रुमाल्या - नाईक | Rumalya Naaik - Aaadivasi information in marathi

Rumalya  Naaik - Aaadivasi  इ.स. १८५७ च्या राष्ट्रीय उठावापासून भारतभर इंग्रजी राज- वटीच्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात अनेक भागांतून लोक विद्रोह करत होते. महाराष्ट्रातही खान्देश विभागातून असंतोष पसरून लोक इंग्रजी सत्तेच्या विरोधात संघर्ष करत होते


Rumalya  Naaik - Aaadivasi
Rumalya  Naaik - Aaadivasi 


 नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा या तालुक्यात वडगाव या लहानशा गावातील रूमाल्या भिल हे देखील या इंग्रजी सत्तेच्या विरोधात आवाज उठवत होते. 

चला तर जाऊन घेवूयात.


 Rumalya  Naaik - Aaadivasi information in marathi

रुमाल्या भील हे लहाणपणापासूनच निडर, धाडसी होते. झाडां- वर चढणे, मासे पकडणे, अनेक खेळ खेळणे, रानावनात भटकणे. करता करता शिकार करण्यातही त्यांचा चांगला हातखंडा झाला. ते तरबेज झाले. आणी इंग्रजी राजवटीतील जंगल रक्षक शिपाई म्हणून इ.स. १८९७ मधे कामाला, नोकरीला लागले. आणी प्रामाणीकपणान काम करायला लागले. इंग्रज अधिकाऱ्यांसोबत, 'Rumalya  Naaik - Aaadivasi information in marathi' त्यांच्या हाताखाली काम करताना त्यांना नेहमी नेहमी अपमान, मानहानी सहन करावी लागत असे त्यांची अरेरावी ऐकून घ्यावी लागे. आणी हे स्वाभिमानी रुमाल्यांना ते सहन होत नव्हतः इंग्रज अधिकाऱ्यांची अरेरावी, शिरजोरी जास्तच वाढायला लागली तेव्हा त्यांनी इ.स. १८९८ मधे ती नोकरी सोडून दिली.

इंग्रज अधिकारी आदिवासींवर, गोरगरीबांवर अन्याय अत्याचार करत होते. जास्तीचे कर सकतीन वसुल करत होते. आणी त्यांच्या आश्रयात सावकार, जमीनदार, ब्राम्हणवादी हे देखील आदिवासी गरिबांवर अन्याय अत्याचार करत होते. आणी ते पाहून रूमाल्यांच्या जीवाची तगमग होत होती. अनावर संताप येत होता. त्या संतापान क्रोधाच रूप घेतल. 

आणी त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवायच ठरवल. त्यांनी सुविचारी योजना आखली. इंग्रजांच्या राजवटीत विविध क्षेत्रात जे आदिवासी समाज- बांधव नोकऱ्या करत होते. त्यांना इंग्रज आणी सावकार, जमीनदार जे अन्याय अत्याचार करतात त्याची जाणीव करून दिली. 

Rumalya  Naaik - Aaadivasi information

त्यांच्यात सरकारच्या विरोधात जागृती केली. आणी त्यांना नोकऱ्या सोडायला लावल्या. त्या सर्वांना संघटीत करून मोठी फौज उभी केली. त्यांच्या त्या फौजेला सर्व खान्देशातून अनेक आदिवासी धाडसी तरुण येवून मिळायला लागले रूमाल्याचा आदर करायला Rumalya  Naaik - Aaadivasi information in marathi लागले आदिवासींच्या या संघटनेची, रुमाल्या इंग्रज राजवटीच्या
विरोधात करत असलेल्या कारवायांची बातमी सरकारच्या कानावर जात होती. 

आणी इंग्रज अधिकारी शिपाई त्यांना पकडण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. तसेच ते आदिवासी गोरगरीबांवर जास्त अत्याचार करत होते.

आपल्याच समाजबांधवांवरील अन्याय अत्याचार पाहून रुमाल्या नाईकांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी ब्राम्हणवादी, सावकार जमीनदार आणी सरकारी खजीन्यांवरही छापे टाकून तिजोऱ्या लुटल्या ते धन गोरगरीबांना आदिवासींना वाटायला लागले. ठेकेदारांची कामे बंद केली. सावकारी कर्जे घेणे बंद केले. जमीनदारांच्या जमीनी करणे बंद केले. 

त्यांच्याकडे कामाला जाणेही बंद केले. त्यामुळे जमीनदार, सावकार आणि सरकारही अडचणीत आले. जमीनी पडीत पडायला लागल्या. उत्पन्न बंद झाले सर्व यंत्रणा हादरली. तर तिकडे आदिवासी समाजबांधवांत रूमाल्यांची लोकप्रीयता, सन्मान वाढत होता. लोक त्यांना आपला दाता-रक्षण- कर्ता समजून सहकार्य करत होते.

रुमाल्यांच्या कारवाया, विद्रोह थांबवण्यासाठी त्यांना पकडण्यासाठी सरकार नवनवीन अधिकाऱ्यांना पाठवून यंत्रणा राबवत होत. आदिवासी गरिबांवर, स्त्रीयां पोरंबाळ, वृद्धांवर अन्याय अत्याचार करणारांना रुमाल्या लोकांच्या समोर आणून शिक्षा करत होते. 

Rumalya  Naaik - Aaadivasi 

कोणाचे हात तर कुणाचे पाय तोडत होते. त्यामुळे त्यांची दहशत पस- रून कोणीही अन्याय अत्याचार करत नव्हत. इंग्रज, सावकार, जमीन दारांच्या तिजोऱ्या ते सहज लुटत आणी गरिबांना समाजबांधवांना वाटून देत. तसेच त्यांना वनौषधांचीही बरीच जाणीव असल्याने ते लोकांना नि:स्वार्थ औषधही देत. उपचार करत.

रुमाल्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी अनेक अधिकाऱ्यांना पाचारण केल. लोकांना प्रलोभन दिल्ली. बक्षीस जाहीर केली. पकडवारंट काढूनी - अनेक अधिकारी मोठी फौज घेऊन जंगजंग पछाडत होते. शोध घेत होते. रुमाल्या नेहमी सावध राहून सतर्कतेन वागत होते.

 मात्र एका जमीनदाराच्या धोकेबाजीन त्यांचा घात केला. त्यान दिलेल्या खबरीनुसार इंग्रजांनी सापळा रचला आणी त्यांना पकडल. ते कारस्थानान पकडले गेले.

 त्यांच्यावर खटला भरला. त्यांना फाशीची शिक्षा झाली "Rumalya  Naaik - Aaadivasi information in marathi"  आदिवासी समाजबांधव गरीबांसाठी झटला झटता ते शहीद झाले अमर झाले.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या