संत साहित्य-आरती | ज्ञानदेवांचा हरिपाठ | पारंपारिक अभंग | sant dnyaneshwar sahitya in marathi

Sant Dnyaneshwar Sahitya in marathi   मस्कार मित्रानो , आज आपण आपल्या हिंदू धर्माचे महत्व पटवून देणारे संत साहित्य जसे , आरती, पारंपारिक अभंग, ज्ञानदेव हरिपाठ यावर जाणून घेऊ


sant dnyaneshwar sahitya in marathi
AARTI
                                                 


चला तर सुरवात करूया आजच्या विषयाला

Sant (Dnyaneshwar )Sahitya in Marathi


 आरती :
तांब्याच्या परातीत गंध अक्षता व फुलांचे हार ठेवून आणि स्वच्छ कापसाची निरंजन वात करून समईत ठेवून दिप प्रज्वलीत करून आराध्य देवतेच लयबध्द्ध स्तुतीगान 'sant dnyaneshwar sahitya in marathi'  सार्वजनीक अथवा स्वतंत्र ओवाळणे याला आरती ओवाळणे म्हणतात. आरती ओवाळण्यापूर्वी इष्ट देवतेची मूर्ती-प्रतिमा स्वच्छ करून फुलांच्या हारांनी सुशोभीत करण्यात येते. गंध धुप दिप लाऊन वातावरणात प्रसन्नता आणली जाते. 

आरती आळवण्यासाठी नगारा झांज घंटा अशा तालवाद्यांची लय धरली जाते. आरती म्हणनारे ओवाळणारे सर्वांग शुचिर्भूत होऊन शुद्ध अंतः करण व प्रसन्न मुख करून इष्ट देवतेल्या आपल्या हृदयासनी अंतर्यामी ध्यान केंद्रित करून साठवावे.

पहाटे सूर्योदयापूर्वी काकडा आरती करतात. इष्ट देवतेच्या मूर्तीला मंगल स्नान करून सुगंध, दुध पंचामृतांचे स्नान, प्रक्षाळण, गंध धुप दिप सुबासीक अगरबत्ती लाऊन परिसर स्वच्छ मंगलमय करतात. व त्या देवतेला जागवण्या साठी भूपाळी भजन म्हणुन आरती ओवाळतात. 

मंत्रांचा उच्चार पुष्पांजली अर्पण करतात प्रसाद ग्रहण करतात. दुपारच्या आरतीला 'माध्यान्ह आरती म्हणतात. या आरतीलाही धुप दिप कापूर उजळवून देवतेला विविध पक्वान्नांचे नैवेद्य अर्पण करतात. तर सायंकाळी होणाऱ्या आरतीला सायं-संध्या आरती म्हणतात. 

रात्री उशिरा साजरी होणारी शेजारती. रात्रीच्या शेजारती नंतर मंदिरांच्या गाभाऱ्याचे दार बंद करतात ते पहाटेच्या आरतीसाठीच उघडतात. तीन्ही त्रिकाल होणाऱ्या आरत्यांचा सोहळा वेगवेगळा असतो. प्रसाद वेगवेगळा असतो.

तीन्ही वेळेला होणा-या आरत्यांच्या वेळी समोरच्या देवी देवतांच्या मुर्तीच्या चेहयावरचे भाव वेगवेगळे दिसतात. पहाटे पूर्व दिशा उजळायला अजून अवकाश असतो. आभाळाचा निळसर रंग थोडासा उजळ होत असतो. हवेतला गारवा सर्वांनाच उल्हसीत करतो. चिमण्यांची चिवचीव, कावळ्यांची कावकाव, भारव्दाज वगैरे सर्वच पक्षी झाडांवर गुंजन करून सृष्टीला जाग येत अस त्याची जणु पूर्व सुचनाच देतात.

 अशा प्रसन्न वेळी प्रसन्न मनान शुचिर्भुत होऊन अनेक भावीक मंदिरात जमा होतात व श्रध्देन पारंपारीक आरत्या म्हणतात, सद्‌भाव, प्रसन्न मन हसतमुखान मंगल वाद्याच्या लयींवर देव देवीची आरती होते, आळवणी होते तेव्हा त्या मुर्तीच्या सुकोमल चेह-यावरचे तेज त्या आरतीच्या मंद प्रकाशात अधिकच सुकोमल तेजस्वीपणान खुलुन दिसते. ते आपल्या अंतर्यामी उसावते. आपला विश्वास दृढ होतो. डोळ्यांचे पारणे फिटतात. डोळे मन तृप्त होतात. 

मनातला सोज्वळ भाव अगरबत्तीच्या सुगंधा सोबत आपल्या डोळ्यांच्या व्दारा त्या निरागस दिव्य सतेज चेहऱ्यावर स्थिर होतो. डोळे पापण्या लवायलाही विसरतात. सुखानंदाचा तो परमोच्च क्षण असतो. तेथेच दिव्यत्वाची प्रचीती होते. तोपर्यंत बाहेर चराचराला जाग आलेली असते. 

सर्व पक्षी आपापल्या घरट्यांमधुन बाहेर येवून आपल्या सवंगड्यांच्या स्वरात स्वर मिसळून थव्यांनी आकाशात उंच भराऱ्या घेत किलबील करतात. झाडांवरच्या कळ्यांची सुंदर फुले होऊन झाडांवर वेलींवर हसतात तर काही अती उताविळतेन झेप घेऊन जमीनीवर अलगद टपकतात. व केव्हा एखादी बालीका सुवासीन भावीकस्त्री आपल्याला अलगद उच उचलून त्या जगत् नियंत्या परमेशाच्या सुकोमल चरणांवर नेवून टाकतात. याची ते प्रतिक्षा करतात. त्यांचा तो भाव खरा असतो. इच्छा पवित्र असतात. प्रांजळ असतात. नी तसच घडत. 

थोड्याच वेळात ते फुलं त्या सुंदर मुर्तीच्या गळ्यात हार बनून व काही नुसतेच चरणांवर विराजतात तेव्हा समाधानाच्या आनंदान सुखावत उसतात. व त्या मुर्तीलाही आनंदान सुखावतात. अशा वेळी त्या मुर्तीतील प्रत्यक्ष देवताच आपल्याला दर्शन देत असल्याची जाणीव होऊन मन तृप्त होत. आपण स्वर्गीय आनंदाची अनुभुती घेतो.

दुपारच्या माध्यान्ह आरतीला महाआरती असेही म्हणतात. गंध धुप दिप असे सारे षोडशोपचार करून फुलें फळे नैवेद्य अर्पण करून ही पूजन आरती संपन्न होते तेव्हा ती मुर्ती लोभस, निरागस भाव प्रगट करून चेहऱ्यावर हास्य विलसत असल्याचा भास होतो. आरती नंतरचा प्रसाद घेऊन मन तृप्त होते. त्या मुर्तीमधील देवतेविषयी आपला सद्‌भाव दुणावतो दृढ होतो

सायंकाळच्या व रात्रीच्या आरतीलाही अगरबत्तीच्या घमघमाटा सोबत, समईच्या भेद प्रकाशाची साथ लाभते व गंध धुप दीप प्रसाद अर्पण होतो तेव्हा प्रार्थना म्हणताना जेव्हा आपण त्या सुस्वरूप अलंकारीत सुंदर मूर्तीकडे पाहताना आपला सद्‌भाव तेथे लीन झालेला असतो. पुन्हा. उद्या हेच श्रीमुख पाहण्याची ओढ, सात्वीकता आपल्या मनात असते

तीच सात्वीकता आपण त्या मंद प्रकाशात पहातो. तेव्हा त्या मुर्ती- मधील जीवंतपणा जणु आपल्याला आश्वासन देत असल्याचा भास होतो की, उद्या पहाटे मी तुम्हाला असच पवित्र दर्शन देईन! अशा भासाची अनुभूती घेऊनच आपण देवाला विश्रांती घ्यायची प्रार्थना करून आत्मीक समाधानान तृप्त होतो. व अलौकीक ब्रम्हानंदात दंग होत्पे.

धार्मिक, सांप्रदायीक सत्भावनीक परंपरेत आरतीला अनन्य साधारण महत्व आहे. पवित्र श्रद्धास्थान आहे. पावित्र्य, मांगल्य, श्रध्दा, सात्वीक भाव निर्गर्वता, लीनता, नम्रता, ईश्वरनीष्ठा अशा सात्वीक परंपरा-भावना आरतीतून प्रगट होत असतात. वैदीक, पौराणीक, ऐतिहासीक, स्वातंत्र्य काळा पासून तर थेट आजच्या विज्ञान-आधु- निक काळातही आरतीचे महत्व अबाधीतच आहे. दिवसें- दिवस ते वाढतच आहे.

आदिदेव, श्री गणपंती, श्री शिव शंकर भगवान विष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण, खंडोबा, जोलींबा असे सर्वच देव आणि जगदंबा, भवानी, लक्ष्मी सप्तश्रृंगी रेणुका, अशा देवी तसेच त्या त्या भार्गातील देवी देवतांना आरतीचा थाट केला जातो. तसेच थोर संत-साधु, भक्तीज्ञान मार्ग प्रचारक प्रसारक द्योतक यांनाही आरती ओवाळून श्रद्धा भाव भक्ती- प्रगट केली जाते. अनेक तिर्थ स्थळाच्या नदयो, पर्वत, यांच्याही आरत्या ओवाळून त्यांप्रती आदरभाव व्यक्त केला जातो. त्यांच्या पावित्र्याचे, थोरवीचे महात्म्याचे वर्णन केले जाते. काही ग्रंथांच्याही आरत्या करण्याच्या प्रथा असून त्यातून त्या ग्रंथांच महात्म्य वर्णन केल जात. श्रद्धा व्यक्त केली जाते.

आरती चार वेळेची असली तरी बहुतांश ती सकाळ सायंकाळ जास्त प्रमाणात होत असले. अनेक भाविक आपापल्या घरी देव्हाऱ्यातील देव देवतांना आरती ओवाळून आत्मीक आनंदाचा लाभ घेतात. कुठलाही स्वार्थ नाही. हेतू नाही. डामडौल नाही. अवाढव्य खर्च नाही. गर्व नाही. प्रांजळ मन, शुद्ध सद्वर्तनान आपल्या आराध्य दैवतासमोर नतमस्तक होऊन नम्र भावनेने गुणगाण गाऊन कृतज्ञता व्यक्त करणे हाच आरतीचा शुद्ध हेतू आहे. अशा स‌द्भावनेने स्वार्थाशिवाय केलेल्या आरतीनेच खरा आत्मानंद मिळतो. त्यातच खर सुख लाभत.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव महाशिवरात्री, आषाढी कार्तिकी जन्माष्टमी तसेच संतांच्या समाधी पुण्यतिथीच्या औचित्यान महा आरती करण्याचाही प्रघात आहे. श्री भागवत, गीता, रामायण अशा अं ग्रंथांच्या पारायणाचा समारोप करतानाही आरती महा आरती करण्याची परंपरा आहे. तसेच सत्यनारायण, यज्ञ, आहुती घरगुती पुजा करतानाही आरती होते. एखाद्या भावीक माळकरी व्यक्तीच्या निधनानंतर अंत्ययात्रेच्या वेळीही आरती म्हनण्याचा प्रघात रूढ होत आहे. अनेक शुभ प्रसंगी, सत्कार्यावेळी आरती करून परमेश्वराची करूणा भाकतात.

श्रध्दा प्रेम सात्वीकता दृढ विश्वास व नम्रतेन आपल्या आराध्य- इष्ट देवताला प्रार्थना करून आत्मीक सुखानंदाची, ब्रम्हानंदाची स्वयं अनुभुती करून घेणे हाच या आरतीचा खरा उद्देश आहे. आपल्या संस्कृतीत आरतीला अनन्य साधारण महत्व आहे. हे महत्व जाणुनच साधु सेत सत्पुरुषांनी आरत्यांची रचना करून ठेवलेली आहे. व आता देखील करत आहेत. सात्वीक धार्मिक परंपरा आरतीशिवाय कधीही पूर्ण होणार नाही हे सत्य सत्य आहे. श्री परमेश्वराच्या पवित्र चरणांवर ही शाब्दीक आरती समर्पण.

Sant Sahitya in Marathi


पारंपारिक अभंग :

                                               Sant Dnyaneshwar Sahitya in Marathi

महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यांत राहणारे मराठी लोके सुरविर धाडसी पराक्रमी निष्ठापान आहेत तसे ते सुसंस्कृत स‌द्भावनीक धार्मीकही आहेत. पंढरपूरचा पांडुरंग, तुळजापूरची तुळजा भवानी, अंबा रेणुका, सप्तश्रृंगी, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, भिमाशंकर, जेजुरीचा खंडेराया, जोतीबा, श्री गणेश व अनेक ठिकाणी विराजमान विविध देव देवता हे त्यांचे आराध्य दैवतं. 

या देव देवतांच्या भक्ती भजनात अवधा महाराष्ट्र दंग होऊन जातो. आपल इतर कोणतही कामं करताना, सुखा दुःखाच्या वेळी आपल्या आराध्याच नामस्मरण करताना सर्व स्त्री पुरुष आत्ममग्न होतात. साध्या भोळ्या भावनेन निर्मळ भक्तीचा आनंद लुटतात. साक्षर अल्पसाक्षर निरक्षर देखील अभंग आळवून. श्रवण करून भक्तीचा आनंद लुटतात. असे हे अभंग.

अभंग- भंग न पावणारे, अक्षय प्रगल्भ ज्ञान समृद्धी    sant dnyaneshwar sahitya in marathi च्या अनंत सात्वीक साठ्यातून प्रगट झालेले भक्ती ज्ञान काव्य. अभंगात वृत्त अलंकार छंद यमक यांचा परिपूर्ण संगमच असतो. यात भक्ती छंद आराधना परमेश्वर व त्याच्या भक्तांचे प्रांजळ एक नीष्ठ सात्वीक नम्रतेने केलेले आर्जव-वर्णन असते. 

यांसोबत दयाळू कृपाळू संतांनी त्या त्या काळातल्या समाजाची, सर्व जनतेची दुःखे व्यथा दुरावस्था भरकटलेपणा पाहून त्यांना सत्मार्ग दाखवून त्यांची दु:खे व्यथा नष्ट करण्यासाठी, त्यांचे अज्ञान नष्ट करण्यासाठी थोर उपदेश करून परमार्थ मार्गाची शुद्ध ओळख अभंगांव्दारा करून दिलेली. आहे. सर्व जनतेला उदारतेन प्रबोधन केलेल आहे

अभंगांची परंपरा, बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात वृध्दींगत झालेली दिसते. पूर्वी संस्कृत भाषेतच काव्यमय लिखाणाची परंपरा रूढ होती. व त्यातील मंत्रांनी आराधना पूजा भक्ती करण्याची प्रथा होती. वेद शास्त्र पुराणं रामायण महाभारत अशा सर्व ग्रंथांतील अध्यात्म गुहय ज्ञान संस्कृत मधुनच असल्याने त्याचे वाचक व श्रोते ठरावीकच अत्यल्प होते. वबहुतांश समाज त्या ज्ञानापासून वंचीत रहात होता. 

अशा त्या अध्यात्म गुह्य ज्ञानाचे भांडार थोर कृपालू उदार संतांनी आपल्या अभंग लेखणातून गायनातून सर्वासाठी खुले करून देऊन लोकांवर जगावर परोपकारच केले.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी- भावार्थ दिपीका लिहून या मराठी काव्यात अजरामरता आणली. त्यासोबतच त्यांनी अभंग रचना करून भक्तीज्ञानही प्रगट केले. त्यांच्या काळातच सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई संत नामदेव, जनाबाई सखुबाई चोखा मेळा यांनीही अनेक रचना करून विनामुल्य लोकांच्या पदरात टाकली. अभंग त्यांच्या काळातच खऱ्या अर्थान अभंग हा काव्य प्रकार प्रचलीत झाला. त्यांच्या नंतरही संत एकनाथ, गोरा कुंभार कान्होपात्रा, रंका बँका, अशा अनेक संतांनी अभंग रचना केल्या. 

एकनाथांच्या नंतर संत तुकाराम महाराज, संत निळोबाराय संत बहिणाबाई अशा संतांनी अभंगांची रचना करून सर्व जनतेला भक्ती मार्ग दाखवला.

हे सर्व संत कवि अनेक जाती धर्मांतले होते. त्यांनी समाजातल्या सर्वांसाठी अभंग लिहीले. सर्वांपर्यंत नेवून पोहचवले. त्यामुळे अभंगांनी प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसांशी जवळीक साधली. अगदी साध्या सोप्या भाषेत, सर्वाना आपल्या प्रवाहात सामावून घेत व सर्वांसी अधिकार देत अभंगांनी उत्तुंग यशोशिखर गाठल. आणि घराघरांत - मनामनात श्रध्देच स्थान मिळवल. 

अगदी अशिक्षीतांनाही ऐकून ऐकून बरेचसे अभंग मुखोद्गत होऊ लागले. मंदिरात घरात हरिपाठांचे अभंग, कथा-किर्तनांतून ऐकायला येवू लागले. अनेक ठिकाणी भजनांतून अभंग गायन होऊ लागले ती परंपरा आजही तशीच व तेवढ्याच श्रध्देन जोपासली जात आहे.

अनेक थोर संतांनी महाराष्ट्राची अभंग काव्य परंपरा समृद्ध करून अजरामर करून ठेवली आहे. व समाज जागृतीचे महान कार्य केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर गावागावात मंदिरात, चौकांत, घराघरांत या सर्व संतांचे अभंग मोठ्या आवडीन व श्रध्देन गायले जातात. व निखळ भक्तीरसात आनंद सागरात लोक तल्लीन होतात

. या अभंगांची प्रमाणे किर्तनकार प्रवक्ते आपल्या किर्तनांतून ज्ञानदान करतात. आणि समाजाला जागृत करून दुर्व्यसनं, दुराचार, कूकर्मापासून परावृत्त करतात. व नवा सुसंस्कृत सुजाण समाज घडवण्यासाठी झटतात. सुश्राव्य चाली स्वर लाऊन टाळ-मृदुंग (पखवाज) व विणा चिपुळ्या साधक, गायक सुमधुर गायन करतात तेव्हा खरोखर ब्रम्हानंदाची अनुभुती जाणवते.

श्री संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे अभंग म्हणजे गीतेत सांगीतलेल सर्व ज्ञान प्रगट करणार द्योतक आहे. घराघरात, विशेषत: ग्रामीण भागात हरिपाठ श्रध्देन म्हटल्या जातो. गळ्यात तुळशीची माळा, कपाळाला गंध टिळा, अशा साध्या भोळ्या रुपात महाराष्ट्राचा भाविक अभंग म्हणताना पाहून त्याच्या त्या निरागसपणात परमेश्वर परमात्म्याच दर्शन होत. असाच हरिपाठ संत मुक्ताबाई, संत एकनाथ व अनेक संतांनीही लिहिला आहे.

" संत एकनाथ महाराजांच्या भारूड या अभंग प्रकाशन तर स्वतःचा रसिकवर्ग तयार करून रूढ ठेवला आहे. आपल्या दैनंदिन जीवनातल्या व्यथा रूपकाच्या द्वारा मांडून समाज जागृती करणार ते एक पवित्र माध्यम आहे. त्यांनी सौर गोंधळ, गौळण, वासुदेव, आंधळे, पांगुळ, मुका, बहिरा, अशा अनेक प्रकारच्या अभंग रचनांतून लोकांना शुद्ध आचार विचार ठेवून स्वानंदान जगत परमार्थमार्गाचा पंथ आचरायला सांगितला आहे. जीवनाच्या उध्दाराचा संसार तरण्याचा मार्ग दाखवून  उपकृत केलेल आहे.

संत तुकाराम महाराजांनी तर प्रत्यक्ष वेदांच ज्ञान आपल्या अभंग रचनांतून मांडलेल आहे. महाराष्ट्रातल्या साध्या भोळ्या भाविकाला रुचैल-पचेल अस ज्ञान त्यांनी आपल्या सर्व अभंगांतून मांडलेल आहे. ते म्हणतात

यारे यारे लहानथोर । याती भलते नारी नर ।।

करावा विचार" न लागे चिंता कोणासी किंवा



कामामधे काम काही म्हणा राम राम "।।

जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे" ।।



अशा सहज सोप्या शब्दांतून अभंगांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला एकत्र आणायच कार्य केल.

संत तुकाराम, संत ज्ञानदेव, सोपान, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई नामदेव निकोबा, गोरोबा, सेना न्हावी, जनाबाई सखूबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, रंका बका व इतर अनेक संतांचे अभंग सर्व जगाला प्रेरक आहेत, संन्मागदर्शक आहेत. भवताप हारक- संसाराचे दुःख विसरायला लावणारे आहेत. संघटीत सुसंस्कृत समाजनिर्मीती करायला द्योतक आहेत. व परमात्म्याची ओळख करून देणारे व आत्मानंद- स्वानुभव सुखाची प्राप्ती करून देणारे आहेत. संसारीक दुःखांचा विसर पडायला सांगणारे आहेत. 

आपल्या रोजच्या व्यवहारांतील सर्व कामं करतानाच त्यात गुरफटुनन रहाता परमात्म्याचा आठव करत जीवनोद्धाराचा मार्ग दाखवतात.

गौळणी या भगवान श्रीकृष्णांच्या लिलांच रसाळ भक्तीच वर्णन करणारे अभंग बहुतेक सर्व संतांनी रचलेले आहेत. कृष्णाच्या खोड्या, गौळणींचा भाव, दृढ भक्तीच थोडस श्रृंगारीक वर्णन या गौळणींच्या अभंगातून प्रगटत. या सर्वच गौळणी - अभंग गायला आणि ऐकायलाही रसाळ वाटतात.

समाजातल्या सर्व स्थरातल्या, जाती धर्मांतल्या लोकांना संसारातून तरून जाण्यासाठी, भवदुःख विसरण्या साठी परमेश्वराची, त्याच्या अस्तीत्वाची ओळख मानवांत - सर्व चराच- रातच, जीव सृष्टीतच असल्याची जाणीव करून देण्यासाठी संतांनी अभंग रचना करून मानवजातीवर अनंत परोपकार करून ठेवलेले आहेत. शतके उलटली तरीही सर्व संतांच्या अभंगांच्या गाथा आपल ज्ञानभांडार घेऊन आजही मोठ्या निष्ठेन सर्व जगाला उध्दाराचा मार्ग दाखवत आहे.

आजच्या विज्ञान युगातही हे अभंग सर्वांना प्रेरणादायी ठरत आहेत. संतांच्या या अभंगांवर डॉक्टरेट मिळवून घेताना अनेकांना समाधान लाभत आत्मानंद होतो. या वरून असे सिध्द होते की, अभंग हे अभंग आहेत. ते माळकरी टाळकऱ्यांच्या काम बुडवेपणाचा उद्योग नसुन आत्मोध्दाराचा, संसारो ध्दाराचाही मार्ग आहे सोपा मार्ग आहे. ज्ञानाचे भांडार आहे. अभंगांची गाथा म्हणजे जीवन जगण्याची प्रेरणा आहे. 

सर्व धार्मिक जीज्ञासू अभ्यासू ज्ञानी विज्ञानी लोकांना चालना देणारा, सहज उपलब्ध होणारा प्रांजळ विनामुल्य स्त्रोत: आहे म्हणून सर्वांनी अभंगांचे वाचन करावे मनन करावे. त्यांतील ज्ञानाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करून आत्मा- नंद मिळवून सुखोपभोग घ्यावा.

बाराव्या शतका पासून संत नामदेव, दामाजीपंत, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबार्ड, जनाबांई सखूबाई, संत चोखोबा, गोरोबा, निळोबा, संत तुकाराम महाराज संत जगनाडे महाराज, संत बहीणाबाई महाराज अशा अनेक संतांनी अभंग लिखाणाची गायनाची परंपरा वृद्धींगत केली. आजही गावोगावी मंदिरांत भजनांत आवडीन अभंग गायन होत असत. मराठी चित्रपट नाटक व इतर ठिकाणीही अभंग गायन होत असत.


Sant Dnyaneshwar Sahitya



ज्ञानदेवांचा हरिपाठ


Sant Dnyaneshwar Sahitya in Marathi

     Sant Dnyaneshwar Sahitya in Marathi


 महा विष्णुचा अवतार ॥ सखा माझा ज्ञानेश्वर  ,  ज्ञानियांचा राजा असलेल्या व जगाच्या कल्याणासाठी अवतरीत झालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व अगाच्या कल्याणासाठी महान ज्ञानाचा ठेवा संपूर्ण विश्वातील जनतेला बहाल करून उपकृत करून ठेवले आहे. 

त्यांची ज्ञानेश्वरी जसी वंदनीय आहे. त‌द्वतच अमृतानुभव आणि अभंगांची गाथा देखील वंदनीय आहे त्यांच्या अभंग गाथ्यातील हरिपाठ हा रोज घरोघरी म्हटला जाणारा परिपाठ, ज्ञान संस्कारपाठ आहे ज्ञानाच महान भांडार आहे

हरिपाठातून ज्ञानेश्वरांनी सर्वाना सहज समजेल उमजेल अशा सोप्या भाषेत महान ज्ञान सांगुन माणसांची सुसंस्कृत पणाने वर्तुन संसार सागरा मधून तरून जाण्याची क्षमता कथन केलेली आहे. पांडुरंग परमात्मा-श्रीहरीच्या नामस्मरणाने जीवनोद्धाराचा साधा सोपा मार्ग सांगीतला आहे. 

जन्माला आल्या पासून आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंतच्या जगण्याला त्यांनी क्षण म्हटले आहे. हा क्षणभर तर आपण परमेशवर सानीध्यात घालवला, त्याच स्मरण करत जगलो तर आपला उध्दार होईल त्याच्या नावाचा उच्चार केल्याने हरी हरी म्हणत राहील्याने अगणीत पुण्याचा लाभ होईल व संसार सुखाचा होईल. 

जीवन सुखात जाईल. तेव्हा विनाविलंब त्याची आळवणी करा. चारी वेदं सहा शास्त्र अठरा पुराणं हे सर्व त्या हरीचेच गुण गायला सांगतात. दुधाचे दही व त्याचे मंथन करून, घुसळून लोणी तुप काढतात ना तस सर्व वाचाळ बडबड सोडून हरीच नाव घ्या. तो हरी सर्व चराचरात विराजमान आहे. तो जीवासारखा आहे तसाच देवासारखा आहे. त्यांच्याशिवाय आणखी कोणाचेही चिंतन करू नका.

सत्व रज तम हे त्रीगुण निव्वळ असार अर्थहीन आहेत. परमात्मां सार्थ सगुण असून त्याचा पाठ करणे हाच खरा सुज्ञ विचार आहे. त्या श्रीहरीच चिंतन आपण सगुण-निर्गुण होन्ही स्वरूपोना स्मरून करूयात. अनंत जन्मानंतर आपणाला हा नरदेह लाभला आहे त्याद्वारे पुण्यलाभ करून घेवूया. खरा भाव - नीष्ठा असल्या खेरीज भक्ती करायची म्हणजे व्यर्थ शिणच. आणि हो, भक्ती केल्या शिवाय मुक्ती तरी कशी मिळणार? अंगात बळ नसताना व्यर्थ घमेंड दाखवून उपयोग नाही इकडे तीकडे भटकत भक्तीच ढोंग करण्यापेक्ष्य, या अशास्वत प्रपंचाचा भार वाहण्यात शिनण्यापेक्षा शांत राहीलेलच बर !

श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग जप तप अशा विधी करून अहंकार वाढवण्यापेक्षा आपले कर्तव्य करत हरी गुण गायल्याने संसार सुखकर होईल मन शुद्ध ठेवून श्रीगुरुच्या दर्शनाने देवाची प्राप्ती करावी. त्या श्रीगुरू शिवाय कोणीही आपल्याला हिताचा मार्ग सांगणार नाही त्यांच्या संगतीनेच आपला तरणोपाय होईल. कापुराची वात उजळवून देवाला दाखवल्यावर त्या कापूराचा कोणताही अंश उरत नाही. तस श्रीगुरुकृपेन परमात्म्याची ओळख झाल्यावर आपण सद्रुप होऊन जातो. मोक्षाला - परमसुखाला जाऊन पोहचतो. आणि सर्वत्र सुंदरताचं दिसते. जो त्या परमेश्वराला आठवत नाही तो दैवहीन पातकी समजावा. इतर कुणाचे गुणगाण करणे म्हणजे बडबडच. आत्मा हाच परमात्मा समजून तो सर्वत्र नांदतो हा भाव ठेवूनच वागावे.

संतांच्या संगतीन, शुद्ध मनान रामकृष्ण या मंत्राचा जप करावा इतर बंधनांत न गुंतता श्रीहरीचेच ध्यान करावे. त्या श्रीहरीच्या भजनाची गोडी अनेकांना लाभली. अनेक योग्यांना आपल्या जीवनाचा अर्थ कळला. प्रल्हाद उध्दवाना तो पावला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या श्रीहरीचे नाव सहज सोपे आहे त्याच्या नावाशिवाय जप तप सर्वच व्यर्थ आहेत. जन्माला येवून स्वैर वागत करंटेपणा करणाराला तो रामकृष्ण कसा लाभणार! किंवा श्री गुरूंकडून ज्ञान मिळवले नाही तर त्याला किर्तन योगाचा लाभ होणार नाही सगुण स्वरूपाचे ठायी मौन पाळून ध्यान चिंतन करावे.

अंतरात परमात्याचे चिंतन नसेल तर अनेक तिर्थाच्या यात्रा त्रिवेणी संगमांवर जाऊन काय बर उपयोग. श्रीहरीच नाव घेत नाही तो पापी समजावा. श्रीहरीच्या नावान तीन्ही लोकांचे जीव उदार पावतात अस पुराणप्रसिद्ध वाल्मीक ऋषीनीही सांगीतलेल आहे- नामजप करणाराचे सर्व कुल परंपरागत शुद्ध रहाते त्या नावाने अनंत पापराशीचा नाश होतो. गवताला अग्नी लागल्यास ते गवत अग्नीरूप होत, तसेच हरीच्या उच्चारान सर्व भुते-दोष पळत सुटतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या हरीच्या सामर्थ्याची प्रशंसा कोण करू शकेल. उपनिषदानाही ते शक्य नाही तेथे मानवाची काय कथा

आपला भाव शुद्ध नसेल तर अनेक सिद्धी योग याग जप तप व्रत निर्धारण करण्यात काही अर्थ नाही तस करण्यान उगाच वेळ वाया जाऊन शिण होतो एका परमात्म्याच्या चिंतनानंच सर्व सिद्धींचा लाभ होतो. त्याच्याशी समरस होऊन चिंतन केल्यास कोणतेही व्दैत दुजाभाव शिल्लक रहात नाही: ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीगुरूंनी मला त्या निर्गुणाला ओळखण्याच ज्ञान दिल आहे त्यात रमुन मी चिंतन करतो. व आत्मानंद उपभोगतो.

हरी हरी हरी! हा भगवान शिवानी सांगीतलेल्या महा मंत्राचा जप करणाराला काळाचा काळही स्पर्ष करू नाही त्या पवित्र नावाने पापांच्या अनंत राशीही नष्ट होतात. त्या श्रीहरीसी समरूप झाल्याने राम दमांच्य नाश होतो. तो श्रीहरी चराचरात देहा देहात सूर्याच्या अनंत प्रकाश किरणांसारखाच विराजतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्या नामजपानेच मी मुक्त झालो.

शुद्ध बुद्धीने हरी चिंतन करणारा, साधे सोपे नाम जपणारा तो भाग्यवानच. त्याने उन्मनी समाधीच्या समाधीच्या पलीकडची अवस्था साधली. व सर्व सिद्धी मिळवल्या असे समजावे. संतसंग करून बुद्धी धर्म- श्रीहरीला समर्पित करणाराला दाही दिशांत आत्माराम भरलेला दिसतो. त्याचा देह पवित्र होतो नाम जप तपाच्या सामर्थ्यान चिरंजीव होऊन अनेक लोकल्पांपर्यंत वैकुंठात राहतो. त्याचे सर्व नातलग हरी रूपस्मरण करतात.

मनाच्या मार्गान स्वैर वागणाराला' हरीची प्राप्ती होत नाही. हरीनाम उच्चारणारा स्थीर रहातो. त्याला सर्व तीर्थांच्या दर्शनाचा लाभ केल्याचा अनुभव येतो. वैकुंठाचा लाभ होतो. म्हणून हरीचा संग करावा. राम कृष्णाची सतत आवड धरावी वेद शास्त्र श्रृती हे आवर्जुन त्या हरीचे गुण गाण करतात. मकरंद सेवनात तल्लीन होऊन भ्रमर जसा कमलासी एकरूप होऊन जातो. तसेच भक्त हरीसी समरस होतात. त्यांना आप्त स्वकियांचाही विसर पडतो.

सतत श्रीहरी चिंतन करत संतसंगतीत रहाणा -यांच्या अनेक पापांचा नायनाट होतो. हे हरीनाम अनंत जन्मा चे तारक असून सर्व मार्गात सुलभ-सोपे आहे. ते सर्वश्रेष्ठ आहे. इतर माया योग जप तप धर्मबंधने निष्फळ आहेत नामजप साठी वेळेच काळाच बंधन नाही हे नाम सर्वं दोषांचे हरण करणारे आहे. सर्वांचा उध्दार करणारे आहे. ज्यांची जिव्हा नेहमी हरी उच्चारण करते तो देवासमान श्रेष्ठ आहे रामनामाने अनेक लोक वैकुंठाला गेले. तो सोपा मार्ग आहे.

नियमान हरीस्मरण करणारा भाग्यवानच. सर्व नवविधा भक्तींच फळ त्यांना लाभत. चारी मुक्तींची तेथेच वसती असते. हरीनाम न घेणाराचा जन्मच व्यर्थ. तो ययाचा गिऱ्हाईक समजावा. हरी नाम हे गगना पेक्षाही श्रेष्ठ आहे. सर्व शास्त्रें पुराणे हरी नामाचे महत्व सांगतात. असे हे श्रेष्ठ हरीनाम घ्यायला कोणतेही कष्ट करावे आगत नाहीत मोल खर्चावे लागत नाही निष्ठा निर्धारा . ठेवून त्याचा जप करावा. राम कृष्ण यांनीच हा आदर्शाच मार्ग लोकांना हा खवला आहे

जप तप अनुष्ठान, क्रिया, धर्माचे बंधन सोडून दृढ विश्वास भावनेने सर्व चराचरात भरलेल्या रामकृष्ण चा सतत जप स्मरण करत रहावे कोणत्याही जातपात गोत कुळाच बंधन तोडून भजन करणारयाला वैकुंठात स्थान लाभत त्याची जाणीव नेणीव मावळून निखळ मोक्षाचा लाभ होतो' नामस्मरण करणारा कडे काळ ही ढुंकून पहात नाही. त्या श्रीहरीचे नामस्मण करा असे सांगण्या खेरीज वेदांनाही काहीच सुचत नाही. तो असा सगळीकडे आपले बैकुंठ करून रहातो आहे

श्रीहरीच्या सोप्या नावाचा सतत उच्चार केल्याने प्रत्यक्ष हरीला दया येवून तो आपणाला मोक्षाला नेईन. सर्व शास्त्रांचा अभ्यास करून पाहीला, सर्वसु चा आस्वाद घेऊन पाहीला तरीही असे सौख्य लाभणार नाही. या मायावी संसारात गुरफटुन अर्थ वेळ घाल वण्यपेक्षा, इंद्रीये स्थीर ठेवून शांती दया सागर ईश्वराच चिंतन कराव आणि संजीवन समाधीचा अनुभव घ्यावा सुखी हाव. संतत समाधानी रहाव. संत ज्ञानेश्वर महाराज सर्वांना कळकळीची विनंती करून आग्रहान सांगत आहेत.

श्री संत ज्ञानेश्वरांचा हा हरिपाठ कैक निरक्षर लोकांनाही केवळ ऐकूनच पाठांतर आहे हेच या हरिपाठाच सामर्थ्य आहे सहज साध्या सोप्या भाषेत त्यात संसार सागर तरून जाण्यासाठी, जीवन सुखी करण्यासाठी व मसाला (चिरंतन सुखाला प्राप्त करण्यासाठी महान ज्ञान सांगीतल आहे. या हरिपाठाची सवय करून नियमीत हरिपाठ करून या ज्ञानाचा रोजच्या दुःखमय जीवनात, संसारात सदुपयोग करून सुखाची अनुभुती घ्यावी. संसार सुखाचा करावा. सर्वानी प्रामाणीकतेन वागून, कष्ट करून, सतत त्या परमेश्वराची आठवण ठेवावी तो दयाळू मरमेश्वर आपण सर्वाना यश सुख देणारच!

संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच संत एकनाथांनीही हरिपाठा लिहीला आहे  "sant dnyaneshwar sahitya in marathi" त्याचेही अनेक भक्त श्रध्देन वाचन पठण करतात त्यातूनही सर्वासाठी अनमोल ज्ञानाचा खजीना संपादन केलेला आहे संसारातून तरण्याचा सुखाचा मार्ग दाखवला आहे.
लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या