श्री क्षेत्र पंचलिंग - पलासखेडे काकर | ANCIENT MAHADEV MANDIR PANCHALING


ANCIENT MAHADEV MANDIR PANCHALING  ओम नमः शिवाय ,नमस्कार  मित्रांनो, आज आपण भगवान शंकराचे दुर्मिळ अशे व प्रभू श्रीरामांनि स्थापन केलेले असे पंचलिंग , पासलिंग महाराज याविषयी माहिती आणि महती जाणून घेऊ
                                     

MAHADEV MANDIR PANCHALING
MAHADEV MANDIR PANCHALING
         

ANCIENT MAHADEV MANDIR PANCHALING  

पासलिंग हे गाव जिल्हयातील जामनेर तालुक्याच्या देऊळगाव गुजरी या दोन्ही गावांच्या सीमारेषेवरून वाहात जाणारी सूर नदी पळसखेडा काकर या लहानशा गावाशेजारी एक किमी अंतरावरून वाहत जाते.
 
तिथे या सूरनदीच्या पात्रातच श्री. क्षेत्र पंचलिंग आहे, हे महादेवाचे पवित्र स्थान आहे. वसाळ्यात सर्वत्र हिरवळ दाटून येते. झाडे वेली पाबहरून येतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. 'ANCIENT MAHADEV MANDIR PANCHALING'  श्रावण महिन्यात तर निसर्गाला बहरच येतो. 
                                          
MAHADEV MANDIR PANCHALING
श्री पंचलिंग महादेव मंदिर (नदीपात्र)

झाडे, वेली, पशुपक्षी, नद्यानाले, यासर्वांसह सर्व मानवजातीला अत्यानंदाचा उत्साह संचारतो. या सर्व आनंदासह श्रावण महिन्यात सण उत्सवांचीही सुरुवात होते. सर्वांच्या मनात सात्वीक सद्भावना फुलारतात. मन पारंपरिक संस्कृतीने अभिप्रेत असलेल्या स्थानांच्या ओढीत गुंतते. 
                                          
MAHADEV MANDIR PANCHALING
नदीपात्रातील शिवलिंग

पौराणीक ऐतिहासीक काळातील एखाद्या स्थळांविषयी तेथील सुंदरता सात्विकता व महत्त्वता जाणून घ्यायला उत्सुक होते. अशाच एका सुंदरशा पवित्र स्थळांविरयीची माहिती आपण आज घेऊ. मराठवाडयातील अजिंठ्यांच्या डोंगरात जाईचा देव या महानुभाव पंथीय धार्मिक स्थळाच्या जवळपास उगम पाऊन व जवळ व्याच खांदेश आणि विदर्भाला जोडून वाहणारी सूनही सुळझुळ वाहत जाऊन पुढे स्वतंत्र खांदेशात समावते. 
                                         
MAHADEV MANDIR PANCHALING
एकाच पिंडीवर पाच आकृत्या = पंचलिंग

मोताळा तालुक्यातल्या धामगाव बढे आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याच्या देऊळगाव गुजरी या दोन्ही गावांच्या सीमारेषेवरून वाहात जाणारी सूर नदी पळसखेडा काकर या लहानशा गावाशेजारी एक किमी अंतरावरून वाहत जाते. 

ANCIENT MAHADEV MANDIR 

  
तिथे या सूरनदीच्या पात्रातच श्री. क्षेत्र पंचलिंग आहे, हे महादेवाचे पवित्र स्थान आहे. मगवान श्रीराम अयोध्येतून बनवासाच्या चौदा वर्षासाठी निघाले. ते फिरत फिरत दंडकारण्यात आले. 

या दंडकारण्यात त्यांच्या पवित्र सहवासाने पुनित झालेल्या अनेक स्थानकांविषयीची माहिती आजही आपण पाहतो ऐकतो. असेच ते लक्ष्मण व सीतेसह या सूर नदीच्या तीरावरून जात असता रमणीय स्थान पाहून इथे काही वेळेकरिता थांबले. येथील रमणीय स्थानात त्यांनी आपले आराध्य भगवान शंकराची पूजा करण्यासाठी नदीच्या पात्रातच शिवलिंगाची स्थापना केली व पूजा आराधना ANCIENT MAHADEV MANDIR PANCHALING  करुन काही काळ तेथे राहून पुढील प्रवासाला निघून गेले मात्र या स्थानला पावित्र्याचं वरदान देऊन गेले. जे आजतागायतही अजरामर आहे. 
MAHADEV MANDIR PANCHALING
MAHADEV MANDIR PANCHALING


 येथील शिवस्थानाचे वैशिष्ट्य असे की, येथील शिवलिंग स्वतः श्रीराम प्रभूंनी स्थापलेले आहे. नदीच्या मुख्य प्रवाहात असल्याने अनेक पावसाळे, पूर साठूनही ते अबाधीत आहे. सदर शिवलिंगावर पाच शंभू आकृती आजही स्पष्ट पाहावयास मिळतात. यावरूनच हे पंचलिंग नावाने रूढ झाले. एकच लिंगात पाच शिवप्रतिमाचं दर्शन होणार हे स्थान दुर्मीळ आणि अत्यंत पवित्र आहे. येथून थोड्याच अंतरावर जागा दाखवली जाते त्याला सीतेची न्हाणी म्हणतात. सध्या तिथे काहीही नसले तरी त्या जागेचं महत्त्व सांगितल्या जातं. 
MAHADEV MANDIR PANCHALING
MAHADEV

गावापासून लांब नदीच्या प्रवाहात, निसर्ग सौंदर्यानं नटलेलं. चिंचेच्या पुरातन वृक्षराजीच्या गर्द दाट सावलीत अगदी निवांत हे स्थान ऋषीमुनींनी तपश्चर्या करण्याच्या स्थानासारखच पवित्र आश्रमवत असल्याने पूर्वी इथे काही ऋषी तूल्य महात्म्यांनी तप साधना करून सहवास केलेला आहे. 
MAHADEV MANDIR PANCHALING
मंदिराबाहेरील शिवपिंड


अशा काही महात्म्यांच्या समाधी येथे आहेत. इतर स्थानांसारखी अतिभव्यता दिवसा वर्दळ गर्दी येथे दिसत नसली तरी रमणीय शांतता व स्वर्गीय पवित्रता ओतप्रोत असल्याने सर्वांच्याच मनाला तृप्ती लाभते. 
MAHADEV MANDIR PANCHALING
मंदिराच्या परिसरातील चिंचेचे घनदाट वृक्ष



भक्तांच्या इच्छेला पावणारा हा देव "असल्याने अनेकांच्या मनोकामना पूर्ण करणारे हे विश्वसनीय स्थान आहे. 

विशेष म्हणजे संतान प्राप्तीची इच्छा पुरवणारे हे इच्छापूर्ती स्थान असल्याने मराठवाडा खांदेश व विदर्भातील अनेक जाती धर्मातील भाविकांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. 
MAHADEV MANDIR PANCHALING
वरण बट्टी चा प्रसाद ग्रहण करताना भाविक


MAHADEV MANDIR PANCHALING  

श्रावण सोमवार महाशिवरात्र व इतर अनेक शुभ दिवशी येथे हजारो भाविक श्रद्धेने येतात. येथील पुजारी श्री हभप वसंतराव महाराज राठोड हे येणाऱ्या भाविकांना या स्थानाविषयीच्या पावित्र्याची माहिती सांगतात. 



आपल्या संस्कृती पुराणकाळातील खुणा जाणून शांतता, पावित्र्याच्या सानिध्यात येऊन मन प्रसन्न होतं. बुलडाण्यापासून ४५ किमी जामनेहून ४० कि.मी. बोदवडहून ३० किमी "ANCIENT MAHADEV MANDIR PANCHALING"   अंतरावर पळासखेडा काकर येथे येता येते व येथून १ किमी वर. हे पवित्र स्थान आहे.

श्रावण सोमवार  व इतर दिवशी येथे अनेक श्रद्धाळू मोठ्या श्रद्धेने येत आहेत. 
लेखक : - डॉ. ज्ञानेश्वर जाधव तोरणाळे, जि. जळगाव, ९४०३११९०८२ .
MAHADEV MANDIR PANCHALING
शिवमंदिर


मित्रानो  , व्हिडीओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या