुंडांना आता गुंड कारस्थानी समजून त्यांच्यावर जाचक अटी लावल्या. कठोर नियम, बंधन लादले. आणि त्यांचे सोषण सुरू केले. मुंडावर अनेक प्रकारचे कर लावण्यात आले. त्यांच्या घरात कुणी जन्माला आल तरी कर भरावा लागत असे. कुणी मेल तरी कर भरावा लागत असे, कुणाच लग्न असल तरीही कर भरावा लागत असे. असे सर्व प्रकारचे कर भरणे मुंडांना शक्य होत नसे. आणि ते काम जमीनदार पोलीस सक्तीन करायचे. ते कर वसूल करताना कोणाचीही गय करत नसत. मात्र ख्रिच्चन धर्म स्विकारणारास दंड माफ केला जात असे. त्या धर्माचे पालण करणारास करात सवलत् मिळत असे. या सर्व जाचक प्रकाराने सर्व मुंडांचे जगणे कठीण झाले. त्यांच्यात नैराष्य, उदासीनतेची भावना निर्माण झाली. आता त्या सर्व लोकांनी ख्रिच्चन धर्माचा त्याग केला. व प्रोटेस्टंट चर्च सोडून दिले. व रोमन कॅथलीक चर्चचा आश्रय घेतला. मात्र थोड्याच दिवसांत तिथलाही अनुभव येवून मनोभंग झाला आणि बिरसासह सर्वांनी त्याचा त्याग केला व ते त्यातूनही बाहेर पडले.

आता बिरसा मुंडा व सर्वच मुंडा समाजातील मुंडाच्या मनात ईसाई, पाद्री, मिशनरी, अधिकारी, इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध मनात आग धगधगत होती. सर्व त्रासांतून सुटण्यासाठी, हाल-अपेष्ठा कमी करण्यासाठी, हिनत्व, अव हेलणा नष्ट करण्यासाठी त्यांच्या आंतरीक घुटमळ माजत होती. संघर्ष करायला हातांच्या मुठी आवळत होत्या मनात सुडाग्नी धगधगत होता. जिवाची तगमग होत होती. आपला आपल्या समाजबांधवांचा लढा आपल्यालाच लढावा लागेल. यातून मार्ग आपल्यालाच काढावा लागेल. असा विचार त्यांनी केला. मनात अशी आशा मोठी जीद्द धरून बिरसांनी चाईबासा सोडल.

पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करा - यची तयारी ठेवून ते कामाच्या शोधात निघाले. त्यांची मोठी बहीण रहात असलेल्या दसकीर या गावात ते आले. तिथे मोल मजुरी करून पोट भरायची सोय करून घेतली. मात्र त्यांच्या समाज- हित दक्ष मनाला नुसतच पोट भरत जगण पसंत नव्हत. समाज बांधवांच्या उध्दाराची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी ते गावही सोडून दिल आणि बदगावला आले. तेथे जगमोहनसींग या मोठ्या जमीनदारांच्या घरी त्यांचा मुन्शी आनंदे पांडे यांचे कडे राहून, काम करून बिरसा मुंडानी ज्ञान घेतले-धर्माचा अभ्यास केला. जीवनाचे ध्येय काय आहे? आपण कोण आहेत ? येथे कशासाठी आलो आहोत? आपणास काय करावयाचे आहे अस चिंतन केल. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. धर्म म्हणजे काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. धर्माचा सखोल अभ्यास केला. व आपल्या समाजातील, मुंडा आदिवासी- मधील दोष शोधून काढले. त्यांच पारंपारीक अज्ञान शोधून काढल. त्यावर चिंतन केल मनन केल. आणि आपल्या समाज बांध वांना संघटीत करून, त्यांच अज्ञान नष्ट करून, त्यांच्या स्वातंत्र्या- साठी, त्यांच्या हक्कांसाठी झटायचे ठरवले. मनाचा निश्चय दृढ करून, आनंद पांडेंचा निरोप घेतला व ते तिथून निघाले.

सुमारे चार वर्षे कठोर साधना, तपस्या करून, सखोल मनन चिंतन करून बिरसा मुंडांनी आपल्या समाजातील प्रथां, परंपरा, अनीष्ट रूढी, अज्ञान, अंधश्रद्धांचा अभ्यास करून नवे विचार, नव्या संकल्पना, नवा धर्म प्रस्थापीत करण्यासाठी व लोकांना मार्गदर्शन करून त्यांचा उध्दार करण्यासाठी त्यांचे कल्याण करण्या साठी ते लोकांसमोर आले. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग ते लोकांच्या कल्याणासाठी करायला लागले. लोकांमधे जाऊन व त्यांच्यात मिसळून त्यांना आपुलकी प्रेम दाखवून संघटीत करायला लागले. त्यांना उपदेश करून सन्मार्गाची शिकवण देवू लागले. त्यांच्या या आत्मीयतेन, प्रामाणीकतेन सांगण्याचा लोकांवर चांगलाच प्रभाव पडायला लागला.

बिरसा मुंडांच रहाणीमान आता पार बदलल होत. सात्वीक ज्ञानाच दिव्य तेज त्यांच्या चेहयावरून ओसंडत होत. पवित्र मनातील सद्भावना, प्रांजळ तळमळ त्यांच्या रसाळ मृदू वाणीतूनप्रगट होत होती. ते तेजापुंज दिसायला लागले. आपल्या समाज बांधवांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत ते बोलायचे. उपदेश करायचे. छोट्या छोट्या गोष्टींतून धर्माचे तत्वज्ञान सांगायचे. उध्दाराचा मार्ग सांगायचे. यांसोबतच ते त्यांना ज्ञात असलेल्या माहीती असलेल्या काही औषधीं लोकांच्या आजारांवर देत व त्यायोगे काही लोकांचे आजारही दुरूस्त होत असत बिरसांचा सहवास लोकांना हवाहवासा वाटायचा. त्यांच्या सहवासात प्रसन्न वाटायच त्यांना भेटायला लोकं दुरदुरून येत, त्यांना पाहून, त्यांचा उपदेश ऐकून धन्य होत. लोक त्यांना आदरान बघायला लागले. त्यांचा सन्मान करायला लागले. त्यांना देवदूत मानायला लागले. तर कोणी त्यांना देव-भगवान समजायचे. त्यांच सांगण लोकं आदरान मानायला लागले. त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून वागायचे. व त्याचा त्यांना लाभच हायचा.

आपल्या अगाध ज्ञानसामर्थ्याने उपदेशाने धर्मप्रवचनातून बिरसा मुंडांनी वनवासी आदिवासी मुंडा लोकांत नविन चैतन्य आणल. त्यांच्यात नव जागृती केली. त्यांना आपल्या अधिकारांची, हक्कांची जाणीव करून दिली. त्यांचा लुप्त झालेला स्वाभिमान जागृत केला. त्यांच्यात संघटना घडवून आणली. प्रथम त्यांनी सर्व लोकांच्या लक्षात आणुन दिले की, आपल अज्ञान हाच आपला शत्रू आहे. आधी अज्ञान दूर करा. अंधश्रध्दा नष्ट करा. सर्वांनी एकोप्याने- एकजुटीने संघटीत रहा. असा उपदेश करून लोकांच अज्ञान घालवल. आणि नंतर खऱ्या शत्रूची ओळख करून देत म्हणाले,

इंग्रजी राजवट हा आपला शत्रू आहे. इंग्रजी राज्यकर्ते, ईसाईंचे मिशनरी, सरकारी कर्मचारी, न्यायाधीश, ठेकेदार, वकील, जमीनदार, सावकार, दलाल, दुभाषी हे सर्व आदिवासींचे व सर्व भारतियांचे शत्रू आहेत. या सर्वांपासून सावध राहून आपल्याला स्वातंत्र्याची वाटचाल करायची आहे. त्यासाठी आपली संघटना अतुट करा!

बिरसा मुंडांनी भारतिय परंपरांचा, ईसाई धर्माचाही अभ्यास केला होता. चिंतन केल होत. त्या दोघांनाही सोडून त्यांनी स्वताची विचारधारा प्रगट केली. तीचा प्रचार्व प्रसार केला. त्याचा अंगीकार लोकांनी करावा म्हणून ते लोकांच्या जवळ जाऊन, लोकांत राहून समजावून सांगू लागले. त्याकरता त्यांनी काही नियम ठरवले. काही अटी लागू केल्या. त्या अशा, सर्वांनी अज्ञान अंधश्रध्दा सोडून देवून नव्या विचारांचा अंगीकार करावा. संघटीत रहावे, सर्वांवर प्रेम करावे. चोरी करू नये, कष्ट करावे. खोटे बोलू नये, व्यसनं करू नये. भूत प्रेते, पिशाच्च हडळ यांवर विश्वास ठेवू नये: इतर देवतांचा नाद सोडून सिंगबोंगा या एकाच देवाची पूजा आराधना करावी.
कुणीही लाचार होऊन भिक्षा मागू नये; स्वाभीमानाने जगावे. काया वाचा मनाने शुद्ध रहावे.
निरपराध पशूंची हत्या करू नये. पारंपारीक अनीष्ट रूढी परंपरांचा त्याग करावा.
असा सोप्या भाषेता उपदेश ते सर्वांना आत्मीयतेन सांगायचे. तळमळीन सांगायचे. ते म्हणायचे,

बंधुनो ! सर्वांनी एक व्हा. संघटीत राहून अन्यायाचा अत्याचाराचा प्रतिकार करा. आपण सर्व मिळून लढा देऊही जुलूमी सत्ता हाकलून देवू आणि आपल आपल्या स्वाभिमानाच राज्य आणू.

बिरसा मुंडांनी समाजबांधवांत जागृती निर्माण करून, सद्‌भावना निर्माण करून, त्यांच्यात एकजुटी केली. त्याचबरोबर क्रांतीचीही भावना निर्माण केली. लोकांना ते सांगायचे,

आपणाला आपला हक्क परत मिळवायचा आहे. त्याकरता या इंग्रजी राजवटीशी संघर्ष करायचा आहे. त्यांच्याशी संघर्ष करताना आपल्याला मवाळ राहून चालणार नाही. त्यांचा प्रतिकार करायला त्यांच्यासारखच व्हावं लागेल. त्यांच्याच सारख शस्त्र चालवाव लागेल. म्हणुन सर्वानी इंग्रजांच्या लढाईच ज्ञान आत्मसात करा. तसेच शस्त्रं मिळवा. त्यांची युद्धनीती शिकून घ्या. त्याशिवाय आपणाला त्यांचा प्रतिकार करता येणार नाही. अशा प्रकारे बिरसांनी आदिवासींची संघटना मजबूत करून इंग्रजी सत्तेच्या विरोधात प्रतिकार करायला, लढायला प्रवृत्त केल.

सर्व लोकांना बिरसांचे विचार पटायला लागले. ते स्वाभिमानान जगण शिकले. त्यांनी जमीनदार, ठेकेदारांसमोर अधिकाऱ्यांसमोर झुकणे बंद केले. सरकारी दरबारात जाऊन हुजरेगीरी करणे बंद केले. कोणत्याही कामांसाठी, प्रत्येकच कारणांसाठी सरकारची परवानगी घेणे, त्यांना अर्ज पाठवणे बंद केले. त्यांनी इंग्रजांच्या राजवटीच्या विरोधात असहकाराचे आंदोलण सुरू केले. अन्याय अत्याचारांचा प्रतिकार करायला लागले. एखाद्या माणसासाठी अनेक लोक संघटीत होऊ लागले. प्रतिकार करायला लागले. सर्वजणं खंबीर झाले. बिरसांच्या नव्या धर्मप्रेरणेने सर्व आदिवासी प्रभावीत झाले. आपले हक्क, आपले स्वातंत्र्य मिळवायला उद्युक्त झाले.

इंग्रजी राजवटीतील हुकुमशाही, जुलुमशाही, अधिकारी, जमीनदार अशा अनेक घटकांनी त्रस्त झालेल्या जनतेला बिरसांच्या नवप्रेरणेने सर्वाना दिलासा मिळायला लागला. सरकारचा प्रतिकार करण्याच तंत्र त्यांनी असहकारातून सुरू केल. स्वातंत्र्याच्या त्यांच्या आशा आता पल्लवीत व्हायला लागल्या होत्या. आपल्या हक्कांच्या मागणीसाठी मुंडा जमातीने यापूर्वीच मोठे आंदोलण केलेले होते. "सरदार आंदोलन" छेडलेले होते. त्याला बरेच दिवस लोटले होते. कोर्टात जाऊन, कचेऱ्यात फेऱ्या मारून देखील लोकांना न्याय मिळालेला नव्हता. तशातच आता छोटा नागपूरच्या भागात भिषण दुःष्काळ पडला. सर्व लोक अडचणीत आले. आदिवासी लोकांना तर या दुःष्काळाची जास्तच झळ बसत होती त्यांना सरकार कडून कोणतीही मदत मिळाली नाही. काही सहकार्य मिळाल नाही. सहानुभूतीही मिळाली नाही. जंगलातील कंदमुळं खाऊन त्यांना जगाव लागल. दुःख, कष्ट, हाल-अपेष्ठा सहन कराव्या लागल्या' त्रास सोसावा लागला तर दुसरीकडे शेठ- सावकार, अधिकारींची बंडखोरी, इंग्रजी राजवटीची मुजोरी, तर एकीकडे उपासमारी अशा बिकट प्रसंगात लोकांची होरपळ होत होती. त्यांना इंग्रजी सत्तेचा राग येत होता. संताप दाटत होता सर्वच लोकं प्रतिकार करायला राजी झाले होते.

बिरसा मुंडांनी समाजबांधवांना नवा मार्ग दाखवला होता. त्यांचा स्वाभिमान जागवला होता. त्यामुळे सर्व समाज बांधव त्यांच्याकडे आपला नेता, उध्दारकर्ता, तारणहार म्हणून पहात होते. त्यांच्या ज्ञानाचा, सुशिक्षीत क्रांतीकारी नेतृत्वाचा प्रभावी व्यक्तीमत्वाचा आदर करत होते. त्यांना आपला देव समजत होते. तर बिरसांना मात्र आपल्या समाजबांधवांचे कष्ट, हाल उपासमारी पाहून हळहळ वाटत होती. त्यांच मन कष्टी होत होत. काय ही वेळ आली ? का अशी उपेक्षा आपल्याच देशात आपल्या हक्कांना आपण का पारखे रहातो? आपल्या समाज बांधवांना एकवेळचही जेवण का नाही मिळत त्यांच्या साठी आपण काहीही करू शकत नाहीत का? असे कळवळ्याचे आंतरीक तळमळीचे विचार आले की ते अस्वस्थ व्हायचे. भुकेल्या पोटांचा प्रश्न मिटवण्यासाठी काहीतरी उपाय शोधा- यचे. शक्य झाल तेवढ, शक्य झाल त्यांना मदत करायचे. स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना दोन घास भरवायचे

एकदा त्यांच्या गावात एक मुलगी मरण पावली. गावातील प्रथेनुसार ते प्रेत गाडत होते. त्या प्रेतासोबतच
त्याच्या, मरणाऱ्या माणसाच्या अंगावरचे दागीने देखील गाडत होते. ही प्रथा बिरसा मुंडांना योग्य वाटत नव्हती. इकडे अन्नावाचून लोक मरताहेत अस असताना हे लोक धनाचा असा अपव्यय करतात हे योग्य नाही? पारंपारीक प्रथा अज्ञानाचा विळखा असलेल्या त्या लोकांना सांगून समजावूनही उपयोग नव्हता.. म्हणून त्यांनी विचार केला नी रात्री स्मशानात गेले. ते गाडलेले प्रेत उकरून काढले. त्याच्या अंगावरचे सर्व दागीने व पैसे काढून ते प्रेत पुन्हा जसेच्या तसे बुजून टाकले. दुसऱ्या दिवशी ते सर्व दागीने घेऊन बाजारात गेले. ते विकून त्याचे तांदुळ आणून गरिबांना वाटले. तेव्हा त्यांच्या मनाला समाधान वाटल. लोकांची एका वेळेची भूक भागली. त्यांनी बिरसांना धन्यवाद दिले:

बिरसा मुंडांनी प्रेतावरचे दागीने विकून लोकांची भूक भागवली. त्या लोकांनी त्यांना धन्यवाद दिले. त्यांचे आभार मानले. मात्र इतर लोकांनी त्यांना वेड ठरवल. त्यांचा दुःसाहस करू लागले. इतर जातींतील लोकही त्यांना वेड ठरवून विटंबनात्मक शब्दांनी त्यांची अवहेलना करायला लागले. तशातच त्या परिसरात देवीच्या रोगाची साथ आली. त्याच्या प्रकोपान लोक आजारी पडायला लागले. त्रास होवू लागला. तेव्हा बिरसा मुंडानी सर्व लोकांना धिर दिला. त्यांच्यात जागृती केली. स्वच्छता पाळायचा संदेश दिला. काही उपाय सांगीतले. व काही औषधं सांगीतले. त्यांच्या मार्गदर्शनाने वागणारांचे आजार दुरुस्त झाले. लोक त्यांना भगवान म्हणू लागले. लोकांनी मिशनरींचा नाद सोडून दिला. आणि स्वताला बिरसांचे अनुयायी समजून संघटीत होऊन राहू लागले. त्यामुळे मिशनरी, भगत, साधू या लोकांचे महत्व कमी व्हायला लागले. ते बिरसाला आपला शत्रू मानायला लागले. लोकांच्या मनात बिरसा विषयी दूषीत भावना निर्माण करायला लागले. लोकांना मात्र सत्य काय आहे हे समजले होते. ते बिरसांच्या जवळ येवून रहायला लागले. विरोधकांनी मात्र बिरसांना वेड ठरवून त्यांचा निषेध करायला लागले लोकांना भडकवल. गावात-परिसरात आलेला आजार बिरसांच्या मुळेच आला. देविचा प्रकोप झाल्याने आला व या प्रकोपाच बिरसाच कारण आहे त्यांना इथे थांबू देवू नका!. ड्यून हकलून दया। अन्यथा असेच आजार पुन्हा पुन्हा येतील. आपणा सर्वाना त्रास होईल. लोक मरतील अस काही काही सांगून भडकवायला लागले. बिरसांनी ही सर्व परिस्थीती पाहीली. त्या लोकांचे अज्ञान पाहीले आणि नकोच या कटकटी! अस म्हणून त्यांनी गाव सोडल ते चकलद सोडून निघून गेले.

बिरसानी गाव सोडल आणि ते रानात निघून गेले. ते गेल्यावर सर्वचकलद गावावर, सर्व परिसरावर आणि सर्व आदिवासींत, मुंडांत औदासीन्य पसरल. सर्वांना बिरसांची आठवण येवू लागली. उणीव भासू लागली. सर्वांनी त्यांचा ध्यास घेतला. व त्यांना परत आणायचे ठरवले. काही लोक त्यांना शोधून घरी परत आणायला रानात गेले. त्यांचा शोध घेत फिरायला लागले.

गाव सोडून आल्यापासून बिरसा मुंडा रानावनात भटकत होते. भूमातेच्या आश्रयाला राहून उपास-तापासी वणवण फिरत होते. ते लोकांच्या कल्याणाचा विचार करत होते. त्यांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी, उध्दारासाठीचा उपाय शोधत होते. लोकांनी खूप फिरून, भटकून त्यांना शोधून काढल. त्यांची क्षमा मांगली याचना केली. विनंती केली. व घरी परत चालण्याचा आग्रह केला. लोकांच्या दुःखांची आठवण करून दिली. लोकांना आपली गरज आहे. आपण आमचे उध्दारकर्ते आहात, तारणहार आहात. आम्हाला अंतर देवू नका. आमच्यापासून दूर राहू नका. घरी चला. आम्ही सर्व लोकांनी आपणाला देव मानल आहे. आपण उदार आहात आम्हाला अस उघड्यावर सोडू नका. चला, घरी चला.

त्या आदिवासी समाज बांधवांची करूण तळमळीची विनवणी बिरसांनी मान्य केली. ते त्यांच्या सोबत यायला राजी झाले. व निघाले. लोकांनी त्यांना मोठ्या आदरान, सन्मानान गावात आणल गावात सर्व गावकऱ्यांनी, परिसरातल्या लोकांनी त्यांच स्वागत केल. त्यांना देव मानून त्यांचा सन्मान केला.

बिरसा मुंडा आता चकलदला आपल्या घरी रहायला लागले. ते स्वतःला भूमीपुत्र समजायला लागले. तसेच लोकांचा सेवक समजून सहकार्य करायला लागले. आजारी लोकांना औषध देऊन त्यांचे आजार बरे करायला लागले. तसेच त्यांनी सर्वाना नविन तत्वज्ञान सांगणे सुरू केले. लोकं त्यांच ते निःस्वार्थ, प्रेमळ सांगण, आत्मीयतेचा उपदेश श्रध्देन आदरान ऐकायचे. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागायचे. त्याचा लोकांना लाभ होऊ लागला.



बिरसांचा प्रभाव- लोकप्रियता वाढायला लागली लोकं दूरदूरुन त्यांच्या दर्शनाला यायला लागले. त्यांच ज्ञानदान श्रवण करून स्वतःला धन्य समजायला लागले. चकदील मधील बिरसाच घर म्हणजे एक तिर्थक्षेत्रच झाल. लोके तिथ श्रध्देन यायचे. लोकांना ते आरोग्याचे नियम सांगायचे. तत्वज्ञान सांगायचे. स्वाभिमानी जीवन जगायला सांगायचे. त्यांच्या त्या रसाळ वाणीन, प्रांजळ तळमळीच ज्ञान-श्रवणाने लोके प्रभावित होत असत त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून वागायचे. लोकांच्या मनात आता इंग्रजी राजवटीविषयी असमाधान वाढत होते आणि ते असहकारान वागत होते. लोकांच्या अशा असहकारान, इंग्रजी राजवटीच्या विरोधान वागण्यान इंग्रजी हुकुमत शाहीला हादरा बसला.

आदिवासीत आता बरीचसी जागृती झाली लोक इंग्रजी हुकुमत शाहीचे कायदे जुमानीत नसत. कर भरणेही कमी होऊ लागले. अन्याय अत्याचारांच्या विरुद्ध आवाज उठायला लागला. संघर्ष होऊ लागला. बिरसांचे हे उद्योग पाहून, आदिवासींचे बदललेले वागणे पाहून मिशनरींना धक्का बसला. ते इंग्रज अधिकाऱ्यांकडे तक्रार करू लागले. अधिकारी वरिष्टांकडे, कमिशनरांकडे तक्रार करायला लागले. सरकारचेही खाड्कन डोळे उघडले. हे लोकं असच वागत राहीले तर ?. तर, १८५७ सारखाच उठाव करतील. आपल्या सरकारला, राजवटीला आव्हान करून धोक्यात आणतील. आपला वचक, वर्चस्व हुकुमतशाही कमी होईल. असे सरकारला वाटले. म्हणून सरकारन आदिवासींचा मुंडांचा बंदोबस्त करायच ठरवलं. त्यांच्या असहकाराला कठोर शासन करून चांगल वठणीवर आणायच ठरवल. तशी त्यांनी योजना आखली.

आदिवासी लोकांना बिरसा मुंडा हेच भडकवतात. त्यांच्या या अशा वागण्याला बिरसा मुंडा हेच कारणीभूत आहेत. अस समजून त्यांनी बिरसांनाच दोषी ठरवल वे त्यांच्यावरच कारवाई करायच ठरवून अटक करायचा बेत
आखला आणि त्यानुसार अंमलबजावणीला सुरुवात झाली. सिंहभूमी येथील डेप्यूटी कमीशनरने तामाडच्या पोलीस ठाण्याला आदेश दिले. व बिरसा मुंडांना अटक करायचा हुकुम सोडला. त्यानुसार मिअर्स. नावाच्या
कान्स्टेबल पोलीस शिपायांना घेऊन निघाला.

बिरसा भगवानांना अटक करायला पोलीस येत आहेत. याची चाहूल त्यांच्या अनुयायी भक्त प्रेमीना आधीच लागली. तस त्यांनी बिरसा मुंडांना सावध केल व अनेक लोकं हातांत कुऱ्हाडी, भाले, धनुष्य- बाण काठ्या हे आपले पारंपारीक शस्त्र घेऊन सज्ज झाले व बिरसांच्या घराभोवती जमा होऊन पहारा करू लागले. त्यांच्या रक्षणाचा पवित्रा घेतला. बिरसांनी त्या सर्वाना उपदेश केला सुचना दिल्या. आपण स्वतः शस्त्र उचलायच नाही. अतिरेक करायचा नाही. जर पोलीसांनी शस्त्र चालवल तरच आपण प्रतिकार करायचा. त्याआधी शांतता राखायची संयम पाळायचा. मर्यादेच रक्षण पालण करायच

पोलीस आले. मुंडांच्या सशस्त्र जय्यत तयारीला पाहुन त्यांना राग आला. मात्र मुंडांची संख्या भरमसाठ असल्याच पाहून त्यांनी आधी सामंजस्याची भूमीका घेतली. लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. व आत जाण्यासाठी मार्ग करू लागले. मात्र एकही मुंडा तिथून बाजुला झाला नाही. एकानही माघार घेतली नाही. कुणीही शस्त्र उगारल नाही. सर्वांनी बिरसांच्या सांगण्याच पालण केल. अहिंसेच पालण केल. पोलीसांनी त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न केला. जरब दाखवली. कायद्याचा धाक दाखवला पण उपयोग झाला नाही. मुंडांच्या त्या अहिंसात्मक मात्र शस्त्रसज्ज पावित्र्यापुढे त्यांना नमाव लागल. हार खावी लागली. ते माघारी वळून निघुन गेले.

आपण काहीही केल नाही' शस्त्र चालवल नाही. कुणीही बोलल नाही. तरिही पोलीस आपल्याला काहीच करू शकले नाही यापूर्वी हेच पोलीस आपल्या काही अपराध नसतानाही कठोर कारवाया करायचे. आज मात्र त्यांना हरून, माघार घेऊन परत जाव लागल. हे तर आश्चर्यच झाल. ही आपल्या बिरसा भगवानांची अद्भूत शक्ती आहे. त्यांचाच खरा चमत्कार आहे. असे त्यांना मुंडांना वाटले. त्यांची श्रध्दा अधीकच बळकट झाली. विश्वास दृढ झाला. त्यांनी आपली संघटना अधीक बळकट केली. ते सर्वजणं समाजजागृतीला लागले इंग्रजांचा प्रतिकार



मुकाबला करण्यासाठी दुरदुरच्या गावांत जाऊन लोकांना जागृत करत होते. शस्त्रांची जमवाजमव करायला लागले होते. बिरसांचा क्रांतीचा संदेश सर्व समाज बांधवांपर्यंत पोहचवत होते.

बिरसामुंडांच्या समाज जागृतीची, लोक संघटनेची व प्रतिकाराच्या तयारीची चाहुल पाद्रिना मिशनरींना आणि अधिकान्यांनाही लागली. त्यांनी पोलिसांनाही खबर कळवली. त्या सर्वांना इंग्रजी राजवटी विरोधात भारतियांनी असे वागणे नको होते. त्यांची संघटना होऊ नये म्हणून तर ते दक्ष रहात होते. काळजी घेत होते. ही वार्ता कळताच पोलीसांनी बिरसांना पकडण्यासाठी नविन योजना आखली. दि. 23 आगष्ट १८९५ या दिवशी त्यासर्वांनी मिटींग घेऊन ख्रिचन पाद्री लास्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधिक्षक डी.आर के मिअर्स हे बंदुकधारी पोलीसांची तुकडी घेऊन मध्यरात्री गुपचुप चकलदला येवून धडकले. सर्व गाव झोपलेले होते. सर्वत्र शांतता पसरली होती. पोलीसांनी बिरसा मुंडांच्या घराभोवती घेराव घाला. आणि घरात घुसले. त्यांची चाहुल लागताच मुंडा जागे झाले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक पोलीसांच्या समोर त्यांचा एकटयांचा निभाव लागला नाही. पोलीसांनी त्यांना घेराव घालून कैद केल. त्यांच्या हातांत व पायांत बेड्या ठोकल्या. इंग्रजी दहशतीने, हुकुमतशाहीने सिंहासमोर लाचार होऊन कप्टान बेसावध असताना कैद केल. आणि त्यांना हत्तीवर बांधुन रातोरात बदगाव कडे घेऊन निघाले.

कपटान कोंडलेल्या बिरसा मुंडा-सिंहाला घेऊन इंग्रजी लांडग्यांची फौज बंदगावला आले. तोपर्यंत बिरसाच्या कैदेची खबर त्या परिसरात चौफेर पसरली होती. सर्व आदिवासी बांधव हातात शस्त्र घेऊन बदगावला जमा होऊ लागले. त्यांनी पोलीस ठाण्यालाच वेढा घातला. आदिवासींची संख्या घडोघडीला वाढतच होती. तणाव वाढत होता. आणखी तणाव वाढू नये, परिस्थीती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी बिरसा मुंडा यांना चोख बंदोबस्तात खुंटी येथे घेऊन गेले. मात्र तेथेही बिरसा प्रेमी मुंडांचा आदिवासी समाजबांधवांचा घेराव वाढायला लागला. लोकांची संख्या वाढायला लागली. तेव्हा परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि सैन्याचा चोख बंदोबस्त करून बिरसाना रांचीला नेण्यात आल. तेथे जेलमधे कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले.

रांचीहून पौजफाटा घेऊन पोलीस कमीश्नर खुंटीला आला त्याने जमलेल्या आदिवासींपैकी अनेकांना कैदेत टाकले रांचीकडे जाणारा लोकांचा लोंढाही थांबवला. मात्र न्यायालयाने कैद केलेल्या त्या सर्व आदिवासींना सोडून दिले.

बिरसा मुंडांना अटक करून रांचीला जेलमधे ठेवण्यात आले. तिथे अनेक मुंडा समाजबांधव शेकडोंच्या संखेने जमा झाले. जेलच्या भोवती त्यांनी गराडा घातला. आमच्या बिरसा भगवानांना सोडून दया! जेलच्या बाहेर काढा! नाहीतर आम्हालाही जेलमधे टाका! आमच्या भग- वंताचे आम्हाला दर्शन तरी होऊ दया! त्यांना सोडा!, सोडा त्यांना! अशा घोषणा करू लागले. संघर्ष करायला उद्युक्त झाले. त्या लोकांची संघर्षाची तयारी पाहून पोलीसांनी लाठीमार सुरू केला. निःशस्त्र मुंडा आदिवासी लोकांना त्या लाठ्यांचा मार खात पळून जावे लागले. तर काही लोकांनी जास्तच छिटाई केली त्यांना पोलीसांनी अटक करून कैदेत डांबले.

बिरसा मुंडांना अटक झाली होती. त्यांना कैदेत ठेवले होते. मात्र त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नव्हता. कायद्याचा भंग केलेला नव्हता. तसा गुन्हा सापडत नष्ठता. अपराध सापडत नष्टता. म्हणुन त्यांच्यावर आरोप दाखल करता येत नव्हता. गुन्हा लादता येत नव्हता. तर त्यांना सोडूनही देता येत नव्हते. म्हणुन पाद्री मिशनरींनी कलकत्याहून खास डॉक्टरांना बोलवले. आणि बिरसांना मनोरुग्ण- वेडा ठरवण्याचे षड्यंत्र रचले. परंतू बिरसांच्या भेटीने, त्यांच्या संपर्काने स्वतः डॉक्टरही प्रभावीत झाले. त्यांनी बिरसांना वेडे मनोरुग्ण ठरवणे तर दुरच उलट त्यांच्या कार्याची प्रसशाच केली. आणि मिशनरी कडे दोष दाखवला डॉक्टरांनी दिलेल्या त्या रिपोर्ट मुळे मिशनरींचा बेत फसला. नंतर मिशनरींनी बिरसांना कोर्टात हजर केले. कृष्णलालजी मुखर्जी नावाच्या न्यायाधीशांसमोर खटला सुरू झाला. सर्व चौकशा पूर्ण झाल्या. कोणताही पुरावा न मिळाल्याने न्यायाधीशांनी बिरसा मुंडांना निर्दोष घोषीत केले. व कैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले. मात्र ख्रिच्चन मिशनरींना हा कोर्टाचा निर्णय मान्य झाला नाही. त्यांनी डेप्यूटी कमीशनरकडे खटला दाखल केला. आणि मुंडा आदिवासी व इतर लोकांना बिरसांनी सरकारच्या विरोधात भडकवले, जनक्षोभ वाढवला आरोप करून खटला भरला. तसेच कृष्णलाल मुखर्डी न्यायाधीशांची तातडीन बदली करून त्यांना हलविण्यात आले. मिशनरींमार्फत रांची येथील न्यायालयात बिरसा मुंडां बरोबरच इतर पंधरा मुंडांवरही खटला सुरू झाला. बिरसांची बाजू कोर्टात न्यायाधीशांसमोर मांडण्यासाठी त्यांना कोणताही वकील देण्यात आला नाही. वकील नाकारण्यात आला. कोर्टानेही त्यांना दोषी ठरवून एकतर्फी निकाल जाहीर करून दिला. बिरसाना अडीच वर्षांची कैदेची शिक्षा व दंड ठोठावण्यात आला. दि १९ नोव्हेंबर १८९५ रोजी हा निकाल जाहीर झाला. याव्दारा सरकारने आपल्या हुकुमत शाहीची साक्ष करून दिली. बिरसा मुंडांना हजारीबाग च्या तुरूंगात नेवून कैदेत ठेवले.

बिरसांना कैदेत ठेवले. आदिवासींचा त्राता, तारणहार जेरबंद झाला. सरकारने व मिशनरींनी पुन्हा आदिवासी मुंडांवर अन्याय, अत्याचार सुरू केले. त्यामुळे मुंडांना आदिवासींना नाईलाजाने मिशनरींचा आश्रय घ्यावा लागला. पण त्यांच्या भावना आता बदललेल्या होत्या. ते पुर्विसारखी वागणूक देत नव्हते. तर सरकारचेही अन्याय अत्याचार वाढत होते. आणि त्यामुळे लोकांच्या मनात. सरकारच्या विरोधात संताप दाटत होता. राग येत होता. तशातच त्या वर्षी १८९५/९६ सालात भागात सातशे-आठशे मैलांच्या परिसरात भिषण दुष्काळ पडला. सर्वत्र त्याची भिषणता वाढत होती. आदिवासी गोरगरिबांची उपासमार होवू लागली. अन्नधान्याचे भाव गगनाला भिडले. अन्नाविना लोकं मरायला लागले. जीव वाचवण्यासाठी लोकं झाडांची पाने बांबुचे कोवळे कोष खाऊ लागले. मात्र त्यांवरही जमीनदारांनी आक्षेप घेतला चोरीचा आळ लावून कोर्टात खटले नेले. जमीनदारांची अशी अमानवीय वागणूक होती तर सरकार ही जाणून बुजून दुर्लक्ष करत होता त्यातच सरकारन कर वाढवून बोजा लादल्या. अशा सर्व कठिणात कठीण परिस्थीती मुळे आदिवासींचे मुंडांचे प्राण कंठांत आले. त्यांनी बॅरिस्टर जेकबच्या मदतीन केस मांडली. तेष्ठा कर भरणे बंद झाले. मात्र खायला काहीच मिळत नहतः सरकार कोणतीही मदत करत नव्हत. अन्नान्न दशा झालेल्या आदिवासी बांधवांनी आता धान्यांचे कोठारं लुटायला सुरुवात केली. लुटलेल धान्य आपसात वाटुन गोरगरिबांना देवून खायला लागले. आणि एकएक दिवस पुढे ढकलायला लागले. सरकारच्या अन्याय अत्याचारांची पर्वा न करता, तमा न बाळगता त्यांनी हा उद्योग सुरू केला. त्यासोबतच आंदोलनही सुरू ठेवले. पुर्विच्या सरदारी आंदोलनानही चांगलाच जोर धरला. ते आता बिरसांच्या नावाने लढवले जात होते. आणि सर्व लोक बिरसांच्या सुटकेची प्रतिक्षा करत होते.

दि. ३० नोव्हेंबर १८९७ रोजी बिरसा मुंडांची शिक्षा पूर्ण होऊन जेलमधून त्यांची सुटका झाली. सर्व समाज बांधवांनी त्यांचा सन्मान करून घरी आणल. मोठा उत्सव करून, ढोल नगारे वाजवून, पारंपारीक नाचगाणी करून आनंद साजरा केला. अनेकांनी ईसाई धर्माचा त्याग करून आपल्या धर्मात येवू लागले. सर्व आदिवासींचा तो जल्लोष आनंद पाहून मिशनरी व सरकारलाही चिंता वाटायला लागली. आपण बिरसाला त्याचा काही गुन्हा नसताना कैद केली व सजा भोगवली. आता जर हे सर्व लोक एकत्र येवून त्यांनी पुन्हा आंदोलन उभारले तर? याची भिती वाटुन व शक्यता लक्षात घेऊन रांचीच्या डेप्यूटी कमीशनरला बिरसांकडे पाठवले. तो चकलदला बिरसाच्या भेटीला आला. तेथे त्यांच्यात संवाद झाला. कमिशनरने बिरसाना समजावण्याचा प्रयत्न केला व आंदोलनात सहभागी न होण्याचा सल्ला दिला. कमिशनरने विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी समाधानकारक योग्य उत्तरं दिली. त्यामुळे कमिशनरलाही बर वाटल. नंतर बिरसानी त्या कमिशनरला गोरगरिब आदिवासी मुंडांच्या समस्या सांगीतल्या. मिशनरी जमीनदार सरकारची वागणूक कशी आहे ते सांगीतले. व सरकार मार्फत गोरगरिबांना न्याय, मदत मिळावी 'अशी विनवणी केली. त्या दोघांत बराच संवाद झाला. नंतर बिरसाचा निरोप घेऊन कमिशनर रांचीला परत गेला.

बिरसा मुंडांनी जेलमधे असतानाच उलगुलान ( विद्रोह) करण्याची योजना मनात आखली होती. म्हणून त्यांनी जेलमधून येताच कामाचे सत्र सुरू केले. उत्साहाने समाज कार्याला लागले. गावोगावी फिरून मुंडा समाजबांधवांत, आदिवासी लोकांत फिरून गुप्त बैठका घेतल्या. लोकांना विश्वासात घेतल. लोकांसोबत विविध विषयांवर सल्लामसलत, विचार विनिमय केला. त्यांत अनेकांनी आपापली मते मांडली, व्यथा-सांगीतल्या अनुभव कथन केले व काही सुचना सांगीतल्या मार्गदर्शन केले.

“आंदोलणासाठी युद्धाचाच मार्ग स्विकारावा ! मवाळपणा नकोच. इतकी वर्षे आपण शांतीच्या, अहिंसेच्या मार्गाने वागत आलो आपले पुर्वजही तसेच वागले. म्हणून आपल्या जमीनी गेल्या. जंगलांवरचा हक्क गेला. घरदारं जाऊन बेघर झालो. जमीनदार ठेकेदार सावकार अधिकायांनी आपणाला कपटाने गुलाम बनवल! छळ केला. आपल्याच मायभूमीत आपण भिकारी झालो. लाचार झालो. उपासमारी पदरी पडली. आपल वैभव गमावून, आपल्या अधीकारांना पारखे झालो! आता मवाळ राहून चालणार नाही. असे अनेकांनी विचार मांडून कठोर पावल उचलायच्या सुचना केल्या. या सर्व ऐकून मुंडांनी आंतरीक विचार केला. सखोल चिंतन केल आणि-

आणि त्यांनी नव्या धर्माची घोषणा केली. आपल्या पुरातन मुंडारी धर्मालाच नविन स्वरूपात आणल. नवे विचार नवे संदर्भ घेऊन नव्या काळाचा, समोरच्या परिस्थीतीचा अभ्यास करून त्यावर मात करण्यासाठी पर्याय शोधून त्या पर्यायांचे परिणाम व दुःष्परीणाम पडताळून, शक्यता वगैरेंचा अभ्यास करून आदिवासी मुंडा लोकांचा "मुंडारी" हा धर्म नव्या स्वरूपात प्रगट केला. त्याची तत्वं धर्म आणि राजनीतीला धरून आखली. शस्त्र हातांत धरून मुक्तीचा मार्ग क्रमण करण्यास सर्व समाजबांधवांना प्रेरीत करायची उस्फुर्तता घेऊन. पारंपारीक अज्ञानाचा, प्रथेचा त्याग करून नवे विचार धारण करून मुंडारीला सर्वांगसुंदर बनवल. अनेक समाजबांधव त्यांच्या सोबत येवून जवळ येवून नव्या धर्मात सहभागी व्हायला लागले. त्यांची संख्या वाढायला लागली. भूमीगत राहून सरकार विरोधी आंदोलनात उस्फुर्ततेन नव्या धर्माचा अंगीकार करू लागले

बोरतोडी येथे डोनकांच्या घरी सर्व समाज बांधवांची सभा घेण्यात आली. त्यात त्यांना-डोनक यांना राजनीतीचे प्रचारक करण्यात आले. तर सोना मुंडांना धर्मनीतीचे प्रचारक नियुक्त करण्यात आले. त्यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना बिरसा मुंडा म्हणाले,

सिंहभूमी आणि छोटा नागपूर हा परिसर मुळनिवासी आदिवासी मुंडांची भूमी आहे. पूर्वापारचे स्थान आहे. या भागालाच आपण विशेष महत्व देवू. डोंबारीचा प्रदेश दऱ्या खोरे पहाडांचा भाग असल्याने आंदोलन करायला व भूमीगत रहायला सुरक्षीत असल्याने त्यालाच आपले मुख्य केंद्र बनवू अशा अनेक सुचना मार्गदर्शन करून त्यांनी लोकांना विश्वास दिला. त्यांना विश्वासात घेतल' जुन्या जाणत्यांच-थोरांच मार्गदर्शन घेतल व कामाला लागले.

१८९८ सालात फेब्रुवारी महिन्यात दोबारी येथे मोठी सभा घेण्यात आली. त्यात अनेक आदिवासी समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थीत होते. सरदार आंदोलनाचे सर्व कार्यकर्तेही निष्ठेन हजर होते. सर्वानी इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष- लढाई करण्याचाच नारा लावून धरला. सर्वाच्या साक्षीन धर्मध्वज म्हणून पांढऱ्या रंगाचा झेंडा वापरायचा ठराव केला. त्याला मान्यता दिली. त्याचा आदर-सन्मान करण्यात आला. व तिथूनच इंग्रजांविरुद्ध संघर्ष करायला प्रेरणा दिली.

बिरसा मुंडांनी लढाई करूनच इंग्रजी राजवटीचा संघर्ष करायच सर्वानुमतांनी ठरवल. मात्र तरिही प्रत्यक्ष लढाईपुर्वी उर्वरीत भागांतील समाजबांधवांना भेटून त्यांना प्रोत्साहीत, प्रेरीत करायच ठरवून काही निवडक साथीदारो घेऊन निघाले. अनेक भागात रानावनांत जाऊन, आदिवासी वाड्यां वस्त्यांवर जाऊन समाज बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना आपल्या कार्याची ओळख करून देवून व त्यांना त्याचे महत्व पटवून सांगू लागले. नव्या धर्माचा प्रसार-प्रचार करायला लागले. अनेकांना आपल्या धर्मात घेऊन इतरांनाही या धर्मात व स्वातंत्र्याच्या संग्रामात यायच आवाहन करू लागले.

त्यांच्या त्या प्रांजळ कार्याला भरघोस प्रतिसाद मिळू लागला. तसेच मार्गातील विशेष स्थळे देवस्थानांच्या भेटीही त्यांनी घेतल्या व तिथल्या त्या स्थानाचे महत्व आपल्या साथी- दारांना सांगून मार्गदर्शन केले.

बिरसा आपल्या साथीदारांना घेऊन समाज प्रबोधन त्यांनी करत करत चुटीयाच्या देवळात आले. सोबतच्या साथीदारांना तुळस वाटली. पुढे ते जगरनाथपूर च्या मंदिरात आले. तिथे रेड्याचा बळी देण्याची प्रथा पूर्वाचार चालत आलेली होती ती प्रथा बंद करावयास बिरसांनी त्या लोकांना प्रेरीत केले. तेथेच त्यांनी कपाळाला गंध लावून ध्‌यान धारणा केली. तिथून ते नवरतनच्या मंदिरात आले ते मंदिर आपल्या पूर्वजांनी बांधलेले असल्याने सर्वच लोकांना तेथे प्रसन्न वाटले व स्वाभिमान जागृत झाला. तेव्हा बिरसांनी त्या सर्व लोकांना आपल्या पूर्वजांची आठवण करून दिली. महत्व कथन केले. तेव्हा सर्वानी स्वाभिमानी मनाने मातृभूमी स्वतंत्र करण्याच्या घोषणा केल्या. पुढे जगन्नाथ पुरीच्या जगन्नाथ मंदिरात ते सर्व साथीदारों सह आले. तिथे त्यांनी सतत पंधरा दिवस ध्यान चिंतन केले. व मायभूमीला स्वतंत्र करण्याची करुणा भाकली. आपल्या गौरवशाली इतिहासाचे महत्व सर्वाना सांगीतले, सर्वाना धिर दिला. तिथल्या स्थानीक लोकांत स्वाभिमान जागृत करून व स्वातंत्र्याची प्रेरणा प्रेरीत करून त्या लोकांचा निरोप घेऊन पुढे निघाले. असच समाज बांधवांना जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, आत्मविश्वास प्रज्वलीत करून स्वातंत्र्य संघर्ष, इंग्रजी राजवटीशी मुकाबला लढाई करायला सिद्ध करत नव्या धर्माचा प्रचार प्रसार करत ते आपल्या साथीदारांसह नव्या उमेदीन व अपार आत्मविश्वासान परतले.

चकलदला आल्यावर बिरसा मुंडांनी गावोगाव फिरून जन जागृती करत समाज बांधवांना एकत्र केले. रात्रीच्या अंधारात पट्टा(वर जंगलात सभा घेऊन हे लोकांना ज्ञान सांगू लागले.त्यांच्यात चेतना जागृत करू लागले. लोकांना मार्गदर्शन करताना म्हणायचे, आपल्या उध्दार आपणासच करायचा आहे स्वतःच प्रयत्न करायचे : आहेत. बाहेरून कोणी येवून आपला उध्दार करीन! अशा भ्रामक कल्पनेत कुणीही राहू नका. आपणच प्रयत्न करा. आता तुमचे आपले घर, सामाजीक संघर्षाच केंद्र बनवा. घराला स्वातंत्र्याच्या लढाईचा एक स्वतंत्र किल्ला समजा, गड समजा आणि त्यात तलवारी, कुन्हाडी, भाले धनुष्यबाण काठ्या अशा शस्त्रांचा साठा करून ठेवा. घरातल्या बायां माणसं मुलांनाही लढाईला, प्रतिकाराला सज्ज ठेवा. आपल्या घरात आपल्या समाजबांधवां शिवाय इतरांना प्रवेश देवू नका!

यासोबतच त्यांनी आपले दुसऱ्या बाजुचेही विचार मांडले, व लोकांना स्पष्ट खुलासा करून दिला,
मी तुमच्यावर कोणावरही जबरदस्ती करत नाही. कुणावरही दहशत लादत नाही. आधी आपण आपल्या प्रांजळ स्वाभिमानी मनोनी विचार करा, आपल्या ताकतीचा अंदाज घ्या. योग्य निर्णय घेऊन मगच या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी व्हा!

बिरसा मुंडा लोकांना, समाजबांधवांना सांगायचे सर्वांनी स्वनियंत्रीत रहा. आपणाला आपल्या हक्कांसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायचे आहे. इंग्रजी हुकुमतशाहीच्या विरोधात संघर्ष करायचा आहे. ही इंग्रजी सत्ता काही सामान्य सत्ता नाही. आपल्या संपूर्ण देशाला तीन कब्जात घेतल आहे. सर्वत्र त्यांचंच राज्य आहे. संघर्ष करताना प्रथम शांतता राखा. संयम बाळगा. शक्यतो सामजस्याने प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा: उगाच उतावळेपणा करून शस्त्र हाती घेऊ नका. आपली आपल्या माणसांची संघटना, संख्या पाहूनच पाऊल उचला. आपल बळ, आपला आवाका ओळखूनच वागा. उतावळेपणा करून अडचणीत येवू नका. तस करण्याने जेलमधे जाऊन पडाव लागेल. त्यात अडकू नका. इकडे आपल्या बळाची- ताकतीची गरज आहे हे विसरू नका. आपल्याला आपल्या जमीनी, घरेदारे हक्क अधीकार परत मिळवायचे आहेत. त्यासोबतच आपले संसार सांभाळायचे आहेत अस सांगून त्यांचा आनंद व्दिगुणीत केला. त्यानंतरही त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. व जनजागृती करून लोक संघटना बळकट केली. पुन्हा त्यांनी डोमबारी च्या पहाडावर सभा घेतली. त्या सभेत निर्णायक लढाईची तयारी करून सर्वांना आवाहन केल आणि लढाईचे नियोजन केले. सर्व पद्धती समजावून सांगीतल्या. इंग्रजी हुकुमशाही सत्ता व त्यांना साथ देणाऱ्या ख्रिश्चन मिशनरींना ठार करून क्रांतीचा आरंभ करण्या ची घोषणा केली. आरंभासाठी नाताळचा दिवस निवडला. सर्वांना गुप्तता राखायला सांगण्यात आले. त्यानुसार सर्वजणं तयारीला लागले.

बिरसा मुंडांचे मार्गदर्शन व सरसेनापती गया मुंडा यांचे कुशल नेतृत्वात दि चोविस डिसेंबर १८९९ रोजी मध्यरात्रीच्या नंतर पासून आदिवासी मुंडांचे इंग्रजी सत्तेच्या विरोधातील क्रांतीकारी आंदोलन पेटून उठले. मुंडांनी हत्यार उचलल आणि प्रथम रांची पासून चाईबासा पर्यंतच्या सुमारे चारशे मैलांच्या परिसरात आंदोलनाला सुरुवात केली. स्वतंत्र एकाच समाजाने पुकारलेले हे पहीलेच आंदोलन होते. मुंडांनी प्रत्यक्ष शस्त्र उचलून इंग्रजांना सहकार्य करणाऱ्या त्या भागातील जमीनदार ठेकेदार महाजन पादरी ब्राम्हण बनीया या सर्वाना कंठस्नान घातले. नंतर अनेक ठिकाणच्या पोलीस चौक्यां, इंग्रज अधिकाऱ्यांचे घरे, क्लब, ख्रिच्चन मिशनरींचे चर्च यांवर रात्रीच्या अंधारात अचानक हल्ले सुरू केले. धनुष्य- बाणांचा वर्षाव सुरू केला. रात्रीच्या त्या अंधारात असा अचानक हल्ला झाल्याने सर्वच लोक घाबरून गेले. बाण कोण मारत कशा करता हल्ला झाला? बाण कुठुन येतात हे कोणालाही कळत नव्हत. काहीही समजत नव्हत. हल्ल्याच्या बाणांच्या दहशतीने कोणी बाहेरही निघू शकत नव्हतः सर्वत्र दहशत - भीती पसरली होती. काहीही उपाय करता येत नव्हता. अचानक बाण येवून धडकत होते जो तो आपला जीव मुठीत धरून दडून बसले होते. काहीही, हालचाल करता येत नव्हती. सर्वांची मती गुंग झाली होती.

सर्व आदिवासी मुंडा लोकं लहाण सहाण गटांनी मिळून हल्ले करत होते. तर सरसेनापती गया मुंडांच्या नेतृत्वात सर्व काम सांभाळायचे आहेत. बायका-पोरांना, कुटुंबांना सांभाळायचे आहे. म्हणून सर्वानी जबाबदारीन वागल पाहीजे.

बिरसा मुंडांनी आपल्या आदिवासी मुंडा समाज बांधवांची स्वतंत्र फौज तयार केली. धाडसी सुरवीर विश्वास, प्रामाणीक चाणाक्ष कष्टाळू लोकांना आपल्या फोडोल-आपल्या सोबत घेतल आणि उत्कृष्ट पद्धतीन त्यांच नियोजन केल. महाराणा प्रतापसीह, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखच कुशल नेतृत्व केल. कडक शिस्त राखली. हत्तींसारख्या इंग्रजांचा मुकाबला करण्यासाठी मोजक्याच सिंहांची सेना बनवली. त्यांनी आपल्या अनुयायांचे लहाण लहाण गट तयार केले. त्या गटावर एक नायक नियुक्त केला. व त्यांच्यावर त्या गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. या नायकाला प्रचारक असे नाव दिले. आपल्या सगळ्या योजना, सभा वगैरेंची माहीती समाज- बांधवांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी त्यांनी नायकावरच सोपवली. आपल्या विश्वासू साथीदारांतूनच त्यांनी मंत्री, सेनापती, सरसेनापत ची निवड केली. व त्यांना त्यांच्या गावांत जाऊन फोडा तयार करायला सांगीतल. गावांतील अनुभवी लोकांनी इतर लोकांना आपल शस्त्रं शिक बण्याची जबाबदारी स्विकारली. ज्याला जे शस्त्र चालवता येत होत ते तो इतरांना स्वयंप्रेरणेने शिकवायला लागले. अशा प्रकारे सर्व आदिवासींचे गाव प्रशिक्षीत होऊन संघटीत होऊ लागले. शस्त्र चालवण्यात व निशाणबाजीत तरबेज होऊ लागले. नविन येणारांनाही सर्व प्रकारचे ज्ञान सांगून शिक्षण देवून जबाबदारी सोपवली जात असे. अत्यंत कडक शिस्तीत गुप्तपणाने त्यांच कार्य सुरू होत. बाहेर कुणालाही चाहुल लागणार नाही याची काळजी घेतली जात होती.

सिंबुआ नावाच्या पहाडीवर बिरसा मुंडांनी आपल्या आदिवासी मुंडा समाजबांधवांची एक सभा घेतली. त्यावेळी धनुष्यबाण व इतर शस्त्रे हातात घेऊन तीनशे मुंडा हजर होते. होळीचा सण होता. सर्वजण पारंपारीक लोकनृत्य व लोकगीत-गाणी गाऊन आनंद साजरा करत होते. सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर केळीच्या झाडाला इंग्रजांच प्रतीक समजून त्याला धनुष्यबाण मारले. व त्याचे दहन केले. तसेच त्यांनी एका झाडाची फांदी तोडून तीला ब्रिटीश सम्राज्ञी समजून तीचेही दहन केले आणी आपला आनंद साजरा केला.

सरवादाग नावाच्या मिशन स्थळावर जोरदार हल्ला झाला. त्याच वेळी मुद्र येथील स्थळावरही तसाच जबरदस्त हल्ला झाला. शिवाय बुडूजू येथेही त्याचवेळी असाच जोरदार हल्ला झाला. एकाचवेळी अनेक ठिकाणी जबरदस्त हल्ले करून मुंडांनी आपली दहशत बसवली. व सशस्त्र आंदोलनाची चुणुक दाखवली.

नाताळच्या दिवशी पंचवीस तारखेला हल्ले सुरूच होते. सरसेनापती गया मुंडांच्या नेतृत्वातील शंभर मुंडांच्या तुकडीने सरवादाग येथील हल्ल्यात मिशनचे कुंपण जाळले, घरांना आगी लावल्या. फादर च्या बंगल्यात घुसुन फादर कारवेरी आणि फादर हाफमेन यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यांना रक्तबंबाळ केले. घायाळ केले तसेच मुद्र मिशनवरही जोरदार हल्ला केला. फादर लास्टीवर बाणांचा जोरदार हल्ला करून त्याला अर्धमेल करून सोडल. बुडजू गावातही असेच हल्ले करून जर्मन पादचाऱ्यांच्या हालचे बेहाल केले. कुन्द्र गुटू गावातही हल्ले करून जर्मन मिशनरींचे चर्च जाळले. अशाच प्रकारचे जबरदस्त हल्ले मुंडांनी अनेक ठिकाणी करून मुंडांनी चांगलाच हादरा बसवला. व दरारा निर्माण केला. पहिलाच वार एवढा जबरदस्त केला की, सर्वांची मती गुंग झाली.

हल्ला यशस्वी करून सर्व मुंडा बांधव ठरल्यानुसार डोमबारी गुरु पहाडावर एकएक करून जमा झाले, व त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आपली मोहीम यशस्वी झाल्याचे पाहून स्वाभिमानान सर्वांच्या माना उंचावल्या. सर्वांनी बिरसांच्या चातुर्याच कौतुक केल गया मुंडा यांच्या कुशल नेतृत्वाची प्रसंशा केली. व समाधान मानल नंतर बीरसा मुंडांनी व गया मुंडांनी सर्वांना विश्वास दिला की, अशाच मोहिमा यशस्वी करून आपण इंग्रजांना जर्जर करू. आणि आपले सर्व अधिकार, जमीनी, स्वातंत्र्य परत मिळवू. ती वेळ आता जवळ आली आहे. असेच सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. सर्वांनी एकजुटीने रहायचे आहे. लढा द्यायचा आहे.

बिरसा मुंडा व गया मुंडा यांनी आता विद्रोहाची संघर्षाची रणनीती बदलवली. सर्वांना विश्वासात घेऊन विचार विनिमय करून सल्ला मसलत करून निर्णय घेतला. आता फक्त चर्च आणि ख्रिच्चनांवरच हल्ले न करता सरळ इंग्रज अधिकारी सोबत सामना करू. त्यांना आपला इंगा दाखवू. असा विचार करून खुंटी व रांची या गावांवर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. त्याकरता सात जानेवारीचा दिवस निवडला. तोपर्यंत सर्व तयारीला लागले. बिरसाचे मुंडा सैनीकांनी उत्साहीत होऊन रोज रात्री गनीमी कावा करून ख्रिच्चन मिशनरी आणि इंग्रज अधीकारी यांच्या घरांवर बाणांचा वर्षाव करायला लागले. ते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन बाणांचा वर्षाव करायचे आणि आपली दहशत दाखवून रात्री च्या अंधारात पुन्हा ठरलेल्या जागी डोमबारी पहाडावर दाट झाडीत घुसुन दिसेनासे हायचे. रोज अचानक होणाऱ्या या अशा हल्ल्यांनी इंग्रज अधीकारी चांगलेच हादरले. काहींनी तर घाबरून जाऊन बंगले सोडून दुसरीकडे निघुन गेले. आणि आपले प्राण वाचवले. क्रांतीच्या आरंभासाठी सात जानेवारी ही तारीख निवडली असली तरी त्यापुर्विच मुंडांनी अनेक ठिकाणी बाणांचा वर्षाव करून रात्रीच्या अंधारात आपला सामना सुरूच ठेवला होता.

रांची व खुंटी येथे हल्ला करायचा होता. त्याचे नियोजन करण्यासाठी सरसेनापती गया मुंडा यांच्या घरी ऐतकेटीह या गावात साठ सत्तर लोकांच्या सोबत बिरसा मुंडांनी बैठक घेतली. व नियोजन केले. या बैठकीचा सुगावा पोलीसांना लागला. ले गया मुंडांना अटक करायला फौज घेऊन निघाले. मात्र तोपर्यंत बैठक संपून लोक गावाशेजारच्या नदीकाठावर पोहोचले होते. काठावर खडकावर बसून ते आपापसात चर्चा करत होते. सर्वांच्या हातात धनुष्यबाण, कुऱ्हाड, तलवार असे शस्त्र होते. चर्चा रंगात आली होती, इतक्यात बिरसाचे लक्ष पोलीसांकडे गेले. दूरून येणाऱ्या पोलीसांना पाहून त्यांनी सर्वांना तातडीने सावध केले. तस हातातील शस्त्रं घेवून सर्वजण त्या पोलीसांवर तुटुन पडले. त्यांचा तो रौद्रावतार पाहून पोलीसांनी मागे

वळून पळ काढला. त्यातल्या एका पोलीसावर गया मूंडानी कुऱ्हाडीचा वार करून खाली पाडले व ठार मारले. इतरांनीही आणखी एकाला ठार मारले. पळत जाणाऱ्या पोलीसांनी खुटीचा मार्ग धरला होता. मात्र त्या मार्गावर असलेल्या विद्रोही मुंडानी आणखी एका पोलीसाला ठार केले. उर्वरीत पोलीस जीव घेऊन पोलीस ठाण्यावर आले व सगळा वृत्तांत कथन केला.

मुंडांच्या या कृत्याची वार्ता ऐकून रांचीचा डेप्यूटी कमीशनर आपल्या काही पोलीस शिपायांना घेऊन ऐटकेडीह ला गया मुंडांच्या घरी आला. वत्याने घराला पोलीसांचा वेढा घाला. आणि सर्व मुंडांनी पोलीसांना शरण यावे! शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करावे! असा हुकूम केला. त्याचे ते आवाहन धुडकावून गया मुंडांनी उत्तर दिले की,

हे घर माझे आहे. या घरात घुसण्याचा पोलीसांना कोणताही अधिकार नाही! तुम्ही परत जा !
गया मुंडांचे हे उत्तर ऐकून कमिशनरला राग आला. त्याने हवेत गोळी झाडली व दहशत बसवण्याचा प्रयत्न केला. वपुन्हा दरडावणीच्या सुरात म्हणाला बोलून मुंडांना घराबाहेर येवून आत्म- समर्पण करण्याचे आवाहन केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गया मुंडा समोर आले व पोलीसांना धमकी देत म्हणाले, तुम्ही परत जा ! आमच्या घरात घुसायचा प्रयत्न कराल तर कुर्हाडीने खांडोळी करु.!

गया मुंडांचे हे शब्द ऐकून कमिशनरचं आता डोक भडकल. त्याने नेम धरून त्यांच्यावर बंदुकीची गोळी झाडली. ती त्यांच्या खांद्याला खरचटून गेली. तरिही ते डगमगले नाही. तलवार घेऊन कमिशनरच्या अंगावर चालून आले. कमिशनरने घराला आग लावण्याची धमकी दिली व सर्वांना बाहेर येण्याचा हुकूम केला. तेव्हा पोलीसांनी त्याला सांगीतले की घराच्या आजूबाजूला अनेक लोकं हातात शस्त्र घेवून उभे आहेत. ते सर्व मुंडाच आहेत. तरिही कमिशनरने घराला आग लावलीच. घराने पेट घेतला तेव्हा गया मुंडाच्या घरातून हातात शस्त्र घेतलेले त्यांची पत्नी, मुले व इतर लोक बाहेर आले. आणि ते पोलीसांवर तुटुन पडले. पोलीस आणि मुंडांत प्रत्यक्षात आमने सामनेची लढाई सुरू झाली. पोलीस कमिशनराने बंदुकीच्या गोळ्या चालवणे सुरू केले. मुंडांच्याही तलवार, कुऱ्हाड धनुष्य बाण चालत होते. त्यांनी दोन पोलीस शिपायांना ठार मारल ते पाहून कमिशनरने गया मुंडावर गोळी झाडली. त्यामुळे ते घायाळ झाले. तरिही ते तलवार चालवतच होते. इतक्यात त्यांच्या पत्नीने मागून येवून कमिशनरच्या डोक्यावर काठीने जोराचा प्रहार केला.

तेव्हा त्याच्या हातातल्या बंदूकीतून आणखी एक गोळी निघाली ती थेट गया मुंडांच्या छातीला लागली. आणि ते गतप्राण झाले. त्यांना रणांगणावर वीर मरण आल. ते मेल्यावर त्यांची पत्नी व मुलांना पोलीसांनी अटक केली. तेव्हा सर्वांना दुःख झाल

बिरसा मुंडांच्या निर्देशनात स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज पोलीसांचा सामना करताना गया मुंडांना विर मरण आल. या घटनेने बिरसाना खुप वाईट वाटले. सर्वांनी शोक व्यक्त केला. व त्यांच्या बलीदानाची प्रेरणा घेऊन जिद्दीन कामाला लागले. त्यांच्या अनुयायानी आता खुंटी, तामर, बासीया, रांची या भागात सुमारे शंभराच्या वर हल्ले केले. अनेक खून केले. जाळपोळ केली. अशा अनेक घटना घडवल्या. साखाडाग मिशनचे आऊट हाऊस जाळले. रांची च्या चर्चवर अंधारात बाणांचा वर्षाव केला. त्यात वाढई- शिपाई मारल्या गेला. रेव्हरंड फादर कारवेरीला छातीला ओझरता बाण लागला. मात्र तो वाचला होता. बुरजू येथे केलेल्या हत्यात पोलीस आणि चार चौकीदार मारले.

दोनशे मुंडा लोकं हातांत शस्त्र घेवून खुंटीच्या मिशन केंद्रावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत! अशी बातमी पोलीस कमीशनरला मीळाली तेव्हा त्याची झोपच उडाली. सर्व पोलीसठाणे खळबळून उठले. त्यांनी सर्व लोकांना सावध केल. दक्षता राखायला सांगीतल. सर्व लोकही या वार्तेन भयभीत झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात, रोमन कॅथॉ लीक मिशनच्या भवनाचा आश्रय घेतला. जीव मुठीत घेऊन दडून बसले. सर्व लोक घाबरे झाले होते. कोणीही बाहेर निघत नव्हत. इकडे रांची शहरातही अशाच अफवा पसरल्या. आठ जानेवारीला रांचीवर हल्ला होणार! अस लोकं सांगायला लागले. पोलीसांनी सर्वांना सतर्क तेचा इशारा दिला. पोलीस बंदोबस्तात वाढ झाली. रस्त्यावर चौका चौकात पोलीस, ऑफीसर, स्वयंसेवक हालोल बंदुका लाठ्या घेऊन गस्त घालायला तैनात केले. सर्व शहरात संचारबंदी लावली. कमिशनरने खुंटीच्या सुरक्षततेसाठी चारशे बंदुकधारी पोलीसांना पाठवून बंदो
बस्त लावला. कडक पहारा बसवला.नियोजन ठरवून घोषणा केल्यानुसार सात जानेवारीला तीनशे साथीदारांना घेऊन बिरसांनी खुंटीवर हल्ला केला. पोलीस चौकी वर बंदोबस्त असुनही बाणांचा वर्षाव केला. त्यात असलेल्या हवालदार आणि पोलीसांना त्यांनी ठार केल आणि पोलीस चौकीला आग लावली. मोठ नुकसान करून हुकुमतशाहीला हादरा बसवून बिरसांची मुंडा सैन्याची फौज हल्ला यशस्वी करून, मोहीम फत्ते करून डोमबारीवर ठरल्या जागी सुखरूप येवून पोहोचली.

घनदाट वनराईन वेढलेल्या उंच डोमबारी पहाडावर बिरसांच्या आदेशाची वाट पहात अनेक मुंडा सैनीक हातांत शस्त्र घेऊन बिरइंग्रजांचा मुकाबला करायला सज्ज होते. पोलीसांना याचा सुगावा लागला. त्यांनी डोमबारी पहाडाला चारही बाजुनी घेराव घातला. चौफेर पोलीसांचा कडक पहारा बसवला. त्या सर्वांजवळ बंदुका होत्या. तर मुंडांच्या हातात धनुष्यबाण होते. आणि त्यांच्या मनात अप्रतीम जीद्द होती. बायामाणसं पोरंसोरं हातांत शस्त्रं घेऊन लढाईला तत्पर होते. बिरसा भगवानांच्या आदेशाची ते वाट पहात होते. बिरसा भगवान की जया अशा घोषणा देत होते. त्या सर्वांनी आता डोंगराच्या खाली येत बिरसांच्या नावाचा जयजयकार करत खाली पहारा करणाऱ्या पोलीसांवर बाणांचा वर्षाव सुरू केला. दगडफेक सुरू केली. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी पोलीसांनी बंदुका-रायफलींतून गोळ्या झाडणे सुरू केले. दोघांत घनघोर लढाई सुरू झाली. पोलीसांचे कमीशनर, डेप्यूटी कमीशनर, कॅप्टन त्यांच शिस्तबद्ध नेतृत्व करत होते. तर मुंडांना सैनिकांना बिरसा भगवानांची उस्फुर्त प्रेरणा लाभत होती. दोघांत जोरदार संघर्ष होत होता.

बंदुकांच्या माऱ्याचा जोर वाढवून डेप्यूटी कमिशनरने गुंडांना शरण येण्याचे आवाहन केले. शस्त्रं खाली ठेवून यायला सांगीतल तेव्हा नरसिंह नाथांचे मुंडा सरदार पुढे येवून म्हणाले. आम्ही इथले राजे आहोत. हा देश आमच्य आहे. ही जमीन आमची आहे. तुम्हीच बाहेरून येवून आमच्यावर अतिक्रमण केले आहे. तुम्हीच आम्हाला शरण या आमचे अधिकार, आमच्या जमीनी आम्हाला परत द्या!"

नरसिंहांच्या या बोलण्याचा राग येवून पोलीसांनी आणखी अंदाधुंद गोळीपार केला. त्यात मुंडांमधील अनेक लोकं बाया  पोरं मरण पावले. डोंगरावरून मुंडांच्या रक्ताचे प्रवाह खाली ओघळायला लागले. शरिरात प्राण असे पर्यंत मुंडां लोकं लढत होते. इंग्रजी सैनीकांना मारण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या पारंपारीक शस्त्रांना इंग्रजी आधुनीक रायफल, बंदुका भारी पडत होत्या. तरिही संघर्ष सुरु होता. बिरसा मुंडा देखील आघाडीवर राहून लढत होते. कुशल नेतृत्व करून इतरांनाही लढवत होते. इतरांनी त्यांना लढाईतून दूर जाण्याचा सल्ला दिला. आपण आमचे तारणहार आहात, मुक्ती दाते आहात, भगवान आहात. आपले प्राण वाचले पाहीजे. आपण इथे थांबू नका', अस आग्रहान सांगून व आपले प्राण धोक्यात घालून त्यांना दुर घेऊन गेले. व पहाडीवरून सुरक्षीत ठिकाणी नेवून पोहचवल. पोलीसांनी मात्र गोळीबार करून अनेकांना ठार मारल. कित्येकांना घायाळ केल तर अनेकांना अटक करून कैदेत टाकल.

ऐन संघर्षाच्या वेळीही ख्रिच्चन पादरी तेथे आले. अटक केलेल्या लोकांसमोर त्यांनी धर्मांतराचे प्रस्ताव मांडले. स्वखुषीने धर्मांतर करणारांना त्यांनी धर्मांतरीत करून सोडून दिले. तर ज्यांनी नकार दिला, विरोध केला त्यांचे हाल हाल केले. त्यामुळे बऱ्याचशा मुंडांनी घाबरून जाऊन धर्मांतर करून घेतले व प्राण वाचवून वेळ निभावून नेली पादरींनी मात्र संधीचा फायदा घेऊन अनेक लोकांना धर्मांतरीत करवून घेतल. आपला डाव साधुन घेतला. तसेच त्या पादरींनी गावोगाव फिरून इतर मुंडांना-आदिवासींना अटक करण्याची भीती दाखवून, दहशत दाखवून अनेकांना धर्मातर करायला भाग पाडल.

डोमबारीच्या भयानक संग्रामात मुंडांचे अतोनात नुकसान झाले. अनेक लोक मरण पावले. बाया माणसं पोरे मारल्या गेले. कोणी जखमी झाले. कोणाला कैद झाली. अनेक ओक लुळे पांगळे झाले. रक्ताचा पूर लोटला अनेक संसार उघड्यावर पडले. हे संसार उघड्यावर पडले. हे पाहून बिरसांना खंत वाटली. ते नाराज झाले. खिन्न झाले. तेल त्यांच्या इतर समाजबांधवांनी त्यांना सावरल समजावल. आणि लढा सुरू ठेवायची विनंती केली.

सर्वांनी सहकार्याच आश्वासन दिल. त्यांच्या सहकार्याला, विनंतीला बिरसा मुडांनी मान दिला. सर्वाना विश्वास दिला. व आपल्या कामाला लागले. ते गावागावांत जाऊन, समाज बांधवांना भेटुन जनजागृती करायला लागले. आज या गावात तर उद्या त्या गावात, पहाटे एखाद्या वस्तीत तर रात्री दुसऱ्या दुसऱ्या वस्तीत दिवसभर रानोमाळ फिरून, लोकांना भेटून ते लोक जागृती करत होते. लोकांत चैतन्याची भावना संचरवत होते.

मुंडांनी केलेल्या आंदोलनाला बिरसाच जबाबदार आहे! त्यांच्याच चिथावणीने मुंडांनी असा उपद्रव केला! अस समजून सरकारन त्यांना दोषी ठरवल. व त्यांना पकडायला पोलीस पाठवले. गावागावांत रानावनांत, रात्री अपरात्री बिरसांचा शोध घ्यायला पोलीस फिरत होते. मात्र शोध घेऊनही ते सापडत नव्हते. सैन्यातील जवानांना देखील रानावनात शोधायला पाठवल. मात्र उपयोग झाला नाही बिरसाना पकडण्यासाठी सैन्यान इतर मुंडांना बंदिवान केल. त्यांना मारठोक केली. मात्र कोणीही बिरसांचा ठाव ठिकाणा सांगत नव्हत कोणीही फितूर होत नव्हत. बिरसा मुंडांना ते लोक आपला भगवान समजत होते. सर्वजण त्यांच्या रक्षणाची काळजी घेत होते. जपत होते. सर्व प्रयत्न करूनही बिरसा मुंडा सापडत नव्हते. म्हणून सरकारने त्यांना पकडून देणाराला किंवा त्यांचा पत्ता सांगणाराला पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ही वार्ताी सर्वत्र पसरली ती मुंडांपर्यंतही पोहोचली. त्यांचे साथीदार त्यांची जास्त काळजी घ्यायला लागले. न्यांना सुरक्षीत स्थळी नेवून जपायला लागले. पोलीसांच्या वार्ता, खबर काढायला लागले. सतत दोन महीने पोलीसांना असच चकवल.

बक्षीसाच्या लोभान अनेक लोकांनीही बिरसांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अशाच एका टोळीन- सात आठ लोकांनी मीळून प्रयत्न केला. व युक्ती लढवली. त्यांनी आदिवासीच सोग घेऊन शोध घेत घेत बिरसांपर्यंत येवून पोहचले. व आम्ही आपले अनुयायी आहोत! आम्हाला तुमची सेवा करायची आहे आम्हाला आपल्या सोबत राहू दया! अशा विनवण्या केल्या. तेव्हा मुंडांपैकी काही लोकांनी बिरसाना सांगून परवानगी दिली. हे सर्वजण त्यांच्या सोबत राहू लागले. इतरांमधे मिळून मिसळून राहू लागले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि एके दिवशी चक्रधरपूर जवळील रोगोली गावालगत मुक्कामी असताना जवळपास कोणी नाहीत याचा फायदा घेऊन बिरसा मुंडांना त्यांनी घेराव घातला व कैद करण्याचा प्रयत्न

प्रयत्न केला. तेव्हा बिरसांनी त्यांच्याशी चांगली झुंज दिली. त्यांना चांगल मैलभर घेऊन गेले. मात्र त्या सात आठ लोकांशी सामना करताना ते थकले घायाळ झाले. तेव्हा त्या लोकांनी त्यांना कैद करून बनगाव पोलीस ठाण्यात आणून पोलीसांच्या हवाली केल. पोलीसांनी त्यांना त्वरीत अटक करून कैदेत टाकल. बिरसांच्या अटकेची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सर्व आदिवासी मुंडा हातात शस्त्र घेऊन बनगाव कडे निघाले. लोकांची झुंबड पाहून व काही दगा फटका होवू नये म्हणून पोलीसांनी बिरसाना बंदोबस्त करून रांचीच्या जेलमधे घेऊन जायला निघाले. मार्गात अनेक लोक बिरसाच्या दर्शनाला यायचे व रस्त्यावरून अभिवादन करायचे. बिरसा त्यांचे ते स्नेहभरले अभिवादन स्विकारून हसत मुखाने प्रतिसाद द्यायचे. ते पाहून सर्व आदिवासी सद्‌गदीत होऊन सिंगबोंगा देवा जवळ त्यांच्या सुटकेची व दिर्घ आयुष्याची करुणा भाकायचे. लोकांच्या गर्दीतून वाट काढत पोलीसांनी त्यांना रांचीला आणले व तुरुगात डांबले.

रांचीच्या जेलमधे आधीच सुमारे चारशे मुंडा समाजबांधवांना-मुंडा अनुयायांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. सरकार त्या सर्वाना अयोग्य-खराब वागणूक देत होते. त्या दुषीत वातावरण व उपासमारीन सतरा लोकांना प्राण गमवावे लागले होते. हे सगळ घडताना प्रत्यक्ष पाहून बिरसाच पवित्र अंताकरण कळ- वळत होत. ते मनान खिन्न होत होते. आपल्या समाजबांधवांना धिर देत होते. समजवत होते,

मी मेल्या शिवाय तुमची या तुरुंगातून सुटका होणार नाही. तरी तुम्ही 1. माझी काळजी करू नका! निराश होऊ नका!
मी तुम्हाला संकटात एकटे सोडून जात आहे, असे समजू नका! संयम राखा, संघटीत रहा!

तुमच्या हातात मी शस्त्रं दिलेल आहे, त्याचा योग्य उपयोग करून स्वताच, मुडांचे रक्षण करा!

मी पुन्हा परत येवून आपले राज्य मिळवीन ! असे आवाहन केले. व सर्वांना आत्मविश्वासान रहायला सांगीतल

बिरसा मुंडांचा व इतर सर्वच मुंडांचाही तुरुंगात छळ होत होता. त्यांच्या हातांत व पायात बेड्या ठोकून साखळदंडांनी जखडवल होत. त्यांना बेचव निकस जेवण, दुषीत पाणी दिलजात होत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यात बिघाड होत होता. दिवसेंदिवस ते खंगत होते. तरिही त्यांच्या मनात जिद्द होती प्रबळ आशा होती. इंग्रजी सत्तेला नष्ट करायच ते आपल्या समाजबांधव मुंडा अनुयायांना सांगत होते. संदेश देत होते. सतत चार महीने तुरुंगात हाल सहन करून त्यांची तब्येत खुपच खराब झाली होती सरकारने त्यांना सर्वापासून दूर-एकट ठेवल होत स्वतंत्र खोलीत कोंडल होत. कोणाशीही संपर्क करू दिला नव्हता. कोणालाही अवळपास फिरकू दिल जात नहतः

त्या दरम्यान प्रसिद्ध वकील बॅरिस्टर जेकब हे कलकत्याहून रांचीला आले. त्यांनी आदिवासी मुडांच्या केसेस चालवायला घेतल्या. त्यांनी केलेल्या युक्तीवाद व प्रयत्नांनी कोर्टाने अनेकांना निर्दोष सोडले. बिरसांनाही न्यायालयासमोर हजर करण्यासाठी नेत असता त्यांची तब्येत बिघडली. त्यांना कॉलरा झाला होता. उपचार करूनही गुण आला नाही. त्यांच्यात त्राण राहील नाही ते क्षिण झाले. तब्येत जास्तच बिघडत गेली. व त्यातच जून १९०० रोजी त्यांना मरण आल तिथेच अंतीम संस्कार करण्यात आले.

अठराशे पंच्याहत्तर मधे जन्मलेले बिरसा मुंडा एकोणवीसशे मधे मरण पावले. अवघ्या पंचवीस वर्षांच आयुष्य लाभलेले बिरसा मुंडा त्या काळातील सर्वात लहाण-कमी वयाचे व शिक्षण घेऊन अनुभवी, व समाजबांधवांच्या व्यथा जाणून संघर्ष करणारे एकमेव क्रांतीकारी होते. सामान्यातले असामान्य, श्रेष्ठांतले सर्वश्रेष्ठ - भगवान होते. ते अपार स्वाभिमानी होते. त्यांच्यातला आत्मविश्वास जगातल्या सर्व पर्वत शिखरांपेक्षाही जास्त उंचीचा होता. म्हणुनच ले बलाढ्य इंग्रजी सत्तेच्या विरोधात प्रत्यक्षात संघर्ष करू शकले. त्यांचे विचार समाजाच्या उध्दाराचे होते. त्यांचे शस्त्र ज्ञानाचे होते, जागृतीचे होते. त्यांचे कार्य क्रांतीचे होते. अंगातल्या सळसळत्या रक्ताला त्यांनी मरेपर्यंत इंग्रजी राजसत्तेच्या मदान बरबटलेल्या, जहागीरदार, ठेकेदार, सावकार ब्राम्हण बनीयांच्या वणव्याने घेरलेल्या गरिब आदिवासींच्या उध्दारासाठी त्यांच्या मुक्तीसाठीच होता. ते पारंपारीक : अज्ञान अंधश्रद्धा

अनिष्ट चालीरीती भूतप्रेतांवरचा अंधविश्वास दुर्व्यसने आणि अज्ञान नष्ट करण्यासाठी झटले. त्यासाठी त्यांनी सतत शुद्ध आचरण, संघटीतपणा, कष्ट-परिश्रम संघर्ष, स्वातंत्र्याची कास धरली. त्यांनी पारंपारीक अज्ञान नष्ट करण्यासोबतच विज्ञानवादी विज्ञानवादी इंग्रज मिशनरी अधीकाऱ्यांमधील चांगल्या गुणांचाही अंगीकार केला. शिस्त आरोग्य, शुद्धता, संघटीतपणा, आजाऱ्यांची सेवा करणे हे गुण त्यांनी इंग्रजांच्या वागण्यातूनच घेतले.

बिरसा मुंडांचा संघर्ष प्रामाणीक होता. निःस्वार्थी होता. तो कोणत्याही राजकीय प्रवाहापासून पुर्णतः अलीप्त होता किंवा तो धार्मीकही नव्हता. त्यात सामाजीक उत्थानाची दिव्य- प्रामाणीक सद्‌भावना होती. समाज बांधवांवर होणाऱ्या अमानुष अन्याय अत्याचारांच्या विरोधात त्यांचा लढा होता. इंग्रजांशी लढायला त्यांच्याच तंत्राचा - युद्धनीतीचा अवलंब करावा लागेल. हे त्यांनी चाणाक्षपणान जाणल होत. म्हणुनच तर त्यांनी लोकांना इंग्रजांच युद्ध कौशल्य शिकायला सांगीतल.

सतत अन्याय अत्याचारांची शिकार होणाऱ्या छळ कपट-कारस्थानात होरपळणाऱ्या पारंपारीक अज्ञान अंधश्रद्धां च्या विळख्यात होरपळणाऱ्या व इथल्याच सावकार जमीनदार, ठेकेदार, ब्राम्हण बनीया यांच्या सामाजीक दहशतीत खीचपत पडणाऱ्या असंघटीत आदिवासी समाज बांधवांना संघटीत करून त्यांना आपल्या सोबत घेऊन. बिरसा मुंडांनी इंग्रजी सत्तेच्या अधिकारालाच आव्हान केले. त्यांनी आपले अधिकार आपले हक्क, आपल्या जमीनी व स्वातंत्र्य मागीतले. बंड पुकारून भारतमातेला इंग्रजी गुलामगीरीतून सोडवण्यासाठी आंदोलन केले. बिरसा मुंडा हे फक्त मुंडा समाजाचे प्रतिनिधीत्व करत झटले नाहीत तर त्यांनी सर्वच आदिवासींना आपल्या सोबत घेतले. म्हणून त्यांचा लढा हा सार्वत्रीक होता' ते सर्व जातीधर्म पंथांचे प्रेरक होते. संपूर्ण भारतवासीयांना त्यांची प्रेरणा सतत आदरणीय राहील. अस त्यांच कार्य थोर होत. 

बिरसा मुंडांचा हा आदर्श सर्वानी नजरे समोर ठेवून कार्य करायला हवः सर्वांनी संघटीत सुशिक्षीत निर्व्यसनी राहून कष्ट करावे. देशहीताची जोपासना करावी. बिरसा मुंडांचा. सर्व आदिवासी समाजाचा सन्मान करावा. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणुन देशाचा राष्ट्राचा कारभार सुरळीत करावा हीच खरी त्या महान क्रांतीकारी, समाजोध्दारक, विद्रोही, भगवान बिरसा मुंडांना आदरांजली ठरेल. विनम्र अभिवादन घडेल!

लेखक : - ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या