आदिवासी - क्रांतीकारी | Aadivasi Krantikari in marathi

Aadivasi Krantikari in marathi  आदिवासी क्रांतीकारी  सृष्टीच्या निर्मितीपासून नैसर्गिक साधनसंपत्तीच सजीवांसाठी वरदान लाभलेल आहे. नद्यां नाले, डोंगर, झाडेवेली, पशू पक्षी सर्व चराचराच्या सहाय्यानच मानवांच जीवन आधारीत आहे.


Aadivasi Krantikari in marathi
 Aadivasi Krantikari in marathi

 या निसर्गाच्या सानिध्यात राहणारा माणूस जो आधिपासूनही याच निसर्गसानीध्याच्या सहा-यावर जगत आला आहे. तो आदिवासी म्हणूनच ओळखला जातो. 


Aadivasi Krantikari in marathi


आदि-आदय मुळ रहीवासी तेच आदिवासी. 'Aadivasi Krantikari in marathi' ते कित्येक पिढ्यांचा वारसा जपून अनेक सामाजीक आर्थीक व नैसर्गीक आणी इतरही आघात सहन करून ते स्वाभिमानान जगत आहेत. 

आपल्या स्वतंत्र चालीरीती, परंपरा संस्कृती पिढ्यांपीठ्यांच्या वारसाने सांभाळत आहेत. कष्ट करून, घाम गाळून आपला संसार चालवतात.

आदिवासी हे शुर, धाडसी, काटक पराक्रमी, निडर असतात अशी त्यांची ओळख आहे. ते संघटीत जीवन जगतात. निसर्गाला ते आपला त्राता मानतात दैवत समजतात. स्वतंत्र स्वाभिमानान राहणारे आदिवासी यवनशाही, राजपूत, मराठे व नंतर इंग्रजांच्या अमलाखाली जगत होते.

 भारतात इंग्रजांची राजवट सुरू झाली तेव्हा त्यांच्या दहशतीची झळ आधी आदिवासींनाच बसली. त्यातच गावागावांतील सावकार, भांडवलदार इंग्रज- धार्जिणे लोकही मिजासखोरीन वाड्यावस्त्यांवरच्या गरीब, आदिवासी वर जरब राखून सरकार दरबारातल आपल वजन जपत होते. 

Aadivasi Krantikari info marathi

आणी गरीब, आदिवासी मात्र पोटाला अन्न मिळवण्याच्या आशेन आपल दुःख बाजूला सारून शेठ, सावकार, जमीनदारांच्या घरी मिळेल त्या मजुरीवर कष्टाची कामे करून जगत होते. 

 काही शेतकरी जंगलातील एखादा जमीनीचा तुकडा परंपरेन सांभाळून जगत होते. अडीनडीला, सुखादुःखात शेठ सावकारांकडे त्या जमीनी गहाण Aadivasi Krantikari in marathi ठेवून कर्ज घेत आणी त्यातल उत्पन्न व्याजापोटी देवून गहाण जमीनी सोडवण्याची, परत घेण्या ची आशा बाळगत. 

कामे करून- नैसर्गीक आपत्तीचा सामना करून व्याज भरून थकले तरी त्या जमीनी सावकारांच्या जबड्यातून काही परत मिळत नसत. त्यामुळे आदिवासी गरीबांचे संसार उध्वस्त होत. शेवटी कष्ट ठरलेलेच होते.

सावकारांच्या अशा वागण्यान, अन्याय अत्याचारांनी, स्त्रीयांवरील अत्याचारांनी त्रस्त झालेले लोकं हातात पारंपारीक शस्त्र घेऊन अन्याय, अत्याचारांचा प्रतिकार करायला सीद्ध होत. 

न्यायासाठी झगडणारांना न्याय मिळाला नाही तर ते रानावनां चा आसरा घेऊन, लपून-छपून उपासी- तापासी राहून आपल्या वरील अन्याय अत्याचारांचा सुड घ्यायची संधी शोधायचे.

Aadivasi Krantikari in


 हे लोक गरीबांवर कधीच अन्याय होऊ देत नसत. तर ते सहनही करत नसत. गरिबांवर अन्याय करणारांवर ते कारवाया करत त्यांना लुटून गरिबांना अन्न देत असत. 

मात्र समाज प्रतिष्ठीत लोक त्यांना बंडखोर - दरोडेखोर डाकू ठरवून त्यांच्या विरोधात त्यांना पकडण्या साठी इंग्रजांना मदत करत

आपल्यावरील अन्याय अत्याचारांच्या विरोधात, सावकार इंग्रजांच्या विरोधात कारवाया करून अनेक आदिवासी इंग्रजांच्या अराजकतेच्या विरोधात आवाज उठवून, कारवाया  "Aadivasi Krantikari in marathi"  करूनच ते क्रांतीकारी झाले. त्यांची क्रांती अन्यायाच्या विरोधात अत्याचारांच्या विरोधात होती.

 त्यांचा आवाज स्वाभिमाना साठी होता. समाजबांधवांच्या सुखांसाठी ते झटत होते.

लेखक : डॉ. ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या