निषादराज - गुल | निषादराज - गुहक (केवट) | Nishad Raj Gul- Nishadraj Kevat information in marathi

 Nishad Raj Gul- Nishadraj Kevat information in marathi   निषादराज गुल

भिल हे आदीवासी, मुळवासी असुन त्यांच श्रेष्ठत्व, थोरपण अबाधीत आहे त्यांची निष्ठा महान आणी श्रद्धाही अवर्णनीय आहे पूर्वापार त्यांची परंपरा सन्माननीय आहे. अनेक राजे महा- राजे त्यांना सन्मानान वागवत होते.


Nishad Raj Gul- Nishadraj Kevat information in marathi
 Nishad Raj Gul- Nishadraj Kevat information in marathi



रामायणात माता शबरीचा, केवट यांचा उल्लेख आपणास माहीत आहेच. त्याप्रमाणेच निषादराज गुल हे देखील एक पात्र आहे. जे निषाद भिलांच आहे.

Nishad Raj Gul- Nishadraj Kevat information in marathi

गुल हे निष्ठावान, पराक्रमी, सद्प्रवृत्तीचे होते. शुरवीर धाडसी होते. ते लहाणशा राज्याचे राजे होते. त्यांच्याजवळ स्वतःच सैन्य दळ होत. ते सर्व सैनीकही पराक्रमी काटक, निष्ठावान होते. 

गुल यांच्या आश्रयान त्यांच्या नगरा सन्नीध विश्वामित्र व इतर ऋषी आश्रम करून रहात होते. ते निर्भय होते. ऋषींनी यज्ञ याग इतर धर्मकार्य करण्याच्या वेळी गुल हे त्यांना सर्व प्रकारची मदत करायचे. त्यांच्या यज्ञांच रक्षण करायचे.

विश्वामित्रांनी आताही यज्ञकार्याच आयोजन केलेल होत. मात्र यावेळी त्यांनी यज्ञाच्या रक्षणासाठी अयोध्यापती दशरथ राजांच्या मुलांना राम-लक्ष्मणांना पाचारण करून ती  'Nishad Raj Gul- Nishadraj Kevat information in marathi' जबाबदारी सोपवली होती. मात्र गुल यांना साध आमंत्रणही दिल नव्हत. गुल यांच्या कानावर दशरथ पुत्रांची किर्ती आलेली होतीच. 

त्यांनाही आपणास भेटता येईल अशा आकांक्षेवर ते आमंत्रणाची वाट पहात होते. मात्र आमंत्रण काही आलनाही. अगदी जवळचे असून, आतापर्यंत त्यांना संरक्षण व सहकार्य, परोपकार केलेले असूनही साध आमंत्रणही देवू नये! हा जणू सर्व निषादांना आपला अपमानच वाटला. सर्वांच्या मनात तसा रागच आला. मात्र गुल यांनी स्वत: संयम राखून इतर सर्वांनाही शांत केल.

यज्ञ सुरू झाला. सर्व बिधी होऊ लागल्या. यावेळी ताडका नावाच्या राक्षसीणीने तो यज्ञ उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राम आणी लक्षमणान तिला ठार मारल नी यज्ञाच रक्षण केल. यज्ञ संपन्न झाला. राम लक्ष्मणांच कौतुक झाल. 

निषादराज गुल यांना जेव्हा ताडकाला ठार केल्याची वार्ता समजली तेव्हा, आपल्या हातून राक्षसी, स्त्री हत्या घडण्यापासून आपण वाचलो! अस त्यांनी समाधान मानल, आणी आपल्या आराध्य-भगवान शंकरांचे आभार मानले.

राम लक्ष्मणान ताडकाला मारल, स्त्री हत्या केली. पुढे जणू त्याचा शाप लागूनच रामाला पत्नीचा, सितेचा वियोग घडला तसेच रामासोबत वनवासात गेलेल्या बंधू लक्ष्म णालाही पत्नीचा वियोग घडला असावा का?


Nishadraj Kevat information in marathi


निषादराज - गुहक (केवट)

पवित्र गंगा नदिच्या काठावर श्रृंगवेरपूर येथे कोळ्यांची. -निषादांची वस्ती होती. गुट्टक नावाचा त्यांचा मुखीया-राजा आपल्या समाजबांधवांना त्यांच्या कुटुंबांना आपलचं कुटुंब समजून वागवत असे. 


Nishad Raj Gul- Nishadraj Kevat information in marathi
 Nishadraj Kevat information in marathi

                                                     
तेथील सर्व माणसे आपापल्या नावां चालवून प्रवाशांना या तिरावरून त्या तिरावर नेवून देण्याचा व्यवसाय करायचे. व समाधानाने जगायचे.

महर्षी वाल्मीक ऋषी हे देखील त्यांच्याच निषाद जमातीतील होते. त्यांनी यापुर्वि महान तपश्चर्या करून अलौकीक ज्ञान मिळवलेले होते. त्या ज्ञानाच्या प्रभावानेच त्यांनी रामायण हा महान काव्यग्रंथ लिहून प्रसिद्धी मिळवलेली होती. 

आपल्या वंशातील या महान सत्पुरूषांचा स्वाभिमान ते सर्व निषाद आत्मीयतेन जपत होते. तसेच त्यांनी लिहिलेल्या रामायणाच्या काव्यानुसार खरोखरच Nishad Raj Gul- Nishadraj Kevat information in marathi भगवंतांनी राम अवतार घेतला होता नी त्यानुसार वर्तल होते. रामांच थोर सद्गुण, सौंदर्याची, पराक्रमांची सुकीर्ती चहूकडे पसरत होती.

एकदा गुहक हे आपल्या नावेतून काही साधुना पैलतीरावर घेवून जात असताना ते आपापसात -श्रीरामांच्या थोरवीचे गुणगाण करत होते. ते ऐकूनच गुहक यांच्या पवित्र मनात रामांविषयी आदर निर्माण झाला. व पवित्र -श्रद्धा जडली. गुहक यांना लोकं केवट नावानेही ओळखत होते. ते रामांच्या येण्याची मोठ्या आतुरतेने वाट पहात होते. त्यांना खात्री होती की एखादा दिवस भाग्याचा उगवून रामांची भेट मला घडवून देईन!

अयोध्येत पित्याच्या वचनांच पालण करण्यासाठी रामांनी वनवासाचा रस्ता धरला. त्यांच्या सोबत पत्नी सीता व बंधू लक्ष्मणही होते. संपूर्ण अयोध्या शोकसागरात बुडाली होती. 

 रामसीता व लक्ष्मणा सह चौदा वर्षांचा वनवास भोगायला निघाले होते. आज ते गंगातटावर आले होते. व त्यांच्या येण्याची वार्ता निषादराज गुहकांना समजली तेव्हा त्यांचा आनंद गगनातही मावत नव्हता त्यांनी आपले सर्व गावकरी जमा केले. त्यांना रामांच्या भेटीसाठी जाण्याची उत्सुकता सांगीतली सर्वांनी आनंदान तयारी केली. सर्व आप्त स्वकीय वसमाज बांधवांसह त्वरीत तयारी करून हातांत फुलें फळें कंदमुळे घेवून पारंपारीक वादयं वाजवत -श्रीरामांच्या भेटीला आले.

श्रीरामांचे सुंदर श्री मुख न्याहळून पाहताना ते स्वताच भान विसरले' हातांतील फुले फळे हातात जसेच्या तसेच ठेवून ते फक्त पहातच राहीले. रामांनी त्यांची ती अवस्था ओळखली. त्यांच्या दंडाला धरून त्यांनी गुहंकांना आपल्या जवळ बसवला मोठ्या आत्मियतेन त्यांची विचारपूस-परिचय करून घेतला. व सर्व कुशल मंगल विचारले. तेव्हा निषादराज गुहक नम्रतेन व नतमस्तक होत म्हणाले,

हे प्रभू! आपल्या कृपा आशिर्वादान सर्व कुशल आहे. मंगल आहे. आपल्या पवित्र दर्शनान मी धन्य झालो. सर्व परिवार व आप्त स्व- कियांसह आपल्याला शरण आलो आहे. तेव्हा श्रीरामांनी स्मित हास्य करून त्यांच स्वागत केल. त्यांच्या सोबतच्या सर्व लोकांचही तसच स्वागत केल. रामांच्या त्या पवित्र स्वागतान त्या सर्वांना धन्यता वाटली. त्यांनी नम्रतेन वंदन केल.

गुहकांनी रामांना आपल्या घरी चालण्याचा आग्रह केला रानावनात काट्यांकुट्यात ऊनपावसात अस वणवण भटकण्यापेक्षा आमच्या घरी चला आम्ही आपली सर्व व्यवस्था करतो. आपला पूर्ण वनवास येथेच काढा व मग सुखरूप अयोध्येला परत जा! अस पुन्हा पुन्हा सांगीतल. तेव्हा रामांनी त्याला धिर देवून समजवल आपली. सगळी कथा सविस्तर सांगली व बनातच रहाणे योग्य आहे हे पटवून दिले. तेव्हा मात्र गुहकाचा नाईलाज झाला. तरिही त्याने हार मानली नाही. त्याने काड्या - लाकडे जमवले त्यावर झाडांची पानें, मऊ गवत अंथरून सुंदर शय्या करून दिली. व सुमधुर फळांचे द्रोण भरून ठेवले. व त्यांच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था करून दिली.

गुहकांनी राम लक्ष्मण सीता यांच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था करून दिली तरी त्यांच्या सहवासासून निघायला गुहकांच मन धजावत नव्हता त्यांचा वियोग नकोसा वाटत होता. म्हणुन ते आपल्या काही साथिदारांना घेवून, दूर अंतरावर बसून पहारा देत बसले. व मनाने 'रामांच स्वरूप आठवून ध्यान- चिंतन करू लागले

पहाटे सर्व विधी आटोपून राम सीता लक्ष्मणांनी पुढील प्रवासाला निघायची तयारी केली तेव्हा तेव्हा रात्रभर स्वानंदात मग्न असलेले, रामचिंतनात मग्न असलेले गुहक खिन्न झाले. त्यांनी रामांना आणखी काही दिवस राहण्याचा आग्रह करून पाहीला मात्र ते पुढे जाणारच होते. तेव्हा त्यांनी गुह काला त्यांची नाव आणायची व आपणाला पैल तिरावर नेवून - पोहचवायची विनंती केली. तेव्हा तो म्हणाला,

प्रभू! मी आपले वर्म जाणले आहे. आपल्या चरणधुळीच्या विषयी लोक म्हणतात की, त्या चरण धुळीने दगडाची बाई झाली होती. माझी नाव तर लाकडाची आहे. ती दगडापेक्षा मऊ आहे. जर आपण तीला स्त्री बनवून एखादया ऋषीची पत्नी बनवून देवून टाकले तर, मी माझी दिनचर्या कशाच्या भरवशावर चालवू?

गुहकान जरी अस स्पष्टीकरण दिल तरी त्याच्या आतला सद्भाव मात्र वेगळाच होता. यानिमित्ताने तरी त्यांनी-रामानी अधिक काळ इथेच थांबावे, तसेच या निमित्ताने तरी रामोचे चरण धुवायला मिळावेत. अस त्यांना वाटत होता त्यांचा तो पवित्र भाव जाणून रामांनी त्यांना संमती दिली. गुहकांनी त्यांचे पाय मोठ्या. आदराने व सद्‌भावनेनें धुतले, तेव्हा आकाशातून देवांनीही फुलांचा वर्षाव करून स्तुती केली. व गुहकाच्या निष्ठा-भक्तीची, शुद्ध स‌द्भावाची प्रसंशा केली. सर्व निषादांनीही रामांच दर्शन घेतले व स्वतःला धन्य समजले. पुढे त्या तिघांना गुहकांनी आपल्या नावेत बसवून पैलतीरावर नेले व दिवसभर त्यांच्या सोबत चालून रात्रीच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था करून दिली. व रोज त्यांच्या सोबत चालून त्यांना कंदमुळे आणुन देणे, त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करणे, त्यांच्या मार्गातील काही काटी कुटी साफ करणे करू लागले.

पुढे ते सर्व जणं प्रयाग तिर्थावर आले. तिथे सर्वांसोबत गुहकांनाही अनेक ऋषी मुनींच्या दर्शनाचा लाभ झाला. अनेक ऋषींनी इतर लोकांनी राम लक्ष्मणा सोबत गुहकांचेही आदरातिथ्य सत्कार केले भेटी दिल्या आलींगन दिले. त्याने गुहकाला धन्य वाटले.

आता रामांनाही पुढिल प्रवासाला निघायचे होते. त्यांनी गुहकाला अनेक प्रकारे समजवले. त्यांच्या मनाच सांत्वन केल आपल्या कर्तव्याची जाणीव करून देवून परत जायला राजी केल. तेव्हा वियोग सहन होत नव्हता तरी नाईलाजान रामांच रूप डोळ्यात साठवून रामांना वंदन करून वळून पहात व पुढे चालत जड अंतकरणान गुहक आपल्या घराकडे परतले.


 Nishad Raj Gul- Nishadraj Kevat

इकडे मामांच्या घरून परत आलेल्या भरताला सर्व वृत्तांत समजला तेव्हा त्याने राज्य तर स्विकारले नाहीच उलट रामांना परत आनायच्या हेतुने वनवासात निघाला. त्यांच्या सोबत सर्व नगरवासीही निघाले. काही लोकं हातातल्या काठ्यां शस्त्रानी मार्ग मोकळा करून देत होते. भरत असा सैनीक व नगरवासी लोकांच्या सोबत लगबगीन येत असल्याच काही निषादांना दिसल. त्यांनी धावतच जाऊन गुहकांना ही वार्ता सांगीतली. ती ऐकताच गुहकांना वाटले की भरतान आता अयोध्येचे राज्य स्विकारले असणार व तो आता रामांना ठार मारायलाच निघाला असणार! असे समजून त्यांनी आपल्या सर्व साथिदारांना हातात शस्त्रं घेवून भरताचा प्रतिकार करायला सिध्द केल. व एका समंजस माणसाला भरताकडे त्याचा काय हेतू आहे ? हे जाणुन घेण्यासाठी पाठवले. तेव्हा समजले की भरत रामाला परत आणायला, क्षमा याच ना करायला जात आहे तेव्हा सर्वांसह गुहक सामोरा गेले व भरताच स्वागत केल. सर्व अयोध्या वासीयांच स्वागत केल. व सर्वांना आग्रहान मुक्कामाला ठेवून घेतल. सर्वांच्या मुक्कामाची व्यवस्थीत सोय केली. व पहाटे त्यांना घेवून पुढील प्रवासाला निघाले.

रामाची - भारताची भेट झाली. भरतान रामांना परत येण्याचा खुप आग्रह केला तरी उपयोग झाला नाही भरताला व सर्व अयोध्यावासीयांना समजावून, सांत्वन करून परत पाठवले व ते सीता लक्ष्मणा सह पुढील प्रवासाला लागले. खीन्न झालेला भरत सर्व अयोध्या वासीयांच्यासमवेत परत यायला निघाला गुडकांनी त्याला धिरं देवून परत फिरवले पुन्हा आपल्या घरी आणुन त्या सर्वांची सर्व व्यवस्था करून मुक्कामाला ठेवले. पहाटे भरतान गुहकांचा चांगला सन्मान केला. 

त्यांचे आभार मानले व जड अंतःकरणान अयोध्येला निघाला. भरताच्या निमि- त्यान आपल्याला रामांचे पुन्हा दर्शन झाले. याच गुहकांना खुप खुप समाधन झाल. त्यांनी भरताचे पुन्हा आभार मानले व त्यांना निरोप दिला.

पुढे राम वनात निघून गेले. रावणान सीता पळवून नेली. रामान वानर सेनेच्या सहाय्यान लंकेवर स्वारी करून रावणाला ठार केले व सीतेला सोडवून आणले. राम सीता लक्ष्मण वनवास पूर्ण करून अयोध्येत परत आले त्यांनी सर्व नगरात आनंद सोहळा साजरा केला. 

त्या समारंभासाठी इतर मान्यवरां प्रमाणेच खास दूत पाठवून निषादराज गुहांनाही सन्मानान आमंत्रीत करण्यात आल व त्यांचा चांगला सन्मान सत्कार करण्यात आला. रामांनी स्वता वस्त्रे भूषणं प्रसाद देवून त्यांचा सन्मान केला. व सर्व मान्य वरांचा सन्मान केल्यानंतर रामांनी सर्वांना उद्देशून म्हणाले, आपणा सर्वांनी आम्हाला सहकार्य केले धन्यवाद ! आता आपण सर्वजण माझे मित्र आहात, भरत लक्ष्मण शत्रूघ्नां सारखे भाऊ आहात. अयोध्येत नेहमी येणे जाणे ठेवा. आपापले कर्तव्य पालण करताना धर्माचरण करा! सदा आनेदान रहा. वैरभाव ठेवू नका. प्रभू सर्वांचे कल्याण करो!

अयोध्येचा राजा रामचंद्र यांकडून मान सन्मान सत्कार घेवून गुहकाला स्वतःचे जीवन धन्य झाल्यासारखे वाटले. ते कृतार्थ झाले व रामांचे गुणगाण गात गात आपल्या घरी आले. 

आपल्या परिवाराला, समाज बांधवांना इष्टमीत्र त्यांना रामरायांकडून मिळालेला सन्मान, वस्त्र आभूषणे दाखवत रामांचा थोरपणा सांगू लागले. राम सेवेचे महत्व सांगू लागले. सर्वांना रामांची भक्ती करत स्मरण करत सत्कार्य करायची प्रेरणा देत आयुष्यभर सुखान जगले व स्वताला  "Nishad Raj Gul- Nishadraj Kevat information in marathi" राम सेवक समजून समाधानान स्वर्गाला गेले' व अमर झाले.

निषादराज यांनी प्रभू रामांची निष्ठेन सेवा भक्ती केली ते रामाचे पहिले सेवक भक्त झाले. सर्व समाज बांधतांना कर्तव्य भक्तीची प्रेरणा आहे. स्फुर्ती आहे.

लेखक : ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या