आपल्या भारत देशाला नैसर्गीक साधन संपत्तीच वरदान लाभलेल आहे. आकाशाला भिडण्यासाठी उत्सुकतेचा भास निर्माण करणारे विशाल डोंगरांच सुरक्षेच अभेदय कवचही लाभलेल आहे.
![]() |
| Adivasi Life information in Marathi |
अनेक भागांतील लहाण मोठे डोंगर, पर्वत, राजस्थानातील अरवली पर्वत, उत्तर भारतातील हिमालय, महाराष्ट्र मध्य- प्रदेशातील सातपूडा, महाराष्ट्रातील सह्याद्री विंध्य पर्वत, असे अनेक प्रदेशांच संरक्षण करून स्वाभिमानी वैभव सांगणारे हे पर्वत अनेक आदिवासी च्या अश्रयाचही स्थान आहे.
Adivasi Life information in Marathi
या डोंगरांच्या पायथ्याशी खळखळ दळदळ करत तर काही संघ गतीन वाहणाऱ्या नदयांच्या सानीध्यात राहून अनेक लोकं अगदी आदीमानवा पासून परंपरेन रहात आलेले आहेत.
आदीवास, आरंभापासून राहणणारे, मुळ रहीवासी, त्यांना आदिवासी 'Adivasi Life information in Marathi' नावाची उपाधी लागली व आदिवासी हीच त्यांची ओळख झाली. हे आदिवासी लोक कित्येक पिढ्यांचा वारसा जपून स्वाभिमानान जगत आहेत. आपल्या स्वतंत्र चालीरीती, परंपरा, संस्कृती पिढ्यांपिढ्यांच्या वारशाने सांभाळत आहेत.
तर काही लोक मोठ- मोठ्या नदयांच्या खोऱ्यात, बाजूच्या उंच डोंगरावरून येणाऱ्या गाळ वहात येवून थोडीफार कसण्यायेगी जमीन तयार करून आपल्या उपजीविकेच साधन करून घेतल आहे.
नैसर्गिक वन संपत्ती सोबतच जमीनींच्या थोड्याशा तुकड्याचा सहारा घेऊन कष्ट करून, घाम गाळून आपला संसार चालवतात. गेल्या शेकडो पिढ्यांचा वारसा जपतात.
अनेक संकटं दुष्काळं, अती- वृष्टी, महापूर, वादळ वाऱ्याचे तडाखे साहून, नैसर्गीक आपत्ती- चा सामना करून, अनेक उलथा पालथींचे दाहक घाव, आघात सोसून आदिवासी लोकं आपल अस्तीत्व राखून आहेत.
अशा अनेक आदिवासींपैकी एक आहेत भिल्ल. भिल्ल निष्ठावान, शुर, धाडसी, पराक्रमी, निडर, काटक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच स्वताच अस्तीत्व ते संघटीतपणान स्वाभिमानान जपून आहेत भारतातल्या पुरातन संस्कृत भाषेत त्यांजा निषाद संबोधल आहे. तर त्यांना व्याध, किरात, सबर नायक, अभीर अशीही नावे असली तरी ते भील म्हणूनच त्यांची खरी ओळख आहे. अनेक प्रांतांत रहात असले. तेथील जन- जीवन समाजव्यवस्थेशी तादात्म्य राखून जगत असले तरी त्यांची स्वताची जीवनशैली, संस्कृती त्यांनी संघटीतपणान व स्वाभिमानान जोपासली आहे. राहणीमान व प्रांतांनुसार ले अनेक भाषांतून बोलत असले तरी भिली हीच त्यांची मुळ व खरी भाषा आहे. धनुष्यबाण हे त्यांच पारंपारीक शस्त्र आहे. पिथोर ही त्यांची प्रसीद्ध चित्रकला आहे.
भिल्ल लोक हे धार्मिक प्रवृत्तीचे असतात शंकरजी श्रीराम, इंद्र या देवांना ते मानतात. पार्वती, शितलादेवी, कालीका माता अशा देवींची ते आराधना करतात.

Adivasi Life information
भिल्ल लोक हे धार्मिक प्रवृत्तीचे असतात शंकरजी श्रीराम, इंद्र या देवांना ते मानतात. पार्वती, शितलादेवी, कालीका माता अशा देवींची ते आराधना करतात.
अनेक देव देवतांवर त्यांची विशेष -श्रद्धा असते. निसर्गाला ते आपला त्राता मानतात. वृक्षांची विशेषता पिंपळ आणी निंबाच्या झाडाची पूजा करतात. बायांच्या अंगावर गोंदण असत. हातात कडे, बांगड्या, पायात साखळ्या असतात. महिलांना दागीन्यांची हौस असते.
अनेक सण, उत्सव ते सर्व मिळून व आपल्या परंपरेने साजरे करतात. पारंपारीक वाद्ये वाजवून, नाचगाणी करतात. पारंपारीक व्यवसायात शेती शेतमजूरी करतात. रानातून सरपण, डींक, मध, रानफळ कंद, वनौषधी गोळा करतात. आपल्या चालीरीती परंपरा पिढ्यांपिढ्यांच्या वारशाने ते आनंदाने समाधानाने जगतात. आपली संस्कृती जोपासतात.
आधी स्वतंत्र स्वाभिमानान राहणारे भील आधी मुघलशाही-यवनशाही, मराठेशाही, राजपूतांच्या राजवटी नंतर त्यांनी इंग्रजी राजवटीतील जाचक राजकीय दहशती सोबत स्थानीक पाटील सावकार अंमलदारांच्या घमेंडखोर हुकूमत शाहीच अधिपत्य मानून त्याच्या दडपणाखाली हे लोक भरडत आलेले आहेत.
भारतात इंग्रजांची राजवट सुरू झाली तेव्हा त्यांच्या दहशतीची झळ रानावनांत राहणाऱ्या सर्व आदिवासी रानटी लोकांपर्यत देखील येवून पोहोचली. त्यातच गावागावातील सावकार देशमुख जमादार, अमलदार, भांडवलदार असे गावगाड्यांचा कारभार चालवणारे मिजासखोर लोक गावांतल्या वाड्या वस्त्यांवरच्या गोरगरीबांवर अन्याय अत्याचार करून आपल अस्तीत्व, दहशत, जरब राखत होते. मी सरकार दरबारात आपल वजन जपत होते.

त्यात गरीब सामान्य जनता भरडली जात होती जे अन्याय अत्याचार करणारे होते. ते इंग्रजांची मर्जी सांभाळून वागत असल्यान गरिबांना त्यांचे अधिपत्य मानून वागाव लागत होत कारण त्यांच्या कडून काम धंदा करून रोजंदारी अन्नधान्य मिळण्याची, पोटाला भाकर मिळण्याची Adivasi Life information in Marathi त्यांना आशा होती. सुख्य दुःखात, पोराबाळांना जगवण्यासाठी हे गोरगरीब अशा शेठ सावकारांच्या घरी आपल दुःख बाजूला सारून ऊन्हातान्हात, झंडी पावसात काम करत होते.
तर दुसरीकडे लहाण गरीब शेतकरी आपल्या जमिनीचा एवढासा तुकडा परंपरेन सांभाळून कष्ट करून जगत होते. मात्र अडी अडचणी सुखदुःखात नड पडली तेव्हा याच शेठ सावकारांकडे जाऊन आपल्या जमीनी गहाण ठेवून कर्जाऊ रक्कम घेऊन आपली गरज भागवून घेत असत. आणि त्या मोबदल्यात धान्य पैसे इतर वस्तू केवळ व्याजापोटी देऊन आपली जमीन गहाणातून सोडवण्याची आशा, भ्रामक आशा बाळगत असत.

काहींना तर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांनी शेतात उत्पन्न आल नाही तर व्याज थकत म्हणून त्या शेठ सावकारांच्या शेतांवर ते देतील त्या मजूरींवर काम कराव लागत असे. कामे करून करून, व्याज भरून भरून थकले खपले आयुष्य गेले तरी तो शेत-डामनीचा तुकडा परत मिळत नसे. आणि त्यामुळे त्या गरिबांचे संसार उध्वस्त होत होते. ते भूमीहीन होऊन मजूरी करून आपल पोट भरत होते.
तर काही लोकांना शेठ सावकार यांच्या अन्याय अत्याचार दहशत खोरीला बळी पडून सततच्या त्रासाला जाचाला कंटाळून हातांत शस्त्र घेऊन बंडखोर व्हाव लागत असे त्यांची ती बंडखोरी म्हणजे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या विरोधातला, न्याय मिळवण्या साठीचा आवाज . रहात असे. असे अनेक अन्याय अत्याचारांची शिकार होऊन न्यायासाठी झगडणारे लोकं अनेक गावांतून कोणत्याही जाती धर्मांतून दिसून येत ते रानावनांचा आसरा घेऊन लपून छपून राहून उपासी तापासी राहून आपल्यावरील अन्याय अत्याचारांचा सूड घ्यायची संधी शोधायचे. त्यातच एखाद्याला त्याच्या समदुःखी भेटला, तीसरा चौथा भेटून त्यांची टोळी होऊन ते संघटीत पणान आपल काम करायचे. त्यांनाच लोकं दरोडेखोर म्हणायचे.
झालेल्या अन्याय अत्याचारांचा सूड उगवण्या साठीच दरोडी खोरी करण्यासाठी घरांबाहेर पडलेले हे लोकं गोर गरिबीतील व अन्याय अत्याचारांची शिकार झालेले असेच असल्याने त्यांचा गरिब सामान्य जनतेला कधीही त्रास नव्हता. बरेचसे दरोडेखोर शेठ सावकारांना लुटून गरिबांना वाटून यायचे. आणि शेठ सावकार लोक मात्र सरकारी अधिकाऱ्यांची जवळीक राखून वागायचे. व गुंड दरोडेखोरांचा माग काढून त्यांची माहीती पुरवून कारवाया करायला मदत करायचे. त्यांनी घरदार पोरंबाळं सोडलेल असायच. आपल्यावरील अन्याय अत्याचारांचा बदला घेणे हाच त्यांचा उद्देश असायचा.

आपल्या वडीलांची जमीन एखादया सावकारान हडप केलेली असायची. कुणाच्या आई बहीणीवर. लेकी बाळीवर बलात्कार झालेला, अत्याचार झालेला असायचा. तर कुणाच्या बापाचा, भावाचा, मुलाच्ा खून झालेला असायचा; कुणाच घरदार जाळलेल असायच तर कुणाच्या शेतातल्या उभ्या पिकाची नासाडी झालेली असायची. फक्त अशा अन्याय अत्याचारांना बळी पडलेल्या लोकांमधूनच गुन्हेगार-दरोडेखोर निर्माण हायचे. व ते आपल्या आपल्या घरांतील समाज बांधवांवरील अन्याय अत्याचारांचा बदला घेण्यासाठी सतत झटायचे.
रानावनातच राहून मिळेल ते खाऊन वणवण भटकत ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता भटकत राहून प्रतिशोधाची संधी शोधायचे तर त्यांतीलच काही लोक शिकार करून, डीक वगैरें रानमेवा, फळे, फुले-कंद आणून गावात विकून, त्याबदल्यात मिळणार अन्न व दाळ भाजी किंवा इतर वस्तू फाटके तुटके कपडे घेऊन मिळेल त्यात समाधान मानून आनंदान रहायचे काहीनी एखादयांच्या शेठ सावकारांच्या शेतावर राखणीच कामे करून वर्षानुवर्षे ते निष्ठेन सांभाळल.
अनेक सण उत्सवात आपल्या बोली भाषेतील गाणी गाऊन आनंदान रहात हे लोक समाधानयन जगत आहेत. तर आता काहिनी आधुनिकतेचा स्विकार करून, शिक्षण घेऊन, समाजप्रवाहात येण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र आपल्या परंपरा निष्ठा त्यांनी अबाधीत राखल्या आहेत .
आपल्या भारतात अनेक भागात भिल्लांच्या पुरातन वस्त्यां आहेत. त्यांना अनेक भागांत अनेक - वेगवेगळ्या नावांनी ओळख आहे. राजस्थान, महाराष्ट्र मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र- प्रदेश कर्नाटक व इतर भागातही ते पूर्वापार राहतात.
भिल्लांना निषाद, किरात, व्याध, नाग, खबर, नायक, सबर, चौधरी, अभीर म्हणुनही ओळखल जात. तसेच ते ज्या भागात- प्रदेशात राहतात त्यावरूनही त्यांना काही नावे रूढ झाली आहेत. आणी त्यांच्या योग्यते नुसारही त्यांच्या ओळखी आहेत.
पहाडी भील:- हे गुजरात राज्याच्या उत्तर भागात हिंमत नगर, साबरकांडा, बिसा, पाटण, कलोल, पालणपूर, राधणपूर, म्हैसाण तसेच गुजरातच्या दक्षीण भागातल्या उदेपूर, छोटा, बडोदा, सुरत व तापी-नर्मदा नदयांच्या खोऱ्यात राहतात.

भिलाला:- भिल-आला, श्रेष्ठ, अधिपती, पूर्विच्या काळी राजदरबारांत यांना मान सन्मान रहायचा. राजपुतांच्या राज्याभिषेक प्रसंगी भिलालांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या रक्ताने राजतिलक लावण्याचा त्यांना मान होता. महाराणा प्रतापांना या भिलालांनी निष्ठेन साथ दिली होती. त्यांची आठवण म्हणून महाराणा प्रतापांनी आपल्या राज्याच्या प्रतीक चिन्हावर त्यांच्या सोबत भील सरदाराचेही चित्र सन्मानाने वापरले. हे भिलाला राजस्थानातल्या मनुरथाना, कोटा, बेसरूड गड, मालवा आणी गुजरात मधे ऑटेश्वर, छोटा, उधेपूर भागात अनेक पिढ्यांपासून रहात आहेत.
चौधरी भील:- हे सुरत आणी आसपासच्या परिसरात आहेत.
मेढ भील:- यांना मुळ आदिवासी मानल्या जात. राजस्था नात रहातात. मेढ या त्यांच्या नावावरूनच त्या प्रांताला मेवाड असे नाव रूढ झाले आहे.
ग्रासी भील:- हे डोंगरांच्या पायथ्यालगत जंगलांच्या अश्व - यान रहातात. त्यांचे लहाण लहाण वस्त्यांत वास्तव्य असते.
मेवासी भील:- हे देखील ग्रासी भिल्लांसारखेच आणी त्यांच्या सोबतच रहातात. ग्रासी भिल्लांच नेतृत्व आणी संरक्षण करण्याची जबाबदारी यांच्यावर असते. ग्रासी त्यांना आपला मुखीया समजून सन्मान देतात.
बसवा भील:- हे तापी आणी नर्मदा नदयांच्या परिसरात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात मधे राहतात.
लंगोटीया भील:- यांनाही मुळ निवासी मानल्या जात. मध्य- प्रदेशातील निंबाद, भोळे, झागवा, धार, पटेलवाड़, अलिराजपूर इकडे त्यांच्या वस्त्या आहेत. असे अनेक नावे आहेत.
भिल्लांचे अनेक कूळ वंश आहेत. गुजरातमधे वारदा, पावरा, रावल, डोंगरी, भागलीया, मिलाला, डोली, गरासीया, अशी ओळख आहे. राजस्थानातही त्यांना भिलाला, "Adivasi Life information in Marathi" देवरा, मसारभील, परडा, भागलीया, डोंगरी, रावल, पावरा अशा विशेषणांनी ओळखल जात. महाराष्ट्रात मावची, कोतवाल, अशी त्यांना ओळख आहे
भिल्लांतील परंपरागत मानसन्मान किंवा त्यांच्या व्यवसाय, त्या काळातील प्रतिष्ठा यावरूनही काही घराणी ओळखली जातात त्यात,
· मदवी, बढ़वो, भगत यांना भिल्लांमधील पवित्र मानले जातात. त्यांचा आदर केला जातो.
· कोटवार, पटेल-हे प्रशासन व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पाळतात. त्यांचा तो परंपरागत हक्क मानला जातो.
· पुजारो - हे औषधी देणारे, उपचार करणारे, तसेच परंपरेनुसार गायन करणारे असतात.
· भोपा - हे पुजा करतात, देवलांची आराधना करून व्याधी निवारण्यासाठी देवांच्या नावान गंडे, धागे, धुपारे करतात.
लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

0 टिप्पण्या